॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद

श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी

अध्याय ३९

सत्यलोकी चरपटीनाथ व नारद यांचें वास्तव्य. १९२ ओव्या · कथासार वाचा

श्रीगणेशाय नमः जयजयाजी आदिनाथाकर्पूरवर्णा उरगभूषिताबोलवीं पुढें ग्रंथार्थानवरसादि कृपेनें
मागिले अध्यायीं केलें कथनचरपटीचा होऊनि जन्मदत्तदीक्षा पुढें घेऊननाथपंथीं मिरवला
उपरी एकादश नाथांपासूनचौर्याचयशीं सिद्ध झाले पूर्णतयांचे सांगितले नामयथाविधीकरुनियां
एक गहनी वेगळा करुनबहात्तर आठांनीं केले निर्माणउपरी मीननाथ चौरंगी आडबंगणबारा सिद्ध निर्मिले
एकूण चौर्यानयशीं सिद्ध पूर्णपुढें आतां ऐका कथनचरपटी करी तीर्थाटनकथा कैसी वर्तली
गया प्रयाग काशीहूनजगन्नाथ मल्लिकार्जुनफणिपर्वत रामेश्वर करुनकुमारीदैवत पाहिलें
बारा मल्हार हिंगलाजबारा लिंगे तेजःपुंजसप्त मोक्षपुर्यात पाहोनि सहजमहीप्रदक्षिणा घातली
सकळ महीचें झाले तीर्थगुप्त प्रगटे अत्यदभुतपरी एक राहिले इच्छिलें तीर्थस्वर्गपाताळ तीर्थात
करुनि मणिकर्णिकेचें स्नानसकळ स्वर्ग यावें पाहूनउपरी पाताळभुवनीं जाणभोगावती वंदावया
ऐसा विचार करुनि चित्तींगेला बद्रिकाश्रमाप्रतीतेथें नमूनि उमापतिपुढें चालिला महाराजा
१०
व्यानप्रयोगीं भस्मचिमुटीचर्चूनियां निजललाटातेणेंकरुनि वातगतींगमनातें दावीतसे
११
मग आदित्यानामी मंत्र जपूनप्रत्यक्ष केला नारायणतो मागें पुढें सिद्ध होऊनमार्गापरी गमतसे
१२
कीं मनयोगाचा धीर धरुनि करींचरपट लंघी महेंद्रगिरीशैल्यबर्फलहरीअंगीं झगट करीतसे
१३
सवितातेज अति अदभुत परम तीव्र दाहाते करीततेणेंकरुनि बर्फगणांतवितळपणीं मिरवत
१४
जैसें पर्जन्यकाळीं महींवितळे मित्रतेजप्रवाहींत्याचि न्यायें ते समयींहिमाचलकण वहिवटले
१५
ऐसी करुनि गमनस्थितीलंघूनि गेला स्वर्गाप्रतीतों प्रथम शृंगमारुतीसत्यलोका पाहिलें
१६
जातांचि गेला विधिसभेंतचतुराननाचें चरण वंदीतवंदूनियां जोडूनी हस्तसन्मुख उभा राहिला
१७
विधि पाहूनि चरपटासीम्हणे कोण आला योगाभ्यासीऐसें बोलतां घडीसींनारद उभा तैं होता
१८
तो तयाच्या सन्मुख होऊनम्हणे महाराजा चतुराननमग मूळापासून जन्मकथनतयापासीं वदला तो
१९
ऐकूनि विधि सर्व वत्तांतआनंदला अति अदभुतमग चरपटाचा धरुनि हस्तअंकावरी घेतला
२०
हस्तें मुख कुरवाळूनक्षणोक्षणीं घेत चुंबनम्हणे बाळा तुझें येणेंकैसें झालें स्वर्गासी
२१
येरी म्हणे जी तातानारदें ओपिलें दत्तहस्तातेणें वरदपाणी माथांठाऊक केला बाळासी
२२
मग सकळ चरपटीतें विद्यार्णववैखरीपत्रें आणूनि ठेवत्यावरी मोदानें कमलोदभवेंश्रवणपात्रीं भरलासें
२३
तो कुशल विद्यारत्नश्रवणशक्तीं कीं सांठवणपरम आल्हादें आनंदनपुन्हां चुंबन घेतसे
२४
यावरी बोले चतुराननबाळा कामना वेधली कोणयेरु म्हणे तव दर्शनमनीं वाटलें हो तात
२५
यापरी होतां कामना चित्तींतेथेंचि वेधली कृपामूर्तीकीं मनकर्णिका स्नाना निगुतींभोगावती पहावी
२६
यावरी बोले कमलोदभवबा रे एक संवत्सर येथें असावेंत्यांत पर्वणी आल्यासी अपूर्वस्नानासी जाऊं सकळिक
२७
ऐसें बोलतां कमलोदभवतातअवश्य म्हणे चरपटीनाथयापरी राहतां सत्य लोकांतबहुत दिन लोटले
२८
परी चरपट आणि नारदमुनीवर्तती एकचित्तें खेळणींचैन न पडे एकावांचुनीएकमेकां क्षणार्ध
२९
यापरी कथा पूर्वापारेसींनारद जातसे अमरपुरीसीतोंसहस्त्रचक्षु देखतां त्यासीविनोदउक्तीं पाचारी
३०
देखतांचि हा तपोवृंद म्हणे यावें कळीनारदऐसे शक्राचे ऐकूनि शब्दमुनी क्षोभ पावला
३१
चित्तीं पेटतां कोपाग्नीअंतरीं जल्पे नारदमुनीम्हणे तोही समय तुजलागुनीएक वेळं दाखवीन
३२
ऐसें म्हणून स्वचित्तांतनारद जातां आपुल्या स्थानाप्रतयासही लोटले दिन बहुतपरी शब्द चित्तांत रक्षीतसे
३३
तों सांप्रतकाळीं चरपुटमुनीविद्यापात्र प्रळयाग्नीतें पाहूनि जल्पे नारद मुनीइंद्र आहुतीं योजावा
३४
ऐसे कामरत्नीं इच्छाधामींरक्षीत असतां देवस्वामीतों एके दिवशीं श्रवणउगमींश्रृंगारिला चरपट तो
३५
म्हणे बांधवा ऐक वचनकामें वेधलें माझें मनकीं अमरकुसुमवाटिकाश्रमपाहूं क्रीडेकारणें
३६
चरपट म्हणे अवश्य मुनीचला जाऊं येचि क्षणींऐसा विचार करोनि मनींअमरपुरीं चालिले
३७
मार्गी चालतां चरपटनाथशांतपणें महीं पाऊल पडततें पाहूनि कमलोद्भवसुतचरपटातें बोलतसे
३८
म्हणे सखय जाणें येणेंआहे परम लंबितवाणेंतरी गमन ऐसे चालीनेंघडोनि कैसें येईल
३९
चरपट म्हणे आम्ही मानवआमुची हीच चाली काय करावेंतुम्हांपाशी असे चपल उपावतरी तेणेंकरुनि मज न्यावें कीं
४०
नारदें ऐसे शब्द ऐकूनकार्यकामनीं मोहित मनमग मार्गालागी स्थिर होऊनगमनकळा अर्पिली
४१
जो महादभुत कमलापतीतेणें दिधली होती नारदाप्रतीती प्रारब्धबळें चरपटाप्रतीलाधली असे अवचितीं
४२
ती गमनकळा कैसी स्थितइच्छिल्या ठाया ती नेतआणि त्रिभुवनांतील सकळ वृत्तांतदृष्टीपुढें बैसतो
४३
आयुष्य भावी वर्तमानगुप्तकृत्ये झाली होऊनकोण्या ठायी वसे कोणसकळ दृष्टी पडतसे
४४
ऐसी कळा ती गमनस्थितीचरपटाते होतां प्राप्तीमग हदयीं सरिताभरतींतोय आनंदाचें लोटलें
४५
मग उभय एके कलेंकरुनमार्गी करिते झाले गमनएकासारखा एक चंडकिरणस्वर्गालागीं मिरवले
४६
मग लवतां डोळियाचें पातेंमनोवेगीं अपूर्व असतगगनचुंबित मार्गे अमरक्षितींतकुसुमवाटिकेंत पातले
४७
तंव तेथें नाना तरु विस्तीर्णगगनचुंबित विशाल वनज्यांच्या कुसुमसुगंधेंकरुनअमोघ पाषाण मिरवती
४८
सहस्त्र योजन कानन समस्तझाले आहे गंधव्यक्तते पाहूनियां चरपटनाथपरम चित्तीं आल्हादें
४९
मग कुसुमवाटीं करितां गमनखेळती नाना क्रीडावचनेंखेळतां खेळतां येती दिसुनपीयूषफळे त्या ठाया
५०
नारदासी म्हणे चरपटनांथफळें भक्षावीं कामना होतनारद म्हणे कोणी हस्तधरिला आहे तुमचा
५१
मग मन मानेल तैसें फळतोडूनियां तपोबळभक्षण करिती एकमेळउभय सुत विधीचे पैं
५२
तयांच्या बीजसाली सोडूनपीयूषरसासी करिती सेवनउपरी सांडूनि तें स्थानअनेक स्थानें सेविती
५३
फळें तोडितां पक्कशाखामहीं पडती विभक्त रुखाऐसी ठाई ठाई कुसुमवाटिकामहीतें दर्शवी
५४
यापरी उभय ते समयींकुसुमें तोडिती गंधप्रवाहींमणि भूषणमिषें सर्व देहींघेऊनि कांहीं जाताती
५५
तों ब्रह्मदेव देवतार्चनीबैसतां ठेविती पुढें नेऊनीम्हणती कोण येतो न कळे येथसकळ नासूनि बागाइतजात आहे येथुनी
५८
मग ते रक्षक पाळतीवरतीगुप्त बैसती अन्यक्षेत्रींतो ऐकें दिनीं उभय तेकुसुमवाटिके संचरले
५९
संचरतांचि विभक्त ठायाचरपट गेला फळें तोडावयातों रक्षक येऊनि पृष्ठीमायाचरपटातें धरियेलें
६०
तें नारदानें पाहूनत्वरेंकरुनि केलें पलायनस्वस्थानासी जाऊनस्थिर होऊनि राहिला
६१
येरीकडे लतिकापाळधरुनियां चरपटबाळयेतांचि भेदिलें मुखकमळहस्तेंप्रहारेंकरुनियां
६२
तेणें कोपोनि तपोकेसरीकीं अपूर्व भासे वैश्वानरीमग तीव्रशिखा आहुती बनकरीचावावया धांवतसे
६३
करीं कवळूनि भस्मचिमुटीवाताकर्षण जल्पे होटींतेणेंकरुनि बनकर थाटींव्याप्त झाले सकळिक
६४
परम अस्त्र तें कठिणसकळांचें भेदलें हदयस्थानतेणें देहींचा सकळ पवनकुंठित झाला ते समयीं
६५
कुंठित होत श्वासोच्छ्वासतेणें प्राण झाले कासाविससकळ उलथोनि महीसडोळां विकास दाटला
६६
गात्रें कांपती थरथराटमुखीं रुधिराचा पूरलोटनेत्र वटारुनि स्थूळवटबुबुळांतें दाविताती
६७
ऐसा होतां विपर्यासतों आणिक बनकर त्या ठायासमागूनि येतां सहज स्थितीततेथें पाहिलें सकळिकां
६८
तों अव्यवस्थित सकळ बनकरपडिले आहेत महीवरऐसें पाहूनि करिती विचारतों सिद्ध बाळक पाहिला
६९
परम तीव्र अति कठिणदेदीप्यरुप तेज गहनत्यातें दृष्टी पाहूनमागचे मागें ते सरले
७०
त्वरें येऊनि नगरक्षितीम्हणती महाराजा हे नृपतीएक जोगी अर्कस्थितीआला असे महाराजा
७१
बाळरुपी अति सानतेणें बनकरांचे घेतले प्राणहदयीं पेटला प्रळयानळासमानदशा मिरवूं म्हणतसे
७२
आणीक वल्ली तरु पाहातफिरत आहे बागाइतन चले आमुचे माहात्म्य तेथम्हणोनि आलो या ठाया
७३
मग पाचारुनि सुरवरमेळइंद्र म्हणे तुम्ही जाऊनि सकळशासन करुनियां बाळधरुनि आणा मजपुढें
७४
नावरे तरी करा बंधनशस्त्रास्त्रीं करावें कंदनयुक्तिप्रयुक्तिकरुनअरिष्टातें दवडा कां
७५
ऐसें बोलतां देवपाळसकळ देव उठले सबळचरपटप्रतापसमुद्रजळप्राशन करुं पाहती
७६
कीं तें सैन्य नोहे वडवानळअति शोभूनि शिखाजाळशस्त्रास्त्रीं महादळघेऊनियां चालिले
७७
येतांचि कुसुमवाटीनिकटींचरपट पाहता झाला दृष्टींमग सावध राहूनि कोपार्णव पोटींलहरा सोडूं म्हणतसे
७८
भस्मचिमुटीं करीं कवळूनसावध उभा ब्रह्मनंदनतों देवसैन्य अपार धननिकट येऊनि बोलती
७९
पाहूनि तयाचें तीव्रपणमनीं म्हणे ब्रह्मनंदनव्यर्थ विद्या अपार शीणकासयासी करावा
८०
सकळ अस्त्रप्रतापतरणीत्यांत अस्त्र मुकुटमणींतेंचि द्वंदासी पाठवूनिवाताकर्षण रुझवावा
८१
मग हातीं भस्मचिमुटीवाताकर्षण झालें होटींपाहूनि देवेचमूथाटीसव्य अपसव्य फेंकीतसे
८२
मग तो अस्त्रप्रयोग कठिणसकळ चमू घाली वेष्टूनसर्वा हदयीं संचरुनआकर्षिला वात तो
८३
सर्वातें वात होतां लिप्तश्वासोच्छवास झाले कुंठितमग ते शस्त्रअस्त्र हस्तमोकलोनि देताती
८४
प्राण होऊनि कासाविसदेह सांडिती स्वर्गमहीसरुधिर येऊनि आननासपूर वाहे भडभडां
८५
नेत्रद्वारें वटारुनसकळ सांडू पाहती प्राणगात्रें विकळ शवसमानसकळ काननीं मिरवले
८६
ऐशा दशेंत देव सघनहोतां येरीकडे पाकशासनहेर भृत्य पाठवूनसमाचार आणवी
८७
येऊनि हेर पाहूनि तेथेंसांगते झाले अमरपाळातेम्हणती महाराजा अत्यदभुतदेव सर्वस्वीं निमाले
८८
निमाले परी पुढें आतांयेथें येऊनि अमरनाथातुमचे सकळ जीविताओस नगरी करील कीं
८९
बाळरुप दिसतो सानपरी कृतांताचा घेईल प्राणप्रळयरुद्र तो आकर्षणकरील मही वाटतसे
९०
कीं महाप्रळय आजीच आलाऐसेपरी भासे आम्हांलाऐसें ऐकूनि बहु बोलांपाकशासन दचकतसे
९१
यावरी धैर्य धरोनि बोलतसिद्ध करा ऐरावतमहाप्रळय वज्रघातेंभग्न करणें तयासीं
९२
ऐसें ऐकूनि बोलती हेरम्हणती न्यून काय झुंजणारपरी तो धनुष्यालागीं शरन लावी अजूनि महाराजा
९३
पाहतां पाहतां रणांगणींविपरीत करतो करणीउगीच श्वासोच्छवास कोंडुनीप्राण सोडितां झुंजार
९४
तेथें तुमचें वज्रअस्त्रकाय करील सहस्त्रनेत्रतयाची विद्या गुप्तक्षेत्रकांहीं करुं नेदीचि
९५
नातरी उगलाचि जाईल प्राणमग सकळ राहील मुखभंजनतरी दशकरातें साहाय्य करुनयेथें आणावा महाराज
९६
त्याची होतांचि दृष्टीयाची होय श्वासकुंठीतरी महाराजा हे दयाजेठीशिव साह्य करावा
९७
तरीच देव उठती पुढतीनातरी सकळांची होऊनि शांतीतस्मात् आतां युद्धाप्रतीजाऊं नये महाराजा
९८
ऐसें ऐकतां हेरभाषणउठता झाला पाकशासनवाहनारुढ प्रत्यक्ष होऊनकैलासासी पातला
९९
तें शिवगणवेष्टित सदाशिवबैसला होता महादेवतों अकस्मात देवरावजाऊनियां पोहोंचला
१००
चरणावरी ठेवूनि माथाम्हणे महाराजा आदिनाथातुम्हीं अमरपुरीं मज पतिताअमर करोनि बैसविलें
१०१
बैसविल्यावरी दानवें थोरगांजिल्यावरी वारंवारसंकट निरसूनि सत्वरपदस्थापना मज केली
१०२
परी आतां निर्वाण आलेंदेव सकळ प्राणा मुकलेंसांगावया तुम्हांसी वहिलेउरलों आहें इतुका मी
१०३
शिव म्हणे ऐसा कोणआला आहे स्वर्ग चढूनशक्र म्हणे स्वदृष्टीनेंपाहिला नाहीं महाराजा
१०४
कुसुमलतिकेचा केला नाशम्हणूनि पाठविलें सर्व देवांसत्यांचा समूळ होतां प्राणनाशपळूनि आलों येथें मी
१०५
ऐसें ऐकतां शिवशंकरगणांसी आज्ञा देत सत्वरसिद्ध होऊनि चला समग्रसमागमें माझिया
१०६
आणि विष्णूते करा श्रुततो होवो अनायासें सहितऐसें ऐकतां दूतविष्णूसमीप धांवती
१०७
मग गणांसहित अष्ट भैरवअष्ट पुत्र घेऊनि शिवशतकोटिसमुदावअमरपुरीं पातला
१०८
चढाओढी रणांतदेव मिळाले समस्तचरपटीनें दृष्टीं देखतभस्मचिमुटी कवळिली
१०९
चित्तीं म्हणे कासया उशीरउगाचि शीण करावा थोरनिवृत्ति करुनि थोर व्यवहारबोलवावें सर्वासी
११०
ऐसें सिद्ध करुनि वचनप्रयोगीं अस्त्र वाताकर्षणअस्त्रदेवता सिद्ध करुनश्वास बंद शिवासहित
१११
श्वास झाले कुंठितशिवासहित देव झाले विगलितमूर्च्छना येऊनि भूमीवरी पडतप्राण सर्वाचे निघूं पाहती
११२
असो शतकोटी गणशिवासह पाकशासनएकदांचि महीकारणढासळून पाडिले
११३
जैं तरु पल्लवशाखींमूळ खंडतां पडती शेखींतेवीं अवस्था झाली निकीमहीवरी पडतसे
११४
त्यापरी शिवादि शतकोटी गणमुख आच्छादी पाकशासनपुष्पवाटिके विकल प्राणमूर्च्छागत झाले ते
११५
अवघे पडिले निचेष्टितपरी नारद दुरोनि विलोकितहस्तपाद खुडितां हंसतअमरनाथा पाहुनी
११६
मनीं म्हणे बरें झालेंअहंकारीं सर्व गळालेदेवांमाजी कित्येक मेलेशव झालें शरीराचें
११७
कुसुमलतापाळक बनकरतैं सकळ सांडिले देहअवसरप्रेत होवोनि महीवरभयेंकरुनि पडियेले
११८
कोणा रुधिराचा भडभडाटमुखीं अपार पूर लोटतश्वेतवर्ण चक्षुपाटवटारुनि दाविती
११९
येरीकडे शिवदूतगेले होते वैकुंठांतविष्णु लक्षूनि महादभुतवृत्तांत सर्व सांगती
१२०
म्हणती महाराजा कमलाक्षामहीदक्षा सर्वसाक्षाराक्षसारी मोक्षमोक्षानिजदासां कैवारी
१२१
नेणों अमरवनीं कोणआला आहे बलिष्ट जाणतेणें सकळ देव केले तृणगतप्राण झाले ते
१२२
एकटा उरला अमरनाथतोही शीघ्र येवूनि कैलासासस्तवूनियां उमानाथासयुद्धालागीं गेलासे
१२३
शतकोटी गणांसहितवीरभद्रासह देव समस्तसवें घेवूनि उमानाथयुद्धालागीं गेलासे
१२४
भव जातां अमरपुरीसीआम्हां पाठविलें तुम्हांपासींआपण चलावे त्या कटकासीम्हणोन आम्हीं धांवलों
१२५
ऐसें ऐकतां मधुसूदनविचार न पाहतां विष्णुगणछपन्न कोटी मेळवूनगरुडारुढ झालासे
१२६
टाळ ढोल दुंदुभिनादसमारंभें श्रीगोविंदअमरपुरींत झाला नादऐसें येवूनि पातले
१२७
समस्त बैसले घालूनि पोळाआर्हाुटिती विष्णुमंडळाधरा मारा शब्दकोल्हाळाएकदांचि करिताती
१२८
शिवगण जे शिवासहितदेवांसह अमरनाथपरम पाहूनि अवस्थितविष्णु मनीं क्षोभला
१२९
सकळ दूतां आज्ञापीतम्हणे तुमचा होय ताताधरा मारा आलंबितशस्त्रेंअस्त्रें करुनियां
१३०
आपण घेवूनि सुदर्शनगांडीव सजविलें लवोनइतुकें चरपटनाथें लक्षूनभस्मचिमुटी कवळीतसे
१३१
मनांत म्हणे विष्णुकुमारसुदर्शन हें आह अनिवारतरी आपण आधींच वारासारकरुनियां बैसावें
१३२
मग मोहनास्त्र जल्पूनि होटींसुदर्शननामीं फेंकिली भस्मचिमुटीतें मोहनास्त्र सुदर्शनपोटींजाऊनियां संचरलें
१३३
तेणेंकरुनि सुदर्शनअचळ जड झालें मोहूनतैसेंचि गांडीव आणि सकळ गणउठावले नेटकीं
१३४
तें पाहूनि चरणस्थितकाय करिता झाला नाथविष्णुगण करुनि समस्तवाताकर्षण योजिलें
१३५
वाताकर्षणप्रयोग नेटींगर्णी फेंकितां भस्मचिमुटीतेणें विष्णुकटक सुभटश्वासोच्छवासें दाटलें
१३६
कोंडतांचि श्वासोच्छ्वासधैर्य न उरे मग समस्तांसमग देह सांडूनि सकळ धरणीसधुळीमाजी लोळती
१३७
खरसायके मोकळे हस्तशस्त्रविकार झाला बहुतमुखीं रुधिर विचकूनि दांतनेत्र श्वेत करिताती
१३८
सकळ सांडूं पाहती प्राणहस्तपाद आपटिती दुःखी होवूनतें पाहूनि मधुसूदनसुदर्शन प्रेरीतसे
१३९
सुदर्शनातें वैडूर्यखाणीकीं येवूनि राहिले सहस्त्र तरणींऐसें अति चंचळाहुनीचपल महाअस्त्र तें
१४०
जैसा अश्वांत श्यामकर्णकीं धेनुगणीं सुरभिरत्नतेवीं अस्त्र सुदर्शनजाज्वल्यपणीं मिरवें तें
१४१
तें सुदर्शन कोपेंकरुनप्रेरिता झाला रमारमणपरी तें नाथापाशीं येउनमोहेंकरुन वेष्टिलें
१४२
चित्तीं म्हणे पिप्पलायनहा प्रत्यक्ष विष्णुनारायणस्वामी आपुला वाचवा प्राणघोट घेतला दिसेना
१४३
तरी हें युद्ध पूर्ण नाहींमाझी परीक्षा पाहीनिमित्तें सहज करुनियां कांहींखेळ मज दावीतसे
१४४
ऐसा विचार करुनि चित्तींनमन केलें नाथाप्रतीनमूनियां दक्षिण हस्तीजाउनियां विराजलें
१४५
चरपटाहातीं सुदर्शनकुस्ती करितां मनोधर्ममग तो चरपट चांगुलपणेंप्रत्यक्ष विष्णु भासतसेयेरीकडे वैकुंठनाथआश्चर्य करीं स्वचित्तांतम्हणे मोहूनि सुदर्शनातेंघेतले कैसें अरिष्टानें
१४७
मग हातीं गदा परताळूनघेता झाला रमारमणतैं चरपट तेथें दृष्टीं पाहूनभस्मचिमुटी कवळीतसे
१४८
वाताकर्षणप्रयोगमंत्रसिद्ध करोनि तपपात्रसमोर लक्षोनि कंजगात्रप्रेरी अस्त्र दुर्घट तें
१४९
मग तें अस्त्र पवनगतींसंचरतें झालें हदयाप्रतीतेणें झालें अरिष्ट अतीधडाडूनि पडियेलें
१५०
हस्तविभक्त होवूनि गदापडती झाली क्षितीं आल्हादापांचजन्य प्रियप्रद गोविंदासोडूनियां मिरवत
१५१
ऐसा होतां अव्यवस्थिततें पाहूनियां चरपटनाथमग विष्णूजवळी येवूनि त्वरितनिजदृष्टी विलोकी
१५२
विलोकितां विष्णूलागुनीतों दृष्टीं पडला कौस्तुभमणीमग मनांत म्हणे आपणालागुनीभूषणातें घ्यावा हा
१५३
ऐसें म्हणोनि स्वचित्तांतवैजयंतीसी काढूनि घेतगळां ओपूनि मौळीं ठेवीतरत्नमुगुट विष्णूचा
१५४
शंखचक्र आदिकरुनहातीं घेतसे ब्रह्मनंदनगदा कक्षेमाजी घालूनशिवापासीं पातला
१५५
शिव पाहूनि निजदृष्टींतों कपालपात्र आणिलें पोटींतें घेवूनि झोळीं त्रिपुटीसोडूनियां चालिला
१५६
चित्तीं गमनागमध्यानत्वरें पातला सत्यग्रामपितयापुधें शीघ्र येवूनउभा राहिला चरपट
१५७
पांचजन्य सुदर्शनसव्य अपसव्य कराकारणकक्षे गदा हदयस्थानकौस्तुभ गळां शोभवी
१५८
तें पाहूनि नाभिसुतविष्णुचिन्हें भूषणास्थितमौळीं मुगुट विराजितअर्कतेजीं चमकूनिया
१५९
ऐसे चिन्हीं पाहतां विधीमनीं दचकला विशाळबुद्धिम्हणे मुला काय त्रिशुद्धीकेलें आहेसी कळेना
१६०
मग चरपटाचा धरुनि हातआपुल्या अंकावरी घेतगोंजारुनि पुसतचिन्हें कोठूनी आणिली हीं
१६१
येरु म्हणे ऐक तातसहज शक्राच्या कुसुमलतांतखेळत होतों पहात अर्थमातें बनकरें तोडिलें
१६२
मम म्यां कोपें बनकरमारुनि टाकिले महीवरतया कैवारें हरिहरझुंजावया पातले
१६३
मग मी चित्तीं शांत होवूनविकळ केले भवविभुप्राणतया अंगींची भूषणे घेऊनआलों आहे महाराजा
१६४
ऐसी ऐकतां चरपटगोष्टीपरम दचकला परमेष्ठीमग हदयीं धरुनि नाथ चरपटीगौरवीत बाळातें
१६५
म्हणे वत्सा माझा तातआजा तुझा विष्णु निश्चितमहादेव तो आराध्यदैवतमजसह जगाचा
१६६
तरी ते होतील गतप्राणमग मही त्यांवांचूनआश्रयरहित होवूनजीवित्व आपुलें न चाले
१६७
तरी बाळा ऊठ वेगींक्लेश हरोनि करी निरोगिनातरी मज जीवित्वभागींअंत्येष्टी करुनि जाई कां
१६८
ऐसें बोलतां चतुराननचित्तीं वेष्टला कृपेंकरुनम्हणे ताता उठवीनसकळिकां चाल कीं
१६९
मग विधि आणि चरपटनाथत्वरें पातले अमरपुरींततों हरिहर अव्यवस्थितचतुराननें देखिले
१७०
मग प्रेमाश्रु आणूनि डोळांम्हणे वेगीं उठवीं बाळावाताकर्षण चरपटें कळाकाढूनियां घेतलें
१७१
वातप्रेरकमंत्र जपूनसावध केले सकळ देवजनउपरी जे कां गतप्राणसंजीवनीनें उठविले
१७२
सकळ सावध झाल्यापाठींब्रह्मा करीं धरुनि चरपटीविष्णुभवांच्या पदपुटींनिजहस्तें लोटिला
१७३
परी विष्णुचिन्ह भूषणस्थितपाहूनियां रमानाथकोण हा विधीतें पुसततोही प्रांजळ सांगतसे
१७४
मग जन्मापासूनि अवतारलक्षणविधी सांगे देवांकारणविष्णु सकळ वृत्तांत ऐकूनग्रीवेलागीं तुकावी
१७५
मग म्हणे मम भूषणेंवर्तलें नाही विभक्तपणमाझाचि अवतार जाणचरपटनाथ आहे हा
१७६
मग परमश्रेष्ठी हस्तेंकरुनचरपट आंगींचे काढूनि भूषणविष्णूलागीं देवूनचरणीं माथा ठेवीतसे
१७७
असो सकळांचे समाधानपावूनि पावले स्वस्थानचरपट अवतार पिप्पलायनसर्व देवालागीं समजला
१७८
कपालपत्र शिवें घेवूनगणांसह पावला स्वस्थानअमरपुरीं सहस्त्रनयनदेवांसहित गेला असे
१७९
मग विधीने चरपट करीं वाहूनपाहतां झाला ब्रह्मस्थानयेरीकडे नारद गायनकरीत आला शक्रापाशीं
१८०
इंद्रालागीं नमस्कारुनम्हणे तुम्हां झाले थोर विघ्नयेथें कोणता नारद येवूनकळी करुन गेला असे
१८१
आम्ही तुमच्या दर्शना येतांकळींचे नारद आम्हां म्हणतांतरी आजचि कैसी बळव्यथाकोणें दाखविली तुम्हांसी
१८२
ऐसें नारद बोलतां वचनमनीं खोंचला सहस्त्रनयनचित्तीं म्हणे हेंचि कारणनारद आम्हां भंवलासे
१८३
ऐसें समजूनि स्वचित्तांतकळीचे नारद कदा न म्हणतअल्प पूजनें गौरवीतमग बोळविलें तयासी
१८४
येरीकडे चतुराननगेला स्वस्थाना चरपटीसी घेवूनतयामागें नारद येवूनसत्यलोकीं देखिला
१८५
यापरी पुढें खेळीमळीपर्वणी उत्तम पावली बळीमणिकर्णिकेसी सर्व मंडळीस्नानालागीं जातसे
१८६
एकवीस स्वर्गीचे लोक समस्तमणिकर्णिकेसी आले बहुततयांमाजी चरपटीनाथविधी घेवूनि आलासे
१८७
मग तात पुत्र करुनि स्नानापरतोनि आले स्वस्थानायाउपरी सहजस्थित होवूनसंवत्सर भरला असे
१८८
नारदविद्या पूर्ण गमनमनीं चिंतितां पावे स्थानतया मार्गे गौरवूनभोगावतीसी पातला
१८९
विधिसुत चरपटनाथगमन करीत महीं येततेथेंही करुनि अन्य तीर्थभोगावतीसी जातसे
१९०
करुनि भोगावतीचें स्नानसप्त पाताळ दृष्टीं पाहूनबळिरायाच्या गृहीं जावूनवामनातें वंदिलें
१९१
बळीनें करुनि परम आतिथ्यबोळविला चरपटीनाथयापरी इच्छापूर्ण नाथभ्रमण करी महीसी
१९२
ऐसी कथा ही सुरसकुसुममाळा ओपी त्यासकवि मालू श्रोतियांसभावेंकरुन अर्पीतसे
१९३
नरहरीवंशी धुंडीसुतअनन्यभावें संतां शरणागतमालू ऐसे नाम देहाप्रतज्ञानकृपें मिरवीतसे
१९४
स्वस्ति श्रीभक्तिकथासारसंमत गोरक्षकाव्य किमयागारसदा परिसोत भाविक चतुरएकोनिचत्वारिंशत्ततिमोध्याय गोड हा
१९५

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ नवनाथभक्तिसार एकोनचत्वारिंशतितमोऽध्याय समाप्त ॥

॥ श्री नवनाथाय नमः ॥

या अध्यायाचे वाचन झाले?

तुमची नोंद या ब्राउझरमध्ये जतन होते.