Nav Nath Bhktisaar.....

 

नवनाथांची  जागृत स्थाने
(नाथभक्तां च्या माहिती करीता “आदरणीय मुकंद दादा अंधारे”अमृतमहोत्सव गौरवांकामधे सौ.सुवर्णा मु. अंधारे यानी संकलित केलेली माहिती या ठिकाणी देत आहोत. मुकंद दादा अंधारे यांच्याबद्दल अधिक माहिती करीता  http://navnathkimaya.co.in  वर लॉग इन करा  )


‘जे पिंडी ते ब्रम्हांडी ‘ ह्या मुलभूत संकल्पनेवर आधारलेल्या नाथ संप्रदायात यात्रा,वारी आदींना महत्व नसले तरी ह्या संप्रदायातील इष्ट दैवतांच्या ओढीने सामान्य भाविक भेटी साठी सदैव उत्सुक असतो. ह्या संबधाने पाहिल्यास श्री नवनाथ भक्तिसार ह्या ग्रंथात नवनारायणांचे  नवनाथांच्या स्वरूपातील अवतार कार्याच्या समाप्तीनंतर ज्या ठिकाणी वास केला त्या स्थानांची माहिती वाचावयास मिळते .


अध्याय ४० श्री नवनाथ भक्तिसार
शके सतराशे दहापर्यंत | प्रकटरूपे मिरवले नाथ | मग येउनी आपुले स्थानात | गुप्तरूपे राहिले ||९४||
मठीत राहिला कानिफाजती | उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती | जानपीर तो जालंदर जती | गर्भगिरी नांदतसे ||९५||
त्याहुनी खालता गैबीपीर | तो गहनीनाथ परम सुंदर | वडवाळ ग्रामी समाधीपर | नागनाथ असे की ||९६||
विट ग्रामी मानदेशात | तेथे राहिले रेवणनाथ | चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ | गुप्त अद्यापि करिताती ||९७||
भर्तरी राहिला  पाताळभूवनी  | मीननाथ गेला स्वर्गालागोनी | गिरनार पर्वती गोरक्षमूनी | दत्ताश्रमी राहिला ||९८||
गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थे गेले वैकुंठात | विमान पाठवोनी मैनावतीते घेउनी विष्णू गेलासे ||९९||

वरील ओव्यात नाथांच्या चैतन्य रुपात वास करणाऱ्या स्थानांची अधिकृत माहिती उपलब्ध आहे.
ह्या शिवाय संपूर्ण देशात अनेक जागी नाथ मंदिरे उभारल्या गेलीत. एका विशिष्ट नाथांच्या प्रभावामुळे त्यांच्या शिष्याद्वारे देखील स्थानांची निर्मिती झाली. पण श्री नवनाथ भक्तिसार ह्या ग्रंथात उल्लेखित स्थानांचा परिचय  नाथभक्ताना व्हावा म्हणून हा प्रपंच

१.”मठीत राहिला कानिफाजती “
प्रबुद्ध नारायणाचे अवतार श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ मंदिर
मढी, ता. पाथर्डी जि. अहमदनगर
फोन नं. ०२४२८-२४४०६४ , २४४०००
website: kanifnathmadhi.org
E-mail : kanifnathmadhi@yahoo.co.in
अहमदनगर – शेवगाव मार्गावर
रंगपंचमीला मोठी यात्रा

२.” मच्छिंद्रासी मायबाप म्हणती”
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड
‘मायंबा’ (बड़े बाबा) कवी नारायणाचे अवतार
सावरगाव, ता. पाथर्डी जि. अहमदनगर(गर्भागिरी  डोंगरावर)
मधि पासून अंतर – १५ किलोमीटर
उत्सव:१)ॠषी पंचमी – जन्मोस्तव २) पौष अमावस्येला यात्रा
३. “जानपीर तो जालंदर जती - गर्भगिरी नांदतसे”
श्री क्षेत्र जालींदर नाथ देवस्थान (अंतरिक्ष) नारायणाचे अवतार
येवलवाडी, ता. शिरूर(सा), जि. बीड.
मच्छिंद्रनाथ गडा पासून अंतर ७५ किलोमीटर
उत्सव १. माघ पौर्णिमा २.महाशिवरात्र(दूसरा दिवस ) ३. गुढीपाडवा
४. “त्याहुनी खालता गैबीपीर - तो गहनीनाथ परम सुंदर”
(गैबीपीर)गहनीनाथ पुरातन मंदिर
गाव: चिचोली ता. पाथर्डी जि. अहमदनगर
मच्छिंद्रनाथ गडा पासून अंतर ४५ किलोमीटर
५.” वडवाळ ग्रामी समाधीपर - नागनाथ असे की”
अविहोत्र नारायणाचे अवतार
गाव: वडवाळ ता. चाकूर , जि. लातूर
मच्छिंद्रनाथ गडा पासून अंतर २७० किलोमीटर . हैदराबाद-परळी रेल्वे महामार्गावर लातूर पासून २५ किलोमीटर
६. “विट ग्रामी मानदेशात - तेथे राहिले रेवणनाथ” ‘रेवणनाथ’ चमस नारायणाचे अवतार यालाच रेवणसिद्ध असेही म्हणतात
वीटा ता. मान , जि. सांगली
मच्छिंद्रनाथ गडा पासून अंतर २५५ किलोमीटर
७. “भर्तरी राहिला  पाताळभूवनी  “
द्रुमिल नारायणाचे अवतार
मु.पो. हरगुळ, ता. गंगाखेड, जि. परभणी,
मच्छिंद्रनाथ गडा पासून अंतर २५० किलोमीटर
८. “ गिरनार पर्वती गोरक्षमूनी - दत्ताश्रमी राहिला”
मु.पो. वाई , ता. वसमत, जि. हिंगोली
औंढा नागनाथ पासून २१ किलोमीटर
९. “चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ - गुप्त अद्यापि करिताती”
श्री अडभंगीनाथ 
मु.पो. भामानगर , ता. गंगाखेड, जि. परभणी,
विशेष म्हणजे चरपटीनाथ, चौरंगीनाथ , अडभंगीनाथ व् इतर नाथासिद्ध आजही गुप्तपणे संचार करीत आहेत व ज्या ज्या ठिकाणी त्यांचे उपासना,पूजा, परायण, हवं आदि द्वारे त्यांचे आवाहन केल्या जाते त्या
ठिकाणी ते प्रत्यक्ष रुपाने हजार होतात व् भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात .
    


या ठिकाणी आम्ही नवनाथ सांप्रदायातील विविध तीर्थ क्षेत्रांची माहिती देत आहोत.

१ श्री क्षेत्र मढी

सह्याद्री पर्वताच्या काही उपरांगा पूर्व- पश्चिम दिशेने पसरलेल्या आहेत. या रांगामध्ये गर्भगिरी पर्वतरांगा अहमदनगर बीड जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे. हा परिसर निसगरम्य असून गर्भागिरीच्या पर्वत रांगेत खळखळ वाहणाऱ्या पानागिरी नदीशेजारी उंचटेकडीकाठी सुंदर असे म गाव आहे व अशा या पवित्र आणि मंगल गावात उच टेकडीवर ब्रम्हचैतन्य श्री कानिफ़नाथ महाराजानी श्री क्षेत्र वॄध्देश्वर येथे सर्व देविदेवतांच्या महायज्ञामध्ये ठरल्याप्रमाणे १० व्या शतकामध्ये फ़ाल्गुन वैद्य रंगपंचमीला संजीवनी समाधी घेतली.अहमदनगर येथून ५५ कि.मी. तर पाथर्डी तालुक्यापासुन १२ कि.मी. अंतरावर समॄध्द संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन करणारे आदर्श गाव व नाथपंथीयांचे अद्यपीठ म्हणून भारतभर प्रसिध्द असलेले हे स्थान सर्वांचेच श्रध्दास्थान बनले आहे.

Kanifa Nath Manir Madhi

अधिक माहिती करिता http://www.kanifnathmadhi.org

नकाशा पहा

२ कानिफनाथ मंदिर (बोपगाव, सासवड)

नाथ पंथामधील कानिफनाथ यांचे मंदिर जेजुरी पासून तीस किलो मीटर अंतरावर सासवडच्या पश्चिमेकडे बापदेव घाट मार्गावर आहे.बोपगाव पासुन उजवीकडे मंदिराची कमान लागते वेडी वाकडी वळणे घेत घाटरस्ता संपल्यानंतर गाडी पार्किंगसाठी मोठे पटांगण आहे. थोड्या पाय-या चढून गेल्यानंतर नव्याने उभारलेला सभामंडप दिसतो, पंचक्रोशीतील लोकसहभागातून या मंदिराचा कायापालट झाला आहे. मुळचे मंदिर लहान आहे,मंदिरामध्ये जाण्या साठी दरवाजा नसून खिडकी वजा १ फुट बाय १ फुटाची चौकट आहे, या चौकटीतून कितीही जाड असलेल्या व्यक्तीला सरपटत आतमध्ये जाता येते. आतमध्ये पंधरा वीस जण मावू शकतील एवढा मोठा गाभारा आहे.आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर दिसते ती यावनी दर्ग्या सारखी कानिफनाथांची समाधी.धूप व फुलांचा सुगंध मन प्रफुल्लीत करतो. ज्याप्रमाणे आतमध्ये प्रवेश केला तसेच बाहेर पडावे लागते.मुख्य गर्भगृहात स्त्रियांना प्रवेश नाही तसेच पुरुषांसाठी सदरा व कंबरपट्टा बाहेर काढुनच आत प्रवेश करावा लागतो. या टेकडीवरून दिवेघाट तसेच मस्तानी तलाव दिसतो.पावसाळ्यामध्ये येथून निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते.

Kanifa Nath Temple Bopgaon
Nav Nath @ Bopgaon

अधिक माहिती करिता http://www.placesnearpune.com/2011/01/kanifnath-temple-near-saswad/

नकाशा पहा