॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद

श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी

अध्याय ४०

इंद्रानें केलेला सोमयाग; त्याकरिता सर्व नाथाचें आगमन, नवनाथांचा आशिर्वाद व समारोप. १९९ ओव्या · कथासार वाचा

श्रीगणेशाय नमः जयजयाजी पंढरीनाथापुंडलीकवरदा रुक्मिणीकांतादीनबंधो अनाथनाथापुढें ग्रंथ बोलवीं
मागिलें अध्यायीं रसाळ वचनतुवां बोलविलें कृपेंकरुनस्वर्गी चरपटीनाथें जाऊनइंद्राचा गर्व हरिलासे
हरिहरांची जिंकूनि कोटीपुढे लोभाची भेटीगमनकळा नारदहोटींप्राप्त झाली महाराजा
उपरी मनिकर्णिकेचें करुनि स्नानपुढें पातले पाताळभुवनघेवूनि बळीचा गौरव मानवामनातें भेटला
भोगावतीची करुनि आंघोळीपुनः पातला भूमंडळींयावरी कथा पुढें कल्होळींनवरसातें वाढी कां
असो आतां रमारमणग्रंथाक्षरीं बैसला येवूनतरी पुढें श्रोतीं सावधानकथारस घ्यावा कीं
इंद्र चरपटीनें जिंकलावैभवें मशकातुल्य केलातरी तो विस्मयवान खोंचलाखडतरपणीं हदयांत
मग जो गुरु वाचस्पतीपरम ज्ञाता सर्वमूर्तीसहस्त्रनयन तयाप्रतीघेवूनियां बैसलासे
देवमंडळांत सहस्त्रनयनघेवूनि बैसलासे कनकासनजैसा नक्षत्रीं रोहिणीरमणअति तेजें मिरवला
ऐशा रीती पाकशासनबैसला सेवूनि सभास्थानमग बृहस्पती विस्मयरत्नचरपटप्रताप सांगतसें
१०
अहा वय धाकुटें सान स्वरुपपरी अर्कासमान थोर प्रतापहरिहरादि करुनि लोपस्थापूनि गेला आपुलेचि
११
तरी वाताकर्षणविद्या सबळदेवदानव झाले निर्बळनाथपंथीं हें महाबळआतळलें कैसें कळेना
१२
तरी यातें करुनि उपायसाध्य करावी इतुकी ठेवया कर्मासी कोण लाघवस्वीकारावें महाराजा
१३
कीं तयाच्या गृहाप्रती जावूनदास्य करावें मनोधर्मेतोषवूनि सर्व कर्ममहीवरी मिरवावें
१४
असो यापरी यत्न करुनभेट घ्यावी त्या गंवसूनपरी ते जोगी तीव्रपणेंवर्तताती सर्वदा
१५
तरी उगलीच घेऊनि सदृढ भेटअर्थ वदावा तयासी निकटपरी काय चाड आमुची अलोटकार्यार्थी भीड कोणती
१६
तरी भिडेचें उपजेपणउजेड पडेल दासत्वेंकरुनतयामागें रानोरानअपार मही हिंडावी
१७
तरी हिंडल्यानें कोणे काळींउदय पावेल कृपानव्हाळीअमरपुरीची देवमंडळीतेजोयुक्त होईल
१८
म्हणाल ऐसें कासयानहा विपर्यास येईल घडोनतरी महीं होतो पुण्यपावनआसन माझें घेतसे
१९
तरी मी येथें सावधानकरुनि रक्षितों आपुलें आसनतस्मात् अमरावती सोडूनजाणें नाहीं मजलागीं
२०
ऐसें बोलतां अमरपतीबोलता झाला वाचस्पतीम्हणे महाराजा नाथाप्रतीयेथेंचि आणावे महायत्नें
२१
तरी तो यत्न म्हणशील कैसायज्ञ करावा सोमभासात्या निमित्तें नाथ राजसाघेवोनि यावें स्वर्गासी
२२
मग तो येथें आल्यापाठीदावूनि भक्तीची अपार कोटीमोह उपजवोनि नाथापोटींकार्य साधूनि घेइजे
२३
ऐसें बोलतां तपोद्विजपरम तोषला अमरराजउपरी म्हणे महाराजकोणा पाठवूं पाचाराया
२४
यावरी बोले कचतातहे महाराज अमरनाथमच्छिंद्रपिता अष्टवसूंतउपरिचर नामें मिरवतसे
२५
उपरिचर जातां महीतळवटींमच्छिंद्राची घेईल भेटीसांगूनि त्यातें कार्य शेवटींमग मच्छिंद्र आम्हां बोधील
२६
तरी त्यातें पाचारुनकार्ययज्ञाचा वदूनि कामविमानयानीं रुढ करुनपाठवावा महाराजा
२७
यापरी मच्छिंद्रनाथआला असतां अमरपुरींतगौरवोनि तुवां त्यातेंतुष्टचित्तीं मिरवावा
२८
तरी शक्ति तव सरितालोटमच्छिंद्र उदधिपोटसंगमिता पात्र अलोटप्रेमतोय भरलें असे
२९
तरी सुमुखाचें पडतां जळकार्यशुक्तिकामुक्ताफळतूतें ओपील तपोबळनवनाथ आणोनियां
३०
मग तो मुक्त अविंधविधीलावी भक्तीच्या शस्त्रास्त्रसंधींमग तें रत्न कर्णविधींस्वीकारी कां महाराजा
३१
ऐसे ऐकूनि गुरुवचनपरम तोषला सहस्त्रनयनमग रथीं मातली पाठवोनउपरिचरा पाचारी
३२
उपरिचर येतां वदे त्यातेंम्हणे महाराजा कामना मनांतउदेली करुं सोममखातेंपूर्ण करीं आतां तूं
३३
तरी विमानयानीं करोनि आरोहणजाऊनियां मच्छिंद्रनंदनउपरी त्यातें सवें घेऊनजावें नवनाथमेळीं
३४
मग ते आर्या भावार्थितमेळवोनि आणी अमरपुरींतसोममखाचें सकळ कृत्यतया हस्तें संपादूं
३५
अवश्य म्हणे वसुनाथतत्काळ विमानयानीं बैसतबद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथलक्षूनियां पातला
३६
तों गोरक्ष धर्मनाथचौरंगी कानिफा गोपीचंद राजसुतबद्रिकाश्रमी जालंधर अडबंगीनाथतीर्थस्नानीं ऐक्यमेळा झाला असे
३७
ऐशा समुदायांत मच्छिंद्रनाथेंअवचटपणीं देखिला तातेमग उठोनि मौळी चरणातेंसमर्पीत महाराजा
३८
मग नाथ वसु भेटूनबैसला सकळांमध्यें वेष्टूनम्लानवाणीं कार्यरत्नअमरांचें सांगतसे
३९
म्हणे महाराज हो शक्रापोटींअर्थ उदेला मखकोटीतरी आपण नवही जेठीसाह्य व्हावें कार्यार्था
४०
बहुतांपरी करुनि भाषणसर्वांचे तुष्ट केलें मनउपरी मच्छिंद्रातें बोधूनअवश्यपणीं वदविलें
४१
मग जालंदर कानिफा चौरंगीमच्छिंद्र गोरक्ष अडबंगीगोपीचंद रायादि अन्य जोगीआरुढ झाले विमानीं
४२
गौडबंगाली हेलापट्टणप्रविष्ट झालें तैं विमानराव गोपीचंद मातेसी भेटूनसमागमें घेतली
४३
उपरी विमानयानी होऊनपहाते झाले वडवालग्राम तेथूनतेथें वटसिद्धनागनाथ पाहूनआरुढ केला विमानीं
४४
तेथूनि भर्तरीचें करुनि कामविमान चालविती इच्छिल्या व्योमेंतों गौतमतीरीं नाथ उत्तमजती भर्तरी अवतरला असे
४५
यापरी तीर्थ करितां महीपाठींमहासिद्ध जो नाथ चरपटीअवंतीसी होता ताम्रपर्णीकांठींसवें घेतला महाराजा
४६
तेणें पुण्यमान देशी विटग्राम नामानेंपहाते झाले विमानयानेंतेथें रेवणसिद्ध बोधूनआरुढ केला विमानीं
४७
असो नवनाथ परिवारासहितते विमानयानीं झाले स्थितचौर्यायशीं सिद्धांसमवेतअमरपुरीं पातले
४८
विमान येतां ग्रामद्वारीसामोरा आला वृत्रारीपरम गौरवोनि वागुत्तरींचरणांवरी लोटला
४९
सकळां करोनि नमनानमननेत सदना सहस्त्रनयनआपुल्या आसनीं बैसवोनषोडशोपचारें पूजिले
५०
नवनाथां पाहोनि सकळ अमरमनीं संतोषले अपारतेज पाहोनियां गंभीरउभे तेथें ठाकलें
५१
मग हवनकृत्य मनकामनावदतां झाला सकळ जनांम्हणे महाराजा कवणे स्थानासिद्ध अर्थ अर्थावा
५२
मग वाचस्पति आणि मच्छिंद्रनाथम्हणती सुरवरपाळा ऐक मातसिंहलद्वीपीं स्थान अदभुतयज्ञ तेथें करावा
५३
अटव्य कानन आहे तुमचेंशीतळ छायाभरित जळाचेंतेथें न्यून साहित्याचेंपडणार नाहीं कांहींच
५४
उपरिचरन वसु गंधर्व घेऊनपाहत झालें अटव्यवनतेथें यज्ञसाहित्य आहुती करुनयज्ञ आरंभ मांडिला
५५
दंपत्य बैसोनि सहस्त्रनयनमंत्रप्रयोगीं बृहस्पती आपणयज्ञ आहुती नवही जणस्वाहा म्हणोनि कुंडीं टाकिती
५६
परी किलोतळेचे सीमे आंतअटव्यवन होते अदभुतयज्ञ होतां मीननाथमच्छिंद्रातें आठवला
५७
मग पाचारोनि उपरिचर तातमच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थसिंहलद्वीपीं मीननाथकवण ग्रामीं ठेविला
५८
येरु म्हणे त्याच्या ग्रामसीमेंतअटव्यवन हें विख्यात विराजिततरी कीलोतळेसहित मीननाथपाचारितों आतांचि
५९
मग उपरिचर वसु प्रत्यक्ष जाऊनमीननाथासह कीलोतळारत्नपाचारुनि एक क्षणभेटी केली उभयतां
६०
परम स्नेहानें क्षण एक कांहींवाहवले मोहप्रवाहीउपरी दारा सुत तया ठायींमच्छिंद्रानें ठेविले
६१
चौरंगी आणि अडबंगीनाथमिरवीत बैसविले समुदायांतयज्ञआहुती तयांचे हस्तेंस्वीकारीत महाराजा
६२
दहा नाथ यज्ञआहुतीप्रवाहीं चाले मच्छिंद्रजतीपुत्रमोह धरुनि चित्तींअभ्यासातें बैसविला
६३
अभ्यास करितां मीननाथवाचस्पती शक्रासी बोलतम्हणे महाराजा यज्ञार्थतुम्ही बैसतां सरेना
६४
तरी दंपत्यार्थ उपरिचरवसुबैसवोनि पहावा अर्थ सुरसुऐसे बोलतां प्राज्ञ विशेषुअमरपाळ समजला
६५
मग हातींचें सोडूनि यज्ञकंकणवसुहाती केलें स्थापनमग न्यूनपणें बहुतां प्रार्थूननिजदृष्टीं विलोकी
६६
सर्व पदार्थ आणवोनि आपणअंगें झिजवी शचीरमणउदकपात्र सांगतां जाणसिद्ध होय पुढारी
६७
खाद्य भोज्य षड्रस अन्नकरें आणीतसे पात्रीं वाढूनशेवटीं शिणले तयाचे चरणनिजहस्तीं चुरीतसे
६८
ऐसी सेवा करितां संपन्नतुष्ट होतसे जतीचे मनहदयीं भाविती यावरुनप्राणसांडी करावी
६९
येरीकडे मीननाथसुतासी विद्या अभ्यासीततो समय जाणोनि सापेक्षइंद्र मयूरवेषें नटलासे
७०
निकटतरुशाखेवरतीविद्या अभ्यासीत गुप्तपंथींतों अकस्मात वातास्त्र जपतीवाताकर्षण लाधलें
७१
दैवें सर्व तपराहटीसकळ लाधली हातवटीउपरी वाताकर्षणविद्या पाठींवातप्रेरक अस्त्र लाधलें
७२
ऐसी विद्या होतां सघनपरम हरुषला सहस्त्रनयनपरी एक संवत्सर होतां यज्ञअभ्यासीत तंववरी
७३
असो हवनअर्पण आहुतीमग पावूनि पूर्ण समाप्तीमग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जतीअग्रपूजे बैसला
७४
मग पूजा करोनि सांगोपांगउपरी दशमनाथें पूजिलें अंगवस्त्रभूषणें चांगदेऊनिया गौरविलें
७५
सकळां बैसवोनि कनकासनींउभा राहिला जोडीनि पाणीसर्वासी वदे म्लानवदनींनाथ वचन माझें परिसा
७६
मातें घडला एक अन्यायपरी आपण सहन करा समुदायम्यां मयूरवेष धरुनि मायेंअभ्यासिलें विद्येतें
७७
मीनजतीचा प्रताप गहनमज सांपडलें विद्यारत्नतरी आपुला वर त्यातें देऊनसनाथपणीं मिरवावें
७८
ऐसें बोलतां अमरनाथसर्वासी समजलें तस्करीकृत्यमग ते कोपोनि परम चित्तांतशापवचन बोलताती
७१
म्हणती इंद्रा तूं कृत्रिमआणिलें ठकवावया कारणतरी चोरुनि घेतलें विद्यारत्ननिष्फळ होईल तुजलागीं
८०
ऐसें बोलता सकळ जतीमग उपरिचर वसु वाचस्पतीगौरवोनि अपार युक्तींतुष्ट केलें चित्तांत
८१
म्हणती महाराजा शापमोचनपुढें बोला कांहीं वचनमग ते बोलती तयाकारणतप आचरावें इंद्रानें
८२
द्वादश वर्षे तप आचरितांविद्या फळेल तत्त्वतांपरी नाथपंथी छळ न होतांपदरावरी पडेल
८३
ऐसें बोलोनि सकळ जतीविमानारुढ झाले समस्तीखाली उतरुनि महीवरतीनाना तीर्थे भ्रमताती
८४
ऐसें भ्रमण करितां जतीतीर्थे झालीं अपरिमितीयाउपरी कीलोतळेतें मच्छिंद्रजतीपुसोनिया चालिला
८५
मग तें कीलोतळेचें नमनअवर्ण्य आहे अनुष्ठाननेत्रीं प्रेमबिंदु आणोनबोळविलें नाथासी
८६
सवें घेऊनि मीननाथविमानयानी झाले समस्तखालीं उतरुनि मृत्युमहींतनाना तीर्थे पाहिलीं
८७
हेलापट्टणीं मैनावतीपोहोंचवोनि तीर्थे हिंडतीतेव्हां मीननाथें तीर्थक्षितींसिद्ध तीन निर्मिले
८८
तयांचें सांगितलें पूर्वी नामआतां सांगावया नाहीं कामअसो सिद्धकटकासह उत्तमतीर्थे करीत भ्रमताती
८९
येरीकडे अमरनाथलक्षूनियां सह्याद्रिपर्वतद्वादश वरुषें तप निश्चिततीव्रपणी आचरला
९०
परी तें आचरितां तीव्रपणींमंत्रप्रयोगें सोडी पाणीतेणें सरिता लोट लोटोनीभीमरथीतें भेटली
९१
तें मणिकर्णिकेचे जीवनआणिलें होतें कमंडलू भरोनपरी इंद्रहस्तीं प्रवाही होऊनइंद्रायणीं पडियेलें
९२
ऐसें तप करोनस्वस्थानासी इंद्र जाऊनउपरी नवनाथ करितां तीर्थाटनबहुत दिवस लोटले
९३
शके सत्राशें दहापर्यंतप्रकटरुपें मिरवले नाथमग येऊनि आपुले स्थानांतगुप्तरुपें राहिले
९४
मठींत राहिला कानिफाजतीउपरी मछिंद्रासी मायबाप म्हणतीजानपीर जो जालंदर जतीगर्भागिरीं नांदतसे
९५
त्याहूनि खालतां गैबीपीरतो गहनीनाथ परम सुंदरवडवानळ ग्रामीं समाधिपरनागनाथ असे कीं
९६
वीटग्रामीं मानवदेशांततेथें राहिले रेवणनाथचरपट चौरंगी अडबंगी तीर्थगुप्त अद्यापि करिताती
९७
भर्तरी राहिला पाताळभुवनींमीननाथ गेला स्वर्गालागोनीगिरनार पर्वतीं गोरक्षमुनीदत्ताश्रमीं राहिला
९८
गोपीचंद आणि धर्मनाथते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठांतविमान पाठवोनि मैनावतीतेंघेऊनि विष्णु गेलासे
९९
पुढें चौर्याायशीं सिद्धांपासूननाथपंथ मिरवला अतिसामर्थ्यानेंयेथूनि चरित्र झालें संपूर्णसर्व नाथांचें महाराजा
१००
तरी आतां सांगतों मुळापासूनकथा वर्तली कवणप्रथमाध्यायीं गणपतिस्तवनसुंदरपणीं मिरवले
१०१
उपरी सांगूनि रेताक्षितीआणि मच्छिंद्राची जन्मस्थितीतो बद्रिकाश्रमाप्रतीतपालागीं बैसला
१०२
या प्रसंगाचें श्रवण पठणनित्य करितां भावेंकरुनतरी समंधबाधा घरांतूनजाईल वासूनी महाराजा
१०३
द्वितीय अध्यायीं अत्रिनंदनविद्यार्णव केला अनुग्रह देऊनउपरी नागपत्रीं अश्वत्थी जाऊनसिद्धयर्थकळा साधिली
१०४
तो अध्याय करितां नित्य पठणअपार धन लाभेल संसारी जाणविजयलक्ष्मी पाठीं बैसूनकरील हरण दरिद्र
१०५
तृतीय अध्यायीं मच्छिंद्र मारुतीयुद्धा प्रवर्तले श्वेतक्षितींयुद्ध करुनि उपरांतींऐक्यचित्त झालें असे
१०६
याचें झालिया पठणशत्रु होतील क्षीणमुष्टिविद्यासाधनतया होत सर्वथा
१०७
मुष्टिबाधा झाली असोनअपकार होईल तियेनेमुर्तिमंत मारुती करोनि रक्षणराहे तया घरीं सर्वदा
१०८
चतुर्थ अध्यायीं वदली कथाअष्टभैरव चामुंडा समस्तारणीं जिंकूनि वसुसुताज्वालामुखी भेटली
१०९
तो अध्याय नित्यपठण करितांचुकेल कपटाची बंधनव्यथाशत्रु पराभवोनि सर्वथानिरंतर शांति मिरवेल
११०
पांचवे अध्यायींचे कथनभूतें घेतलीं प्रसन्न करुनअष्टपती जिंकूनविजयी झाला मच्छिंद्र
१११
ती कथा नित्य करिता पठणभूतसंचार नोहे त्या घराकारणआले असतां जाती सोडोनपरम त्रासेंकरोनियां
११२
सहाव्या अध्यायांतशिवअस्त्र कालिका मच्छिंद्रनाथयुद्ध करुनि प्रसन्नचित्तवश्य झालीं अस्त्रें ती
११३
तो अध्याय नित्य करितां पठणशत्रूलागीं पडेल मोहननिष्कपट तो करुनि मनकिंकर होईल द्वारींचा
११४
सातव्या अध्यायीं अपूर्व कथाजिंकूनि वीरभद्र केली ऐक्यताउपरी स्वर्गापासाव मच्छिंद्रनाथाइच्छेसमान झालीसे
११५
ती कथा नित्य गातां ऐकतांलिप्त नोहे त्रौर्यापयशींची व्यथाझाली असेल मिटेल सर्वथाचिंत्ता व्यथा हरतील
११६
जखीणभयापासुनीत्वरित मुक्त होईल जनींएक मंडळ त्रिकालीं अभ्यासूनीफलप्राप्ति घेइजे
११७
आठव अध्यायीं सकळ कथनपाशुपतरायासी रामदर्शनरणीं मित्रराज जिंकोनकेला प्रसन्न विद्येसीं
११८
तो अध्याय नित्य गातां ऐकतांआपुला सखा देशावरतातो गृहासी येऊन भेटेल तत्त्वतांचिंताव्यथा हरेल कीं
११९
नववे अध्यायीं कथनगोरक्षाचा होऊनि जन्मउपरी सेवूनि बद्रिकाश्रमविद्यार्णव झालासें
१२०
तो अध्याय नित्य गातां ऐकतांसाधेल विद्या इच्छिल्या अर्थाब्रह्मज्ञान रसायण कविताचवदा विद्या करोनि राहे
१२१
दशम अध्यायीचें कथनस्त्रीदेशीं मच्छिंद्रनंदनअंजनीसुतअर्थी पाठवोनअर्थ किलोतळेचे पुरविले
१२२
एकांतीं बैसूनि अनुष्ठानसंजीवनी पाठ करी गौरनंदनगहिनीनाथाचा झाला जन्मकर्दमपुतळा करितां तो
१२३
तो अध्याय करितां पठणस्त्रियांचे दोष जातील कपटपणफळे वाचतील होतां जाणजगीं संतती मिरवेल
१२४
उपरी गृहद्रव्याच्या यज्ञांतउदय पावला जालिंदरनाथतो एकादश अध्याय पठण करितां नित्यअग्निपीडा होईना
१२५
आणि जयाचे धवळारातपूर्वीचा कांहीं दोष असततो जाऊनि संपत्तिविशेषातेंसंततीसह भोगील कीं
१२६
बाराव्यांत हें कथनजालिंदरें गुरु केला अत्रिनंदनउपरी कानिफाचा होऊनि जन्मविटंबिले देवांसी
१२७
तो अध्याय करितां पठणक्षोभ न पावे कोणी देवता जाणक्षोभित असल्या होतील शमनसुख सर्व त्याचि देती
१२८
तेराव्या अध्यायांतमैनावतीतें प्रसन्न नाथहोऊनि केलें अचल सनाथब्रह्मरुपीं आगळी
१२९
तरी तो अध्याय करितां पठणस्त्रीहत्येचें दोष सघनत्यांचे होऊनि सकळ निरसनउद्धरील पूर्वजां चतुर्दश
१३०
चतुर्दश अध्यायीं कथनगर्तेत जालिंदर गोपीचंदानेंस्त्रीबोलें घातले नेऊनगुप्त निशीमाझारी
१३१
तो अध्याय पठण करितांअसेल बंध कारागृहीं व्यथातरी त्याची होईल मुक्ततानिर्दोष जनीं वर्तेल
१३२
पंचदशांत सुढाळ कथनकानिफामारुतीचे युद्धकंदनउपरी स्त्रीराज्यांत जाऊनआतिथ्य पूर्ण भोगिलें
१३३
तो अध्याय गातां ऐकता नित्यघरचे दारचे कलह नित्यकृत्यशांति पावोनि सर्व सुखांतनिर्भयपणें नांदेल
१३४
सोळावे अध्यायांतकानिफा भेटला गोपीचंदातेंतरी तो अध्याय वाचितां नित्यानित्यदुःस्वप्नातें नाशील
१३५
सप्तदश अध्यायीं कथनजालिंदर काढिला गर्तेतूनउपरी नाथाची दीक्षा घेऊनगोपीचंदें अर्चिला
१३६
तोचि अध्याय पठण करितांयोग साधेल योग आचरतांदुष्टबुद्धि जाईल सर्वथासुपंथपंथा लागेल तो
१३७
अष्टादश अध्यायीं कथनबद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊनतपःपूर्ण भगिनी उठवोनतीव्रपणीं आचरला
१३८
तो अध्याय नित्य पठण करितांब्रह्महत्या नासेल सर्वथापूर्वज कुंभीपाकीं असतांसुटका होईल तयांची
१३९
एकोणिसाव्यात गोरक्षाकारणभेटला मारुति श्रीरामप्रीतीनेतरी तो अध्याय करितां पठणतया मोक्षार्थ साधेल कां
१४०
तिसाव्यात अदभुत कथनश्रीमाच्छिंद्रा भेटीचे कारणगोरक्ष स्त्रीराज्यांत जाऊनस्नेहसंपन्न जाहला
१४१
तो अध्याय पठण करितां गोडलागलें असेल अत्यंत वेडतरी ती चेष्टा जाऊनि धडहोऊनि प्रपंच आचरेल
१४२
एकविसाव्यांत स्त्रीराज्यांतूनमच्छिंद्रासी काढिलें गोरक्षनंदनेंनानापरी बोधूनि मनदुष्टकर्मातें निवटिलें
१४३
तो नित्य अध्याय पठण करितांनासेल बहुजन्माची गोहत्यानिष्कलंक होऊनि चित्तातपोलोकीं मिरवेल
१४४
बाविसाव्यांत सोरटीग्रामीगोरक्षें मीननाथा मारोनीपुन्हां उठविला मंत्रेंकरोनीमच्छिंद्रमोहेंकरुनियां
१४५
तरी तो अध्याय नित्य पठण करितांपुत्रांर्थिया पुत्र तत्त्वतांतो होईल विद्यावंतविद्वज्जना मान्य कीं
१४६
तेविसाव्यांत रसाळ कथनमच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊनसुवर्णविटेकरितां सुवर्णगर्भगिरि केला असे
१४७
आणिक केला तेथें उत्सवतरी तो अध्याय पठण नित्य भावेकरितां घरीं सुवर्ण नवअखंड राहे भरोनि
१४८
चोविसाव्यांत भर्तरीनाथजन्मोनि आला आवंतिकेंततरी तो अध्याय पठण करितां नित्यबाळहत्या नासेल
१४९
बाळहत्या जन्मांतरीतेणें समस्त वांझ होती नारीतरी ते नासेल संसारींसुखी होऊनि बाळ वांचे
१५०
पंचविसाव्यात गंधर्व सुरोचनरासभ झाला शापेंकरुनतरी तो अध्याय केलिया पठणशापवचन बाधेना
१५१
आणि मानवाविण दुसरा जन्महोणार नाही तयाकारणआरोग्य काया पतिव्रता कामिनपुत्र गुणी होईल
१५२
सव्विसावे अध्यायांतगणगंधर्व झाला विक्रमसुतआणि विक्रम भर्तरीसुतएकचित्तभेटी होऊनि राहिले
१५३
तो अध्याय करितां पठणगोत्रहत्या जाति नासूनपोटीं पाठीं शत्रुसंतानन राहे होऊनियां
१५४
सत्ताविसाव्यांत अदभुत कथनराज्यपदी बैसला राव विक्रमभर्तरी पिंगलेचें होऊनि लग्नदत्तानुग्रह लाधला
१५५
तरी तो अध्याय करितां पठणपदच्युत पावेल पूर्वस्थानगेली वस्तु पुनः परतोनसांपडेल तयांची
१५६
अट्ठाविसाव्या अध्यायांतपिंगलेकरितां स्मशानांतविरक्त होऊनि भर्तरीनाथपूर्ण तप आचरला
१५७
तो अध्याय करितां श्रवण पठणत्या भाविकाचें होईल लग्नकांता लाभेल गुणवानसदा रत सेवेसी
१५८
एकुणतिसावे अध्यायींचे चरित्रभर्तरी होऊनि विरक्त पवित्रगोरक्ष सांगती अत्रिपुत्रगुरुनाथ पै केला
१५९
तो अध्याय नित्य करितां पठणसुटेल क्षयरोगापासूनआणि त्रितापांची वार्ता जाणकालत्रयीं घडेना
१६०
तिसाव्या अध्ययांतजन्मला चौरंगीनाथपरी तें चरित्र पठण करितांतस्करी दृष्टी बंधन होय
१६१
एकतिसाव्यांत चौरंगीनाथतपा बैसला हिमालयांततरी तो अध्याय पढतांकपटमंत्र न चालती
१६२
बत्तिसाव्यांत सुगम कथनमच्छिंद्र त्रिविक्रमदेहीं संचरोनद्वादश वर्षे राज्य करोनरेवतीसी पुत्र दिधला
१६३
त्या अध्यायाचें करितां पठणअयुष्य असतां देहाकारणगंडांतरें करुं येतील विघ्नेंआपोआप टळतील कीं
१६४
तेहतिसाव्यांत गौरनंदनवीरभद्राचा घेऊनि प्राणमच्छिंद्रशव स्वर्गाहूनमहीवरती उतरिलें
१६५
तरी ती कथा करितां पठणधनुर्वाताचें निरसे विघ्नझालेल्यातें होतां श्रवणपीडा हरेल तयाची
१६६
चौतिसाव्यांत रेवणजन्महोऊनि भेटला अत्रिनंदनसहज सिद्धिकळा दावूनगेला असे महाराजा
१६७
तरी ती कथा करितां पठणजाणें कोणत्याही कार्याकारणतो सिद्धार्थ साधेल कार्यसाधनयश घेऊन येईल तो
१६८
पस्तिसाव्यांत पूर्ण कथनरेवण झाला विद्यावानदत्तकृपें स्वर्गी जाऊनबाळें आणिलीं विप्राचीं
१६९
तरी ती कथा करितां पठणमहासिद्ध येईल उदराकारणबेचाळिसांचें करुनि उद्धरणगातील आख्यान लोक परी
१७०
छत्तिसाव्यांत अपूर्व कथाजन्म झाला वटसिद्धनाथाआस्तिक ऋषि झाला तातातयाचिये मातेसी
१७१
ती कथा करितां श्रवण पठणसर्पवृश्चिक दंश जयाकारणझालिया विषाचें उत्तीर्णश्रवण केलिया अध्याय तो
१७२
सदतिसाव्या अध्यायांतनागनाथासी गुरु झाला अत्रिसुतउपरी विद्याबळें मच्छिंद्रनाथजिंकियेले भिडोनी
१७३
ती कथा करितां श्रवण पठणसदना न लागे कुशीलपणलागल्या त्याचें होईल बंधनविद्यावंत होऊनियां
१७४
अडतिसाव्यांत चरपटीचा जन्महोऊनि दत्तात्रेयें दीक्षा देऊनविद्येमाजी करुनि संपन्नतीर्थावली धाडिला
१७५
तरी ती कथा सुरसश्रवण पठण होतां त्यासहिंवताप मधुरा नवज्वरासशांति होईल सर्वस्वीं
१७६
एकूणचाळिसाव्यांत कथाचरपटीनें जिंकिलें अमरनाथाहरिहरादि देवां समस्तांस्वर्गी ख्याती लाविली
१७७
तरी तो अध्याय करितां पठणतो युद्धां जातां तपोधनशस्त्रबाण पावोनजय घेऊन येईल कीं
१७८
यावरी चाळिसाव्यांत कथनसर्व नाथांतें पाकशासनस्वर्गी नेऊनि करी हवनविद्यार्थिरुपें अर्थ पुरविला
१७९
तरी चाळिसावा नित्य पठण करितांलाभेल सर्व इच्छिल्या अर्थायश श्री ऐश्वर्य योग्यतापुत्रपौत्रीं नांदेल
१८०
एकुणचाळिसांचा फलार्थतोचि प्राप्त तदर्थकीं चाळिसावा एक परिसकीं कामधेनु कल्पतरु
१८१
गोरक्ष बोलतो वाचेकरुनत्यातें असत्य मानील जनजो निंदक यातें दावील निंदूनतो अधिकारी विघ्नांचा
१८२
इहलोकीं परलोकींराहणार नाहीं परम सुखीनिर्वश पावोनि शेवटीं वंशींपिचेल ग्रंथ निंदितां हा
१८३
अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसारआहे गोरक्षाचा किमयागारपरी पालटोनि भाषांतरमहाराष्ट्र अक्षरीं रेखिला
१८४
म्हणोनि श्रोते हो भाविक जनसोडोनि द्या कीं निंदावचनविश्वासपर स्वार होऊनमोक्षमुक्काम करी कीं
१८५
तरी हा ग्रंथ संग्रह करुनचमत्कार पाहावा पठण करुनहे चाळीस प्रसंग मंत्रनिर्वाणमहासिद्धीचे असती कीं
१८६
हे चाळीस मंत्र परोपकारीआहेत दुःखाची करतील बोहरीतरी संग्रह करुनि उगलेचि घरीठेवा विश्वास धरुनियां
१८७
ह्या चाळीस अध्यायांत मंत्रयंत्रसुखकारक असती अति पवित्रदुःखदरिद्रहरण सर्वत्रगोरक्षकानें निर्मिलें
१८८
पठण करितां षण्मासमितिजो अध्याय ज्या कार्याप्रतितें कार्य होईल निःसंशय चित्तींपठण करुनि पहावें
१८९
याउपरी वाचितां न ये जरीतरी संग्रह करुनि ठेवावा घरींनित्य वंदितां नमस्कारींकार्य त्यांतचि घडेल
१९०
एक कुसुम झोंकूनि वरतीचला म्हणावें मम कार्याप्रतिनवनाथ वंदूनि उक्तिनमस्कार करावा
१९१
ऐसा याचा आहे मार्गकरुनि पहावा चमत्कार चांगनवनाथ ओडवोनि अंगकार्य तुमचें करितील कीं
१९२
तरी असो विजय संपत्तीनांदो श्रोत्याच्या गृहाप्रतिधुंडिसुत हेंचि प्रार्थीमालू नरहरी देवाते
१९३
शके सत्राशें एकेचाळीसप्रमाथीनाम ज्येष्ठ मासशुक्लपक्ष प्रतिपदेसग्रंथ समाप्त जाहला
१९४
तरी ओंव्या सर्व नेमस्तसप्तसहस्त्र सहाशतउपरी ऐसे देदीप्यवंतओंव्या मंत्र असती ह्या
१९५
अध्याय वाचावया न बनेल ज्यासीतरी अध्यायांतील एक ओंवीसीपठण करुनि नाथनामासीकार्यकाज करावें
१९६
असो आतां बहु भावश्रोते असोत चिरंजीवइहलोकीं परलोकीं ठेवआनंदाची होतसे
१९७
तरी समस्त नाथांतें धुंडीसुतमालू नरहरि हेंचि विनवीतकीं श्रोते असोत सुखरुपवंतसर्व अर्थी सर्वदा
१९८
स्वस्ति श्रीभक्तिकथासारसंमत गोरक्षकाव्य किमयागारसदा परिसोत भाविक चतुरचत्वारिंशतितमाध्याय गोड हा
१९९

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ श्री नवनाथाय नमः ॥

या अध्यायाचे वाचन झाले?

तुमची नोंद या ब्राउझरमध्ये जतन होते.