Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ३८

श्रीगणेशाय नमः जयजयाजी व्यंकटरमणा ॥ दयासागरा परिपूर्णा ॥ भक्तदुःखभंजना ॥ पुढें ग्रंथ बोलवीं ॥१॥ मागिले अध्यायीं कथन ॥ नागनाथा भेटला अत्रिनंदन ॥ विद्याभ्यासें दीक्षाकारण ॥ नाथपंथीं मिरवला ॥२॥ उपरी मच्छिंद्राशीं खेळूनि रळी ॥ जिंकिला मच्छिंद्र तपोबळी ॥ तंव सिद्ध उत्पन्न करुनि मंडळी ॥ शाबरी विद्या ओपिली ॥३॥ यावरी श्रोतीं पुढें कथन ॥ पूर्वी दक्षगृहीं वार्ता जाण ॥ निघालें विवाहयोजनालक्षण ॥ मंगळकार्याचें तेधवां ॥४॥ हिमालयाची आत्मजा ॥ ती योजिली मंगलकाजा ॥ तेव्हां देवदानवमानवां भोजा ॥ पाचारण पाठविलें ॥५॥ तेणेंकरुनि दक्षागार ॥ भरोनि निघाला सुरवर ॥ मानवी दक्ष हरि हर ॥ सभास्थानीं बैसले ॥६॥ मंडळी ऐसी सर्वासहित ॥ बैसली असे पार्वती त्यांत ॥ मंगलकला करुनि मंडपांत ॥ मिरवत असे नोवरी ॥७॥ परी ते नोवरी स्वरुपखाणी ॥ कीं चंद्रकला नक्षत्रगणीं ॥ तेजाला जैसी सौदामिनी ॥ उजळपणा कराया ॥८॥ कीं सहस्त्र विद्युल्लतांचा पाळा ॥ ऐक्यपणें झाला गोळा ॥ सुरवरीं घनमंडळा ॥ चमकपणी शोभवी ॥९॥ कीं अर्क प्रत्यक्ष दीक्षाबाळ ॥ सभासद मिरवे केवळ ॥ तयाचें प्रतिबिंब व्योमीं जळ ॥ ब्रह्माण्डकुंडीं अर्क हा ॥१०॥ ऐसियापरी लावण्यता ॥ सभेंत मिरवे जगन्माता ॥ ते स्वरुप देखूनि नाभिसुत ॥ कामानळ दाटला ॥११॥ कामविरह चपळवंत ॥ नेणे विचार समयोचित ॥ स्थान सोडूनि इंद्रियांत ॥ लिंगामाजी पातला ॥१२॥ तैं विधीचा विरहकाम ॥ अधीरपणीं द्रवला उत्तम ॥ महीं प्राप्त होतां मनोधर्मे ॥ संकोचला विधी तो ॥१३॥ बैसल्याठायींचि करुन ॥ रेत रगडियेले महीकारण ॥ तैं आगळे साठसहस्त्र ऋषी वेषें ॥ वालखिल्य भागीं मिरवले ॥१५॥ परी एक आगळा होता भाग ॥ तैसाचि राहिला तेथें चांग ॥ सेवक झाडी महीअंग ॥ केरसमानी मिसळला ॥१६॥ उपरी सरतां मंगळनेम ॥ केला होता लज्जाहोम ॥ केर आणि तयाचें भस्म ॥ सेवक सांडिती सरितेंत ॥१७॥ सरितेंत पडतां सकळ मेळ ॥ सर्व रेताचा सांडूनि मळ ॥ केर मग उगवोनि तळ ॥ निर्मळपणीं वर्तला ॥१८॥ मग तो जळी ढळढळीत ॥ तरुनि प्रवाहीं वाहात जात ॥ तो वाहतां अकस्मात ॥ कुशवेष्टनी आतुडला ॥१९॥ तैं जललहरीचें नेटेंकरुन ॥ कुशवेष्टींत पडे जाऊन ॥ तेथे लोटतां बहुत दिन ॥ कुशमुळ्यांनीं वेष्टिला ॥२०॥ यापरी बहुतां दिवशीं ॥ ईश्वरआज्ञा अवतारक्रमासी ॥ पिप्पलायन त्या रेतासी ॥ नारायण संचरला ॥२१॥ संचरला परी कैसे रीतीं ॥ रोहिसावजे विपिनीं असती ॥ तो मेळ त्या कुशवेष्टीप्रती ॥ उदकपाना पातला ॥२२॥ त्यांत रोहिणी ऋतुवंत ॥ मूत्न स्त्रवली प्रत्यक्ष रक्त ॥ तें भेदूनि वीर्यव्यक्त ॥ रेत वाढी लागलें ॥२३॥ कुशवेट परम भुवन ॥ तयामाजी हे सघन ॥ वाढी लागतां स्वेदजविधान ॥ कीटकन्यायें करुनियां ॥२४॥ अंडज जारज स्वेदज प्रकरण ॥ ऐसीं जीवां उत्पत्तिस्थानें ॥ असो या विधानेकरुन ॥ मूर्ति रचिलीं नवमास ॥२५॥ देह वाढता सबळवंत ॥ कुशमूळ झालें त्रुटित ॥ मग ढाळपणीं महीवरतीं ॥ बाळ दृष्टीसी ते आलें ॥२६॥ तो त्या ठायीं अकस्मात ॥ सत्यश्रवा विप्र भागीरथींत ॥ येवोनियां दर्भानिमित्त ॥ कुशवेष्टी विलोकी ॥२७॥ तो विप्र असे परम सुशीळ ॥ पुनीतग्रामीं तयाचें स्थळ ॥ तेथें येतां दृष्टीं बाळ ॥ पाहिलेसे तेधवां ॥२८॥ देखिलें परी देदीप्यमान ॥ अर्कतेजें परम सुगण ॥ कीं प्रत्यक्ष चंद्रकळा जिंकोन ॥ आणिता झाला त्या ठायीं ॥२९॥ कीं अनंत मस्तकींचा मणी ॥ विसरुनि गेला ते स्थानीं ॥ ऐसें भासलें विप्रा मनीं ॥ अति तेजस्वी चकचकाटे ॥३०॥ चित्तीं म्हणे हें बाळ ॥ कोणाचें आहे तेजःपुंजाळ ॥ कीं उर्वशी उदरकमळ ॥ टाकूनियां गेली असे ॥३१॥ कीं राजबीज मनमोहन ॥ जळदेवतीं दृष्टी पाहून ॥ आणिलें मातेच्या शेजेहून ॥ आपुले स्थानीं न्यावया ॥३२॥ तरी याची पुनः माता ॥ येऊनि भेटेल कधी आतां ॥ परी प्रेमरहित लोभ ममता ॥ टाकूनि ती गेलीसे ॥३३॥ ऐसा तर्कवितर्क करीत ॥ परी तो बाळा न लावी हस्त ॥ कैसे न्यावें म्हणोनि मनांत ॥ पुढील अर्थ दिसेना ॥३४॥अति वितर्के भेदलें मन ॥ परी मोहें वेष्टिले पंच प्राण ॥ चित्तीं म्हणें कैसें सोडून ॥ बाळालागीं जावें हो ॥३५॥अरण्य कर्कश तीर भागीरथी ॥ सावजे येती उदकाप्रती ॥ दृष्टि पडतां तयाचि क्षितीं ॥ घात करतील बाळकाचा ॥३६॥ ऐसें मोहें चित्तीं जल्पून ॥ परी स्पर्श न करी भयेंकरुन ॥ चित्तीं म्हणे नेणों संधान ॥ कैसें आहे कळेना ॥३७॥ ऐसें प्रकरणीं शंकित मानस ॥ बाळानिकट उभा असे ॥ परी स्वर्गाचे देव असती डोळस ॥ देखते झाले तयासी ॥३८।\ बाळक करीतसे रुदन ॥ हस्तपादांतें नाचवून ॥ तें स्वर्गी सुरवर पाहून ॥ नमन करिती भावानें ॥३९॥ म्हणती हा पिप्पलायन नारायण ॥ आजि देखियले तयाचे चरण ॥ तरी आजिचा दिन परम सुदिन ॥ कृतकृत्य झालों कीं ॥४०॥ मग सर्वत्र करुनि जयजयकार ॥ वर्षिते झाले कुसुमभार ॥ कुशवेष्टींत कुसुमें अपार ॥ खचूनियां पाडियेलीं ॥४१॥ विप्र बाळाच्या अंगावरुनी ॥ कुसुमें अपरिमित काढूनी ॥ टाकी परी कुसुमांलागोनी ॥ परी न सरे म्हणोनि दचकला ॥४२॥ चित्तीं म्हणे कैचें बाळप्रकरण ॥ पिशाचकरणी येते दिसोन ॥ अकस्मात येऊनि कुसुमघन ॥ कोणीकडून वर्षती ॥४३॥ ऐसा भयस्थित होऊनि चित्तीं ॥ पळूं लागला नगरवाटीं ॥ कैंचे दर्भ चरणसंपुटीं ॥ अति कवळूनि पळतसे ॥४४॥ तें पाहूनि सुर समस्तीं ॥ गदगदां हास्य करिती ॥ सत्यश्रव्यासी पळतो म्हणती ॥ उभा उभा पळूं नको ॥४५॥ ते सत्यश्रवें शब्द ऐकोन ॥ परम घाबरला पडे उलथून ॥ चित्तीं म्हणे पिशाच येऊन ॥ भक्षावया धांवले ॥४६॥ ढळढळीत भरले दोन प्रहर ॥ खेळी निघाले महीवर ॥ कैंचे बाळक तें प्राणहर ॥ पिशाचकृत्यें मिरवला ॥४७॥ ऐशा वितर्ककल्पना आणूनी ॥ पळत आहे प्राण सोडुनी ॥ पडतां महीतें उलथुनी ॥ पुनः उठोनी पळतसे ॥४८॥सुरवर उभा उभा म्हणती ॥ तों त्यातें न दिसे क्षिती ॥ परी शब्द सुस्वर होती ॥ पिशाच सत्य हें आहे ॥४९॥ मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडुनी ॥ नारदातें बोलती वचनी ॥ स्वामी तुम्हीं जाऊनी ॥ सत्यश्रव्यातें सुचवावें ॥५०॥