Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय १६

श्रीगणेशाय नमः श्रीसरवत्यै नमः ॥ जयजयाजी दिगंबरा ॥ आद्यनामें विश्वंभरा ॥ वर्णिता तुझिया गुणसंभारा ॥ मति अपूर्व होतसे ॥१॥ वर्णिता तुझिया गुणसंपत्ती ॥ वेदभांडारे अपूर्व होती ॥ सहस्त्रफणी वाहतां मार्थी ॥ शीण वाचे दावीतसे ॥२॥ पंचाननाऐसे धेंडे ॥ परी दो अक्षरीं झाले धडे ॥ सरस्वतीचें शिणोनि तोंड ॥ करी सांड विलापाची ॥३॥ आठभार उदभिज देही ॥ कमळपत्रांते पुरे मही ॥ सप्ताब्धींची अपूर्व शायी ॥ तव गुणसाररसज्ञ ॥४॥ ऐसा सर्वगुणज्ञ पुरुष ॥ येवोनि बैसला अबद्भमतीस ॥ भक्तिसार ग्रंथ सुधारस ॥ स्वयें निर्मिला आपणचि ॥५॥ तरी मागिले अध्यायीं सकळ कथन ॥ कानिफा आणि वायुनंदन ॥ युद्धसमयीं ऐक्य होऊन ॥ सुखसागरा मिळाले ॥६॥ यावरी कानिफा स्त्रीदेशांत ॥ गेले श्रीगडमुंडगांवांत ॥ तेथें भेटोनि मच्छिंद्रातें ॥ आतिथ्यातें भोगिलें ॥७॥ भोगिलें परी कैसे रीतीं ॥ तेंचि ऐका येथूनि श्रोतीं ॥ मच्छिंद्राचे काम चित्तीं ॥ एक अर्थी उदेला ॥८॥ कीं कानिफा जाईल स्वदेशांत ॥ श्रीगोरक्षका करील श्रुत ॥ मग तो धांवोनि येईल येथ ॥ नेईल मातें येथुनी ॥९॥ तरी गोरक्ष मम शिष्य आहे ॥ ऐसे यासी श्रुत करुं नये ॥ अनेक योजूनि उपाय ॥ येथें राहता करावा ॥१०॥ ऐसी युक्ती रचूनि चित्तीं ॥ करावें म्हणे आतिथ्य बहू रीतीं ॥ म्हणोनि बोलावूनि बहुत युक्तीं ॥ सकळां मच्छिंद्र सांगतसे ॥११॥ याउपरी आणिक योजना करीत ॥ कीं विषयीं गोंवावा कानिफानाथ ॥ मग हा कदा देशांत ॥ जाणार नाहीं सर्वस्वें ॥१२॥ चंद्राननी मृगांकवदनी ॥ पाठवीतसे शिबिरालागुनी ॥ परी तो नातळे कामवासनीं ॥ इंद्रियदमनी महाराज ॥१३॥ म्हणाल तरी त्या कैशा युवती ॥ प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती ॥ जयांचे नेत्रकटाक्षें होती ॥ वेडेपिसे देवादि ॥१४॥ जयेचें पाहतां मुखमंडण ॥ तपी सांडिती तपाकारणें ॥ येवोनि मुंगी लुंगी होवोन ॥ मागें भ्रमती जपी तपी ॥१५॥ जयेचे अधर पोंवळ्यांपरी दिसती ॥ दर्शन दाळिंबबीज गोमटी ॥ गौरवर्ण पिकाघाटी ॥ ग्रीवा दर्शवी बाहेर ॥१६॥ कीं अनंत चंद्राचा प्रकाश जैसा ॥ कीं उडुगणपतीचा द्वितीय ठसा ॥ जयांच्या नखाकृतिलेखा ॥ चंद्रकोरी मिरवल्या ॥१७॥ असो ऐसे स्त्रियांचे वर्ण ॥ कीं भानुचि पावला उदयमान ॥ ऐसिया स्त्रिया पाठवोनि स्थान ॥ चेतविती कामासी ॥१८॥ परी तो नातळे महाराज ॥ हा वृत्तांत मछिंद्रा कळला सहज ॥ मग म्हणे शिष्यकटकाचा समाज ॥ कामासनीं गोवावा ॥१९॥ ऐसाहो यत्न करुनि पाहतां ॥ कामिनींचा श्रम झाला वृथा ॥ शिष्यकटकही येईना हाता ॥ उपाय कांहीं चालेना ॥२०॥ असो ऐसे छळणांत ॥ एक मास राहिले तेथ ॥ परी कोपें देव होतां उदित ॥ सहजस्थितीं लोटले ॥२१॥ असो लोटल्या एक मास ॥ मग पाचारुनि मच्छिंद्रास ॥ म्हणती आज्ञा द्यावी आम्हांस ॥ स्वदेशासी जावया ॥२२॥ मग अवश्य म्हणोनि मच्छिंद्रनाथ ॥ नानासंपत्ती द्रव्य ओपीत ॥ गज वाजी उष्ट्र अमित ॥ द्रव्य बहुत दिधले ॥२३॥ शिबिरें कनाथा पडप थोर ॥ तंबू राहुट्या पृथगाकार ॥ शिबिका मुक्तझालरा छत्र ॥ वस्त्राभरणी भरियेले ॥२४॥ ऐसी ओपूनी अपार संपत्ती ॥ बोळवीतसे मच्छिंद्रजती ॥ एक कोस बोळवोनि नमिती ॥ परस्परांसी आदरें ॥२५॥ ऐसें बोळवोनि कटकभार ॥ स्वस्थाना आला नाथ मच्छिंद्र ॥ येरीकडे तीर्थवर ॥ करीत आला स्वदेशा ॥२६॥ सहज आले मुक्कामेंमुक्काम ॥ लंघुनि स्त्रीदेश सुगम ॥ पुढें गौडबंगाल स्थान उत्तम ॥ नानाक्षेत्रें हिंडती ॥२७॥ परी जया गावीं जाय नाथ ॥ त्या गावीं लोक करिती आतिथ्य ॥ सर्व पाहूनि भक्तिवंत ॥ उपचारें मिरवती ॥२८॥ इच्छेसम सकळ अर्थ ॥ पूर्ण होऊनि शिष्यसांप्रदायीं होत ॥ म्हणोनि वर्णिती कीर्त ॥ मुखोमुखीं उल्हासें ॥२९॥ मग या गावीचें त्या गांवीं लोक ॥ येऊनि नेती सकळ कटक ॥ दावूनि भाक्तिभाव अलोलिक ॥ बोळविती पुढारा ॥३०॥ ऐसें श्रवण करीत करीत ॥ कीर्तीमागें कीर्ती होत ॥ ती सत्कीर्ती हेळापट्टणांत ॥ प्रविष्ट झाली जगमुखें ॥३१॥ बहुत जनांचे वाचे स्तुती ॥ अहाहा स्वामी ऐसें म्हणती ॥ मग राजांगणी ही कीर्ती ॥ हेलावली सेवकमुखें ॥३२॥ कीर्ति ऐकूनि नृपनाथ ॥ पुढें प्रेरिता झाला दूत ॥ त्याकरवी उत्तम वृत्तांत ॥ मुनिकटकाचा आणविला ॥३३॥ ते सांगती मुनीचा राजयोग ॥ गांवोगांवींहूनि शिबरें सुरंग चांग ॥ धांवताती घेऊनि मागोमाग ॥ स्वामीलागीं राहावया ॥३४॥ पुढें नाथध्वज येऊन ॥ शिबिरें चालती त्यामागून ॥ शिष्यकटकासी मागूनि गमन ॥ कानिफाचे होतसे ॥३५॥ ऐसें मार्गी करितां गमन ॥ तो येरीकडे जगन्नाथाहून ॥ गोरक्ष बंगालदेशात येऊन ॥ गांवोगांव भ्रमतसे ॥३६॥ तो सहजमार्गी करितां गमन ॥ महीप्रवाही तरुव्यक्त विपिन ॥ तया विपिनीं गजकर्ण नंदन ॥ सहजस्थितीं भेटला ॥३७॥ तेणें पाहिलें गोरक्षकासी ॥ गोरक्षें पाहिलें कानिफासी ॥ दृष्टादृष्टी होतां आदेशीं ॥ एकमेकां बोलिले ॥३८॥ करुनि स्थिर शिबिकासन ॥ खालीं उतरला कर्णनंदन ॥ मग भरजरी गालिंचा महीं पसरुन ॥ गोरक्षासी बैसविलें ॥३९॥ आपण बैसें उपसवे नेटीं ॥ बोले कानिफा वाग्वटी ॥ नाथपंथ हा वरदपुटी ॥ कोण गुरु लाहिला ॥४०॥ हें ऐकून गोरक्षनाथ ॥ मच्छिंद्रजन्मापासुनि कथा सांगत ॥ वरदपाणी उदयामित्र ॥ प्रसन्न झाला तयासी ॥४१॥तरी त्याचा दासानुदास ॥ मी म्हणवितों महापुरुष ॥ परी श्रीगुरु कानिफादेहास ॥ गुरु कोण मिरवला तें सांगा ॥४२॥ ऐसे गोरक्षबोल ऐकून ॥ कानिफा सांगे जालिंदरकथन ॥ जन्मापासूनि वर्तमान ॥ दत्तकृपा आगळी ॥४३॥ ऐसे उभयतांचें भाषण ॥ झालिया मिरवले समाधान ॥ म्हणती योग्य आलें घडून ॥ तुम्ही आम्हां भेटलां ॥४४॥ याउपरी कानिफाचित्तीं ॥ कामना उदेली एका अर्थी ॥ की मच्छिंद्र गुरु गोरक्षाप्रती ॥ दत्तवरदें मिरवला ॥४५॥ तरी दत्तकृपेचें अनुसंधान ॥ कैसें लाधलें विद्यारत्न ॥ कीं कवणरुपीं सहजदर्शन ॥ जगामाजी मिरवती ॥४६॥ तरी याचा शोध करावा ॥ दावूनी आपुल्या गौरवा ॥ ऐसें योजूनि सहज भावा ॥ दृष्टी करी भोंवतालीं ॥४७॥ तों दृष्टीसमोर आम्रवन ॥ पक्क फळी देखिलें सघन ॥ तेंही पाडाचें पक्कपण ॥ शाखा व्यक्त ॥ झोंबल्या आहेत ह्या वृक्षीं ॥४९॥ परी ऐसी फळें सुगम दिसती ॥ तरी भक्षण करावें वाटे चित्तीं ॥ यावरी गोरक्ष बोले युक्तीं ॥ नको नको म्हणतसे ॥५०॥

 

Sadguru Vishnudas Maharaj