॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद

श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी

अध्याय

नऊ नारायणांपैकी मच्छिंद्रनाथाचा जन्म, त्याची तपश्चर्या. १९२ ओव्या · कथासार वाचा

श्रीगणेशाय नमः श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीपांडुरंगाय नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीमातापितृभ्यां नमः

ॐ नमो जी हेरंवमूर्तीवक्रतुंडा गणाधिपतीविद्यार्णवा कळासंपत्तीभक्तसंकट वारीं गजानन
सदैव धवला श्वेतपद्माविद्याभूषित कलासंपन्नधामातुझ्या वंदितों पादपद्माग्रंथाक्षरां बोलवीं
तूं निश्वळ निरंजन निर्विकारपरी भक्तरज्जुबंधनाधारप्रेमें संभवोनि मूर्ति साकारआम्हां दासां मिरविसी
तरी वक्रतुंडा पाशांकुशधराकिंकिणीमंडिता ग्रंथादरायेऊनि स्वामी वदनसुंदरामम रसनारस सेवीं कां
अगा अर्थ - लिंग - प्रकरण - र्ह्स्व -दीर्घ शृंगार धारणा सुरसछंद ताल नवरसरसग्रंथामाजी आदरीं कां
हे गणाधिपते गणराजमी अबुध वर्णना आहे सहजपरी कृपा करोनि सकळां भोजविकळ आपदा हरी आतां
हे मोरेश्वरा गणाधिपतिसर्वविषयाधीशमूर्तीमंगळारंभी मंगळाकृतीआरंभीं स्तुती पार्थितो
तरी सरस्वती कळामांदुससवे घेऊनि वहनहंसया संतांगणीं येऊनि सभेसविराजावें महाराजा
जी मंगलदायक वाग्भवानीचातुर्थसरिता ब्रह्मनंदिनीती महाशक्ती हंसवाहिनीयेऊनि घेई महाराजा
जीचेनि कृपें वांकुडें दृष्टीवाचस्पतीच्या मिरवती कोटीती माय तूं सवें गोरटीघेऊनि येई महाराजा
१०
असो ऐसें पाचारणवचनग्लानित भावना सम्यक् पाहूनग्रंथासनीं मूर्तिमंत येऊनवरालागीं ओपिजे
११
सकळसिद्धी पूर्णपणापावोत ऐशा विनीतवचनावरद मौळी हस्तकंजनार्शोनि ज्ञान मिरविलें
१२
म्हणे महाराजा कलोत्तमासिद्धी पावेल काव्यमहिमाऐसे बोलोनि सुशीलधामारसने स्थापिली सरस्वती
१३
यापरी नमितों श्रीगुरुराजजो अज्ञानतमी सविता विराजेजो मोक्षपदातें वरवूनि काजसाधकातें विराजवी
१४
तो ज्ञानेश गुरु ज्ञानदिवटीसंजोगोनि बैसला मम पृष्ठींलेखणी कवळोनि करसंपुटींग्रंथालागीं आदरीतसे
१५
वरदहस्तें स्पर्शोने मौळीफेडिली सकळ अज्ञानकाजळीयापरी तया बद्धांजुळीअनन्यभावें नमितों मी
१६
जो नरहरिवंशीं विजयध्वजधुंडिराज नाम तयाचें साजेतोही पृष्ठीं बैसोनि सहजग्रंथालागीं आदरीतसे
१७
आतां नभूं ज्ञानशक्तीजी सत्तामयी चिदभगवतीअनन्यभावें चरणांवरतीभाळ तिचिये अर्पोनियां
१८
यापरी नमितो श्रोते संतकीं तुमच्या गृहींचा मी अतीततरी ग्रंथांतरीं सुरस नितांतप्रेमभरित दाटवा
१९
अहो प्राज्ञिक संत श्रोतींप्रत्यक्ष तुम्ही महेशमूर्तीतुम्हां वर्णावया अबुध शक्तीमजमाजी केवीं मिरवेल
२०
परी धन्य तुम्ही भक्तिंवाडेंस्वीकारितां बोल बोबडेजड बाळा उभवोनि कोडेंजगामाजी मिरवितां
२१
कीं पहा जैसें कांचमण्याससोमकांत नांव ठेविलें त्यासतेणोंचे शब्दें लाज सोमासवरवूनि बुंदां ढाळीतसे
२२
तेवीं तुमचा शरणागतनरहरि मालू धुंडीसुततस्मात महंत श्रोते संतकरा सरतें आपणांतरीं ९
२३
यापरी पूर्वी कथासारामृत ग्रंथवदविला तुम्हीं श्रद्धायुक्तआतांही ओपूनि वरद हस्तभक्तिसार वदवा हा
२४
जे संत झाले जगद्विख्याततयांचें माहात्म्य वदविलें समस्तपरी सारसार कथा ज्यांनी सांप्रदाय जगद्विख्यातजगामाजी स्थापिले
२६
तरी त्यांची सर्व कथा ग्रंथींस्वीकारावया अवधान द्यावें श्रोतींअसो कलिप्रारंभीं रमापतीनवनारायणां पाचारी
२७
उद्भवासी बैसवोनि सन्निधकनकासनीं यादववृंदतंव ते नवनारायण प्रसिद्धप्रविष्ट झाले द्वारके
२८
कवि प्रथम हरि दुसराअंतरिक्ष तृतीय होय चतुरमहाप्राज्ञिक प्रबुद्ध नरनारायण चतुर्थ तो
२९
पंचम महाराज पिप्पलायनसहावा आविर्होत्र नारायणसातवा द्रुमिल आठवा चमस जाणकरभाजन नववा तो
३०
ऐसे नवनारायण महाराजद्वारकेंत पातले सहजासहजरमापतीचें पाचारणचोजदृश्य झाले धवळारी
३१
हरीनें पाहतांचि नारायणसोडिता जाहला सिंहासनपरम गौरविले आलिंगूनकनकासनीं बैसविले
३२
सकलवैभवभूषणाकारमेळवोनि सकळ अर्चासंभारसारिता झाला सपरिकरषोडशोपचारें पूजेसी
३३
हरिचा गौरव पाहोनबोलते झाले नारायणकवण अर्थी पाचारणआम्हांसी केलें श्रीरंगा
३४
हरि म्हणे जो महाराजाकीं मनीं काम वेधला माझ्याकलींत अवतार घेणें ओजातुम्हीं आम्हीं चलावें
३५
जैसे सम्रुच्चयें एकमेळींराजहंस जाती उदधिजळीतेवीं तुम्हीं कृपाकल्लोळींअवतारदीक्षा मिरवावी
३६
येरु म्हणती जनार्दनाअवतार घ्यावा कवणे स्थानाकवण नामीं कवण लक्षणांजगामाजी मिरवावें
३७
यावरी बोले द्वारकाधीशकवि नारायण जो कां प्रत्यक्षतेणें मच्छिंद्र होऊनि दक्षजगामाजी मिरवावें
३८
यावरी हरी जो महादक्षतो तंव शिष्य होऊनी प्रत्यक्षमहाराज नामें तो गोरक्षजगामाजी मिरविजे
३९
यापरी अंतरिक्ष नारायण नामतो जालिंदर मिरविजे प्रकामतयाचा शिष्य भक्तिद्रुमप्रबुद्ध नामें कानिफा
४०
यापरी पंचम पिप्पलायन प्रकाममिरविजे जगीं चरपट नामआविर्होंत्र जो योगद्रुममिरविजे जगीं नामें नागेश
४१
यापरी द्रुमिल अतिसमर्थजगीं मिरविजे भरतनाथआणि चमस नारायण जगीं विख्यातरेवणनामें मिरविजे
४२
नववा जो करभाजनतो गहिनी ऐसें मिरविजे नामऐसे अवतार महीकारणदीक्षेप्रति मिरवावे
४३
म्हणाल एकटपणीं वासकरणें सांगतां आह्मी कलीसतरी तुम्हांसवें अवतारासबहुत येतील महाराजा
४४
प्रत्यक्ष कवि वाल्मीक सुरसतो पुढें होईल तुलसीदासआणि शुक महाराज जो ब्रह्ममासकबीर भक्त होईल तो
४५
यापरी जो व्यास मुनीतो जयदेव होईल महाप्राज्ञीआणि उद्धव माझा प्राणाहुनीआवडता होईल नामा तो
४६
आणि भक्तिप्रौढी जांबुवंततो नरहरि होईल नितांतप्रत्यक्ष जो बलराम भ्रातपुंडलीक होईल तो
४७
मीही प्रत्यक्ष जन्मोनज्ञानदेव नामें मिरवीनआणि धवलारी जो पंचानननिवृत्तिनाथ होईल कीं
४८
आणि सत्यनाथ चतुराननतो स्वनामीं मिरवील सोपानजी योगमाया मानसमोहनमुक्ताबाई विराजेल
४९
यापरी प्राज्ञक हनुमंततो रामदास होईल महाभक्तआणि कुब्जा दासी मातें रमतजनी जनांत होईल कीं
५०
असो ऐसें समुच्चयेंकरोनकलींत वाढवावें भक्तिमाहात्म्य जाणमग अवश्य म्हणोनि नारायणपुढें बोलत प्रश्नातें
५१
म्हणती महाराजा सर्वज्ञमूर्तीआम्हां सांगतां जन्मस्थितीपरी कवण स्थानीं केउते युक्तींव्यक्त होणें तें सांगा
५२
यावरी बोले प्रत्यक्ष नारायणकीं दीक्षेचें भविष्यपुराणपूर्वीच कथिलें पराशरनंदनेंमहामुनि व्यास तो
५३
अगा पूर्वी अठ्ठ्यांयशीं सहस्त्र ऋषीनिर्माण झाले विधिवीर्यासींतें वीर्य चुकोनि ठायाठायासीअपाप कांहीं उरलें असे
५४
तें जीवदशेवांचोनि सत्यमहाराजा न पावे उदयतरी ते ठायीं ठायीं केउतें वीर्यत्याचें ठाय ऐकावें
५५
उपरिचर वसु यानी असतांवीर्य गळलें उर्वशी पाहतांतें शरस्तंबीं दुरोनि द्रवतांआदळतां झालें त्रिभाग
५६
यमुनेंत वीर्यबिंदु द्रोणाकांठींपडतांचि झाले विभाग शेवटींदोन भाग द्रौणापोटींएक जळीं पडियेला
५७
असो पर्णद्रोणांत जो भाग पडिलातो तत्काळ द्रोणकूपीं जन्मलापरी जळांत जो भाग पडिलातो ग्रासिला मत्स्यानें
५८
तरी तें मत्स्युदरीं वीर्यनारायण प्रत्यक्ष आहेपरी जीवदशेविण गर्भवंशोदयहोत नाहीं महाराजा
५९
तरी प्राज्ञिक कवि नारायणतेणें मत्स्युदरी जन्म घेणेंमच्छिंद्र ऐसें जगांत नामानेमिरवावें महाराजा
६०
यापरी शिव कामावरी कोपोनतृतीयनेत्रींचा काढोनि अग्नमहास्मर केला भस्म तेणेंऐसें ग्रंथ बोलती
६१
परी तो काम द्विमूर्धनीबैसला आही वीर्य प्राशन करोनीतरी तयाचे जठरीं अंतरिक्ष जाऊनीजालिंदर नामें मिरवेल
६२
यापरी कुरुवंशीं जनमेजयेंनागसत्री आवाहन केलें आहेतया वंशीं महान पाहेंबृहद्रथ राणा मिरवेल
६३
तो महीलागीं करील हवनतेव्हां गर्भ सांडील द्विमूर्धनयज्ञकुंडीं देदीप्यमानजालिंदरें जन्मावें
६४
यापरी ब्रह्मवीर्य सहस्त्रेंशींऋषि निर्मिले सहस्त्र अठ्ठ्यायशींतेव्हां वीर्य रेवातीरासीरेवेमाजी पडियेलें
६५
तें महीचे परम कुशींवीर्य आहे रेवातीरासीतेथें व्यापोनि जीवदशेसीदेहालागीं मिरवावें
६६
तो महाराजा चमस नारायणरेवणसिद्ध मिरविजे नामानेंरेवारेवेंत झाला जन्मम्हणोनि नाम हें त्याचें
६७
तेचि वेळीं आणिक रेतसर्पिणीमौळीं अकस्मातपडतां प्राशिलें तिनें नेमस्तभक्ष्य म्हणोनि जाण पां
६८
ते जनमेजयाचे नागसत्रांतनाग आहुति विप्र देततये वेळीं आस्तिकें निश्वितसर्पिणीतें लपविलें
६९
ब्रह्मवीर्य उदरांतअंडजाशुक्तिरत्नयुक्तपुढें होईल महानाथभविष्य जाणोनि आच्छादी
७०
महातरुच्या पोखरीतक्षकात्मजा पद्मिनी नारीठेवितां प्राज्ञिक ऋषीश्वरीनवमास लोटले
७१
असो त्या अंडजाशुक्तिकायुक्तजीवदशा सकळ होऊनि मुक्ततरी आविर्होंत्र नारायण तेथसंचरिजे महाराजा
७२
वीर्य अंडजपात्र सांडोनीगेली आहे तक्षकनंदिनी २तो वडाच्या पोखरस्थानींअद्यापि आहे महाराजा
७३
तरी तेथें आविर्होत्रप्रवेश करितां सत्पात्रवटसिद्धनाथ स्वतंत्रतया देहीं मिरवावे
७४
यापरी मित्ररेत मंत्रसंपत्तींकृपें कुरवाळील मच्छिंद्रजतीती वरदहस्ताची उकरडा विभूतीसाचोकार मिरवेल
७५
तें मंत्रप्रतायें सूर्यवीर्यसविताराज सांडिता होयपरी तें भविष्यकारणीं उकरडामयवरदभस्म मिरवेल
७६
तेथें हरी जो नारायणशीघ्र संचरोनि दीक्षाकारणगौरक्ष ऐसें प्रतिष्ठानामानेंजगामाजी मिरवावें
७७
यापरी मृडानीकारणींसुरवर आलिया दक्षसदनींते कमलोद्भव पाकशासनीसमारंभें पातले
७८
परी दक्षात्मजेची रुपरहाटीनेत्रकटाक्ष पाहतां परमेष्ठीतेणें धडाडोनि कामपाठींइंद्रियद्वारा द्रवला तो
७९
परी तो चतुराननीबैसला होता समास्थानींकाम द्रवतां इंद्रियवदनींपरम चित्तीं लाजला तो
८०
मग रगडोनि चरणटांचेछिन्नन्व केलें रेताचेंतें एक आगळें साठ सहस्त्रांचेंरेतभाग वहियेलें
८१
तें साठ सहस्त्र रेतप्रभाणासीजीवदशा अपत्य वालखिल्यऋषींसीझाले परी एक भागासीवीर्य आहे तैसेंच
८२
तें लज्जायुक्त होऊनीकेरासह सांडिले भागीरथीजीवनींतयांतूनि एक भाग जाऊनीकुशवंटींस्थिरावला
८३
तरी ते कुशदरीचे निखळींरेतभागाची आहे वेलीती पिप्पलायन माउलीसंचारावें तेणें तेथें
८४
टांचे चरपटलें आहे रेतम्हणोनि नाम चरपटनाथजगांत मिरवोनि जगविख्यातदीक्षेलागी विराजावा
८५
यापरी कुंभोदभवाचा उदय झालातो मित्रकामशराचा लोट लोटलातो गगनपंथें विमुक्त झाला अतिबळें करोनियां
८६
एक भाग घटीं पडतांअगस्तिउदय झाला तत्त्वतांएक भाग महीवरताकैलिकसदनीं पातला
८७
तो महाराज कैलिकऋषीभिक्षाभरतरी ऊर्ध्वशीभरतरी म्हणती भिक्षापात्रासीआंगणीं तें ठेविलें
८८
तों मित्ररेत अकस्मातयेऊनि पडिलें भरतरीआंततें कौलिकें पाहोनि भविष्यातेंभरतरीं तैसें रक्षितसे
८९
तरी ते भरतरीरेतसंगींद्रुमिल नारायण प्रसंगींसंचारोनि रेत अंगींभरतरी नामें मिरविजे
९०
यापरी हिमाद्रीच्या विपिनस्थानीदिग्गज ठेला महीते शयनींतैं सरस्वतीचे उद्देशेंकरोनीविधि वीर्यासी ढांसळला
९१
तें वीर्य गजकर्णातपडतांचि झाले चालीचालता मेदलें पाउलींतया पादसंधींत तनु ओतिलीजीवदशा अत्रीची
९३
तैसा गजकर्णसूतिकारणप्रबुद्ध मिरविजे रेतरत्नतया नामाभिधानी प्रयत्नकर्णकानिफा मिरविजे
९४
यापरी गोरक्षाची हतवटीपडतां वाळवंटाचे पोटींकर्दमओपुतळा करितां जेठीअभिमंत्रोनि भविष्यांत्तर
९५
मंत्रशक्ती विष्णुवीर्यआव्हानिलिया पुतळामयतैं करभाजनें संचरायाजीवदशा मिरवावी
९६
ऐसें सांगोनि रमारमणेंसंतुष्ट केले नवनारायणमग परस्परें नमनानमनकरोनियां उठले ते
९७
असो भगवंतेंशीं नवनारायणपाहती मंदराचळमौळीस्थानश्रीशुकाचार्य समर्धपासीं जाऊनसमाधीं वरियेलें
९८
नव समाधी मेरुपाठारींदहावी समाधी शुकऋषीश्वरींअसो ते दाही स्थूळशरीरींपुढें तेथोनियां निघाले
९९
यापरी शुकवीर्याचें कथनवद्रिकाश्रमीं सोमब्राह्मणरंभाउद्देशें झालें पतनकबीर तेथें जन्मला
१००
ही कथा भक्तिकथामृतांतवदविली आहे जगन्नाथेंआतां नवनारायण झालें व्यक्तत्यांची कथा ऐक वी
१०१
असो वसुवीर्य दोन्ही भाग झालाएक मच्छीनें प्राशिलातंव कवि नारायण संचरोनि वहिलागर्भ लागला वाढीसी
१०२
दिवसानुदिवस नवमासमच्छीने लोटिले जलोदरासपुढें प्रसूत अंडज सुरसयमुनाजळीं व्हावें जों
१०३
तों तेथें एक कथा वर्तलीश्रीकैलासीं अपर्णा माउलीशिवासी म्हणे कृपासाउलीअनुग्रह मज द्यावा जी
१०४
तुम्ही जपता जो मंत्रतो मज द्यावा जी पवित्रतेणेंकरोनि मी चिरसनाथपणें मिरवेन जी
१०५
शिव म्हणे उमे ऐकमी मंत्र उपदेशीन सकळिकपरी एकांत ठाव अलोकिकऐसा जाण पाहिजे गे
१०६
अपर्णा म्हणे एकांतस्थानतरी महीवरी शोधूं आपणऐसें ऐकतां दयाघनअवश्य तीतें म्हणतसे
१०७
मग सिद्ध करोनि नंदिकेश्वरहिंडतां स्थाने महीवरश्रमोनि वर्ततां उमाईश्वरयमुनेतटीं येऊनि पोंचले
१०८
मग उतरोनि नंदिकेश्वरावरुनि तींनंदी ठेवोनि तटावरतीउभयतां उतरोनि यमुनेसरितींजवळ कांठीं बैसलीं
१०९
तंव तो यमुनातटएकांततेथें मनुष्यांची न मिळे जातऐसें पाहोनि शुद्ध एकांततें स्थान ईश्वरासी मानलें
११०
परी तो मच्छोदरांतकवि नारायण नेणोनि त्यांतपार्वतीतें उपदेशितमंत्रसंजीवनीसी नाथ
१११
तीतें तो मंत्र उपदेशितांमच्छी तेथें होती सत्यतातो उपदेशशब्द गर्भी तत्त्वतांमच्छिंद्रानें ऐकला
११२
ऐकलेपरी ग्रहणचि झालेंतेणेंकरुनि ज्ञान प्रगटलेंमीतूंपण सर्व सरलेंसर्वचि ब्रह्म सनातन ६
११३
असो शिव पार्वतीतें पुसतकीं कैसें चोज उपदेशांततूतें सांपडेल खूण ते मातेंबोलानि दावीं अपर्णे तूं
११४
ऐसें शिव तीस पुसतांतों आधींच मच्छेंच्र झाला बोलताम्हणे महाराजा आदिनाथाब्रह्मवोज मिरवेल
११५
आतां किंबहुना चराचराअसे स्वरुपीं वृत्ति साकारनग नोहे हेमचि सारआब्रह्मभुवनापासोनी
११६
ऐसें शिव ऐकतां वचनाजळीं पाहे चाकाटोनतों मच्छोदरीं नारायणकवि महाराज समजला
११७
मग शंकर बोलते झाले त्यातेंम्हणती महाराज तूं आहेस येथेंतरी मम उपदेशाचा तूतेंलाभ झाला कविराया
११८
परी हें फारचि झालें अपूर्वपुढें ऐक आनंदपर्वमंत्रउपदेशगौरवदत्तमुखीं करवीन मी
११९
तरी तुज जन्म झालियापाठींबद्रिकाश्रमी यावें शेवटींतेथें तूतें देईन भेटीसर्व सामग्री सचिन्ह
१२०
ऐसें बोलोनि आदिनाथस्वस्थाना गेला अपर्णेसहितयेरीकडे गर्भ मच्छोदरांततोचि मंत्र घोकीतसे
१२१
यापरी भरतां पूर्ण दिवसमच्छीनें प्रसूतकळा समयासअंड सांडोनि जळतटासमच्छी गेली जळोदरीं
१२२
असो अंड सांडोनि तीरासमच्छी गेली जळोदरासत्यास कांहीं लोटल्या दिवसयमुनातीजळीनिजगणासहित संचरले
१२४
तो अकस्मात मित्रात्मजातटीअंडजशुक्तिका पाहिली दृष्टींमग सर्व मिळोनि चंचुपुटींखाद्य म्हणोनि भेदिती ते
१२५
चंचुपुटांचा भेदवज्रतेणें अंड झालें जर्जरद्विशकल होऊनि सत्वरमहीवरे आदळले
१२६
परी वरील शकल पडिलें महींखालील शकलांत बाळ विदेहीजैसा अर्क उदकप्रवाहींएकाएकीं उतरला
१२७
रुदनशब्द कडकडाटबाळतेजाचा बोभाटतें न्याहाळितां चकचकाटपाहोनियां पळाले ते
१२८
असो सकळशुक्तिका रत्नाकरआंत मुक्तमुक्तिकेचा भद्र मच्छेंद्रअसतां तमारिकन्यातीरपावला धीवर त्या काळीं
१२९
तो धीवर कामिकनाम सुभटपाहतां अंडजशुक्तिका प्रकटतों आंत रत्नतेज स्फुटबाळ रम्य देखिला
१३०
देखिला परी जो सवितामग चित्तीं द्रवली मोहममताम्हणे बाळ हें कोमळ तत्त्वतांयातें भक्षील कोणी सावज
१३१
ऐसा उदय होतां चित्तींदेव शब्दकुसुमां सांडितीकीं हे महाराजा कामिकमूर्तीबाळ नेई वो सदनातें
१३२
अरे हा दक्ष योगींद्रजेठीतारक नौका महीपाठींतरी तूं संशय सोडोनि पोटींसदना नेई महाराजा
१३४
ऐसें देववागुत्तररत्नकर्णपुटिकं होतां भूषणमग तें दृढ करोनि जतनहदयसंपुटीं पाळीतसे
१३५
महाविश्वासाचे पाठींआधींच मोह नांदेल पोटींआनंदाची अपार दाटीआनंदपात्रीं हेलावे
१३६
जैसें पयाचेनि पात्रींघृतशर्करा होय मिश्रितीतो गोडपणाचा भाग अमृतींवाढला कां जाईना
१३७
कीं दरिद्राचे सुरवाडासमनीं पेटली राजहौसते गजशुंडींची माळा ग्रीवेससुख कां वाटलें जाईना
१३८
कीं वंशवृद्धि ते शून्यमयचिंताकाळिमा निशा आहेतैसा सुतमित्राचा होतां उदयमग तेथ चिंता कासया
१३९
कीं कवडीसाठीं वोंचितां प्राणते मांदूसचि लाधली सुखधनकीं मृत्युभयातें असुख मानूनचित्त जडे चिंतासाकडीं
१४०
तों पीयूषाची अनुकूलतागोडी सुखाचा उदय होतांमग चिंतानिशीचा आनंदसविताप्रभेलागीं हेलावे
१४१
मग स्नेहकवचें करसंपुटींतोयें न्हाणिला बाळजेठीहदयीं वाहूनि कामिक पोटींसदनीं आणिले तयातें
१४२
शारद्वता नामें सुंदरा नारीओपिता झाला तिचे करींम्हणे साजणी वंशाधारीसुत मिरवीं लोकांत
१४३
कीं पाहें पां पूर्ण भरंवसाकीं राधातनय कर्ण जैसातरी तो पुढें राजमांदुसाजगामाजी आव्हानी
१४४
तन्न्यायें भाग्योदयेंसर्व सुखशयनीं पहुडावेअहाहा बाळ अवतार होयकवि नारायण मच्छेंद्र
१४५
मग कामिकहाती सुढाळ सुतानवरत्नांच्या सम पाहतांपरम आनंदली शारद्वताबाळ कवळिला स्नेहमेळीं
१४६
स्नेहें धरितांचि पयोघरीपय दाटलें अतिपाझरींजैसें सोमतेजकरीसोमकांत द्रवतसें
१४७
असो कुशांचें मंडनस्नेहभावें होतां संगोपनमग बाळजठरापिंडींचा अग्नपय पाहोनि स्वीकारी
१४८
तैं स्नेहाचा ओघ बाणेबाळ अंगिकारोनि मार्जनेंतप्तोदकीं घालोनि स्नानेंपालखातें हालवितसे
१४९
आधींच नामें शारद्वतात्यावरी अपत्यकामी कांतातेथें बाळमोहकाम द्रवतांकवण रीतीं वर्णावें
१५०
आधींच असतां अमरवेलींत्यावरी पजन्यर्वृष्टी झालीमग तो हेलावा लवलव पाउलींकवणासी वर्णवे
१५१
ऐसेपरी आनंदस्थितींदिवस लोटले कांहींसे मितीपांच वरुषें वयावरुतीमच्छिंद्रनाथ मिरवला
१५२
तंव कोणे एके दिवसीसुदिनीं उदईक भूमीसीपिता म्हणे तमारिकन्येईचला जाऊं ये मच्छिंद्रा
१५३
अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथकृतांतभगिनीतीरा येतमग जळोदरीं संचरोनि तातमच्छबाळां आव्हानीतसे
१५४
तंव जाळ्यासवें मीनधाडीआंतुल्या ओढी करसंपुतीबाहेर काढितां कामिक जेठीमहीं मीनांतें सोडीतसे
१५५
मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमावेंचोनि सांठवी या मीनांऐसे वदोनि कामिक पुन्हांजळामाजी संचरे
१५६
येरीकडे मच्छिंद्रनाथमीन देखतां म्हणे हो तातअहा मातुळकुळा घातकामिका ताता मांडिला
१५७
तरी आपण असतां ऐसी रहाटीबरवेपणें पाहतां दृष्टींहें योग्य नव्हे कर्म पाठींउपकारा मिरवावें
१५८
पूर्वीं आस्तिकें मातुळकुळा रक्षिलेंआपुले तपाचेनि बळेंराव बोधोनि सत्रपाळनागकुळा वाचविलें
१५९
मग एक एक मत्स्य वेचोनीप्रवाहा मेळवी जीवनालागोनीतें कामिकतातें दृष्टीनें पाहोनीपरम चित्तीं क्षोभला
१६०
जैसा परम सबळपेटला मिरवी वडवानळतेवीं कामिकक्रोधाग्नि प्रबळहदयानाजी धडाडी
१६१
कीं मेघमंडळाचे दाटींचपळा पळती तेजावाटीतैसा धडाडोनि क्रोध पोटींबाहेर आला तत्क्षणीं
१६२
लक्षोनि मच्छिंद्राचें मुखमंडनस्वकरपुटी केले ताडनम्हणे जळोदरीचे काढितां मीनबहु श्रम जाणसी
१६३
तरी पुन्हां जळोदरीमच्छ सोडितोसी कैसा भिकारीखासील काय उदरांतरींभीक मागों जाशील
१६४
ऐसे ऐकोनि कामिकवचनमनांत मच्छिंन्द्र करी बोलणेंसर्वांत पवित्र भिक्षान्नदोष त्यासी कांहीं नसे
१६५
तरी हाचि आतां उपदेशआरंभावे भिक्षान्नासयेरीकडे जळोदरासकामिक तेव्हां संचरला
१६६
येरीकडे मच्छिंद्रनाथदृष्टी चुकवोनि गमन करीतभ्रमण करितां अद्वैतवनांतसुढाळ जागा दिसेना
१६७
मग उत्तरदिशा बद्रिकाश्रमपाहतां झाला योगद्रुमतेथें द्वादश वर्षे उत्तमोत्तमगालागी आचरला
१६८
तें तीव्र तप गा शुचिस्मंतमंत्रदृष्टी अद्वैतवनांतलोहकंटक पादांगुष्ठांतदेऊनि तप करीतसे
१६९
ऊर्ध्व वायूचे करुनि भक्षणदृष्टी अर्का देऊनि दानवाचा करोनि कृष्णार्पणहरीभजनीं मिरविल
१७०
शरीर क्लेशा देऊनि दानईश्वरी वेध तनुमनप्रमाणेंतेणें अस्थिपंजरावरोनत्वचा तितुकी मिरवीतसे
१७१
तपें भक्षिलें सकळ मांसपरी लाग न लागे अस्थित्वचेसमांस भक्षोनि सकळ भागासवृद्धिरस सकळ आटिलें
१७२
नेत्र फिरोनि झाल्या वातीदिसों लागली कार्पासरीतीसकळ तेजाची आटली ज्योतिमहाघोर तपानें
१७३
अस्थि त्वचा व्यक्त होऊनीशिरा दिसती चांगुलपर्णीसर्व अंग गेले वाळोनिकाष्ठापरी मिरवितसे
१७४
ऐसे क्लेश असंभवितमच्छिंद्रअंगीं जाणवततों तेथें अकस्मातअत्रिनंदन पातला
१७५
संचरोनि देवालयास्तविता झाला उमारायाहे दक्षजामाता करुणालयादिगंबरा आदिपुरुषा
१७६
कामांतका फणिवेष्टकारुंडभूषणा कैलासनायकाअपर्णानिधाना कामांतकावृषभारोहणा महाराजा
१७७
हे सकळ दानवांतकादेवाधीशा उमाकांताप्रळयरुद्रा त्रिपुरांतकाशूळपाणी महाराजा
१७८
हे शंकरनामाभिधानीपंचवक्त्रा त्रिनयनीभस्मधारणा उमारमणीनरकपाळा विराजसी
१७९
ऐसें स्तुतीचें वाग्रत्नदत्त अर्पितां माळा करोनतेणें तोपोनि कामदहनप्रत्यक्षपणे मिरवला
१८०
प्रत्यक्ष होतां उमाकांतनयनीं यजिता झाला दत्तमग आलिंगोनि प्रेममरितनिकट आपण बैसला
१८१
योगक्षेमाची सकळ वार्ताशिव पुसतां झाला दत्तातेणेंही सांगोनि क्षेमवार्ताशिवसुखा पुसिलें
१८२
यापरी बोलता झाला दत्तकीं बद्रिकाश्रमीं कानन बहुततरी महाराजा दृष्टी व्यक्तमाजी करा कृपाळुवा
१८३
मग अवश्य म्हणोनि उमारमणउभयतां पाहूं चालले काननपरी ही वासना दत्ताकारणेंमच्छिंद्रदैवें उदभवली
१८४
जैसा लाभ असतो पदरींतो सहज वळूनि येत घरींलघुशंके मूत्रधारींमांदुसघट लागतसे
१८५
कीं उष्णत्रासें मही चालीआतुडे कल्पतरुची साउलीतेवीं दत्तवासना उदभवलीमच्छिंद्रदैवप्रकरणीं
१८६
कीं याजव्रता टाकिल्या बाहेरीहिरा ठेवोनि नेत गारीतेवीं दत्तात्रेयवासनालहरींउदेली मच्छिंद्रदैवानें
१८७
असो ऐशा लाभभावनाउभयतां रमती बद्रिकाश्रमानाना तरुप्लवंगमांअपार चिन्हें पाहती
१८८
सुरतरु पोफळीबकुळ चंपक कर्दळीगुलछबु गुलाब केळीनारळी सोनकेळी शोभल्या
१८९
की सहज पाषाण ढाळितां महीसीदैवें आतुडे हस्तपादांसीतेवीं मच्छिंद्रदैवउद्देशीदत्तवासना उदभवली
१९०
ऐसे वर्णितां अपारतरुतरी बद्रिकेचा फार शेजारुकानना महा निकट मंदारुमंदराचळ शोभला
१९१
तयावरोनि वर्षत तोयधरमणिकर्णिके अपार नीरती भागीरथी उत्तमतीरनिजदृष्टीनें पाहिली
१९२
मग तेथ ओघ धरोनउभयतां करिते झाले गमनअसो मच्छिंद्राकारणेंनिजदृष्टीं पाहातील
१९३
तेथें जी जी होईल वार्ताश्रीगुरु ज्ञानंत होय सांगतानिमित्तमात्र धुंडीसुताग्रंथामाजी मिरविलें
१९४
धुंडीसुत नरहरिवंशींमालू वदे कवित्वासीनिमित्तमात्र नरहरिकृपेसीतोचि बोलवी ज्ञानेश
१९५
स्वस्ति श्रीभक्तिकथासारसंमत गोरक्षकाव्यकिमयागारसदा परिसोत भाविक चतुरप्रथमोऽध्याय गोड हा
१९६

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ नवनाथभक्तिसार प्रथमोऽध्याय समाप्त ॥

॥ श्री नवनाथाय नमः ॥

या अध्यायाचे वाचन झाले?

तुमची नोंद या ब्राउझरमध्ये जतन होते.