Navnath Bhaktisar....श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ६ पृष्ठ १ Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ६

श्रीगणेशाय नमः जयजयाजी क्षीराब्धिवासा ॥ शेषशायी कमळहंसा ॥ नभोदभवशोभा कमळाभासा ॥ सुखविलासा रमेशा ॥१॥ हे करुणानिधे दयावंता ॥ दीनबंधो दीनानाथा ॥ पुढें रसाळ कवित्वकथा ॥ बोलवीं की रसनेसी ॥२॥ मागील अध्यायीं रसाळ कथन ॥ कीं बारामल्हार पवित्र स्थान ॥ तेथें अष्टदैवत पिशाच मिळोन ॥ युद्ध केलें नाथासी ॥३॥ यापरी बारामल्हार करुनि तीर्थ ॥ कुमार दैवत करुनि कोकणस्थानांत ॥ कुडाळ प्रांत आडूळ गांवांत ॥ येऊनियां राहिला ॥४॥ तों ग्रामाबाहेर दुर्गालयीं ॥ महाकाळिका दैवत आहे ॥ तयाचे दर्शना लवलाहें ॥ मच्छिंद्रनाथ पैं गेला ॥५॥ तें काळिकादैवत अति खडतर ॥ मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर ॥ तें शिवहस्ताचें काळिकाअस्त्र ॥ स्थापन केलें महीसी ॥६॥ त्या अस्त्रेंकरुनि दैत्य वधिले ॥ म्हणोनि शिवचित्त प्रसन्न झाले ॥ म्हणूनि काळिकादेवी वहिलें ॥ वरदान घेई कां ॥७॥ वेधक कामना असेल चित्तीं ॥ तें वरप्रदान मागें भगवती ॥ येरी म्हणे अपर्णापती ॥ मम कामना ऐकिजे ॥८॥ तव हस्तीं मी बहुत दिवस ॥ बैसलें अस्त्रसंभारास ॥ आणि जेथें धाडिलें त्या कार्यास ॥ सिद्ध करुनि आलें मी ॥९॥ बहुत वृक्षांतें भंगितां क्षितीं ॥ मी श्रम पावलें अंबिकाहस्ती ॥ परी मातें विश्रांती ॥ सुखवासा भोगू दे ॥१०॥ मग अवश्य म्हणूनि उमारमण ॥ तेथें केलें तियेचें स्थापन ॥ तें उग्र दैवत अति म्हणोन ॥ अद्यापि आहे कलीमाजीं ॥११॥ त्या काळिकादर्शनासाठीं ॥ चित्त व्यग्र होवोनि पोटीं ॥ मार्ग लक्षूनि तयासाठीं ॥ संचार करिता जाहला ॥१२॥ देवीप्रती करुनि नमन ॥ म्हणे माय वो आश्वर्यपण ॥ म्यां मंत्रकाव्य केलें निपुण ॥ त्याजला साह्य होई तूं ॥१३॥ तरी माझें हस्तें विराजून ॥ मम कवित्वविद्या गौरवून ॥ तया ओपूनि वरदान ॥ कार्या उदित होई कां ॥१४॥ ऐसें मच्छिंद्र बोलतां वाणी ॥ क्षोभ चढला अंतःकरणीं ॥ शिवहस्तें अस्त्रालागोनि ॥ पूर्णाश्रम झालासे ॥१५॥ त्यात मच्छिंद्राचें बोलणें ॥ त्या काळिकादेवीनें ऐकून ॥ तेणें क्षोभलें अंतःकरण ॥ प्रळयासमान जेवीं ॥१६॥ जैसा मुचकंद श्रमोनि निद्रिस्त ॥ तैं काळयवन गेला तेथ ॥ निद्रा बिघडतां क्रोधानळांत ॥ प्रसर झाला त्या समयीं ॥१७॥ कीं प्रल्हाद पडतां परम संकटीं ॥ विष्णुहदयीं क्रोध दाटी ॥ प्रगट झाला कोरडे काष्ठी ॥ राक्षसालागीं निवटावया ॥१८॥ तैसी काळिकाहदयसरिता ॥ उचंबळली क्रोधभरिता ॥ मच्छिंद्रालागीं महीसिंधुअर्था ॥ मेळवूं पाहे लगबगें ॥१९॥ कीं क्रोध नोहे वडवानळ ॥ मच्छिंद्र अब्धी अपारजळ ॥ प्राशूं पाहे उतावळ ॥ अर्थसमय जाणूनियां ॥२०॥ म्हणे नष्टा अनिष्टा पतिता ॥ मी भवपाणी श्रमलें असतां ॥ त्यांतचि मातें दुःखवार्ता ॥ शिणवूं पाहसी पुढारा ॥२१॥ तुवां कवित्वविद्या निर्मून ॥ मातें मागसी वरप्रदान ॥ परी वर नोहे मजला विघ्न ॥ करुं आलासी दुर्बुद्धे ॥२२॥ अरे मी आपला भोग सारुन ॥ निवांत बैसलें सेवीत स्थान ॥ तैं तूं मातें वरा गोंवून ॥ शिणवूं पाहसी दुगत्मया ॥२३॥ तरी आतां मम लोचनीं ॥ उभा न राहें जाय फिरोनि ॥ नातरी आगळीक होतां करणी ॥ शासनकाळ लाभसील ॥२४॥ मी शिवकरीचे अस्त्र ॥ तव करीं राहीन काय विचित्र ॥ कीं करीं कवळूनि नरोटीपात्र ॥ भिक्षा मागे श्रीमंत ॥२५॥ किंवा पितळधातूची मुद्रिका रचिली ॥ ते हिराहिरकणी वेढका घडली ॥ तेवी तूतें कामना स्फुरली ॥ सर सर माघारा ॥२६॥ कीं वायसाचे धवळारी ॥ हंसबाळ करी चाकरी ॥ तन्न्यायें दुराचारी ॥ इच्छूं पाहे मम काष्ठा ॥२७॥ राव रंकाचे पंक्ती आला ॥ आला परी श्रेष्ठता त्याला ॥ कीं सिंधूचि कूपस्थानीं ठेला ॥ नांदत कीं आवडीनें ॥२८॥ की दीपतेजाते पाहूनि वास ॥ दीपतेजातें करी आस ॥ तन्न्यायें शक्तिअस्त्रास ॥ तंव करीं वसती प्रारब्धें ॥२९॥ आला विचारिता पांडित्यपण ॥ तो अजारक्षका पुसेल कोठून ॥ तन्न्यायें मूर्खा जाण ॥ आलासी येथें दुरात्मया ॥३०॥ अहा प्रतापी विनतासुत ॥ क्षीणचिलीट होऊनि मस्त ॥ तयासीं समता करुं पाहत ॥ तेवीं येथें आलासी ॥३१॥ अरे मी देव रुद्रकरी असतां ॥ तंव करीं वसूं हें काय भूता ॥ तूतें कांही शंका बोलतां ॥ वाटली नाहीं दुरात्मया ॥३२॥ तरी असो आतां कैसें ॥ येथोनि जाई लपवी मुखास ॥ नातरी जीवित्वा पावसी नाश ॥ पतंग दीपासम जेवीं ॥३३॥ याउपरी मच्छिंद्र म्हणे देवी ॥ पतंग जळे दीपासवीं ॥ परी तैसें नोहे माझे ठायीं ॥ प्रताप पाहीं तरी आतां ॥३४॥ अगे मित्राबिंब तें असे लहान ॥ परी प्रतापतेजें भरे त्रिभुवन ॥ तेवीं तूतें दाखवून ॥ वश्य करीन ये समयीं ॥३५॥ अगे प्रताप जेवीं पंडुसुतांनी ॥ वायुसुतातें श्वेती दावुनी ॥ अक्षयी ध्वजीं बैसवोनी ॥ किर्ति केली महीवरी ॥३६॥ की अरुण मित्रापुढी जोड ॥ तेवीं तूतें दावीन चाड ॥ तरी दत्तपुत्र मी कोड ॥ जगीं मिरवीन ये वेळे ॥३७॥ देवी म्हणे भ्रष्टा परियेसी ॥ कान फाडुनि तूं आलासी ॥ इतुक्यानें भयातें मज दाविसी ॥ परी मी न भीं सर्वथा ॥३८॥ हातीं घेऊनि करकंकण ॥ शेंदूर आलासी भाळीं चर्चुन ॥ परी मी न भिईं इतुक्यानें ॥ सर सर परता हे भ्रष्टा ॥३९॥ अरे तुझी उत्पत्ती मज ठाऊक ॥ कीं धीवर जाण तुझा जनक ॥ तरी तूं मत्स्य मीन धरुनि कौतुकें ॥ निर्वाह करी बा उदराचा ॥४०॥ तरी तुज अस्त्रविद्या निपुण ॥ कायसा व्हावी दारिद्रयाकारण ॥ कीं अंधाचें जन्मचक्षुलावण्य ॥ सर्वथा उपयोगी दिसेना ॥४१॥ कीं बहुरुपी मिरवी शूरपण ॥ तरी तें खेळापुरतें निपुण ॥ तें द्वंद्वजाळ सांभाळ सांभाळून ॥ वेव्हार आव्हानी आपुला ॥४२॥ अरे मातें दाविसी उग्र रुप ॥ दांभिका ठका महाप्रताप ॥ अहंकृती मनाचें पाप ॥ मनामाजी मिरवी कां ॥४३॥ तूतें वाटेल मी महाथोर ॥ कीं वश्य केलीं भूतें समग्र ॥ तैसा नोहे हा व्यवहार ॥ शिवास्त्र मी असें ॥४४॥ उगवली दृष्टी करीन वांकुडी ॥ पाडीन ब्रह्मांडांच्या उतरंडी ॥ तेथें मशका तव प्रौढी ॥ किमर्थ व्यर्थ मिरवावी ॥४५॥ अगा मशक धडका हाणी बळें ॥ तरी कां पडेल मंदराचळ ॥ तेवीं तूं मातें घुंगरडें केवळ ॥ निजदृष्टीं आव्हानिसी ॥४६॥ मच्छिंद्र म्हणे देवी ऐक ॥ बळीनें वामन मानिला मशक ॥ परी परिणामीं पाताळलोक ॥ निजदृष्टीं दाविला ॥४७॥ ऐसें ऐकतां भद्रकाळी ॥ चित्तव्यवधान पडिलें क्रोधानळीं ॥ मग प्रतापशिखाज्वाळामाळी ॥ कवळूं पाहे मच्छिंद्रा ॥४८॥ मग परम क्रोधें त्यासी बोलत ॥ म्हणे कवण प्रताप आहे तूतें ॥ तो मज दावीं मशाक येथें ॥ वामनकृत्यें बळी जेवीं ॥४९॥ मच्छिंद्र म्हणे बहु युद्धासी ॥ मिरवलीस शिवकार्यासी ॥ तें मज दावीं अहर्निशीं ॥ परीक्षा घेईन मी तुझी ॥५०॥