Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय २१

श्रीगणेशाय नमः जयजयाजी जगन्नायका ॥ जगज्जनका जगत्पाळका ॥ विश्व व्यापूनि अवशेषका ॥ विश्वंभर म्हणविसी ॥१॥ जरी सकळ विद्यांचे भरणें ॥ करिसी कायावाचामनें ॥ तरी मीच काय विश्वार्तीनें ॥ उरलों असें महाराजा ॥२॥ जरी मी असें विश्वांत ॥ तरी पाळण होईल सहजस्थितींत ॥ ऐसें असोनि संकट तुम्हातें ॥ कवण्या अर्थी घालावें ॥३॥ परी मम वासनेची मळी ॥ रसनांतरी हेलावली ॥ तयाचीं सुकृत फळें जीं आलीं ॥ तीं तुज पक्क ओपीत महाराजा ॥४॥तरी तेंही तुज योग्य भूषणस्थित ॥ मज न वाटे पंढरीनाथ ॥ परी सूक्ष्म शिकवीत भक्तां मात ॥ मोक्षगांवांत प्रणविसी ॥५॥ तरी आतां असो कैसें ॥ स्वीकारिलें बोबड्या बोलास ॥ मागिले अध्यायीं सुधारस ॥ गोरक्ष मच्छिंद्र भेटले ॥६॥भेटले परी एकविचारीं ॥ गुरुशिष्य असती त्या धवळारी ॥ नानाविलासभोगउपचारी ॥ भोगताती सुखसोहळे ॥७॥ शैल्यराजनितंबिनी ॥ मुख्य नायिका कीलोतळा स्वामिनी ॥ मोह दर्शवी गोरक्षालागुनी ॥ स्वामिनी ॥ मोह दर्शवी गोरक्षालागुनी ॥ स्वसुताहूनि आगळा ॥८॥आसन वसन भूषणांसहित ॥ स्वइच्छें तया उपचारीत ॥ पैल करुनि मीननाथ ॥ संगोपीत गोरक्षबाळा ॥९॥ जैसा चातकालागी घन ॥ स्वलीलें करी उदकपान ॥ कीं तान्हयाला कासें लावून ॥ पय पाजिती गौतमी ॥१०॥ पाजी परी कैशा स्थिति ॥ उभवोनि महामोहपर्वतीं ॥ वत्सासी लावोनि कांससंपत्ती ॥ शरीर चाटी तयाचें ॥११॥ त्याची नीतीं कीलोतळा ॥ संगोपीत गोरक्षबाळा ॥ भोजन घालीत अपार लळा ॥ तान्हयातें पाजीतसे ॥१२॥ भलतैसें ललितपणें ॥ श्रीगोरक्षा घाली भोजन ॥ निकट मक्षिका उडवोन ॥ निजकरें जेववीतसे ॥१३॥ नाना दावोनि चवणे ॥ अधिकाधिक करवी भोजन ॥ ऐसिये परी माउलपण ॥ नित्य नित्य वाढवी ॥१४॥ ऐसा असोनि उपचार ॥ बरें न मानी गोरक्ष अंतरें ॥ चित्तीं म्हणे पडतो विसर ॥ योगधर्माविचाराचा ॥१५॥ऐसें चिंतीत मनें ॥ मग भोग तो रोगाचि जाणें ॥ जेवीं षड्रस रोगियाकारणें ॥ विषापरी वाटती ॥१६॥ मग नित्य बैठकीं बैसून ॥ एकांतस्थितीं समाधान ॥ धृति वृत्ति ऐसी वाहून ॥ करी भाषण मच्छिंद्रा ॥१७॥ हे महाराजा योगपती ॥ आपण बसता या देशाप्रती ॥ परीं हें अश्लाघ नाथपंथीं ॥ मातें योग्य दिसेना ॥१८॥ कीं पितळधातूचें तगटीं हिरा ॥ कदा शोभेना वैरागरा ॥ कीं राव घेऊनि नरोटीपात्रा ॥ भोजन करी श्लाघ्यत्वें ॥१९॥ श्रीमूर्ति चांगुळपणें ॥ महास्मशानीं करी स्थापन ॥ तैसा येथें तुमचा वास जाण ॥ दिसत आहे महाराजा ॥२०॥ पहा जी योगधर्मी ॥ तुम्ही बैसलां निःस्पृह होवोनि ॥ तेणेंकरुनि ब्रह्मांडधामीं ॥ कीर्तिध्वज उभारिला ॥२१॥ मृत्यू पाताळ एकवीस स्वर्ग ॥ व्यापिलें आहे जितुकें जग ॥ तितुकें वांच्छिती आपुला योग ॥ चरणरज सेवावया ॥२२॥ ऐसी प्रज्ञा प्रौढपणीं ॥ असोनि पडावें गर्ते अवनीं ॥ चिंताहारक चिंतामणी ॥ अजाग्रीवी शोभेना ॥२३॥ तरी पाहें कृपाळु महाराज ॥ उभारिला जो कीर्तिध्वज ॥ तो ध्रुव मिरवेल तेजःपुंज ॥ ऐसें करी महाराजा ॥२४॥ ऐसें झालिया आणिक कारण ॥ तुम्ही पूर्वीचे अहां कोण ॥ आला कवण कार्याकारण ॥ कार्याकार्य विचारा ॥२५॥ कीं पूर्वी पहा ब्रह्मस्थिती ॥ श्रीकविनारायणाची होती ॥ लोकोपकारा अवतार क्षितीं ॥ जगामाजी मिरवला ॥२६॥ आपण आचरलां तपाचरण ॥ शुभमार्गा लावावें जन ॥ धर्यपंथिका प्रज्ञावान ॥ जगामाजी मिरवावया ॥२७॥ ऐसें असतां प्रौढपण ॥ ते न आचारावे धर्म ॥ मग जगासी बोल काय म्हणवोन ॥ अर्थाअर्थी ठेवावे ॥२८॥ जात्या वरमाया आळशीण ॥ मम काय पहावी वर्‍हाडीण ॥ राव तस्कर मग प्रजाजनें ॥ कोणे घरी रिघावें ॥२९॥ कीं अर्कचि ग्रासिला महातिमिरीं ॥ मग रश्मी वांचती कोणेपरी ॥ उडुगणपती तेजविकारी ॥ जात्या होती तेवीं तारागणें ॥३०॥ तेवीं तुम्ही दुष्कृत आचरतां ॥ लोकही आचरती तुम्हांदेखतां ॥ अवतारदीक्षेलागीं माथां ॥ दोष होईल जाणिजे ॥३१॥ तरी आधींच असावें सावधान ॥ अर्थाअर्थी संग वर्जून ॥ अंग लिप्त मलाकारणें ॥ तिळतुल्यही नसावें ॥३२॥ नसतां ओशाळ कोणापाठीं ॥ कळिकाळातें मारूं काठी ॥ निर्भयपणें महीपाठीं ॥ सर्वां वंद्य होऊं कीं ॥३३॥ तरी महाराजा ऐकें वचन ॥ सकळ वैभव त्यजून ॥ निःसंग व्हावें संगेंकरुन ॥ दुःखसरिता तरवी ॥३४॥ प्रथमचि दुःखकारण ॥ विषयहस्तें बीज रजोगुण ॥ रजा अंकुर येत तरतरोन ॥ क्रोधपात्रीं हेलावे ॥३५॥ मग क्रोधयंत्रीं तृतीयसंधी ॥ मदकुसुमें क्रियानिधी ॥ मदकुसुमांचे संधीं ॥ मत्सरगंध हेलावे ॥३६॥ गंधकुसुमें ऐक्यता ॥ होतांचि दैवे विषयफळता ॥ मग विषयफळीं अपार महिमता ॥ मोहर शोभें वेष्टीतसे ॥३७॥ मग वेष्टिलिया मोहर अंतीं ॥ दैवें फळें पक्कपणा येती ॥ मग तीं भक्षितां दुःखव्यावृत्तीं ॥ यमपुरी भोगावी ॥३८॥ मग तें शिवहळाहळाहूनि अधिक ॥ कीं महा उरगमुखींचे विख ॥ मग प्राणहारक नव्हे सुख ॥ दुःखाचे परी सोशीतसे ॥३९॥ मग दुःखाचिये उपाधी ॥ शोधीत फिराव्या ज्ञानऔषधी ॥ तरी प्रथम पाऊल कृपानिधी ॥ भिवोनियां ठेवावें ॥४०॥ तरी आतां योगद्रुमा ॥ चित्तीं निवटोनि विषयश्रमा ॥ सावधपणें योगक्षेमा ॥ चिंता मनीं विसरावी ॥४१॥ ऐसी विज्ञापना युक्तिप्रयुक्तीं ॥ करुनि तोषविला मच्छिंद्रयती ॥ तंव निवटूनि विषयभ्रांती ॥ विरक्तता उदेली ॥४२॥ मग म्हणे वो गोरक्षनाथा ॥ तूं जें बोललासी तें यथार्था ॥ निकें न पाहती अशा वृत्ता ॥ भ्रष्टदैवा दिसेना ॥४३॥ तरी आतां असो कैसें ॥ जाऊं पाहूं आपुला देश ॥ ऐसें म्हणोनि करतळभाष ॥ गोरक्षकातें दीधली ॥४४॥ कीं गंगाजळनिर्मळपण ॥ परी महीचे व्यक्तकरोन ॥ गढूळपणें पात्र भरुन ॥ समुद्रातें हेलावे ॥४५॥ भाक देऊनि समाधान ॥ चित्तीं मिरवी गोरक्षनंदन ॥ मग गुरुशिष्य तेथूनि उठोन ॥ पाकशाळे पातले ॥४६॥ पाकशाळे करुनि भोजन ॥ करिते झाले उभयतां शयन ॥ कीलोतळामेळें मच्छिंद्रनंदन ॥ शयनीं सुगम पैं झाले ॥४७॥ झाले परी मच्छिंद्रनाथ ॥ कीलोतळेतें सांगे वृत्तांत ॥ म्हणे मातें गोरक्षनाथ ॥ घेऊनि जातो शुभानने ॥४८॥ जातो परी तव मोहिनी ॥ घोटपळीत माझे प्राणांलागुनी ॥ त्यातें उपाय न दिसे कामिनी ॥ काय आतां करावें ॥४९॥ येरी म्हणे तुम्ही न जातां ॥ कैसा नेईल कवणे अर्थी ॥ मच्छिंद्र म्हणे मज सर्वथा ॥ वचनामाजी गोंविले ॥५०॥