Navnath Bhaktisar....श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ७ पृष्ठ १ Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ७

श्रीगणेशाय नमः जयजयाजी पंकजाक्षा ॥ कमलापते कमलपत्राक्षा ॥ अवगुणरुपा गुणसर्वेशा ॥ महादक्षा रघुत्तमा ॥१॥ हे कमळमित्रकुळभूषणा ॥ रावणांतका रघुनंदना ॥ पुढें बोलवीं ग्रंथरचना ॥ जेणें श्रोतयां सुख वाटे ॥२॥ मागिले अध्यायीं कथा सुरस ॥ काळिका देवी मच्छिंद्रास ॥ प्रसन्न होऊनि वरदानास ॥ साबरीविद्या आतुली ॥३॥ तेथूनि आला हरेश्वरासी ॥ गदातीर्थस्नानउद्देशीं ॥ स्नान करुनि पर्वतासी ॥ प्रदक्षिणा आरंभिली ॥४॥ सर्वेचि येतां मच्छिंद्रनाथ ॥ तों वीरभद्र पातला स्नाना तेथ ॥ मानववेषी जोगी कृत्य ॥ त्रिशूळ डमरु धनुष्यादि ॥५॥ शैली शिंगी नाद अदभुत ॥ नाद नोहे तो आंगम व्यक्त ॥ साधकहिताचा स्वार्थअर्थ ॥ परिणाम सूचवी ॥६॥ अहो ती शिंगी नोहे देवता ॥ साधकजनांची कामदुहिता ॥ पूर्ण करावया परिणाम अर्था ॥ बोधरवि प्रवेशती ॥७॥ रज तम सत्त्व तृतीय गुण ॥ महामारक अति कठिण ॥ ते त्रिवर्ग करिती खडतरपण ॥ ऐक्य केला त्रिशूळ तो ॥८॥यापरी आगमनिगमबीजें ॥ सारव्यक्त तेजापुंजें ॥ तयाची पंथिका दावी करांबुजे ॥ विशाळ डमरु विराजला ॥९॥ सगुणकथा सप्तधातु ॥ गुणीं भरला गुणातीतु ॥ नवरंगरसांत झाला व्यक्तु ॥ हरिगुणींचि भक्तु होईना कां ॥१०॥कामक्रोधषडगुणविकार ॥ सत्त्वस्थाचे शत्र अनिवार ॥ तयां जिंकितां विवेक फार ॥ शरगांडीव विराजलें ॥११॥ अहो शर नोहे ते जाण युक्ती ॥ कामक्रोधांतें देत मुक्ती ॥ गांडीव नोहे तें विषयभक्ती ॥ ज्ञानशरीं विराजलें ॥१२॥ अगा शर न म्हणूं ते ज्ञानदिवटी ॥ अज्ञानतमींचें मनीं वीरभद्र येतसे स्नानालागून ॥ तों मार्गी मच्छिंद्रातें पाहून ॥ उभा केला हटकोनी ॥१५॥करुनि उभे नमनानमन ॥ म्हणे स्वामी तुम्ही कोण ॥ येरु म्हणे मच्छिंद्र अभिघान ॥ निजदेहा मिरवीतसे ॥१६॥येरु म्हणे कवण पंथीं ॥ अभ्यास मिरवितसां जगाप्रती ॥ मच्छिंद्र म्हणे जोगीये नीती ॥ नाथपंथीं मिरवीतों ॥१७॥ येरु म्हणे कोण दर्शन ॥ मच्छिंद्र म्हणे जोगीमहिमान ॥ शैली कंथा मुद्रा भूषण ॥ निजाअंगीं मिरवीतसें ॥१८॥ वीरभद्र म्हणे मुद्रा सान ॥ न घालितां फाडिले कान ॥ येरु म्हणे गुरुप्रसादें करुन ॥ मंथनीं निर्मिला हा एक ॥१९॥वीरभद्र म्हणे काय पाखंड ॥ व्यर्थचि उगलें वाढवूनि बंड ॥ जगामाजी मिरवितां काळें तोड ॥ योग्यायोग्य दिसेना ॥२०॥ तरी आंता योगद्रुमा ॥ मुद्रा सोडीं ह्या नसती उत्तमा ॥ नाहीं तरी शिक्षा पावसी नेमा ॥ ठाई ठाई महाराजा ॥२१॥ अगा तव गुरु ऐसा कोण ॥ वेदविधिच्या प्राज्ञेंकरुन ॥ पूर्ण आगळीक पंथ निर्मून ॥ जगामाजी मिरवितो ॥२२॥अगा स्वबुद्धी तर्क करुन ॥ भलतेंचि मत करी स्थापन ॥ तो प्राज्ञिक नव्हे मुर्खाहून ॥ शतमूर्ख म्हणावा ॥२३॥ऐसी ऐकतां भद्रगोष्टी ॥ मच्छिंद्र संतप्त झाला पोटीं ॥ म्हणे मशका खाटी ॥ वल्गना करिसी अपार ॥२४॥अरे शतमुर्खाहूनि मूर्ख ॥ म्हणूनि बोलसी दुःखदायक ॥ परमात्मा क्षोमवूनि पातक ॥ भार वाहिला निजमौळी ॥२५॥ अरे आत्मा क्षोभतां पराचा ॥ पापभार होत ब्रह्मांडींचा ॥ तस्मात् तव गुरु कैंचा ॥ दुजा गुरु विलोकीं ॥२६॥ अरे नष्टा दुर्जन अधमा ॥ तव दर्शने स्नान करणें आम्हां ॥ आतां उगाचि जाय आपुल्या कामा ॥ शिक्षा पावसील मम हस्ते ॥२७॥ ऐशापरी मच्छिंद्रनाथाचें भाषण ॥ ऐकतां वीरभद्राचें क्षोभलें मन ॥ म्हणे भ्रष्टा तुझा प्राण ॥ आतांचि घेईन ये काळीं ॥२८॥मग करीं कवळूनि सायकासन ॥ सत्वर रगडूनि लाविला गुण ॥ निर्वाण अर्धचंद्र बाण ॥ तूणीरांतूनि काढिला ॥२९॥तें पाहूनिं मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे पतित झालासी उन्मत्त ॥ अरे उद्धटा आपुलें अहित ॥ जनांमाजी मिरविसी ॥३०॥अरे सायकासन सिद्ध करुन ॥ सोंग दाविसी मजलागून ॥ परी हें बरवें नोहे मरण ॥ ये काळीं पावसी ॥३१॥ अरे ऐसें सोंग मजकारण ॥ कित्येक झाल अवलोकून ॥ बहुरुप्याचें खडतरपण ॥ शूरत्व रणीं मिरवेना ॥३२॥कीं अजाकंठींचे लंबस्तन ॥ परी नातुडे त्यांत दुग्धपान ॥ तेवीं तूं दाखविसी हावभाव करुन ॥ परी क्षणैक क्षीण होसील कीं ॥३३॥ वीरभद्र म्हणे मूर्खा एक ॥ तूतें दावीन यमलोक ॥ तव आयुष्य सरलें सकळिक ॥ म्हणूनि येथें आलासी ॥३४॥ तरी मी तूतें काळक्षय ॥ प्रगट झालों आहें प्रत्यक्ष ॥ तरी तव गुरु प्रतापदक्ष ॥ कैसा आहे पाहूं दे ॥३५॥मच्छिंद्र म्हणे मशकासाठी ॥ मेरु मिळवील काय नगांची कोटी ॥ कीं महाक्षीराब्धी घेऊनि नरोटीं ॥ भीक मागेल पोटातें ॥३६॥मूर्खा ऐक वचनार्थ ॥ मम गुरुचा मौळीं वरद हस्त ॥ तेणें होतसे शरणागत ॥ मानव दानव देवादि ॥३७॥ तेथें अर्मका तुझा पाड ॥ किमर्थ आधीं मिरविसी कोड ॥ महासविता तप्त उजेड ॥ खद्योतातें मिरवेना ॥३८॥वीरभद्र म्हणे तूं काय करिशी मरणकाळीं फांटा फुटला तुजसा ॥ आतां क्षणोंचि भूमीपाशीं ॥ करीन नव्हतासि ऐसें ॥३९॥अरे तव ग्रीवेतें काळपाश ॥ आधींच पावलें आयुष्य नाश ॥ म्हणूनि मूर्खा तूतें हौस ॥ ये वादा स्फुरलासी ॥४०॥ ऐसें म्हणूनि वीरभद्रानें ॥ गुणीं सज्जिलें अस्त्रविंदान ॥ म्हणे भ्रष्टा सावधान ॥ राममंत्र जल्पीं कां ॥४१॥ मच्छिंद्र म्हणे राममंत्र ॥ तूतें वाटला अपवित्र ॥ परी तेणोंचि सुखी पंचवक्र ॥ दुःखलेशी मुकलासे ॥४२॥ अरे राममंत्रें वाल्या तरला ॥ तें नाम तारील आतांचि मजला ॥ परी सावध तूं होई कां वहिला ॥ राममंत्रावेगळा ॥४३॥ऐसें म्हणूनि कक्षे झोळी ॥ विलोकूनि भस्म करीं कवळी ॥ मग शस्त्रास्त्रीं तेणें काळीं ॥ वज्रस्थापना जल्पतसे ॥४४॥पूर्ण प्रयोग घालूनि धाटीं ॥ भोंवती फिरवी भस्मचिमुटी ॥ तेणें करुनि वज्रदाटी ॥ दाही दिशा मिरवीतसे ॥४५॥ आणीक करीं कवळूनि भस्म ॥ यासी विलोकी योगद्रुम ॥ तों वीरभद्रें सायकें परम ॥ निर्वाण बाण सोडिला ॥४६॥ तो बाण येतां किंकाटत ॥ दृष्टीं पाहे मच्छिंद्रनाथ ॥ मग आपुले मानी मनांत ॥ बाण आहे तृणासम ॥४७॥ ऐसें म्हणूनि स्तब्धदृष्टी ॥ उभा करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥ तवं तो बाण नभापोटीं ॥ संचरुनि उतरतसे ॥४८॥ मच्छिंद्रनाथातें लक्षून ॥ खालीं उतरतसे घ्यावया प्राण ॥ तों सबळ बळें वज्र येऊन ॥ प्रहार करितें पैं झाले ॥४९॥ तरी तें वज्र वरिष्ठ ॥ आदळतांचि बाण झाला पिष्ट ॥ तें पाहूनि वीरभद्र वरिष्ठ ॥ परम चित्तीं क्षोभला ॥५०॥

 

Sadguru Vishnudas Maharaj