Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय १५

श्रीगणेशाय नमः जयजयाजी जगत्पालका ॥ मुनिमानसचकोरमृगांका ॥ कृपांबुदातया पूर्णशशांका ॥ ग्रंथादरीं येई कां ॥१॥ मागील अध्यायीं कथन ॥ तुवां वदविलें कृपा करुन ॥ गर्तकूपीं अग्निनंदन ॥ गोपीचंदें घातला ॥२॥ घातला परी कैसा लाग ॥ कीं कोठें नाहीं मूसमाग ॥ जैसा शंकर गेल्यामाग ॥ फसवूनि त्यासी वरियेलें ॥३॥ असो पुढें आतां श्रोती ॥ श्रवण करावी रसाळ उक्ती ॥ सिंहावलोकनीं घेऊनि गती ॥ मागील कथा विलोका ॥४॥ बद्रिकाश्रमीं पूर्ण तपासी ॥ गोरक्ष कानिफा जान्हवीतीरासी ॥ तप आचरितां द्वादशवर्षी ॥ उद्यापन उरकिलें ॥५॥ परी याचें त्यासी नाहीं ठाऊक ॥ कायाभुवनीं उभय अर्क ॥ संगोपीत कामांतक ॥ परी माहीत नाहीं अन्योन्यां ॥६॥ पुढील भविष्योत्तर जाणून ॥ गुप्त ठेविलें ओळखून ॥ यापरी तप झालिया पूर्ण ॥ उभयतांही बोळविलें ॥७॥ कानिफा निघाला उत्तरदेशीं ॥ महातपी तो गोरक्षशेखी ॥ उत्तरपूर्णमध्य कोणासी ॥ संचार करीत चालिला ॥८॥ प्रयाग गया काशी करुन ॥ श्रीगुरुतें शोधी गजकर्णनंदन ॥ यापरी पूर्ण दक्षिण कोण ॥ गोरक्ष शोधी मच्छिंद्रा ॥९॥ शोधीत परी तो कैसा ॥ कीं जलाविण विभक्त मासा ॥ कीं बाळ मातेचे वसवसा ॥ सदोदित हदयांत ॥१०॥ नावडे त्यातें अन्नपाणी ॥ नावडे निद्रा सुखासनीं ॥ सदा भंवते भाविक मनीं ॥ उद्वेगचक्रीं पडियेला ॥११॥ श्रीगुरु आठवूनि चित्तांत ॥ भ्रमण करीतसे पिशाचवत ॥ साडी श्वास आणूनि हेत ॥ नाथ हे नाथ म्हणोनि ॥१२॥ वारंवार हंबरडे फोडीत ॥ म्हणे कधीं भेटती गुरुनाथ ॥ प्राण डोळां उरला किंचित ॥ पाय आतां दाखवीं ॥१३॥ ऐसी प्रेमें होतसे वृष्टी ॥ आपुल्या पुसे वागवटी ॥ म्हणे पहिला असेल मच्छिंद्र जेठी ॥ कोणी तरी सांगा हो ॥१४॥ ऐसें बहुधा बहुतां पुसून ॥ नाना क्षेत्री करी गमन ॥ तो भ्रमत गौडदेशाकारण ॥ हेळापट्टणीं पातला ॥१५॥ तपें मांस भक्षिलें समग्र ॥ अति सूक्ष्म जर्जर शरीर ॥ त्यावरी श्रीगुरुवियोगचिंताशर ॥ हाडीं टोले मारीतसे ॥१६॥ जेथें बैसे तेथें वसे ॥ नीरबिंदू वाहती नेत्रास ॥ कार्याकारण कोण्या क्षेत्रास ॥ भिक्षा मागूं जातसे ॥१७॥ तों हेळापट्टण नगरामाझारी ॥ येऊनि बैसला क्षणभरी ॥ तों द्वारपाळ ग्रामद्वारीं ॥ बैसले होते कांहींसे ॥१८॥ त्यांनी पाहूनि गोरक्षनाथ ॥ आदेश म्हणूनि त्यातें नमीत ॥ परी गोरक्ष तयां द्वारपाळां पुसत ॥ मच्छिंद्रनाथ आहे कीं ॥१९॥ तवं ते म्हणती आमुचे गांवीं ॥ मच्छिंद्र नामें कोणी गोसावी ॥ महाराजा आलाचि नाहीं ॥ काय सांगावी सुखव्यक्ती ॥२०॥ परी नाथा एक तापसी ॥ आला होता या गांवासी ॥ नाम जालिंदर या जगासी ॥ मिरवत होता महाराजा ॥२१॥ काय सांगावी तयाची नीती ॥ लोकांसी वाटे जैसा गभस्ती ॥ तो तृणभारा वाहतां माथीं ॥ अधर आम्ही पाहातसों ॥२२॥ गोरक्ष म्हणे काय कारण ॥ मस्तकीं वाहतसे तृण ॥ येरी म्हणे तो काननांतून ॥ गोधनाकरितां आणीतसे ॥२३॥ गोरक्ष म्हणे गोधन कोणाचें ॥ येरी म्हणती तें गांवीचें ॥ परी निःस्पृहवृत्ति गोधनाचें ॥ पालन करी महाराजा ॥२४॥ गोरक्ष म्हणे किती दिवस ॥ राहिला होता या वस्तीस ॥ राहूनि लोप कवण ठायास ॥ झाला पुढें तो सांगा ॥२५॥ येरी म्हणती योगद्रुमा ॥ एक संवत्सर राहिला या ग्रामा ॥ पुढें गेला कोठें तें आम्हां ॥ माहीत नाहीं महाराजा ॥२६॥ याउपरी गोरक्षनाथ ॥ दिवस किती लोटले ते पाहात ॥ येरी म्हणे दश आजपर्यंत ॥ लोटले संवत्सर महाराजा ॥२७॥ ऐसी ऐकूनि तयांची वाणी ॥ गोरक्ष विचारी आपुले मनीं ॥ तरी कां माझा स्वामी नाम पालटूनी ॥ जगामाजी विचरला ॥२८॥ मी सांडूनि पूर्ण तपास ॥ लागावया करीत येईन धांवत ॥ म्हणूनि पालटिलें स्वनामास ॥ गांवामाजीं मिरवला ॥२९॥ ऐसी कल्पना आणूनि मनीं ॥ अश्रुधारा वाहती नयनीं ॥ म्हणे महाराजा गेलासी सोडुनी ॥ मज पाडसा कैसा रे ॥३०॥ टाकूनि निर्वाण काननांत ॥ कोठें गेला माझा नाथ ॥ मी अर्भक अज्ञान बाळक ॥ बहुत मोकलिलें कैसें मज ॥३१॥ हे नाथ तूं सकळमय ॥ सर्वस्वी बापमाय ॥ तुजविण मातें कोण आश्रय ॥ तिन्हीं लोकीं दिसेना ॥३२॥ अहा मज पाडसाची येरणी ॥ चरुं गेली कोणे रानीं ॥ माझें स्मरण सकळ सांडूनी ॥ कैसी गुंतली तिकडेचि ॥३३॥ अहा मग वत्साची प्रेममाउली ॥ कोण रानीं चरुं गेली ॥ परी माझे स्मरण विसरली ॥ कैसी गुंतली तिकडेचि ॥३४॥ अहा माझी मोहाची माय ॥ करुं गेली अंतराय ॥ मज ते विसरुनि सदयहदय ॥ कैसी गुंतली तिकडेचि ॥३५॥ ऐसें बोलूनि विलाप करीत ॥ ऊर्ध्व हंबरडा मारुनि धांवत ॥ पोट कवळुनि श्वास सोडीत ॥ अहा नाथ म्हणूनी ॥३६॥ मग ते कानवाळू द्वारपाळ ॥ म्हणती नाथा न करीं तळमळ ॥ तुम्हां मायलेंकरांचा मेळ ॥ ईश्वर करील पुढारां ॥३७॥ ऐसी वदती ते वाणी ॥ गांवांत धाडिला भिक्षेलागूनी ॥ मग तो गोरक्ष सदनोसदनीं ॥ अलक्ष गाजवीत जातसे ॥३८॥ परी जालिंदर होता ज्या ठायीं ॥ तेथें सहज आला भिक्षेस पाहीं ॥ तैं एकटएक सदन सांई ॥ पाहुनि अलख म्हणतसे ॥३९॥ तो सवाल ऐकूनि जालिंदरनाथ ॥ आदेश म्हणत महीआंत ॥ ते आदेश गोरक्षाप्रत ॥ श्रवण झाले तांतडी ॥४०॥ मग ते आदेश वंदूनि पुढती ॥ म्हणे कोठे आहांत महाराज जती ॥ येरु म्हणे महीगती ॥ विराजलोसे महाराजा ॥४१॥ गोरक्ष म्हणे कवण नामीं ॥ मिरवत आहांत नाथा स्वामी ॥ येरी म्हणे मनोधर्मी ॥ नाथ जालिंदर म्हणतात ॥४२॥ परी महाराजा योगद्रुमा ॥ कवण नाम मिरवतसे तुम्हां ॥ आणि वहदहस्तप्रसादउगमा ॥ गुरु कोण तुमचा हो ॥४३॥ गोरक्ष म्हणे मच्छिन्द्रजती ।। वरदप्रसाद गुरुमूर्ती ।। आणि गोरक्ष नाम देहाप्रती ।। जगामाजी मिरवलें ।।४४।। परी महाराजा ऐकें उक्ती ।। तुम्हीं सेविली महीगर्ति ।। जगीं प्रवेवेष्टवूनि पाप मती ।। भंगीत झाली लोकांची ।।४५।। ऐसी ऐकूनि तयाची वार्ता ।। जालिंदर सांगे झाली कथा ।। ती ऐकतांचि गोरक्षनाथा ।। कोपानळ पेटला ।।४६।। म्हणे महाराजा आज्ञा करावी ॥ क्षणेंचि घालीन पालथी मही ॥ तंव त्या नृपाची प्रौढी कांहीं ॥ भस्म करीन क्षणांत ॥४७॥ जैसा अग्नि पेटला सदनांत ॥ तेणें तृणतंतूचें कोण गणित ॥ तन्न्यायें येथील नृपनाथ ॥ भस्म करीन महाराजा ॥४८॥ अहा ऐसी गुरुमूर्ती ॥ देवां दानवां वरद अती ॥ ऐशा स्वामीसी घालूनि गर्ती ॥ राज्य कैसा करितो जी ॥४९॥ तरी आतांचि आज्ञा प्रमाण ॥ लागूं नेदीं एक क्षण ॥ मग जालिंदर बोले वचन ॥ ऐसें नोहे महाराजा ॥५०॥