Navnath Bhaktisar....श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ५ पृष्ठ १ Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ५

श्रीगणेशाय नमः जयजयाजी यदुकुळटिळका ॥ भक्तिपंकजाच्या सदैव अकी ॥ मुनिमानसचकोरपाळका ॥ ॥ कृपापीयूषा चंडा तूं ॥१॥ भाविक प्रेमळ भक्त परी ॥ तयामचा अससी पूर्ण कैवारी ॥ बाळप्रल्हादसंकटावरी ॥ कोरडे काष्ठीं प्रगटलासी ॥२॥ करविंशतिप्रताप सघन ॥ संकटीं घातले देव तेणें ॥ तदर्थ सकळ रविकुळपाळण ॥ अवतारदीक्षा मिरविसी ॥३॥ देवविप्रांचें संकट पाहून ॥ मत्स्यकुळातें करी धारण ॥ मग उदधीतें गगन दावून ॥ शंखासुर धरियेला ॥४॥ तेवींच दैत्य दुमदुमा करीत ॥ अवतार कच्छ झाला मिरवीत ॥ उदधी मंथूनि शंखा ॥ तोषवीत ॥ महाराज कृपार्णव ॥५॥ राया बळीची उद्दाम करणी ॥ स्वरुप मिरवी खुजटपणी ॥ संकट पडतां सुरगणी ॥ फरशधर झालासे ॥६॥ अपार भक्तप्रेमा सघन ॥ त्यांत स्थिरावले पंडुनंदन ॥ शिशुपाळ - वक्रदंतकंदन ॥ वसुदेवकुशीं मिरवला ॥७॥ असो ऐसा भक्तिप्रेमा ॥ तूतें आवडे मेघश्यामा ॥ तरी भावभक्तिच्या उगमा ॥ पुढें ग्रंथ बोलवीं ॥८॥ मागिलें अध्यायीं केलें कथन ॥ हिंगळाज क्षेत्रीं मच्छिंद्रनंदन ॥ अष्टभैरव चामुंडा जिंकून ॥ दर्शन केलें अंबेचें ॥९॥ तरी श्रोते सिंहावलोकनीं ॥ कथा पहा आपुले मनीं ॥ बारामल्हारमार्ग धरुनी ॥ जाता झाला मच्छिंद्र ॥१०॥ तो बारामल्हारकाननांत ॥ मुक्कामा उतरला एका गांवांत ॥ देवालयीं मच्छिंद्रनाथ ॥ सुखशयनीं पहुडला ॥११॥ तों रात्र झाली दोन प्रहर ॥ जागृत आहे नाथ मच्छिंद्र ॥ तंव काननी दिवट्या अपार ॥ मच्छिंद्रनाथें देखिल्या ॥१२॥ इकडूनि जाती तिकडूनि येती ॥ ऐशा येरझारा करिती ॥ तें पाहूनि नाथ जती ॥ म्हणे भुतावळें उदेलें ॥१३॥ तरी यातें करावें प्रसन्न ॥ समय येत हाचि दिसून ॥ कोण्या तरी कार्यालागून ॥ उपयोगीं श्रम पडतील ॥१४॥ तरी त्यातें आतां शरणागत ॥ प्रसन्न करुनि घ्यावें भूत ॥ श्रोते म्हणती कार्य कोणतें ॥ भूतास्वाधीन असेल कीं ॥१५॥ तरी ऐसें न बोलावें या वेळे ॥ भूत श्रीराम उपयोगी आलें ॥ राक्षसाचें प्रेत नेलें ॥ समरंगणीं सुवेळे ॥१६॥ तेव्हां अमृतदृष्टीकरुन ॥ उठवी श्येन कपिरत्न ॥ तेवीं तुळसीसी प्रसन्न ॥ भूत झालें कलींत ॥१७॥ तरी लहानापासूनि थोरापर्यंत ॥ समयीं कार्य घडूनि येत ॥ पहा अर्णवा झुरळें निश्वित ॥ वांचविलें म्हणताती ॥१८॥ तन्न्यायें कल्पूनि चित्तीं ॥ नाथ भूतांच्या बैसल्या अर्थी ॥ मग अंबिकाअस्त्र स्पर्शशक्ती ॥ प्रेरिता झाला तेचि क्षणी ॥१९॥ तें अस्त्र प्रेरितां भूतगणीं ॥ होतां स्पर्श कुरुमेदिनीं ॥ मग पद घरी आंवळूनी ॥ सुटका नाहीं पदातें ॥२०॥ जेवीं युद्ध कुरुक्षेत्रांत ॥ मही धरीतसे कर्णरथ ॥ चक्रें गिळूनि करी कुंठित ॥ गमनसंधान करुं नेदी ॥२१॥ तन्न्यायें स्पर्शशक्ती ॥ करी भूतपदा धरा व्यक्ती ॥ चलनवलन मग त्या क्षितीं ॥ कांहीएक चालेना ॥२२॥ जैसे तरु एकाचि ठायीं ॥ वसती अचळप्रवाहीं ॥ तन्न्यायें भूतें सर्वही ॥ खुंटोनियां टाकिली ॥२३॥ तयां भूतांचें वियोगानिमित्ते ॥ कीं वेताळा भेटी जाणें होतें ॥ सर्व मिळोनि येतां क्षितींत ॥ जमोनियां येताती ॥२४॥ तंव ते दिवशीं झाले कुंठित ॥ वेताळभेटीच राहिली अप्राप्त ॥ येरीकडे वेताळ क्षितींत ॥ अनंत भूतें पातलीं ॥२५॥ तो दक्षभूतांचा बळी वेताळ ॥ पाहे अष्टकोटी भूतावळ ॥ तों न्यूनपणीं सर्व मंडळ ॥ दिसून आलें तयातें ॥२६॥ मग अन्य भूतातें विचारीत ॥ शरभतीरींची भूतजमात ॥ आली नाहीं किमर्थ ॥ शोध त्यांचा करावा ॥२७॥ अवश्य म्हणोनि पांच सात ॥ गमन करिते झाले भूत ॥ शरभतीरीं येऊनि त्वरित ॥ निजदृष्टीं पहाती ॥२८॥ तंव ते मंडळी महीं व्यक्त ॥ उभी असे बळरहित ॥ जैसा एका ठायींचा पर्वत ॥ दुसर्यां ठायीं आतळेना ॥२९॥ मग त्या मंडळानिकट येऊन ॥ पुसते झाले वर्तमान ॥ तुम्ही व्यक्त महीलागून ॥ काय म्हणोनि तिष्ठलां ॥३०॥ येरी म्हणती अनेक जे भेद ॥ महीं उचलोनि देतां पद ॥ कोण आला आहे सिद्ध ॥ तेणें कळा रचियेली ॥३१॥ मग ते पाहे कळा ऐकून ॥ पर्वता चालिले शोधालागून ॥ गुप्तरुपें वस्तींत येऊन ॥ मच्छिंद्रनाथ पाहिला ॥३२॥ बालार्ककिरणीं तेजागळा ॥ शेंदूर चर्चिलासे भाळा ॥ तयामाजी विभूती सकळा ॥ मुखचंद्रें चर्चिली ॥३३॥ कर्णी मुद्रिका रत्नपाती ॥ कीं वस्तीत पातल्या रत्नज्योती ॥ हेमगुणी गुंफोनि निगुती ॥ कवरींभारीं वेष्टिला ॥३४॥ललाट अफाट मिशा पिंगटा ॥ वटदुग्धानें भरल्या जटा ॥ सरळ नासिका नेत्रवाटा ॥ अग्रीं समदृष्टी पहातसे ॥३५॥ अर्कनयनीं विशाळ बहुत ॥ उग्रपणीं उदय दावीत ॥ पाहतां वाटे कृतांत ॥ नेत्रतेजें विराजला ॥३६॥ स्थूळवट बाहुदंड सरळ ॥ आजानुबाहू तेजाळ ॥ कीं मलविमल करुनि स्थळ ॥ बहुवटीं विराजले ॥३७॥ मस्तकीं शोभली दिव्य वीरगुंठी ॥ कंथा विराजे पाठपोटीं ॥ त्यावरी ग्रांवेसी नेसल्या दाटी ॥ ज्ञानशिंगी मिरवीतसे ॥३८॥ बाहुवटें हनुमंत ॥ वीरकंकण करीं शोभत ॥ कुबडी फावडी घेऊनि हातांत ॥ बोधशौलिका विराजे ॥३९॥ जैसा तीव्र बारावा रुद्र ॥ कीं सरळ योगियांचा भद्र ॥ जैसा नक्षत्रगणीं चंद्र ॥ तेजामाजी डवरतसे ॥४०॥ ऐसें पाहूनि एक भूतीं ॥ मनामाजी करितां ख्याती ॥ येणेंचि व्यक्त केलें क्षितीं ॥ भूतगणा वाटतसे ॥४१॥ मग ते होऊनि संदेहस्थ ॥ नाथासी म्हणती भूतें पतित ॥ जाऊं द्या स्वामी करा मुक्त ॥ आपुलाल्या कार्यासी ॥४२॥ नाथ म्हणे सर्व गुंतले ॥ तुम्ही मुक्त केवीं राहिले ॥ येरु म्हणे पाठविलें ॥ समाचारा वेताळे ॥४३॥ तरी महाराजा करीं मुक्त ॥ जाऊं द्या वेताळनमनार्थ ॥ यावरी त्यांसी म्हणे नाथ ॥ सोडणार नाहीं सहसाही ॥४४॥ तुमचा वेताळ आदिराणीव ॥ जाऊनि त्यातें त्वरें सांगावें ॥ येरु म्हणती मग अपूर्व ॥ भलें नोह महाराजा ॥४५॥ वेताळ खवळता बाबरदेव ॥ हे महाबळाचे असती अष्टार्णव ॥ ब्रह्मांड जिंकूनि कंदुकभाव ॥ महीं खेळती महाराजा ॥४६॥ नवनाग जैसे सबळी ॥ तयां माजी फोडितां कळीं ॥ तयांसवें कोणी रळी ॥ केली नाहीं आजन्म ॥४७॥ देव दानव गंधर्व असती ॥ तेही वेताळ बलाढ्य म्हणती ॥ तस्मात् स्वामी तयांप्रती ॥ श्रुत करुं नोहे जी ॥४८॥ येरु म्हणे संपादणी ॥ येथें काय करितां दाऊनी ॥ तुमचा वेताळ पाहीन नयनीं ॥ बळजेठी कैसा तो ॥४९॥ ऐसी ऐकूनी भूतें मात ॥ म्हणती अवश्य करुं श्रुत ॥ मग जाती जेथ तो वेताळ भूत ॥ तयापाशीं पातले ॥५०॥