॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद

श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी

अध्याय ३४

वीरभद्रास सजीव केलें; मच्छिंद्रनाथानें त्रिविक्रम राजाचा देह सोडला; अडभंग कथा; रेवणनाथ जन्मकथा. १८१ ओव्या · कथासार वाचा

श्रीगणेशाय नमः जयजयाजी रघूत्तमाआराध्य होसी प्लवंगमांजटायूनामी विहंगमामुक्तिदाता रक्षक तूं
तरी आतां कथाप्रसंगापुढें बोलवी नवरस प्रसंगाजेणें ऐकूनि श्रोतये अंगाअनुभवतील महाराजा
मागिले अध्यायीं करविलें बोलणेंमच्छिंद्राचें भूमंडळीं शरीर आणूनवीरभद्र मारुनि केला भस्मदानवांसह रणांगणीं
तरी आतां पुढें कथावीरभद्र निमाल्या उमाकांतासहज गुण आठवोनि चित्तापुत्रमोहें वेष्टिला
मुख वाळूनि झालें म्लानअश्रु लोटले दोन्ही नयनींपरी न बोले कांहीं जटा वेष्टूनीपुत्र मोहें स्फुंदतसे
मनांत म्हणे हा हा पुत्रापरता धैर्या लावण्यगात्राविद्यासंपन्न सर्वअस्त्राजाणता एक होतास कीं
अहा कैसा दैवहीन हातींचें गेलें पुत्रनिधानकाय असोनि अपार गणतया सरसी न पवती
एक इंदु खगीं नसतांअपार उडुगण असोनि वृथातेवीं वीरभद्राविण सर्वथाहीन तेजें वाटती
कीं मयूरा सर्वागीं डोळेपरी देखण्याचे मंदावले बुबुळेतेवीं वीरभद्राविण गण विकळेसर्व मातें भासती पैं
कीं गात्रें सकळ चांगुलपणींअंगी मिरविला लावण्यखाणीपरी एक घ्राण गेलें सांडोनीसकळ विकळ ती होती
१०
तैसें माझ्या वीरभद्राविणसकळ विकळ दिसती गणअहा वीरभद्र माझा प्राणपरत्र कैसा गेला सोडोनी
११
ऐसें म्हणूनि मनींच्या मनांतपंचानन आरंबळततीं चिन्हें जाणूनि गोरक्षनाथचित्तामाजी कळवळला
१२
मनांत म्हणे बद्रिकाश्रमातेंमातें बैसविलें तया गुरुनाथेंतै रात्रंदिवस उमाकांतमजसाठीं श्रम पावे
१३
मायेसमान पाळूनि लळामाता रक्षी जेवीं बाळातरी ऐसा स्वामी चित्तकोंवळापुत्रमोहें वेष्टिला असे
१४
अहा तरी म्यां उपकारकाय हो केला अनिवारऐसा स्वामी शिणविला हरदुःख तुंबळ देऊनियां
१५
ऐसें म्हणून स्वचित्तांतपायां लागे गोरक्षनाथम्हणे पुत्रदुःखावरी मोहवेष्टितचित्त तुमचे झालें कीं
१६
तरी वीरभद्रातें आतां उठवीनपरी अस्थि आणाव्या ओळखूनयेथें राक्षसांचें झालें कंदनराक्षसअस्थी मिरविती
१७
त्यांत वीरभद्राच्या अस्थीमिसळल्या कृपामूर्तीम्हणूनि संशय वाटें चित्तींवीरभद्रातें उठवावया
१८
जरी ऐसिया मिसळल्या नाथासंजीवनीप्रयोग जपतांसकळ राक्षस उठतील मागुतांम्हणोनि चिंता व्यापिली
१९
ऐसें बोलतां गोरक्षजतीनीलग्रीव म्हणे कृपामूर्तीवीरभद्राच्या सकळ अस्थीओळखून काढीन मी
२०
माझे गण आहेत जितुलेते आसनीं भोजनीं भलेमम नामीं रत झालेकायावाचाबुद्धीनें
२१
तरी चित्तबुद्धिअंतःकरणींवीरभद्र नामीं गेला वेष्टोनीजागृत सुषुप्त स्वप्नींवेष्टिला असे मम नामीं
२२
ऐसें बोलूनि शंकररणभूमीत करी संचारमग तेथें अस्थि उचलूनि सत्वरकर्णी आपुल्या लावीतसे
२३
ऐशियेपरी शोध करितांवीरभद्र जेथें पडला होतातेथे जाऊनि अवचट हस्ताअस्थी उचली तयाच्या
२४
अस्थी उचलोनि कर्णी लावीततंव त्या अस्थी मंद शब्द करीतशिव शिव म्हणोनि शब्द येतशिवकर्णी तत्त्वतां
२५
मग त्या अस्थी पंचाननेगोळा केल्या परीक्षेनेंजेथें होता गोरक्षनंदनतेथें आणूनि ठेविल्या
२६
मग तो विद्यार्णवकेसरीभस्मचिमुटी कवळूनि करींवीरभद्रनामीं साचोकारींसंजीवनी स्मरला असे
२७
होतां संजीवनीचा प्रयोग पूर्णवीरभद्र उठला देह धरुनम्हणे माजें धनुष्यबाणकोठें आहे सांग कीं
२८
व्यापले अपार राक्षस कोटीतितुके मारीन आतां जेठीउपरी गोरक्षा यमपुरी शेवटींप्रतापानें दावीन कीं
२९
ऐसें वीरभद्र बोले वचनकरीं धरीं पंचाननम्हणे बापा आतां शीणव्यर्थ बोलाचा न करी
३०
मग हदयी कवळूनि त्यातेंसांगितला सकळ वृत्तांतउपरी म्हणे उमाकांतस्नेह नाथीं धरावा
३१
मग गोरक्ष आणि वीरभद्रजेठीउभयतांची करविली भेटीउपरी म्हणे स्नेह पोटींउभयतांनीं रक्षावा
३२
उपरी बहात्तर कोटी चौर्यांभयशीं लक्षशिवगण प्रतापी महादक्षते वायुचक्रीं असतां प्रत्यक्षउतरी गोरक्षक तयांसी
३३
मग सकळ समुदाय एक करुनजाते झाले गोरक्ष नमूनयेरीकडे राव त्रिविक्रमराज्यवैभवीं गुंतला
३४
गोरक्ष सकळ शवमांदुसरक्षन करी शिवालयासतों त्रिविक्रमराव दर्शनासअकस्मात पातला
३५
राव देखतां गोरक्षासीप्रेमें मिठी घाली ग्रीवेसीनिकट बैसवोनि त्यासीसर्व वृत्तांत विचारी
३६
मग शवाचा जो झाला वृत्तांततो सकळ त्यातें केला श्रुतहोतांचि तळमळ चित्तांतमच्छिंद्राच्या लागली
३७
मग गोरक्षासी बोले वचनधैर्य धरावें कांहीं दिनधर्मनाथातें राज्यासनदेऊनि येतो लगबगें
३८
ऐसें बोलूनि प्रजानाथस्वगृहीं आला त्वरितात्वरितबोला वोनि मत्रिकांतेंविचारातें घडविलें
३९
मग पाहूनि उत्तम दिनमहीचे राव घेतले बोलावूनराज्यपदीं स्वहस्तें अभिषेक करवूनधर्मराज स्थापिला
४०
याचकांसी देऊनि अपार धनेंआणि भूपांलागीं दिधली भूषणेंपरम स्नेहें बोळवूनबंदिजन सोडविले
४१
यासही लोटला एक मासराव त्रिविक्रम आपुल्या मंदिरीं खासदेह सांडूनि शिवालयासतत्क्षणीं पातला
४२
येरीकडे रेवती सतीसहज गेली राजसदनाप्रतीम्हणे महाराजा हे नृपतीअजूनि कां हो निजलांत
४३
परी तीतें न बोले कांहींमग हालवोनि पाहे स्वहस्तप्रवाहींतंव तें प्रेत मिरवले देहींपाहोनि शोका वहिवाटे
४४
रेवती शोक करितां तुंबळऐकूनि धांवला धर्मनाथ बाळमंत्री प्रजा सेवक सकळहंबरडा बहु ऊठला
४५
तो वृत्तांत शिवालयासीजनमुखें आला गोरक्षापाशींमग सिद्ध करुनि भस्मचिमुटीसीसंजीवनी प्रयोजी
४६
अस्थी मांस प्रयोजितांदेह संगीन झाला त्वरितसंगीन होतां मच्छिंद्रनाथासमय पावला रिघावया
४७
मच्छिंद्र देहीं संचार होतांउठूनि बैसला क्षण न लागतांयेरीकडे रावप्रेतस्मशानवाटिके आणिलें
४८
प्रेत आणिलें स्मशानीत्रिवर्ग पहावया निघाले मुनीतो रेवतीनें दृष्टीं पाहोनीशोध आणविला तयाचा
४९
करुनि रायाचें दहनस्नाना गेले सकळ जनपरी धर्मराज दारुणशोक करी अदभुत पैं
५०
शोक करी तरी कैसासोडूनि प्राणाचा भरंवसालोक बोधितां न ये भासाआरंबळत असे आक्रोशें
५१
उत्तरक्रिया झालिया उपरीन राहे रुदन तयाचे परीअन्नपाणी वर्जोनि शरीरीप्रान देऊं म्हणतसे
५२
मग मायेचा मोह अत्यंतत्यातें नेऊनि परम एकांतातम्हणे बाळा शोक कां व्यर्थपितयाकरितां करितोसी
५३
तरी आतां बाळ तुझा पितांचिरंजीव आहे महीवरुताप्रत्यक्ष जाऊनि शिवालयीं आतांनिजदृष्टी विलोकी
५४
तव पित्याचें मच्छिंद्र नामचिरंजीव आहे उत्तमोत्तमऐसे ऐकतां राजोत्तमपिसा कैसा म्हणतसे
५५
मग प्रवेशादि सकळ वार्तासांगती झाली निजसुतधर्मराया ऐकूनि तत्त्वतांतुष्ट झाला शरीरातें
५६
मग शीघ्र घेऊनि कटकभारशिवालयीं आला अति सत्वरभावें नमुनि नाथ मच्छिंद्रशिबिकासनीं वाहिला
५७
नेऊनि आपले राजभवनीसेवा करीतसे प्रीतीकरुनीमग तो एक संवत्सर येथें राहुनीपुढें तीर्था चालिला
५८
चालिला परी धर्मनाथपरम झाला शोकाकुलितम्हणें ताता तव सागातेंमीही तीर्था येतो कीं
५९
याउपरी बोले मच्छिंद्रनाथबाळा द्वादश वर्षी येऊं येथेंमग जोग देऊ गोरक्षहातेंतूतें सवें नेईन मी
६०
आतां रेवतीची सेवा करुनभोगीं आपुलें राज्यासन जेथें रेवती तेथें प्राणमाझा असे हो बाळका
६१
तिची सेवा केलियानेंसंतुष्ट आहे माझें मनऐसें करुनि समाधानत्रिवर्ग तेथूनि निधाले
६२
मग तीर्थाटनी भ्रमण करितीयेऊनि पोहोंचले गोदातटींधामनगर काननपुटींयेऊनियां पोहोंचले
६३
ग्रामनाम ऐकूनि कानींगोरक्षाचे अंतःकरणींस्मरण झालें कृषीधर्मीमाणिकनामी कृषांचे
६४
मम मच्छिंद्रातें सांगे समस्तअडबंग भेटला एक तेथेंमी प्रसन्न होतां आपुल्या चित्तेंकांही वर न वे तो
६५
मग मुळापासूनि तयाचें कथनमच्छिंद्रा केलें निवेदनमच्छिंद्रें ऐकूनि वर्तमानम्हणें पुनः आतां पाहावा
६६
मग शेतसुमार धरुनि चालीचालत आले त्रिवर्ग पाउलींतों माणीकनामें निश्चयबळीकाष्ठासमान देखिला
६७
मौळीं विराजे वेष्टनबाबर्या रुळती महीकारणनखें जुळमट गेलीं होऊनमांस दिसेना तिळभरी
६८
अस्थी त्वचा झालीं एकपोट झालें पृष्ठीं स्थायिकदृष्टी लावूनियां देखमंत्रजप करीतसे
६९
ऐसी पाहतां तपाकृतीगोरक्ष धन्य म्हणे चित्तींमग नमूनि मच्छिंद्राप्रतीअडबंग हाचि म्हणतसे
७०
मग निकट येऊनि त्रिवर्ग जणबोलते झाले तयाकारणम्हणती आतां तपोधनपूर्ण तप करी कां रे
७१
येरु वचन त्या देततुमचें यांत काय जातधरुनि आपला शुद्ध पंथगमन करावें येथूनियां
७२
जें जें बोले मच्छिंद्रनाथतया वांकडेपणें उत्तर देतमग गोरक्ष म्हणे मच्छिंद्रातेंहा अडबंग असे महाराजा
७३
तरी याचें आतां हितयुक्तीनें करितो बैसा स्वस्थमग तरुच्छायेनिकट तेथमच्छिंद्र जाऊनि बैसला
७४
चौरंगा आणि मच्छिंद्रनाथगोरक्षाची मौज पाहतगोरक्ष जाऊनि पैं तेथअहा अहा म्हणतसे
७५
अहा म्हणोनि वाणीम्हणे ऐसा महीतें दुजा स्वामीआम्हीं देखिला नाहीं नयनींतपोनिधि आगळा हो
७६
समुद्रवलयांकितपृथिवी पाहिली आहे समस्तपरी ऐसा तपोनाथदेखिला नाहीं निजदृष्टीं
७७
तरी ऐसा स्वामी योगमुनीयाचा अनुग्रह घ्यावा कोणींगुरु झालिया ऐसा प्राणीदैव अपार मिरवतसे
७८
तरी आतां असो कैसेंगुरु करावा आपणासऐसें बोले त्यासप्रज्ञावंत महाराजा
७९
म्हणे स्वामी कृपा करुनमज अनुग्रही गुरु होऊनयेरु बोलणें ऐकोनअडबंग म्हणे तयासी
८०
बेटा येवढा थोर झालाअद्यापि अक्कल नाहीं त्यालागुरु करुं म्हणतो आम्हांलामूर्खपणीं आगळा हा
८१
मग मजला गुरु करुं पाहशीतरी तूंचि कां बेट्या होईनासी मजसीऐसें म्हणोनि स्वमुखासीतया कर्णी लावीतसे
८२
कर्ण लागतां गोरक्षाननींसज्ञानमंत्र ब्रह्मखाणीपरम कृपें कर्णी फुंकूनीसनाथ केला क्षणार्धे
८३
मंत्र पडतां कर्णपुटींत्रैलोक्याची आली दृष्टीस्थावरजंगम एकथाटींब्रह्मरुप भासलें
८४
मग अर्थाअर्थी सकल ज्ञानझाला बृहस्पतिसमानमग सांडूनि आपुलें तपःसाधनगोरक्षचरणीं लागला
८५
मग गोरक्ष भस्मशक्तिप्रयोगप्रयोगूनि भाळीं चर्ची सांगतेणेंकरुनि सर्वागशक्तिवान मिरवलें
८६
मग धरुनि शीघ्र तयाचा हस्तवृक्षाखालीं आणी नाथम्हणे महाराजा कृपावंतअडबंग हाचि ओळखावा
८७
हंसूनि बोले मच्छिंद्रमुनीया अडबंगातें अडभंग नामींपाचारावें सर्व येथोनीसाजूकपणी या वाटतसे
८८
मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यासनाथदीक्षा दीधली खासमग शीघ्र घेऊनि व्यासंगासतीर्थालागीं जातसे
८९
मार्गी जातां सद्विद्येसीसकळ तेव्हां पूर्ण अभ्यासीआपुल्या समान शस्त्रअस्त्रेंसींअडभंग तो मिरवला
९०
असो ऐसे चारी जणद्वादश वर्षे तीर्थाटनकरुनि पुनः प्रयागकारणचारी सूर्य पातले
९१
येरीकडे धर्मरायासीपुत्र झाला सतेजराशीवडिलांचें नांव ठेविलें त्यासीत्रिविक्रम म्हणोनियां
९२
चौघे प्राज्ञिक ग्रामीं येतांश्रुत झालें धर्मनाथामग कटकभारेसीं शिबिके तत्त्वतांबैसवोनि आणिलें सदनासी
९३
मग धृति वृत्ति भक्ति सघनकरुनि तोषविलें मच्छिंद्रमनमग त्रिविक्रमसुता राज्यीं स्थापूनदीक्षा घेतली योगाची
९४
माघमासीं पुण्यतिथीद्वितीयेसी धर्मराजाची बीज म्हणतीतें दिवशीं गोरक्ष जतीअनुग्रह देत तयातें
९५
या उपरी देव मिळवूनि स्वर्गीचेआणि प्रजालोक त्या ग्रामीचेमेळवूनि चोज अनुग्रहाचेंमोहळें रचिलीं अपार
९६
अनुग्रह झाल्यावरतीसकळ बैसोनि एकपंक्तींगोरक्ष कवळ घेऊनि हातींसर्वामुखीं ओपीतसे
९७
मग तो आनंद परम जेठीपाहूनि धांवले सुरवर थाटींतेही प्रसाद पावोनि शेवटींतुष्ट चित्तीं मिरवले
९८
मिरवले परी करिती भाषणऐसाचि प्रसाद जन्मोजन्मप्रतिसंवत्सरीं असावा पूर्णइच्छेलागीं वाटतसे
९९
ऐसें बोलतां सुरवर सकळऐकोनि बोले तपोबळमाझें नाम घेऊनि केवळअर्पा जगा प्रतिवर्षी
१००
धर्मराजाची बीज म्हणवूनीउत्सव करावा तुम्ही सघनयाचि नीती कुमारा सांगोनिकवळों पाहे जगासी
१०१
मंत्र स्फुरला म्हणूनि स्फुरमाणसकळ तुम्ही बोला वचनअंबलिपणें शक्तीसमानसदैव करा उत्सवो
१०२
ऐसें महाराजा गोरक्ष बोलतांमानवलें सुरवरांच्या चित्तामग प्रतिवर्षी आनंदभरितामहाउत्सव करीत
१०३
तैंपासूनि सहजासहजजगीं मिरवतसे धर्मनाथाची बीजहें वृत्त आचरल्या महाराजातुष्ट होतसे गोरक्ष
१०४
पूर्वी किमयागार ग्रंथांतस्वयें बोलिला गोरक्षनाथकीं बीजेचें जो आचरील व्रतशक्तीमान आपुल्या
१०५
तयाचे गृहीं दोषदरिद्ररोगभोगादि विघ्नेंद्रस्वप्नामाजीं संसार अभद्रपाहणार नाहीं निजदृष्टीं
१०६
प्रत्यक्ष रमा सुखें सुरगणींत्या गृहीं होईल गृहवासिनीमग दोषदरिद्र तया अवनीस्पर्शावया येईना
१०७
असो महात्म्य वदावें कितीते प्राज्ञिक पावले सुखसंपत्तीजैसी कामना वेधेल चित्तींतोचि अर्थ पावेल
१०८
ऐसा गोरक्ष तयाकारणबोलिला आहे मूळग्रंथीं वचनतैसें येथें केलें लेखनविश्वासातें वरा कीं
१०९
असो तेथें महोत्साह करुनधर्मनाथा नाथदीक्षा देऊनतेथोनि निघाले पांच जणनरशार्दूळ ते ऐका
११०
नाना तीर्थे करितां महीसीअभ्यासिलें सद्विद्येसीशाबरी सहस्त्र अस्त्रासींप्रवीण केला महाराजा
१११
मग शेवटीं बद्रिकाश्रमीं जाऊनदृश्य केला उमारमणधर्मराज तया स्वाधीनतपालागीं बैसविला
११२
द्वादश वर्षाचा केला नेमतपा बैसला नाथ धर्मयेरु तेथूनि चौघे जणतीर्थालागीं चालिले
११३
द्वादश संवत्सर तीर्थे करुनपुनः पाहिला बद्रिकाश्रममग तेथें मावंदे अति दुर्गमबद्रिकाश्रमीं मांडिलें
११४
सकळ देव सुरवरांसहितपाचारुनि घेतले तेथमावंदें झाल्या पूर्ण वरातेंदेऊनि देव गेले पैं
११५
मग तो धर्मराज सवें घेऊनफेरी करिती तीर्थाटनआतां पुढें ऐंका कथनरेवणसिद्धनाथाचें
११६
पूर्वी अठ्ठयायशीं सहस्त्र ऋषीझाले आहेत विधिवीर्यासीत्याचि समयीं रेत महीसीरेवातीरी पडियेलें
११७
रेवातीरी तेंही रेवेंतरेत पडिलें अकस्मातचमस नारायण संचार करुनि त्यांतदेहद्वारीं मिरवला
११८
बाळतनू अति सुकुमारबालार्ककिरणीं मनोहरउकरडां लोळे महीवरठेहेंठेंहें म्हणोनियां
११९
तों त्या काननीं कृषी एकउत्तम नाम सहनसारुकतो घट घेऊनि न्यायवा उदकरेवातीरा पातला
१२०
पातला परी अकस्मातयेता झाला बाळ जेथसहज चालीं पुढें चालतबाळ दृष्टीं देखिलें
१२१
बाळ परम अति सुकुमारकांति कर्दळीगाभाभरपाहूनि तयाचें अंतरविव्हळ मोहें झाला असे
१२२
मग घट ठेवूनि महीलागींधांवोनि तांतडीं उचली वेगींमोहें कवळूनि हदयभागींअति स्नेहें धरिलेसें
१२३
आधींच सहनसारुक नामानेंतेथें दयेसी काय उणेंआवडीनें करुनि मुखचुंबनकुर्वाळीत प्रीतीनें
१२४
मग रिक्तपट भरुनि आडींग्रामांत आला हरुषापाडीसदनीं प्रवेशूनि आवडींकांतेलागीं बोलतसे
१२५
म्हणे जिवलगे आजिचा दिनमातें झाला धातुहेसतरी शिवलतेलागीं द्रुमकुंभापरी मिरवला
१२६
सहज गेलों उदकातेंरेवातीरीं वाळवंटींतआपणा ईश्वरें दिधला सुतवंशावळी मिरवावया
१२७
ऐसी ऐकतां कांता गोष्टीम्हणे कोठें मज दाव दृष्टींतंव तो काढूनि वस्त्रपुटींकरसंपुटीं देतसे
१२८
तंव ती कांता उत्तमनामीधार्मिकबुद्धी संसारधामींदेखतां देहदर्मीहर्शसिंधु लोटला
१२९
जैसा पूर्ण चंद्र दृष्टींदृश्य होतां उदधिपोटीं आनंद भरुनि तोयदाटींउचंबळा दाटतसे
१३०
कीं दरिद्रियासी मांदुस होय दर्शनमग तयाचा आनंद वर्णील कोणतेवीं उत्तम मनोधर्मआनंददरीं मिरवितसे
१३१
बाळ धरुनि हदयसंपुटींचुंबन घेत स्नेहाचे पोटींमग तैलउदकीं न्हाणूनि शेवटींपालखातें घातले
१३२
तियेचें तान्हुलें होतें घरींनिजविला योगी तयाशेजारींस्तनपान केलियाउपरीबाळ निजे पालखीं
१३३
असो ऐसे नित्यानित्यबाळ संगोपी ममतेंरेवणनाम ठेवोनि त्यातेंमोहेंकरुनि सांभाळी
१३४
रेवातीरीं बाळ रेवेंतसांपडलें म्हणूनि त्यातेंरेवणनाम साजुकवंतसहनसारुक ठेवोनियां
१३५
असो रेवणनामियाचें संगोपनकरिता उभयतां पालनऐसे लोटतां बहुत दिनप्रपंचरहाटी करितसे
१३६
द्वादशसंवत्सर प्रपंचराहटीकृषिकर्मविद्यापाठींपूर्ण झाला आवुता जेठीपित्याहूनि आगळा
१३७
नांगर वरखरली पेरणकाकपक्ष्यादि करी रक्षणऐसा कृषिकर्मी निपुणरेवणनाथ झाला असे
१३८
तो कोणे एके दिवशींउठुनि मागिले प्रहरनिशींवृषभ सोडून काननासीचारावयासी चालिला
१३९
चांदणें पडलें असें सुदृढदृश्य होतसें महीची वाटसुदृढपणें गोचर वातनिजचक्षूतें होतसे
१४०
दादा म्हणूनि वृषभापाठींहांकीत चालिला आहे जेठीतों अनुसूयाशक्तिकारत्न वाटींपुढें झालें अकस्मात
१४१
परी तो महाराजा अत्रिनंदनपवनवेगें तयाचें गमननेमिलें ठायीं करुनि स्नानगिरनार पर्वती जातसे
१४२
पायीं खडावा सुशोभितएक अंचल अंगीं शोभतशुभ्र कौपीन विराजितकंठतटा वेष्टूनी
१४३
मौळी वेष्टिल्या असती जटादाही मिशा रंग पिंगटासकळ ज्ञानियांचा वरिष्ठाकनककांति शोभतसे
१४४
ऐसा महाराजा अत्रिनंदनजो त्रितयदेवांचा अवतार पूर्णअति लगबगें करीत गमनपुढील नेम मानुनियां
१४५
तों मार्गावरी अकस्मातवृषभगमन देखतवृषभाआड रेवणनाथदृष्टी नाहीं आतळला
१४६
मानवगती तेणे देखोनपुढें आला अत्रिनंदनसहजस्थिती वृषभामागूनपाऊलें ठेवी चालावया
१४७
तों सर्वांमागील वृषभ पूर्णशरीरें मिरवे शीथलपणतयाआड नाथ रेवणबाळतनू चालतसे
१४८
तों वृषभामागें येत दत्तवृषभ बुजोनि पुढें पळतमागें अंतरतां रेवणनाथत्यावरी दत्त आदळला
१४९
उभयदेहीं कामपणीऐक्य झाली देहधरणीपरी स्पर्श होतां अंतःकरणीज्ञानदीप उजळला
१५०
विमूढपणीं कृषिकर्मातअज्ञान सर्वापरी वर्ततसदा बैसणें अरण्यांतअबुद्धीपणें वर्ततसे
१५१
परी दत्तात्रेयाचा स्पर्श होतांपूर्वजन्मातें झाला देखताचित्तीं म्हणे मी महीवर असतांकवण स्थिती पावलों
१५२
आहे मी पूर्वीचा नारायण प्रकामपरम प्राज्ञिक चमसनामऐसे असूनि कृषिकर्मयेथें करीत बैसलों
१५३
वंद्य असतां तिही लोकांतआतां कोणी ओळखीना मातेंसदा काननीं झालों रतअहितकामीं प्रपंच
१५४
ऐसें देहीं झालिया ज्ञानमग स्तब्ध धरुनि राहे मौनपरी धडक बैसतां अत्रिनंदनकोण तूं ऐसा पुसतसे
१५५
कोण तूं ऐसें पुसतां दत्तकरिता झाला प्रणिपातम्हणे महाराजा या देहांतअंश असे तुझा कीं
१५६
तुमचे देहीं त्रिदेवांचे अंशपरी सत्यगुणी जो महापुरुषतो मी येथें प्रपंचदेहासपरम कष्टें कष्टलों
१५७
तरी आतां क्षेमोदयासउदित करा जी महापुरुषसनाथ करुनियां या देहासमहीलागी मिरवावें
१५८
ऐसें म्हणोनि दृढोत्तर चरणींमौळी अर्पी प्रेमेंकरुनीम्हणे मज सनाथ केल्यावांचुनीकदा न सोडीं तुम्हांतें
१५९
ऐसें वदूनि वाग्वटींसदृढपणी देत मिठीपरी आदरें प्रेमपोटींदत्तजेठी मिरवला
१६०
तयाचा पाहूनि भक्तिआदरसदृढपणीं निश्चयपरमग कमंडलु ठेवूनि महीवरमौळी कर स्थापीतसे
१६१
भाळाखालीं घालूनि हातउठविला रेवणनाथमनांत म्हणे हा सनाथपूर्वीचाची असे कीं
१६२
हा नावामाजी असे एकनाथपंथी अवतार दोंदिकचमसनारायण प्रतापार्कमहीवर विराजला
१६३
तरी आतां यातें सनाथकरुनि वाढवावा नाथपंथकृपें ठेवोनि मौळीं हस्तकेला अंकित आपुला
१६४
कृपें मौळीं ठेविला करपरी अनुग्रहाचें केलें अंतरम्हणाल कासयासाठीं उदारझाला नाहीं अनुग्रहा
१६५
तरी चित्ती योजिता झाला दत्तभक्तिश्रम यासी घडले नाहींततरी कांही देहीं प्रायश्वित्तघडोनि यावें ययातें
१६६
तरी भक्तिश्रम घडतां सांगउपदेश मग द्यावा अव्यंगमग ज्ञानवैराग्याचा मार्गब्रह्मस्थितीं मिरवेल हा
१६७
ऐसें म्हणूनि अनुग्रहारहितकृपा मौळीं ठेविला हस्तपरी भक्तीलागीं रेवणनाथकाय करी महाराजा
१६८
एक सिद्धीची कळा त्यातेंसांगता झाला कृपावंतअसतां बीज रोपूनि किंचित्दृष्टी ठेवील पुढारां
१६९
जैसें अर्भका देऊनि धनपिता मिरवी व्यवसायाकारणमग तयाचें पुढें चांगुलपणनिजदृष्टीं पाहतसे
१७०
किंवा महींत मेळवणघालूनि पाहती दुग्धाकारणकीं पत पहातसे देऊनि धनसावकार कुळातें
१७१
तेवीं सहस्त्रांशेंकरुनमहीमान सिद्धीचें सांगूनतुष्ट केले तयाचें मनप्रज्ञावंतें महाराजें
१७२
परी ती कळा होतांचि प्राप्तरेवण झाला आनंदभरितमग प्रेमें नमूनि अनुसूयासुतबोळविले तत्क्षणीं
१७३
परी विरह मानूनि चित्तींचालता झाला काननाप्रतीपरी अंतरला आपुल्या हितींनिजपदातें पहावया
१७४
जैसें कोंडवळ्य़ा कांजीदेतां भूत होतसे राजीतैसा अल्पसिद्धीमाजीतुष्ट झाला तो पुरुष
१७५
परम लाधली होती धणीपरंतु दवडिली अज्ञानपणींखापरासाठीं चिंतामणीसोडूनि दिधला हातींचा
१७६
कीं सुरा लागूनि परम गोडसोडिली अमृतरसाची चाडकीं निर्मळपणीं पाहूनि दगडपरिस हातींचा सोडिला
१७७
तेवीं प्रत्यक्ष नाथ रेवणभुलला सिद्धिप्रकरणेंकरुनसिद्धिबुद्धि अत्रिनंदनहातींचा सोडिला नायकें
१७८
असो ऐशी संप्रदाययुक्तीनिःस्पृह पातला आपुल्या शेतीतेथील कथा होईल श्रोतींपुढिले अध्यायीं ऐकावी
१७९
धुंडीसुत नरहरिवंशींसांगेल तुम्हां श्रोतियांसीसंतकृपें नाम देहासीमालू ऐसें म्हणती तया
१८०
स्वति श्रीभक्तिकथासारसंमत गोरक्षकाव्य किमयागारसदा परिसोत भाविक चतुरचतुस्त्रिंशति अध्याय गोड हा
१८१

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ नवनाथभक्तिसार चतुस्त्रिंशतिअध्याय समाप्त ॥

॥ श्री नवनाथाय नमः ॥

या अध्यायाचे वाचन झाले?

तुमची नोंद या ब्राउझरमध्ये जतन होते.