Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ३४

श्रीगणेशाय नमः जयजयाजी रघूत्तमा ॥ आराध्य होसी प्लवंगमां ॥ जटायूनामी विहंगमा ॥ मुक्तिदाता रक्षक तूं ॥१॥ तरी आतां कथाप्रसंगा ॥ पुढें बोलवी नवरस प्रसंगा ॥ जेणें ऐकूनि श्रोतये अंगा ॥ अनुभवतील महाराजा ॥२॥ मागिले अध्यायीं करविलें बोलणें ॥ मच्छिंद्राचें भूमंडळीं शरीर आणून ॥ वीरभद्र मारुनि केला भस्म ॥ दानवांसह रणांगणीं ॥३॥ तरी आतां पुढें कथा ॥ वीरभद्र निमाल्या उमाकांता ॥ सहज गुण आठवोनि चित्ता ॥ पुत्रमोहें वेष्टिला ॥४॥ मुख वाळूनि झालें म्लान ॥ अश्रु लोटले दोन्ही नयनीं ॥ परी न बोले कांहीं जटा वेष्टूनी ॥ पुत्र मोहें स्फुंदतसे ॥५॥ मनांत म्हणे हा हा पुत्रा ॥ परता धैर्या लावण्यगात्रा ॥ विद्यासंपन्न सर्वअस्त्रा ॥ जाणता एक होतास कीं ॥६॥ अहा कैसा दैवहीन हातींचें गेलें पुत्रनिधान ॥ काय असोनि अपार गण ॥ तया सरसी न पवती ॥७॥ एक इंदु खगीं नसतां ॥ अपार उडुगण असोनि वृथा ॥ तेवीं वीरभद्राविण सर्वथा ॥ हीन तेजें वाटती ॥८॥ कीं मयूरा सर्वागीं डोळे ॥ परी देखण्याचे मंदावले बुबुळे ॥ तेवीं वीरभद्राविण गण विकळे ॥ सर्व मातें भासती पैं ॥९॥ कीं गात्रें सकळ चांगुलपणीं ॥ अंगी मिरविला लावण्यखाणी ॥ परी एक घ्राण गेलें सांडोनी ॥ सकळ विकळ ती होती ॥१०॥ तैसें माझ्या वीरभद्राविण ॥ सकळ विकळ दिसती गण ॥ अहा वीरभद्र माझा प्राण ॥ परत्र कैसा गेला सोडोनी ॥११॥ ऐसें म्हणूनि मनींच्या मनांत ॥ पंचानन आरंबळत ॥ तीं चिन्हें जाणूनि गोरक्षनाथ ॥ चित्तामाजी कळवळला ॥१२॥ मनांत म्हणे बद्रिकाश्रमातें ॥ मातें बैसविलें तया गुरुनाथें ॥ तै रात्रंदिवस उमाकांत ॥ मजसाठीं श्रम पावे ॥१३॥ मायेसमान पाळूनि लळा ॥ माता रक्षी जेवीं बाळा ॥ तरी ऐसा स्वामी चित्तकोंवळा ॥ पुत्रमोहें वेष्टिला असे ॥१४॥ अहा तरी म्यां उपकार ॥ काय हो केला अनिवार ॥ ऐसा स्वामी शिणविला हर ॥ दुःख तुंबळ देऊनियां ॥१५॥ ऐसें म्हणून स्वचित्तांत ॥ पायां लागे गोरक्षनाथ ॥ म्हणे पुत्रदुःखावरी मोहवेष्टित ॥ चित्त तुमचे झालें कीं ॥१६॥ तरी वीरभद्रातें आतां उठवीन ॥ परी अस्थि आणाव्या ओळखून ॥ येथें राक्षसांचें झालें कंदन ॥ राक्षसअस्थी मिरविती ॥१७॥ त्यांत वीरभद्राच्या अस्थी ॥ मिसळल्या कृपामूर्ती ॥ म्हणूनि संशय वाटें चित्तीं ॥ वीरभद्रातें उठवावया ॥१८॥ जरी ऐसिया मिसळल्या नाथा ॥ संजीवनीप्रयोग जपतां ॥ सकळ राक्षस उठतील मागुतां ॥ म्हणोनि चिंता व्यापिली ॥१९॥ ऐसें बोलतां गोरक्षजती ॥ नीलग्रीव म्हणे कृपामूर्ती ॥ वीरभद्राच्या सकळ अस्थी ॥ ओळखून काढीन मी ॥२०॥ माझे गण आहेत जितुले ॥ ते आसनीं भोजनीं भले ॥ मम नामीं रत झाले ॥ कायावाचाबुद्धीनें ॥२१॥ तरी चित्तबुद्धिअंतःकरणीं ॥ वीरभद्र नामीं गेला वेष्टोनी ॥ जागृत सुषुप्त स्वप्नीं ॥ वेष्टिला असे मम नामीं ॥२२॥ ऐसें बोलूनि शंकर ॥ रणभूमीत करी संचार ॥ मग तेथें अस्थि उचलूनि सत्वर ॥ कर्णी आपुल्या लावीतसे ॥२३॥ ऐशियेपरी शोध करितां ॥ वीरभद्र जेथें पडला होता ॥ तेथे जाऊनि अवचट हस्ता ॥ अस्थी उचली तयाच्या ॥२४॥ अस्थी उचलोनि कर्णी लावीत ॥ तंव त्या अस्थी मंद शब्द करीत ॥ शिव शिव म्हणोनि शब्द येत ॥ शिवकर्णी तत्त्वतां ॥२५॥ मग त्या अस्थी पंचानने ॥ गोळा केल्या परीक्षेनें ॥ जेथें होता गोरक्षनंदन ॥ तेथें आणूनि ठेविल्या ॥२६॥ मग तो विद्यार्णवकेसरी ॥ भस्मचिमुटी कवळूनि करीं ॥ वीरभद्रनामीं साचोकारीं ॥ संजीवनी स्मरला असे ॥२७॥ होतां संजीवनीचा प्रयोग पूर्ण ॥ वीरभद्र उठला देह धरुन ॥ म्हणे माजें धनुष्यबाण ॥ कोठें आहे सांग कीं ॥२८॥ व्यापले अपार राक्षस कोटी ॥ तितुके मारीन आतां जेठी ॥ उपरी गोरक्षा यमपुरी शेवटीं ॥ प्रतापानें दावीन कीं ॥२९॥ ऐसें वीरभद्र बोले वचन ॥ करीं धरीं पंचानन ॥ म्हणे बापा आतां शीण ॥ व्यर्थ बोलाचा न करी ॥३०॥ मग हदयी कवळूनि त्यातें ॥ सांगितला सकळ वृत्तांत ॥ उपरी म्हणे उमाकांत ॥ स्नेह नाथीं धरावा ॥३१॥ मग गोरक्ष आणि वीरभद्रजेठी ॥ उभयतांची करविली भेटी ॥ उपरी म्हणे स्नेह पोटीं ॥ उभयतांनीं रक्षावा ॥३२॥ उपरी बहात्तर कोटी चौर्यांभयशीं लक्ष ॥ शिवगण प्रतापी महादक्ष ॥ ते वायुचक्रीं असतां प्रत्यक्ष ॥ उतरी गोरक्षक तयांसी ॥३३॥ मग सकळ समुदाय एक करुन ॥ जाते झाले गोरक्ष नमून ॥ येरीकडे राव त्रिविक्रम ॥ राज्यवैभवीं गुंतला ॥३४॥ गोरक्ष सकळ शवमांदुस ॥ रक्षन करी शिवालयास ॥ तों त्रिविक्रमराव दर्शनास ॥ अकस्मात पातला ॥३५॥ राव देखतां गोरक्षासी ॥ प्रेमें मिठी घाली ग्रीवेसी ॥ निकट बैसवोनि त्यासी ॥ सर्व वृत्तांत विचारी ॥३६॥ मग शवाचा जो झाला वृत्तांत ॥ तो सकळ त्यातें केला श्रुत ॥ होतांचि तळमळ चित्तांत ॥ मच्छिंद्राच्या लागली ॥३७॥ मग गोरक्षासी बोले वचन ॥ धैर्य धरावें कांहीं दिन ॥ धर्मनाथातें राज्यासन ॥ देऊनि येतो लगबगें ॥३८॥ ऐसें बोलूनि प्रजानाथ ॥ स्वगृहीं आला त्वरितात्वरित ॥ बोला वोनि मत्रिकांतें ॥ विचारातें घडविलें ॥३९॥ मग पाहूनि उत्तम दिन ॥ महीचे राव घेतले बोलावून ॥ राज्यपदीं स्वहस्तें अभिषेक करवून ॥ धर्मराज स्थापिला ॥४०॥याचकांसी देऊनि अपार धनें ॥ आणि भूपांलागीं दिधली भूषणें ॥ परम स्नेहें बोळवून ॥ बंदिजन सोडविले ॥४१॥ यासही लोटला एक मास ॥ राव त्रिविक्रम आपुल्या मंदिरीं खास ॥ देह सांडूनि शिवालयास ॥ तत्क्षणीं पातला ॥४२॥ येरीकडे रेवती सती ॥ सहज गेली राजसदनाप्रती ॥ म्हणे महाराजा हे नृपती ॥ अजूनि कां हो निजलांत ॥४३॥ परी तीतें न बोले कांहीं ॥ मग हालवोनि पाहे स्वहस्तप्रवाहीं ॥ तंव तें प्रेत मिरवले देहीं ॥ पाहोनि शोका वहिवाटे ॥४४॥ रेवती शोक करितां तुंबळ ॥ ऐकूनि धांवला धर्मनाथ बाळ ॥ मंत्री प्रजा सेवक सकळ ॥ हंबरडा बहु ऊठला ॥४५॥ तो वृत्तांत शिवालयासी ॥ जनमुखें आला गोरक्षापाशीं ॥ मग सिद्ध करुनि भस्मचिमुटीसी ॥ संजीवनी प्रयोजी ॥४६॥ अस्थी मांस प्रयोजितां ॥ देह संगीन झाला त्वरित ॥ संगीन होतां मच्छिंद्रनाथा ॥ समय पावला रिघावया ॥४७॥ मच्छिंद्र देहीं संचार होतां ॥ उठूनि बैसला क्षण न लागतां ॥ येरीकडे रावप्रेत ॥ स्मशानवाटिके आणिलें ॥४८॥ प्रेत आणिलें स्मशानी ॥ त्रिवर्ग पहावया निघाले मुनी ॥ तो रेवतीनें दृष्टीं पाहोनी ॥ शोध आणविला तयाचा ॥४९॥ करुनि रायाचें दहन ॥ स्नाना गेले सकळ जन ॥ परी धर्मराज दारुण ॥ शोक करी अदभुत पैं ॥५०॥