Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय २८

श्रीगणेशाय नमः जयजयाजी जगदुद्धारा ॥ अखिल निरंजना निर्विकारा ॥ भक्तमानसचकोरचंद्रा ॥ प्रेमांबुधारा ओसरसी ॥१॥ तरी तूं असतां कृपाळु आई ॥ माय माझे विठाबाई ॥ तरी आतां ग्रंथप्रवाहीं ॥ येऊनियां बैसे गे ॥२॥ मागिले अध्यायीं प्रेमेंकरुन ॥ वैभवीं मेळविला राव विक्रम ॥ भर्तरीसंगमीं पिंगलालग्न ॥ दत्तानुग्रह लाधला ॥३॥ उपरी मृगया करुनी ॥ अवंतिकास्थाना जाऊनि ॥ राजधामीं कनकासनीं ॥ सभामंडपीं बैसला ॥४॥ क्षणैक बैसूनि त्वरितात्वरित ॥ पाकशाळे गेला नृपनाथ ॥ पक्कान्न सेवूनि अंतापुरात ॥ पिंगलागृहीं संचरला ॥५॥ कनकमंचकीं सुमनशेजी ॥ राव बैसवी पिंगला अजीं ॥ षोडशोपचारेंकरुनि पूजी ॥ श्रद्धापूर्वक पिंगला ॥६॥ परम प्रीतीं भावारुढ ॥ रायें दर्शविलें चित्तीं कोड ॥ मग करी कवळूनि स्नेहपाडें ॥ निकट घेत पिंगला ॥७॥ तीतें वामांकी बैसवोन ॥ परम प्रीतीनें घेत चुंबन ॥ वाचेनें म्हणे तुजसमान ॥ अन्य दारा नावडती ॥८॥ अगे पिंगले माझें मन ॥ भावी मम देहींचें ऐक्यरत्न ॥ जैसे मित्र आणि रश्मिचिन्ह ॥ ऐक्यदेहीं मिरवती ॥९॥ कीं राजमौळी तेजें आगळा ॥ द्वितीये शोभली त्याची कळा ॥ तेवीं माते तूं पिंगला ॥ मम चित्तावरी धांवें ॥१०॥ अगे हे पिंगले माझा भाव ॥ पिंगलाभर्तरीं ऐक्यनांव ॥ एकाचि देहीं मज वाढीव ॥ भासे भास शुभानने ॥११॥ जैशी शर्करा आणि गोडी ॥ नामें भिन्न परी ऐक्यप्रौढी ॥ तेवी तूं पिंगला माझे पाठीं ॥ भासे भास शुभानने ॥१२॥ जैसा उदधी आणि लहरी ॥ परी ऐक्यता सागरीं ॥ तेवीं मातें तूं सुंदरी ॥ भास भाससी शुभानने ॥१३॥ ऐसें म्हणूनि परम प्रीतीं ॥ पुन्हां चुंबन घेत नृपती ॥ मग भोगूनि सकाम रीतीं ॥ संतुष्ट चित्तीं मिरवला ॥१४॥ मग विचार सुचला एक गहन ॥ आनंदें बैसती प्रीतीकरुन ॥ बैसल्या पिंगला बोलूनि वचन ॥ विडा त्रयोदशगुणी देतसे ॥१५॥ म्हणे हे महाराजा नृपवरा ॥ मम देहींचे प्राणप्रियेश्वरा ॥ मम मानसचकोरचंद्रा ॥ प्रेमांबु मिरवतसे ॥१६॥ तरी तुम्हां आम्हां गांठी ॥ गांठी गांठिल्या त्या परमेष्ठीं ॥ गांठिल्या परी चित्तदेठीं ॥ ऐक्यभास भासतसे ॥१७॥ जसें लवण उदकी मिश्रित ॥ भिन्न न दावी दृष्टींत ॥ तन्न्यायें ऐक्यचित्त ॥ रावणराणी शोभत ॥१८॥ तरी ऐसा मिश्रित अर्थ ॥ उदया पावला असे ऐक्यचित्त ॥ परी नेणूनि निर्दय परम कृतांत ॥ जगामाजी मिरवतसे ॥१९॥ चित्तीं चित्तभय काया ॥ हरण करीत असे राया ॥ तरी नेणों आपण विषयचिंते या ॥ बुद्धि जरी संचरली ॥२०॥ संचरतां परी एक त्यांतें मातें दिसत उचितार्थ ॥ तुम्हांआधी मातें मृत्यु ॥ सुगम चित्ता वाटतसे ॥२१॥ तरी हें ऐसें इच्छिल्याप्रमाण ॥ ईश्वरसत्ते जरी आलें घडोन ॥ मग परम बरवें दैववान ॥ जगीं असें मी एक ॥२२॥ ऐसें बोलतां शुभाननी ॥ राव ऐकूनि बोले वाणी ॥ नेणों सखे ईश्वरकरणी ॥ पुढील काहीं वदवेना ॥२३॥ मज आधी तूं कामिनी ॥ मृत्यु पावों इच्छिसी मनीं ॥ परंतु नेणों निर्दयपणीं ॥ मित्रात्मज मिरवतसे ॥२४॥ तो कदा न जाणे वेदविधी ॥ सदा वर्ततसे बिघडबुद्धीं ॥ नेणों मज मृत्यु तुज आधी ॥ आल्या काय करशील ॥२५॥ ऐसें ऐकूनि वदे पिंगला ॥ नेणो कैसे असे जी भाळा ॥ रेखिली विधीनें अकळ कळा ॥ कळत नाहीं महाराजा ॥२६॥ परी ऐशा घडल्या गोष्टी ॥ मी राहाणार नाहीं महीपाठीं ॥ देह दाहूनिया हव्यवाटी ॥ गमन करीन तुम्हांसह ॥२७॥ राव ऐकूनि बोले वचन ॥ पुरे आतां तुझे बोलणे ॥ प्राणांहूनि प्रिय कोण ॥ घात त्याचा करवेना ॥२८॥ तरी हे बोल उगलेचि फोल ॥ माझिया तोषाचें करिसी मोल ॥ परी समय येतां तव पाऊल ॥ मागेंचि धांव घेणार ॥२९॥ तरी अनुभव माझिये चित्ता ॥ सहज आहे मजला पाहतां ॥ अगे राज्यासनीं विपुल वार्ता ॥ सेवक श्रवण माझें करविती ॥३०॥ करविती परी कैशा रीतीं ॥ समरंगणींचा भाव दाविती ॥ शत्रुअनली प्राणाहुती ॥ वेंचूं ऐसें म्हणताती ॥३१॥ तरी समय पडतां दृष्टीं ॥ जीवित्व रक्षिती बारा वाटीं ॥ मग कोण कोठील मोह पोटीं ॥ जीवित्वाचा वरिती गे ॥३२॥ तरी हें तैसे तुझें बोलणें ॥ दावीत मातें चांगुलपण ॥ परी समय पडतां अर्थ ॥ भिन्न दुसराचि आहे गे ॥३३॥ कीं बहुरुपियाचे खेळमेळीं ॥ होऊनि बैसती महाबळी ॥ परी ते शूरपणाची नव्हाळी ॥ समरभूमीं चालेना ॥३४॥ कीं श्वानपुच्छाची कैशी उग्रता ॥ परी हार तेचि पडे बळी देखतां ॥ जैसी पालीची दृष्टी देखतां ॥ वृश्चिक नांगी उतरीतसे ॥३५॥ तन्न्यायें तव बोलणें ॥ मातें दिसतें सहज स्थितीनें ॥ ऐसें बोलतां भर्तरीनंदनें ॥ पिंगला वदे स्वामीसी ॥३६॥ म्हणे महाराजा प्राणेश्वरा ॥ या बोलाच वाग्दोरा ॥ कंठीं बांधिला आहे नरा ॥ काया वाचा मानसीं ॥३७॥ तरी आतां व्यर्थ बोलून ॥ नेणो घडेल अर्थ कोण ॥ ईश्वरसत्तेचें प्रमाण ब्रह्मांदिका कळेना ॥३८॥ परी माझिये भावनेऐसें ॥ येत आहे स्वचित्तास ॥ विधवा शब्द शरीरास ॥ लिप्त होणार नाहीं कीं ॥३९॥ जरी म्हणाल कैशावरुन ॥ तरी काया वाचा चित्त मन ॥ तुम्हांलागीं केलें अर्पण ॥ साक्ष असे ईश्वर तो ॥४०॥ तरी ईश्वर तो सत्याश्रित ॥ आहे म्हणती सकळ जगतीं ॥ तरी वैधव्य शब्द जगमुखांत ॥ मातें लिप्त होणार नाहीं कीं ॥४१॥ असो बीज पेरिलें तैसे फळ ॥ दुमकोमादि दावी सकळ ॥ तेवीं माझो चाली सरळ ॥ फळ उमटेल तैसेंचि ॥४२॥ ऐसें बोलूनि निवांतपणीं ॥ स्तब्ध राहिली कामिनी ॥ परी रायाचे अंतःकरणीं ॥ शब्द सदृढ मिरवलें ॥४३॥ मिरवले परी ठेविले मनांत ॥ चमत्कार पाहूं कोणे दिवसांत ॥ असो हे जल्प बहु दिनांत ॥ सारिते झाले प्रीतीनें ॥४४॥ सहज कोणे एके दिवशीं ॥ राव जातसे पारधीसी ॥ मृगुया खेळतां विपिनासी ॥ आठव झाला कांतेचा ॥४५॥ कीं आम्ही उभयतां दोघे जण ॥ बैसलों होतों सुखसंपन्न ॥ तयामाजी मृत्यु बोलोन ॥ निश्चयविलें कांतेनें ॥४६॥ तुम्ही झालिया गतप्राण ॥ तुम्हांसवे करीन गमन ॥ तरी त्या बोलाचें साचपण ॥ आज पाहूं निश्चये ॥४७॥ ऐसी चित्तीं योजना करुन ॥ मृगया करीत फिरे कानन ॥ तों अकस्मात देखिला नयनें ॥ मृग एक नेटका ॥४८॥ राव देखतां तयापाठीं ॥ लागूनि शीघ्र महीं आर्हामटी ॥ शीणचि त्या जीवीं बहु मेळथाटी ॥ मृग जीवंत धरियेला ॥४९॥ धरियेला परी हस्तेंकरुन ॥ तयाची ग्रीवा छेदून ॥ मुकुटासह काढूनि भूषणें ॥ रुधिरें अस्त्रें भिजविलीं ॥५०॥