Nav Nath Bhktisaar.....

नवनाथांची आरती

जयदेव जयदेव जय श्री नवनथाहो स्वामी नवनाथा॥
भावार्थे आरती ओवाळू आरती श्रीगुरुदेव दत्ता॥ ॥जयदेव॥
कलियुगी अवतार नवनथांचा। केलासे उद्धार भक्तजनांचा॥
दाविईला मुळ मार्ग शाबरीविद्येचा। आगळा महिमा न कळे स्वामी सिद्धांचा॥ ॥जयदेव॥
मच्छिपासून झाले स्वामी मच्छिंद्र। गोरक्ष जन्मले गोवर भस्मात॥
जालंदर उत्पत्ति यज्ञकुंडात। कानिफ पैदास गजकर्णात॥ ॥जयदेव॥
जयाचे चरणापासुनि झाले चपटीनाथ। गहिनी गोपीचंद अडंबनाथ॥
हरिणीने रक्षिले भरतरीनाथ। पुढे चौर्यांशी सिद्धांचे गणित॥ ॥जयदेव॥
कलिमध्ये नवनाथ प्रकटले। शाबरीविद्या देऊनि जग उध्दरिले॥
विद्येच्या प्रतापे सूरवर जिंकिले। नाथांच्या सेवेसी शरणांगत आले॥ ॥जयदेव॥

आरतीनंतर नाथांची पुढील श्लोक म्हणावे.

गोरक्ष जालंदर चर्पटाश्र्च अडबंग कानिफ मच्छिंदराद्याः ।
चौरंगिरेबाणकभर्त्रिसंद्या भूम्या बभुवर्नवनाथसिध्दाः ॥