॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद
नवनाथांची जागृत स्थाने

तीर्थयात्रा

नवनाथ भक्तिसारात उल्लेखलेल्या स्थानांचा भाविकांसाठी परिचय.

नाथभक्तांच्या माहितीकरिता “आदरणीय मुकुंद दादा अंधारे” अमृतमहोत्सव गौरवांकामध्ये सौ. सुवर्णा मु. अंधारे यांनी संकलित केलेली माहिती येथे देत आहोत.

‘जे पिंडी ते ब्रह्मांडी’ या मूलभूत संकल्पनेवर आधारलेल्या नाथ संप्रदायात यात्रा, वारी आदींना महत्त्व नसले तरी या संप्रदायातील इष्ट दैवतांच्या ओढीने सामान्य भाविक भेटीसाठी सदैव उत्सुक असतो. श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथात नवनारायणांनी नवनाथांच्या स्वरूपातील अवतारकार्य समाप्तीनंतर ज्या ठिकाणी वास केला, त्या स्थानांची माहिती वाचावयास मिळते.

अध्याय ४० · श्री नवनाथ भक्तिसार

शके सतराशे दहापर्यंतप्रकटरूपे मिरवले नाथ
मग येउनी आपुले स्थानातगुप्तरूपे राहिले९४

मठीत राहिला कानिफाजतीउपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती
जानपीर तो जालंदर जतीगर्भगिरी नांदतसे९५

त्याहुनी खालता गैबीपीरतो गहनीनाथ परम सुंदर
वडवाळ ग्रामी समाधीपरनागनाथ असे की९६

विट ग्रामी मानदेशाततेथे राहिले रेवणनाथ
चरपट चौरंगी अडबंगी तीर्थगुप्त अद्यापि करिताती९७

भर्तरी राहिला पाताळभूवनीमीननाथ गेला स्वर्गालागोनी
गिरनार पर्वती गोरक्षमूनीदत्ताश्रमी राहिला९८

गोपीचंद आणि धर्मनाथते स्वसामर्थे गेले वैकुंठात
विमान पाठवोनी मैनावतीतेघेउनी विष्णू गेलासे९९

वरील ओव्यांत नाथांच्या चैतन्यरूपात वास करणाऱ्या स्थानांची अधिकृत माहिती उपलब्ध आहे. याशिवाय संपूर्ण देशात अनेक ठिकाणी नाथ मंदिरे उभारली गेली; विशिष्ट नाथांच्या प्रभावामुळे त्यांच्या शिष्यांद्वारेही स्थानांची निर्मिती झाली. पण श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथात उल्लेखित स्थानांचा परिचय नाथभक्तांना व्हावा म्हणून हा प्रपंच.

श्री कानिफनाथ मंदिर, मढी

मठीत राहिला कानिफाजती

श्री कानिफनाथ मंदिर, मढी

प्रबुद्ध नारायणाचे अवतार श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ

मढी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर

अहमदनगर–शेवगाव मार्गावर

रंगपंचमीला मोठी यात्रा

फोन: ०२४२८-२४४०६४, २४४०००
kanifnathmadhi.org ↗
kanifnathmadhi@yahoo.co.in

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड

मच्छिंद्रासी मायबाप म्हणती

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड

‘मायंबा’ (बडे बाबा) — कवी नारायणाचे अवतार

सावरगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर (गर्भगिरी डोंगरावर)

मढीपासून अंतर १५ किलोमीटर

उत्सव: ऋषीपंचमी (जन्मोत्सव), पौष अमावस्येला यात्रा

श्री क्षेत्र जालिंदरनाथ देवस्थान

जानपीर तो जालंदर जती — गर्भगिरी नांदतसे

श्री क्षेत्र जालिंदरनाथ देवस्थान

अंतरिक्ष नारायणाचे अवतार

येवलवाडी, ता. शिरूर (कासार), जि. बीड

मच्छिंद्रनाथ गडापासून अंतर ७५ किलोमीटर

उत्सव: माघ पौर्णिमा, महाशिवरात्र (दुसरा दिवस), गुढीपाडवा

(गैबीपीर) गहिनीनाथ पुरातन मंदिर

त्याहुनी खालता गैबीपीर — तो गहनीनाथ परम सुंदर

(गैबीपीर) गहिनीनाथ पुरातन मंदिर

करभाजन नारायणाचे अवतार

चिंचोली, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर

मच्छिंद्रनाथ गडापासून अंतर ४५ किलोमीटर

श्री नागनाथ

वडवाळ ग्रामी समाधीपर — नागनाथ असे की

श्री नागनाथ

आविर्होत्र नारायणाचे अवतार

वडवळ, ता. चाकूर, जि. लातूर

मच्छिंद्रनाथ गडापासून अंतर २७० किलोमीटर

हैदराबाद–परळी रेल्वेमार्गावर, लातूरपासून २५ किलोमीटर

श्री रेवणनाथ

विट ग्रामी मानदेशात — तेथे राहिले रेवणनाथ

श्री रेवणनाथ

चमस नारायणाचे अवतार; यांनाच रेवणसिद्ध असेही म्हणतात

विटा, ता. माण, जि. सांगली

मच्छिंद्रनाथ गडापासून अंतर २५५ किलोमीटर

श्री भर्तरीनाथ

भर्तरी राहिला पाताळभूवनी

श्री भर्तरीनाथ

द्रुमिल नारायणाचे अवतार

मु.पो. हरंगुळ, ता. गंगाखेड, जि. परभणी

मच्छिंद्रनाथ गडापासून अंतर २५० किलोमीटर

श्री गोरक्षनाथ

गिरनार पर्वती गोरक्षमूनी — दत्ताश्रमी राहिला

श्री गोरक्षनाथ

हरि नारायणाचे अवतार

मु.पो. वाई, ता. वसमत, जि. हिंगोली

औंढा नागनाथपासून २१ किलोमीटर

श्री अडभंगीनाथ

चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ — गुप्त अद्यापि करिताती

श्री अडभंगीनाथ

चरपटीनाथ, चौरंगीनाथ, अडभंगीनाथ व इतर नाथसिद्ध

मु.पो. भामानगर, ता. गंगाखेड, जि. परभणी

हे नाथसिद्ध आजही गुप्तपणे संचार करीत आहेत. ज्या ज्या ठिकाणी उपासना, पूजा, पारायण, हवन आदींद्वारे त्यांचे आवाहन केले जाते, त्या ठिकाणी ते प्रत्यक्ष रूपाने हजर होतात व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात, अशी श्रद्धा आहे.

नवनाथ संप्रदायातील तीर्थक्षेत्रे

१. श्री क्षेत्र मढी

सह्याद्री पर्वताच्या काही उपरांगा पूर्व–पश्चिम दिशेने पसरलेल्या आहेत. या रांगांमध्ये गर्भगिरी पर्वतरांग अहमदनगर–बीड जिल्ह्यांमध्ये पसरलेली आहे. हा परिसर निसर्गरम्य असून गर्भगिरीच्या पर्वतरांगेत खळखळ वाहणाऱ्या पानागिरी नदीशेजारी उंच टेकडीकाठी मढी हे सुंदर गाव आहे. या पवित्र आणि मंगल गावात उंच टेकडीवर ब्रह्मचैतन्य श्री कानिफनाथ महाराजांनी, श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे सर्व देवदेवतांच्या महायज्ञामध्ये ठरल्याप्रमाणे, दहाव्या शतकात फाल्गुन वद्य रंगपंचमीला संजीवन समाधी घेतली.

अहमदनगरपासून ५५ कि.मी. तर पाथर्डी तालुक्यापासून १२ कि.मी. अंतरावर असलेले, समृद्ध संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन करणारे हे आदर्श गाव नाथपंथीयांचे आद्यपीठ म्हणून भारतभर प्रसिद्ध असून सर्वांचेच श्रद्धास्थान बनले आहे.

श्री कानिफनाथ मंदिर, मढी

२. कानिफनाथ मंदिर (बोपगाव, सासवड)

नाथ पंथातील कानिफनाथांचे हे मंदिर जेजुरीपासून तीस किलोमीटर अंतरावर, सासवडच्या पश्चिमेकडे बापदेव घाट मार्गावर आहे. बोपगावपासून उजवीकडे मंदिराची कमान लागते. वेडीवाकडी वळणे घेत घाटरस्ता संपल्यानंतर गाडी पार्किंगसाठी मोठे पटांगण आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर नव्याने उभारलेला सभामंडप दिसतो; पंचक्रोशीतील लोकसहभागातून या मंदिराचा कायापालट झाला आहे.

मूळ मंदिर लहान आहे. मंदिरामध्ये जाण्यासाठी दरवाजा नसून खिडकीवजा एक फूट बाय एक फूट अशी चौकट आहे; या चौकटीतून कितीही जाड व्यक्तीला सरपटत आत जाता येते. आत पंधरा–वीस जण मावू शकतील एवढा मोठा गाभारा आहे. आत प्रवेश केल्यानंतर समोर दिसते ती यावनी दर्ग्यासारखी कानिफनाथांची समाधी. धूप व फुलांचा सुगंध मन प्रफुल्लित करतो. जसा आत प्रवेश केला तसेच बाहेर पडावे लागते.

मुख्य गर्भगृहात स्त्रियांना प्रवेश नाही; पुरुषांना सदरा व कंबरपट्टा काढूनच आत प्रवेश करावा लागतो. या टेकडीवरून दिवेघाट तसेच मस्तानी तलाव दिसतो; पावसाळ्यात येथून निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते.

कानिफनाथ मंदिर, बोपगावकानिफनाथ मंदिर परिसर, बोपगाव
ही माहिती जुन्या संकेतस्थळावरून घेतली आहे. प्रवासापूर्वी मंदिराची वेळ, मार्ग, संपर्क आणि स्थानिक नियम संबंधित देवस्थानाकडून पुन्हा तपासा.