Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय १४

श्रीगणेशाय नमः जयजयाजी पंढरीनाथा ॥ समचरणीं भक्ततापशमिता ॥ कटीं कर नासाग्रीं दृष्टी ठेविता ॥ होसी रंजिता मुनिमानसा ॥१॥ ऐसा स्वामी तूं करुणाकार ॥ तरी तूं बोलवीं भक्तिसार ॥ मागिले अध्यायीं कथानुसार ॥ परम कृपें वदविला ॥२॥ त्या कृपेचा बोध सबळ ॥ ब्रह्म उदधि पावला मेळ ॥ पात्रा मैनावती सबळ ॥ सरिताओंघीं दाटली ॥३॥ ॐ नमो ब्रह्मार्णवीं दाटली परी ॥ ऐक्यरुप झाली नारी ॥ मोहें पुत्राचें परिवारीं ॥ गुंतलीसे जननी ते ॥४॥ मनासी म्हणे अहा कैसें ॥ त्रिलोचनरायाचें जाहले जैसें ॥ त्याचि नीतीं होईल तैसें ॥ मम सुताचें काय करुं ॥५॥ जंव जंव पाहे त्यातें दृष्टीं ॥ तंव तंव वियोग वाटे पोटीं ॥ हदयी कवळूनि जठरवेष्टी ॥ होत असे मोहानें ॥६॥ अहा पुत्राचें चांगुलपण ॥ दिसे जैसा प्रत्यक्ष मदन ॥ परी काय करावें चांगुलपण ॥ भस्म होईल स्मशानीं ॥७॥ उत्कृष्टपणें करोनि कष्ट ॥ धाम उभाविलें अति श्रेष्ठ ॥ परी वन्हिबळें लागल्य काष्ठ ॥ तेवीं असे काळाग्नी ॥८॥ पहा पल्लवपत्रझाड ॥ अति विशाळ लावला पाड ॥ परी गाभारी वेष्टितां भिरुड ॥ उशाशीं काळ बैसला ॥९॥ तन्न्यायें दिसूनि येत ॥ वायां जाईल ऐसा सुत ॥ कीं कद्रूलागीं चोखट अमृत ॥ फिकरपणे मिरविले ॥१०॥ कीं यत्नेंकरुनि कचें दुर्घट ॥ संजीवनीचा केला पाठ ॥ परी देवयानीचा शाप उल्हाट ॥ यत्र व्यर्थ तो झाला ॥११॥ कीं सुंदर जाया कर्मे जारिणी ॥ परी पतिभयाच धाक मनीं ॥ तेवीं तो उशाशीं काळ बैसोनि ॥ सकळ जनां मिरवला ॥१२॥ कीं कुसुमशेज मृदुलाकार ॥ परी उसां घालूनि निजे विखार ॥ ते सुखनद्रेचा व्यापार ॥ सुखा लाहे केउता ॥१३॥ तन्न्यायें झालें येथ ॥ राजवैभव अपरिमित ॥ परी काळचक्राची सबळ बात ॥ भ्रमण करीत असे पैं ॥१४॥ ऐसी सदासर्वकाळ ॥ चित्तीं वाहे माय तळमळ ॥ परी सुतासी बोध कराया बळ ॥ अर्थ कांही चालेना ॥१५॥ तंव कोणी ऐके दिवशीं ॥ शीतकाळ मावमासीं ॥ उपरी सहपरिचारिकेंसीं उष्ण घेत बैसलीसे ॥१६॥ ते संधींत गोपीचंद ॥ चौकीविभागीं सकळ स्त्रीवृंद ॥ वेष्टूनि स्नान कराया सिद्ध ॥ चंदनचौकीं बैसला ॥१७॥ चंदनचौकी परी ते कैशी ॥ हेमतगंटी रत्न जैशीं ॥ जडावकोंदणी नक्षत्रांसीं ॥ राजवृंदीं चमकतसे ॥१८॥ सकळ काढूनि अंगींचे भूषण ॥ वरी विराजे राजनंदन ॥ उष्ण उदकीं करीत दंतधावन ॥ चौकीवरी बैसला ॥१९॥ तों सौधउपरी मैनावती ॥ झाली स्वसुतातें पाहती ॥ देखिला जैसा पूर्ण गभस्ती ॥ तेजामाजी डवरला ॥२०॥ राजसेवकाचें भोवतें वेष्टन ॥ परिचारिका वाहती जीवन ॥ परी त्या मंडळांत नृपनंदन ॥ चांगुलपर्णी मिरवतसे ॥२१॥ जैसा अपार पाहतां स्वनंदन ॥ मोहें आलें उदरवेष्टन ॥ तेणें लोटलें अपार जीवन ॥ चक्षूंतूनि झराटले ॥२३॥ परी ते बुंद अकस्मात ॥ मोहें घ्राणाचे उदभव व्यक्त ॥ गोपीचंद चातकातें ॥ स्पर्शावया धावले हो ॥२४॥ म्हणाल बुंद चक्षूदकीं ॥ नोहे उरते सत्कर्मवाकीं ॥ उत्तम फळांवें लक्षूनि सेकी ॥ व्यक्त जलें ते अंगासी ॥२५॥ बुंद नव्हती ते चिंतामणी ॥ हरुष केला भवकाचणी ॥ कीं कृतांतभयातें संजीवनी ॥ भूपशरीरा आदळले ॥२६॥ कीं अर्के पीडित भारी ॥ नृपजन वेष्टला नगरी ॥ तैं ते उतरले घन मनहरी ॥ बुंदवेश धरुनियां ॥२७॥ कीं काळक्षुधेचा पेटला अनळ ॥ तेणें शरीर झालें विकळ ॥ ते संधींत होऊनि कृपाळू ॥ कामधेनु उतरली ॥२८॥ कीं दरिद्राचें अतिवेष्टन ॥ तैसा येथें मिरविला कुबेर येऊन ॥ तन्न्याय सुबुंद घन ॥ रावहदयीं आदळले ॥२९॥ शरीरीं होतां बुंद लिप्त ॥ परी उदभवस्थिती लागली त्यांत ॥ म्हणूनि ऊर्ध्व करुनि मूर्धातें ॥ नभालागीं विलोकीं ॥३०॥ हदयीं होऊनि राव शंकित ॥ म्हणे बुंद कैंचा उदभवला येथ ॥ तरी अंबर झालें असेल व्यक्त ॥ घनमंडळ आगळें ॥३१॥ म्हणूनि ऊर्ध्व करुनि दृष्टी ॥ पाहता झाला नभापोटीं ॥ परी ते निर्मळपणें वृष्टी ॥ झाली कोठूनि म्हणतसे ॥३२॥ ऐसा विचार करितां चित्तीं ॥ दृष्टिगोचरी संभविती ॥ तों रुदन करितां मैनावती ॥ निजदृष्टीं देखिली ॥३३॥ करीत होता दंतधावन ॥ तैसाचि उठला नृपनंदन ॥ उपरी त्वरा वेगीं चढून ॥ मातेपाशीं पातला ॥३४॥ जातांचि पदी ठेवूनिया माथा ॥ उभा जोडूनि हस्तां ॥ म्हणे सांग जी कवण अर्था ॥ उचंबळलीस जननीये ॥३५॥ मजसारखा तूतें सुत ॥ राज्याधीश महीं व्यक्त ॥ ऐसा असूनि दुःखपर्वत ॥ कोठूनि उदेला तंव चित्तीं ॥३६॥ पाहें पाहें प्रताप आगळा ॥ न वर्णवे बळ बळियांकित महीपाळा ॥ मिरवती दर्पकंदर्प केवळा ॥ करभारातें योजिती ॥३७॥ ऐसी असतां बळसंपत्ती ॥ बोललें कुणी दुःखसरितीं ॥ तरी मम कोपाचा दाहक गभस्ती ॥ सांवरेल कोणातें ॥३८॥ जेणें पाहिलें असेल नयनीं ॥ उगीच तीव्र दृष्टी करोनि ॥ तरी तयाचे क्षणें चक्षु काढोनि ॥ तव करीं माये ओपीन गे ॥३९॥ किंवा दाविलें असें बोटी ॥ तरी तींच बोटें काढीन शेवटीं ॥ तरी कवण अर्थ उदेला पोटीं ॥ रुदन कराया जननीये ॥४०॥ अष्टविंशति स्त्रीमंडळ ॥ कीं त्यांनीं ओपिलें कडुवट फळ ॥ तरी शिक्षा करुनि तयां सबळ ॥ मोक्षपंथा मिरवीन ॥४१॥ किंवा माझिये दृष्टी सेवेशीं ॥ उदया पावला अंतर शेषीं ॥ म्हणूनि उदय शोकानिशी ॥ दर्शविली त्वां मातें ॥४२॥ तरी कोणता कवण अर्थ ॥ माते वदे प्रांजळवत ॥ कामनीं वेधक असेल चित्त ॥ तोचि वेध निवटीन मी ॥४३॥ म्हणसील कार्य आहे थोर ॥ करुं न शके सुत पामर ॥ तरी हा देह वेंचूनि समग्र ॥ अर्थ तुझा पुरवीन मी ॥४४॥ जरीं ऐशिया दृष्टीं ॥ अंतर पडेल काय पोटीं ॥ तरी धिक्कार असो मज शेवटीं ॥ पुत्रधर्म मिरवावया ॥४५॥ मग श्वान सूकर काय थोडीं ॥ अवतार मिरविती द्वारीं पवाडी ॥ याचि नीति तया प्रौढीं ॥ निर्माण झालों मी एक ॥४६॥ अहा पुत्रधर्म मग कैसा ॥ माता पिता दुखलेशा ॥ पाहूनि चित्तीं परी हरुषा ॥ भूमार तो नर एक ॥४७॥ आपण मिरवे राणिवा प्रकरणीं ॥ मातापिता दैन्यवाणीं ॥ तयाचे भारें सकळ मेदिनी ॥ विव्हळ दुःखे होतसे ॥४८॥ कांतेलागी शृंगार व्यक्त ॥ मातेसी वसन नेसावया भ्रांत ॥ तयाचे भारीं धरा समस्त ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥४९॥ कांतेसी नेसावया वस्त्रें भरजरी ॥ माता ग्रंथीं चीर सावरी ॥ तयाचे भारें सकळ धरित्री ॥ विव्हळ दुःखें होतसे ॥५०॥