Navnath Bhaktisar....श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ४ पृष्ठ १ Nav Nath Bhktisaar.....

 
अध्याय :
मुखपृष्ठ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०



श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ४

श्रीगणेशाय नमः जयजयाजी करुणानिधे ॥ आगमअगोचर विशाळबुद्धे ॥ सकळमुनिमानसहदयवृंदे ॥ उद्यान वाटे आनंदाचें ॥१॥ हे योगिमानसरजनी ॥ पंढरीशा मूळपीठणी ॥ पुंडलिकाचे आराध्य स्वामिणी ॥ उभी अससी विटेवरी ॥२॥ सौम्य दिससी परी नीटक ॥ बहुत ठक चित्तचालक ॥ भक्तमानसभात्रहारक ॥ छिनाल सुकृत उरों नेदीं ॥३॥ पहा कैसी बकासमान ॥ नासाग्रभागीं दृष्टी देऊन ॥ कोणी म्हणेल गरीबावाण ॥ चांगुलपण मिरवीतसे ॥४॥ परी ही अंतरीची खुण ॥ न रहरि मालू एकचि जाणे ॥ भक्तीविषयीं लंपट वासना ॥ मनामाजी हुटहुटी ॥५॥ सुकर्म हदया घालूनि हात ॥ युक्तिप्रयुक्ती काढूनि घेत ॥ पुढें पुढें होऊनि कार्यार्थ ॥ आपुले त्या संपादी ॥६॥ पहा दामाजीचें दायधन ॥ गटकन गिळिलें अभिलाषून ॥ कंगालवृत्ती सोंग धरुन ॥ देव महार झाला असे ॥७॥ नरहरि सबळ सुवर्णकर्म ॥ तयाच्या विषयीं वरिला काम ॥ भांडावें तों जन्मोजन्म ॥ शिवमौळी राहातसे ॥८॥ कुब्जादादुला वांकुडातिकुडा ॥ नाहीं म्हणे तिला झाला पुंडा ॥ वृंदा पुरुषही जाडा ॥ स्मशानवस्ती केलीसे ॥९॥ ठकवोनि मारिला काळयवन ॥ सोळा सहस्त्र दादुला होऊन ॥ शेवटीं न पावे समाधान ॥ ब्रह्मास्थिती वरिलीसे ॥१०॥ चक्षुगोचर होत जें जें ॥ तें मागूं शके अति निर्लज्जें ॥ सुदामाचें पृथुक खाजे ॥ कोरडें न म्हणे सहसाही ॥११॥ काय वरिला मृत्यु दुकाळानें ॥ द्रौपदीची खाय भाजीपानें ॥ हात वोडवूनि लाजिरवाणें ॥ मिटक्या मारुनि भक्षीतसे ॥१२॥ शबरीचीं बोरें उच्छिष्ट पाहून ॥ न म्हणे भक्षी मन लावून ॥ चोखियाचा पदार्थ गोड पाहून ॥ र्हभदासहित सारीतसे ॥१३॥ नामा बाळ ठकवूनि त्वरित ॥ नैवेद्य भक्षित हातोहात ॥ तस्मात् किती दुर्गुणांत ॥ सदगुणातें आणावे ॥१४॥ असो ऐसे परम ठकणी ॥ येऊनि बैसली ग्रंथश्रेणी ॥ मम चित्तातें समूळ घेऊनी ॥ पायांपासीं ठेवीतसे ॥१५॥ असो तिचे वरदेंकरुन ॥ श्रोते ऐका आतां कथन ॥ श्रीमच्छिंद्र योगीं पूर्ण ॥ हिंगळाकारणीं संचरला ॥१६॥ मागिल अध्यायीं कथन ॥ मच्छिंद्र मारुतीचें युद्ध होऊन ॥ शेवटीं प्रीति विनटून ॥ हिंगळाख्यस्थाना पावले ॥१७॥ ती ज्वाळामुखी भगवती ॥ महाप्रदीप्त आदिशक्ति ॥ तेथें जाऊनि द्वाराप्रती ॥ मच्छिंद्रनाथ पोचले ॥१८॥ तंव तें द्वार पाहतां क्षितीं ॥ उंच बाहु सार्धशत ॥ औरस चौरस षडशत ॥ विराजलेसें द्वार तें ॥१९॥ तें द्वारीं प्रचंड ॥ अष्टभैरव महाधेंड ॥ त्यांनीं नाथपंथ पाहुनि वितंड ॥ चित्तांत कामना उदेली ॥२०॥ नागपत्रअश्वत्थठायीं ॥ मच्छिंद्रनाथ हा गोसावी ॥ नेमाचरणीं विद्याप्रवाहीं ॥ प्रसन्न केलें देवातें ॥२१॥ तरी शाबरीविद्याकवित ॥ येणें केलें वरदस्थित ॥ तपीं तें प्रांजळ कायस्थ ॥ केवीं झाले तें पाहूं ॥२२॥ ऐसा काम धरुनि पोटीं ॥ युद्धरीतांच्या सुखालोटों ॥ अष्टही भैरव एकथाटीं ॥ प्रत्यक्ष झालें द्वारातें ॥२३॥ अंगें नेमूनि संन्यासरुपा ॥ देहपंकजा दावूनि तदूपा ॥ म्हणती महाराजा योगदीपा ॥ कोठें जासी तें सांग ॥२४॥ येरु म्हणे शक्तिदर्शन ॥ घेणें उदेलें अंतःकरण ॥ तरी तुम्ही आहांत संन्यासधाम ॥ तुम्हां जाणें आहे कां ॥२५॥ तंव ते म्हणती जोगिया ऐक ॥ आम्ही येथेंचि स्थायिक ॥ भगवतीकाजा वरदायक ॥ द्वारपाळ म्हणवितों ॥२६॥तरी येथें कामनास्थित ॥ दर्शनार्थ कोणी येत ॥ तरी पापपुण्य पुसोनि त्याप्रत ॥ मार्गापरी योजितसों ॥२७॥ अगा पुमांसा प्राणी शब्दरचनें ॥ दिसूनि येतां चित्तकामनें ॥ त्या प्रसादूनि अंबादर्शनें ॥ सिद्ध करितो महाराजा ॥२८॥ आणि पापकलह अर्थ धूर्जटी ॥ आमुतें दिसूनी येता दृष्टी ॥ त्यासी मागे परतवूनि राहटी ॥ तो पुरुष दर्शनासी मिरवेना ॥२९॥ तस्मात् वागोत्तराचे देठी ॥ प्रसाद मिरवला हो शेवटीं ॥ तरी त्वत्कामना उदेली पोटीं ॥ अंबादर्शनीं मिरवावें ॥३०॥ तरी महाराजा योगद्रुमा ॥ पापपुण्यांचा झाडा आम्हां ॥ दर्शवोनि दर्शन कामा ॥ स्वस्थ करीं रतिसुखा ॥३१॥ अंतरीं आला अर्थकंदर्प ॥ येथें करितां कांही लोप ॥ तरी संचार करितां द्वारमाप ॥ मध्ये अटक महाराजा ॥३२॥ द्वार सांकडें होतें अतिसान ॥ गुंते करितां अनृत भाषण ॥ मग त्यातें मागें ओढून ॥ पूर्ण शिक्षा दावितों ॥३३॥ तस्मात् तुमची कर्मराहटी ॥ झाली जैसी महीपाठीं ॥ तीतें दर्शवूनि वागदिवटी ॥ दर्शनातें दर्शिजे ॥३४॥येरु म्हणे द्वारस्थ बापा ॥ आम्ही नेणों पुण्यपापा ॥ कर्मसुकर्म अर्थकंदर्पा ॥ ईश्वरी अर्थी केलें असे ॥३५॥ जैसेया लहराभास ॥ उभय नातळे त्या सुखास ॥ हर्षदरारा सावधपणास ॥ ठायीं ठायीं मुरतसे ॥३६॥ तो नौका सरितातोयी जात ॥ दों थडीं रुख दिसती पळत ॥ दों थडींचा बा एक साक्षिवंत ॥ रुखा पळ नेणेचि ॥३७॥ कीं तो व्यक्त बहू घटक्षितीं ॥ अंतरदिवटा बहु गभस्ती ॥ परी त्याची सदा दीप्ती ॥ नयनीं मिरवे महाराजा ॥३८॥ तुटूनि नीतिपुण्यद्रुमा ॥ आम्ही नेणों पाउली उगमा ॥ तंव ते म्हणती नरेंद्रोत्तमा ॥ बोल बोलसी हे काय ॥३९॥ जगीं जन्मोदय देह धरिल्या पोटीं ॥ कर्माकर्म उभे राहटी ॥ मिरवले हे प्रपंचहाटीं ॥ पदार्थसवें हे दोन्ही ॥४०॥ तरी बा तयाच्या गृहकपाटीं ॥ ना तळपे ना मिरवे शक्ती ॥ तरी आतां लोपूनि कर्माप्रती ॥ अर्थ तुझा सरेना ॥४१॥ जैसें वेचिल्यावांचूनि धन ॥ नातळे कदा हाटींचे कण ॥ तरी कर्माकर्म जल्पल्याविण ॥ अर्थ तुझा सरेना ॥४२॥तरी प्रांजळवचनप्रवाही ॥ कामसरिता मिरविल्याही ॥ तेणें दर्शनें अंबापायीं ॥ संगमातें मिरवेल ॥४३॥ नातरी गौन धरुनि पोटीं ॥ वदतां अर्थ न लाघे जेठी ॥ प्रांजळ वद कीं शेवटी ॥ फिरुनि जाशील माघारा ॥४४॥ तुवां प्रांजळ वदल्याविण ॥ करुं न देऊं तुझें गमन ॥ बहुचावटी जल्पल्यान ॥ शिक्षा पावसी येथें तूं ॥४५॥ ऐसें ऐकतां मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे शासनी उदेला आदित्यसुत ॥ तेथें तुमची शक्ति अदभुत ॥ केवीं वर्णूं मशक हो ॥४६॥ जो महाप्रळय भद्ररुद्र ॥ तो ग्रासूनि बैसला मुखचंद्र ॥ तेथें तुमची कथा महींद्र ॥ काय असे मशक हो ॥४७॥ ऐसी ऐकतां मच्छिंद्रगोष्टी ॥ परम क्रोधाची झाली दाटी ॥ मग ते अष्टभैरव थाटी ॥ एकदांचि उठावले ॥४८॥ जैसें अपार विधानथाटी ॥ अबळां सांडूनि उबलाकोटी ॥ प्रदीप्त होऊनि सांगे गोष्टी ॥ महाखगीं जाऊनियां ॥४९॥ तन्न्यायें अष्टभैरव ॥ मांडिते झाले युद्धपर्व ॥ कोणी त्रिशूळ परशु गांडीव ॥ टणत्कारिले ते समयीं ॥५०॥