॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद
॥ ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः ॥

श्री नवनाथ
भक्तिसार

कवी धुंडीसुत मालू विरचित नाथसंप्रदायाचा हा पावन ग्रंथ.
४० अध्यायांतील मूळ ओव्या, सोपा मराठी कथासार आणि पारायणासाठी एक शांत डिजिटल सहचर.

वाचा
४० अध्यायमराठी मूळ ग्रंथ व कथासारतुमच्या गतीने नित्य वाचन
मूळ पोथीओवीबद्ध वाचनकथासारसोप्या मराठीत अर्थपारायणतुमच्या वाचनाची नोंद
पहाटेच्या मंदिरात वाचनासाठी उघडलेली पोथी आणि प्रज्वलित पितळी समई
॥ श्री नवनाथाय नमः ॥

मन शांत. वाचन अखंड.

श्रद्धेचा अखंड वारसा

श्री दत्तगुरू आणि नवनाथांचे दर्शन

श्री दत्तात्रेय आणि नऊ नाथ — मूळ नवनाथ भक्तिसार संकेतस्थळावरील चित्र

॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

मंदिरात वाचनासाठी ठेवलेली पोथी, समई आणि फुलेकवी धुंडीसुत मालू विरचित
मूळ संकेतस्थळावरील परिचय

श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाविषयी

धुंडिसुत मालू कवी विरचित “श्री नवनाथ भक्तिसार “ हा ओवीबद्ध ग्रंथ नाथपंथाचा प्रमाणग्रंथ मानला जातो . मालू कवीं नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व साधकाला विधिपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव देणारा असा आहे.नी हा ग्रंथ इ.स.१८१९-२० च्या दरम्यान लिहून पूर्ण केला. प्रस्तुत ग्रंथात ४० अध्याय असून ओवीसंख्या ७६०० आहे. या ग्रंथात नवनारायणांनी श्रीकृष्ण परमात्म्याच्या आज्ञेने धारण केलेल्या नवनाथांच्या कथा आहेत. भगवान द्वारकाधीशांच्या आज्ञेवरुन कवी नारायणाने मच्छिंद्र हे नांव धारण केले, हरीने गोरक्ष, अंतरिक्षाने जालंधर,प्रबुद्धाने कानिफ, पिप्पलायनाने चरपट, आविहोंत्राने नागेश,द्रुमिलाने भरतनाथ, चमसाने रेवण व करभाजनाने गहिनी अशी नावे धारण केली यात मच्छिंद्रनाथ हे प्रमुख नाथ. जात पंथ यांच्या पलीकडे जाऊन या नवनाथांनी आपल्या चमत्कारांनी जनसामान्यांना आकर्षित करून नाथपंथाचा प्रसार केला. त्यांच्या दिव्य चरित्रामुळे घोर तप,अनन्य गुरुभक्ती,अपूर्व भक्तीभाव, ब्रम्हचर्याचे नैश्ठीक पालन या सद्गुणांच्या जोरावर आपल्याला कोणतीही अशक्यप्राय गोष्ट प्राप्त करून घेता येवू शकते हि गोष्ट आपणास पटते . ज्ञानेश्वरी च्या खालोखाल चिंतन,मनन व पारायण यांसाठी “नवनाथ भक्तिसार”हा ग्रंथ सुपरिचित आहे. “गोरक्ष किमयागार” या अप्राप्य ग्रंथाच्या आधाराने धुंडिसुत मालू यांनी हा अद्भुत ग्रंथ सिद्ध केला आहे. या ग्रंथाचे पारायण वेगवेगळ्या पद्दतीने केले जाते. बरेच लोक या ग्रंथाचे पारायण श्रावण महिन्यात करतात. तर बरेच भाविक या ग्रंथाचे दैनिक पारायण करतात. या ठिकाणी आम्ही “नवनाथ भक्तिसार” पोथीतील सर्व ४० आध्याय त्यांच्या सुलभ मराठी सारांशा सह देत आहोत

नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ दिव्य अश्या चित्रमय कथांनी सजलेला आहे. या ग्रंथ वाचनाने ऐहिक उत्कर्ष आणि पारलौकिक कल्याण असे दोन्हीही हेतू साध्य होतात.याचा प्रत्यक्ष अनुभव अनेक श्रेष्ठ भक्तांना आला आहे.

तुमची वाचनयात्रा

दररोज थोडे वाचन. मनाला नवी प्रसन्नता.

तुम्ही थांबलेली ओवी आपोआप जतन होते.

वाचन सुरू करा
/ ४० अध्याय पूर्ण
वाचन आणि चिंतन

तुमच्या साधनेची वाट निवडा

सुलभ वाचन · शांत अनुभव
श्री नवनाथ भक्तिसार

पहिल्या अध्यायापासून…

सर्व ४० अध्याय →
ओवीतून चिंतन

ॐ नमो जी हेरंवमूर्ती ॥ वक्रतुंडा गणाधिपती ॥ विद्यार्णवा कळासंपत्ती ॥ भक्तसंकट वारीं गजानन

अध्याय १ · संपूर्ण ओवी वाचा →

॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

वाचनातून चिंतनाकडे. चिंतनातून आत्मानंदाकडे.