॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद

श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी

अध्याय ३१

चौरंगीस मच्छिंद्र-गोरक्षाने शशांगर राजाकडून मागून घेतले, चौरंगीची तपश्चर्या. १८३ ओव्या · कथासार वाचा

श्रीगणेशाय नमः जयजयाजी जगत्पाळकाजगत्पते वैकुंठनायकाजगत्सृजका यदुकुळटिळकाभक्तसखा तूं होसी
निखिलजीवन निर्विकाराविवेकरत्नवैरागराशुद्धसत्त्वगुणगंभीरारुक्मिणीवरदा दीनबधो
हे कृपार्णवा पंढरीनाथापुढें बोलवीं भक्तिसारग्रंथामागिले अध्यायीं अनाथनाथाजन्म चौरंगीचा करविला
करविला परी त्याचें कथनराहिलें तें ग्रंथीं लेखनआतां करवीं जगज्जीवनपुढें वैखरी बैसूनियां
तरी गताध्यायीं सापत्नमातालोटली तातें कामसरितापरी कृष्णागर प्राज्ञिक सुताबळेंचि नेलें पाचारुनी
करुनि जननीचा धिक्कारुसदना गेला होता कृष्णागरुयेरी सखी जीवापारुपाचारिली होता कीं
तिये सांगूनि सकल वृत्तांतप्राणघातासी झाली होती उदितपरी ती सखी प्रज्ञावंतदेत मसलते तियेसी
म्हणे बाई वो भुजावंतीईश्वरकरणी प्रारब्धगतीजैसे असेल तैसी पुढतीघडून येईल भिऊं नको
परी तूतें सांगेन हित कांहींतैसेचि धरुनि जीवींनको कष्ट मानूं आपुले देहींशयन शयनीं करी आतां
शयन शयनीं केलिया पूर्णराव येईल पारधीहूनआल्या सेवील तुझें सदनपरी तूं उठू नको कीं
१०
मग तो राव पुसेल तूतेंतंव तूं सोंग दावीं शोकाकुलतेंरुदन करुनि वदें रायातेंप्राणरहित होय मी
११
आतां काय ठेवूनि प्राणझाला नाहीं अबूरक्षणऐसें बोलतां राव वचनपुढें तुजशीं पुसेल
१२
पुसतां वदे कीं प्रांजळवंतकृष्णागर तुमचा सुतकामुक होऊनि मम सदनांतस्पर्शावया धांवला
१३
धांवला परी यत्नेकरुनबळें दिधला मागें लोटूनऐसें होतां अनुचित प्राणकैसा ठेवूं महाराजा
१४
ऐशा परी आराधूनि युक्तींक्रोंध उपजवीं रायचित्तींक्रोधवश झालिया राय नृपतीकलहें मुला सोडील कीं
१५
मग तो कदा ना म्हणे सुतत्वरें करील प्राणरहितमग तूं सदनीं आनंदभरितसुखलाभातें सेवीं कां
१६
अंगीं विपतरुचा कोंब चांगखुडूनि टाकिल्यानें मार्गमग विषाचा शरीरीं लागकोठूनि होईल जननीये
१७
आधीं ठेचिल्या उरगमुखमग कैंचें मिरवेल विषदुःखकंटकी धरिल्या वृश्चिकवेदनेतें मिरवेना
१८
कीं वन्हि असतां धूम्रा कारवरी सांडावे लगबगे नीरमग धांव सदनापरघेत नाहीं जननीये
१९
तरी कृष्णागराचा वसवसातव हदयी मिरवे स्वबाळफांसातरी राया सांगूनि ऐशिया लेशादुःखसरिता लोटवीं
२०
तरी त्या उदकाचे आधीं वळणदुःखसरिते बांधावे बंधनबंधन बांधिल्या सजीवपणेंसुखे पुढें मिरवीं कां
२१
ऐसी सांगूनि ती युवतीगेली आपुल्या सदनाप्रतीयेरीकडे भुजावंतीकनकमंचकीं पहुडली
२२
त्यजूनि अन्नोदक स्नानकैंचे श्रृंगार कुंकुमलेणसर्व उपचारांतें त्यजूनविन्मुख तई पहुडली
२३
तों येरुकडे शशांगरपारधी खेळूनि काननभरचिंताब्धीची फोडूनि लहरसदना तदा जातसे
२४
नाना गजरें यंत्रस्थितचमूअब्धीचा लोट लोटीतक्षेत्रपातीं पूर्ण भरितचमृतोयें तेधवां
२५
यावरी राव तो पूर्ण ज्ञानीसंचार करी आपुले सदनींदृष्टीसमोर न देखितां राणीपरिचारिके विचारीतसे
२६
म्हणे कोठे आहे भुजावंतीसन्मुख कां न आली पारधीप्रतीआजि चुकुर होऊनि चित्तींनिंबलोणा नातळली ते
२७
रायातें बोलती परिचारिकाहे महाराजा सद्विवेकाआजि राणी कवण दुःखादुखावली कळेना
२८
तेणेंकरुनि शयनापाटीनिजली आहे होऊनि कष्टीहोतांचि शब्द कर्णपुटीसदनामाजी संचरला
२९
तों ती मंचकीं भुजावतीराव देखूनि बोले युक्तींम्हणे कां हो कवण अर्थीशयन केलें जिवलगे
३०
परी तई उत्तरा न देतीकांहींच न बोले रायाप्रतीजीवन आणूनि नेत्रपातींअश्रु ढाळी ढळढळां
३१
तें पाहुनियां राव दयाळचिंत्तीं दाटला मोहें केवळमंचकीं बैसे उतावेळहदयीं धरीं कांतेतें
३२
अश्रुधारा नेत्रपातींराव पुसी स्वयें हस्तींचुंबन घेऊनि लालननीतींअंकावरी बैसवीतसे
३३
अंकीं बैसवोनि स्वदारारत्नहेम जडावया करी यत्नराव कोंदणी हाटकप्रयत्नअर्थरत्ना जोडीतसे
३४
म्हणे सुखसरितेकोठूनि भेदलें गढोळ चित्तींदुःखघनाचा वर्षाव अमितकोणें केला तो सांग
३५
मी राव महीचा भूपमी बोलणारा दर्पसर्पऐशा व्याघ्राचा करोनि लोपदिधलें माप दुःखाचें
३६
तरी ती कवण पुरुष नारीतूतें अन्य झाली भारीतरी मातें बोलूनि वैखरीनिमित्तमात्र दावीं कां
३७
अगे सहज दिठवा होतेदावीन त्यातें अर्कसुतया बोलाची सहज भ्रांतमानूं नको जिवलगे
३८
अगे प्रिय तूं मातें अससीकोण गांजील उद्देशींहरिबाळातें जंबुकलेशीदुःखदरी मिरवेना
३९
अगे मशकाचेनि पाडाधडके उतरे गिरीचा कडाकीं रामरक्षे भूतवडारक्षणिया बैसतसे
४०
तेवीं तूं माझी पट्टराणीकोण घालूं शके काचणीनाम दर्शवीं प्रांजळपणींमग ऊर्वी न ठेवीं तयातें
४१
ऐसें ऐकतां राववचनहदयीं तोषली अर्थार्थी सघनम्हणे महाराजा तव नंदनभ्रष्टबुद्धी व्यापिला
४२
आपण गेलिया पारधीसीएकांत पाहूनि मम उद्देशींयेथें येऊनि स्मरलेशीहस्त माझा धरियेला
४३
धरिला परी निर्दयवंतेंकामें ओढिता झाला हस्तम्हणे चालावें एकांतांतसुखसंवाद भोगावा
४४
मग म्यां पाहूनि कामिकवृत्तीहात आंसडूनि घेतला निगुतींभयार्थ मानूनि आपुले चित्तींसदनामाजी पावलें
४५
पळता कोणे झाली अवस्थाउलथूनि पडलें महीवरतीपरी म्यां धरुनि तैशीच शक्तीआड कवाड पैं केलें
४६
मग तो छलबलत्वहीनहोऊनि पाहे आपुलें सदनतस्मात् आतां आपुला प्राणठेवीत नाहीं महाराजा
४७
भलतैसिया गरळांतघेऊनि करीन प्राण मुक्तपरी धैर्य वरिलें तुम्हांकरितांतुमचा मुखेंदु पहावा
४८
मज वाटलें पारधीचें काननअति तीव्र कर्कश भयाणत्यातूनि तुम्ही जीवंतपणेंकैसे याल वाटलें
४९
ऐसेपरी धुसधुशीतसंचार होतां हदयांतम्हणोनि महाराजा येथपर्यंतप्राण देहीं रक्षियेले
५०
आतां याचि बोलापाठींमी चकोर देहीं चंचुपुटींतव आननेंदूचे जीवन शेवटीलक्षूनि तुष्ट झालें असें
५१
ऐसें बोलतां भुजावंतीपरम क्रोधावला नृपतीपरी क्रोध नव्हे क्षितींवडवानलचि पेटला
५२
वडवानल तरी कैसाशिखा मिरवी अंबरलेशासुतरत्नालागीं कैसाग्रासूं पाहे क्षणांत
५३
मग तैसाचि येऊनि सदनाबाह्येआरक्त नेत्रीं भंवता पाहेम्हणे कोणी तरी येथे आहेपुढें यावें माझिया
५४
तंव ते भृत्य धांवत येतीभृत्य नव्हे ते कृत्तांत दिसतीराव वरुनि क्रोधरीतीस्वतां त्यांतें लोटीतसे
५५
म्हणे भृत्य हो याचि पावलींजाऊनि मम सुताची करा होळीअथवा बंधन करुनि हस्तवेलीखंडोनियां टाकाव्या
५६
ऐसें बोले नृपनाथदूत धांवती वाताकृतसदन वेढूनि राजसुतमृत्युमहीं नेलासे
५७
परी ते सेवक ज्ञानखाणीपुनः जाती राजांगणीम्हणती महाराजा मृत्युभुवनींकृष्णागरु पैं नेला
५८
राव क्रोधें तयां पहातम्हणे हस्तपादांते करा खंडितपुनः येवोनि सांगतधांवधांवोनि रायातें
५९
तरी रायाचा कोपानळकदा न होय शीतळपुनः पाहोनि दूतमेळतीच आज्ञा आज्ञापा
६०
परी ते भृत्य देहस्थितींम्हणती हा स्वामी राजसुतयासी वधितां काय अनर्थकैसा होईल कळेना
६१
ऐसे संदेहें भयस्थितपुनः जाती राजांगणांतपरी तो राव अति संतप्ततीच आज्ञा आज्ञापी
६२
मग ते दूत निष्ठुरपणीचौरंग आणिती कनककोंदणींतयालागी बैसवोनीकार्यावर्ती वहिवटले
६३
शुद्ध चर्हाूटें बांधोनि हस्ततदा नेत कृष्णागरातेंम्हणती बंधसिद्ध केले हस्तखंडविखंड करावया
६४
परी कृष्णागर चव्हाटां नेलाहा वृत्तांत सकळ ग्रामांत कळलामग चुंगारचुंगार मेळाविलोकावया धांवती
६५
येरीकडे येरीकडे राजांगणीमिळाले थोर प्राज्ञींपरी नृपतीचा क्रोधाचि पाहुनीबोलो न शकती कदाचित
६६
तरी वृत्तीचा क्रोधानळलोकबोलाचें सुभद्रजळप्राशनें भेणें उतावेळधांव मागें घेतसे
६७
येरीकडे चव्हटेंशीकनकचौरंगी राजसुतासीदूर्ती बैसवोनि हस्तपादांसीयोजिते झाले छेदावया
६८
शस्त्र करुनियां नग्न त्वरितएकें घायाळ केले हस्ततैसेचि झाले चरण व्यक्तभग्न होऊनि पडियेला
६९
एकचि आकांत वर्तला तेथेंकोणी कोणा न विचारी जेथेपाहूनि सकळ संग्रामातेंभयभीत संपूर्ण
७०
उपरी योजूनि पद निगुतींतीक्ष्णधारा शस्त्रें हाणितीतीहीं एका घायें क्षिती पदकमलीं पडियेली
७१
मग रुधिराचा भडभडाटमहीं लोटला अपार लोटजेवीं युवतिकुंकुममळवटतेवीं धारा शोभली
७२
परी राव तो कृष्णागरमूर्च्छेनें व्यापूनि तीव्रकनकासनीं चौरंगावरउलथोनियां पडियेला
७३
प्राण होऊनि कासावीसमुखावरी दाटला फेसउपरी कोरड पडली मुखासश्वेतनयन पैं केले
७४
मग तें दुःख पाहूनि लोकदुःखानें करिती महाशोकअहा कृष्णागरासारखें माणिकव्यर्थ राये भंगिले
७५
एक म्हणती म्हातारपणींराव चळला आहे प्राज्ञीऐसा पुत्र लावण्यखाणीनष्ट केला पदवीचा
७६
तरी राजा परम भ्रष्टझाला आहे निर्दय नष्टआतां येथें राहतां उत्कृष्टयोग्य काहीं दिसेना
७७
सहज प्रपंचाचे पाउलींपडतसे आड पाउलीपरी रायें हदयीं क्षमा न केलीघात करील कधीं तो
७८
अहा एकुलता एक बाळत्यावरि पाखडिला क्रोधानळमग प्रजान्याया कैसा शीतळवृद्ध राव राहील हा
७९
एक म्हणे राजनीतीतैशीच आहे सर्व क्षितींगृहीं दाविली क्रोधसंपत्तीधाक पडेल प्रजेतें
८०
एक म्हणे भ्रष्ट कृष्णागरकुबुद्धि धरिली मातेवरतैं शिक्षा पावला साक्षात्कारराया दोष न लागेचि
८१
गौपीडक व्याघ्रे असलातरी कां मारुं नये त्यालातरी रायानें धर्म पाळिलालोभ धरिला नाहीं की
८२
वृश्चिक होतां दृष्टिव्यक्ततरी कां करुं नये प्राणांतदुष्ट आहे कीं धुसधुसीतमारु नये कीं त्याला
८३
ऐशा नानापरी युक्तींतर्कवितर्क जग बोलतीअपार मेळा चवाठ्याप्रतीमिळाला असे लोकांचा
८४
त्यांत सहजासहज गमनगोरक्ष मच्छिंद्र उभय जाणकरीत आले चव्हाटेंकारणेंतो अपार मेळा देखिला
८५
सोडूनि गर्भाद्रिपर्वतातेंन्यावें भेटीसी मच्छिंद्रातेंघेऊनि जाता गोरक्षनाथआले होते त्या ठायीं
८६
आले परी सहज चालींनगरदीक्षेची कामना फिरलीम्हणोनि पाहतां व्यवहारपाउलीयेवोनि तेथें धडकले
८७
धडकले परी अपार मेळपाहूनि त्यांत संचरले गौरबाळतों कृष्णागर होऊनि विकळकनकचौरंगी पडियेला
८८
मग मच्छिंद्रातें पाचारुनदाविता झाला गौरनंदनजळचरसुतें पाहूनपरम चित्तीं द्रवलासे
८९
परी त्याचा अन्याय कायलोकांपाशी पुसों जायक्षण स्थिर करुनि हदयकरणी विलोकी बाळाची
९०
तों सहज अंतरीं दृष्टि करितांत्या समजली तयाची माताआणि कृष्णागरासी वरताअवतारदक्ष आढळला
९१
ऐसा शोध शोधिल्या चित्तींमग क्रोधें दाटले तपोगभस्तीम्हणे अहो हे रांड शक्तीप्रविष्ट झाली लोकांत
९२
परी तो आहे मूर्ख रायचित्तीं योजितां न ये न्यायबाळावरी तिनें घायकोपशस्त्रीं योजिला
९३
तरी ऐसा बुद्धिभ्रष्टविषयलोभी अति वरिष्ठमहीं नसावा महाभ्रष्टमहीमार आगळा
९४
लागूनि कांतेच्या बुद्धिसंगतींबाळालागीं केली आर्तीतस्मात् राव विषयभक्तीठेवूं नये महीसीं
९५
ऐसें चित्तीं धरुनि तेथूनउभय निघाले मंडळांतूनमग गोरक्षा सकळ खूणनिवेदिली रायाची
९६
सकळ गोरक्षां निवेदन होतातोही आपुले हदयीं पाहतांपाहूनि म्हणे गुरुनाथायांचे नांव रंगाते आणावें
९७
कृष्णागर तो चौरंगीं व्यक्तम्हणोनि चौरंगी बोलला नितांतकृष्णागर हें नाम महींतनाहीं म्हणोनि वदलासे
९८
आणि हस्तपादादि सकळएका चौरंगी झाले सकळम्हणोनि चौरंगी गौरबाळसहजस्थितीं वदलासे
९९
असो गोरक्ष मच्छिंद्रातेंम्हणे राजसदना जाऊं त्वरितेमागूनि घ्यावें चौरंगातेंनाथपंथीं मिरवावया
१००
मच्छिंद्र म्हणे कर्मशासनरावराणीतें दुःख दावूनमग न्यावा शिवनंदननाथपंथीं मिरवावया
१०१
गोरक्ष म्हणे हो नोहे ऐसेंनऊं आधीं चौरंगासपूर्णपर्णी नाथपंथासविद्यार्णव करावा
१०२
मग तयाचेचि हातींरायासी दावावी प्रतापशक्तीआणि त्या रांडे चामुंडेप्रतीओपणें तें ओपावें
१०३
तरी आतां सौम्य उपचारराया करुं वागुत्तरमागून घ्या स्नेहपरिवारचौरंगीतें महाराजा
१०४
ऐसी गोरक्ष बोलतां वाणीअवश्य म्हणे मच्छिंद्रमुनीमग उभयतां राजसदनींप्रविष्ट जाहले महाराजा
१०५
पुढें धाडूनि द्वाररक्षकश्रुत करविलें नांव दोंदिककीं मच्छिंद्र गोरक्षक तपोनायकभेटीसी येती महाराजा
१०६
रायें ऐकोनि ऐसें नाममनीं उचंबळे भावार्थ प्रेममनांत म्हणे योगद्रुमवंद्य असती हरिहरा
१०७
परी मम दैवार्णवा सुफळबांधमच्छिंद्रकृपेचा वोळला मेधऐसें म्हणूनि लागवेगकनकासन सांडिलें
१०८
सम्यक सामोरा होऊनि नृपतिदृष्टीं देखतां मच्छिंद्रजतीभाळ ठेवूनि चरणांवरतीआलिंगीतसे प्रेमानें
१०९
म्हणे महाराजा अज्ञानभंगाअज्ञानपतिता बोधली गंगावळूनि धीर पावल्या संगाकुशब्दपाप नाशील
११०
ऐसें म्हणोनि राव पुढतीनमिता झाला गोरक्षाप्रतीभाळ ठेवूनि चरणांवरतीसभेस्थानीं आणिलें
१११
बैसवूनि कनकासनींषोडशोपचारें पूजिले मुनीउपरी उभय जोडूनि पाणीउभा राहिला सन्मुख
११२
म्हणे महाराजा योगद्रुमातुमचे चरणीं असे मम प्रेमादर्शन दिधलें भक्तिउगमामम अभक्ताकारणें
११३
तरी आतां कामशक्तींवेध कोणता सांगा जतीजेवीं ऋतुकाल द्रुमाप्रतीफळे येतील तैशींच
११४
तरी चिच्छक्तिउल्हासपणेंअर्थ दावा मजकारणते त्यावरी कामना पावनतुष्ट होईल महाराजा
११५
ऐसें बोलतां नरेंद्रपाळमच्छिंद्रचित्तद्रुमाचें फळशब्दचातुर्यलापिका रसाळचौरंगभावीं निघालें
११६
म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमाएक काम वेधला आम्हांआज तुमच्या कौंडण्यग्रामाशासनीं बाळ विलोकिला
११७
राया तिष्ठतां तव कोपाग्नतयाचे हस्तपाद केले भग्नतो जरी तुमचा अन्यायी उत्तमआम्हांलागीं ओपावा
११८
राव ऐशी ऐकूनि मातहदयीं गदगदोनि हांसतम्हणे महाराजा योगी समर्थकाय त्या कराल नेवोनि
११९
म्हणाल करील सेवाभक्तीतरी भग्न झाला पदहस्तींतरी त्या पंथ गमाया शक्तीकांहीं एक दिसेना
१२०
तुम्हीच वाहोनियां आपुल्या स्कंधींवागवाल कीं कृपानिधीतो स्वामी तुम्ही सेवकबुद्धीआचराल कीं महाराजा
१२१
यावरी बोले मच्छिंद्रनाथतो सत्यपणें शक्त कीं अशक्तइतुके वद कीं आमुचे अर्थकासया तूं पाहशी
१२२
ऐसें बोलतां मच्छिंद्रजतीअवश्य म्हणे शशांगरनृपतीघेऊनि जावें आवडल्या चित्तींसिद्धसंकल्प महाराजा
१२३
ऐसें बोलतां धरापाळउठोनि आले तत्काळपरोपकारी अति कनवाळचौरंगापाशीं पातले
१२४
कनकचौरंगी सधीर युक्ततैसाचि उचलिला महीभुवसुतनेऊनि आपुले शिबिरांतहस्तपाद तळविले
१२५
येथें श्रोते कल्पना घेतीनिजीवास सजीव करितो जतीतेणें चौरंगीहस्तपादांप्रतीस्नेहकढयी कां तळविलें
१२६
निर्जीव पुतळा नृत्य करीततेथें मिरवले गहिनीनाथमग हस्तपादनिमित्तकाय अशक्य झालें तें
१२७
तरी कवि म्हणे पुढील कारणहोतें म्हणोनि मच्छिंद्रानेंलोहढथीं द्विमूर्धानेंस्नेहीं तळले पदहस्त
१२८
तूतें करोनि दुःखाचें शमनपुढें पहा म्हणती नेमानेमसमान उत्तमोत्तमफळा मिरवूं ययासी
१२९
ऐसा विचार करुनि चित्तींतळों लागले पदहस्तीमग तेथें राहोनि एक रातीपुढें गमती महाराजा
१३०
चौरंगी स्कंधीं वाहूनमार्ग गमीतसे गौरनंदनमग ग्राम पाहूनि निघूनबद्रिकाश्रमीं पातले
१३१
शीघ्र जावोनि शिवालयांतभावें वंदिला उमाकांतउपरी चौरंगी ठेवूनि तेथकाननांत संचरले
१३२
काननीं हिंडतां तेथ पाहींतों एक गव्हर देखिलें महींदेखतां विसरती तया ठायींगुहागृहामाझारी
१३३
तंव तें गव्हर परम गोमटपाहूं बोलती प्रताप सुभटम्हणती चौरंगीनिश्चयतुळवटयेथें कसून पहावा
१३४
पाहावें तरी कैसें रीतींमग काय करिते झाले जतीएक शिळा विस्तीर्ण शक्तिगोरक्षनाथें आणिली
१३५
आणिली परी गुहागृहांतउचलूनि वरल्या जमिनीतशस्त्र अस्त्र जल्पूनि तेथेंअंधारव्यक्त केलेंसे
१३६
ऐसें कृत्य करुनि तेथेंपुन्हां परतोनि आले नाथस्कंधीं वाहूनि चौरंगीतेंपुन्हां परतोनि गेले त्या ठायीं
१३७
तेव्हां गृहद्वारासमीपतरु एक होत विशाळरुपतयाखालीं प्रतापदीपसावलींत बैसले
१३८
बैसले परी गोरक्षासीमच्छिंद्र म्हणे भावउद्देशींवा अनुग्रह चौरंगासीयाच ठायीं ओपावा
१३९
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथगोरक्ष वदतसे उत्तरातेंमम अनुग्रह तपाश्रितलाभ होतसे महाराजा
१४०
तरी चौरंगीचें अनुष्ठानपूर्णस्वरुपीं मी पाहीनमग प्रसन्नचित्तें देईनअनुग्रह महाराजा
१४१
ऐसें बोलतां वरदउक्तीमच्छिंद्र म्हणे बरवी नीतीतरी याचि ठायीं चौरंगीप्रतीतपालागीं स्थापावा
१४२
ऐसें म्हणूनि गोरक्षासीपुसता झाला चौरंगासीहे बाळा तूं पूर्ण तपासीबसतोसी कीं या ठाया
१४३
यावरी बोले चौरंगनाथमी मान्य तुमचे कर्तव्यांतजेथें ठेवाल राहीन तेथसांगाल करीन तैसेंचि
१४४
परी एक मागणें आहे येथेंतुम्ही जावें कोण्या देशातेंपरी प्रतिदिनीं माझा हेतकूर्मदृष्टीं रक्षावा
१४५
इतकें मातें दिधल्यास दानसकळांत माझे कल्याणदिवसानुदिवस माझे स्मरणतव धवळारीं पाळावें
१४६
तुम्हांस होतां माझें स्मरणत्या कृपें होईल माझें पोषणजैसें कूर्मदृष्टीकरुनबाळालागीं पोषीतसे
१४७
ऐसें बोलतां चौरंगनाथउमय झाले तोषवंतमग उचलोनि गुहागृहांतचौरंगीतें ठेविलें
१४८
ठेविलें परी त्यास सांगतीबा रे ऊर्ध्व करीं कां दृष्टीप्रतीशिळा सुटक दिसे क्षितींपडेल वरती तुज राया
१४९
परी आपुले प्रसादेंकरुनतूतें देतों एक वरदानदृष्टी याजवरुनकाढूं नको कदापि
१५०
जरी दृष्टी किंचित चुकुरहोता पडेल अंगावरमग प्राण सोडूनि जाईल शरीरचूर्ण होशील रांगोळी
१५१
मग पुढील कार्य साधेपर्यंतसकळ राहिले नरदेहांततरी जतन करुनि शरीरांतहित आपुलें जोडी कां
१५२
मग एक मंत्र सांगूनि कानींम्हणे करी याची सदा घोकणीयेणेंचि सर्व तपालागुनीप्राप्त होसील पाडसा
१५३
मग गोरक्ष जाऊनि उत्तम फळातेंतया सामोरें आणूनि ठेवीतम्हणे हें फळ भक्षूनि निश्वितेंपूर्ण तपा आचरी कां
१५४
परी आणिक राया तूतेंदृष्टी रक्षावी जीवित्वनिमित्तेंमंत्र जपावा तपोअर्थेफळे भक्षावीं क्षुधेसी
१५५
ऐसी त्रिविधा गोष्टी तूतेंसांगितली परी रक्षी जीवातेंतों आम्ही लवकरी करुनि तीर्थातेंतुजपासीं येऊं कीं
१५६
ऐसें सांगूनि चौरंगासीबाहेर निघे गोरक्षेंसीशिळा आपुले गुहाद्वारासीबंधन केलें दृष्टोत्तर
१५७
या उपरांतीं तपाचारशक्तीचामुंडा स्मरला लावोनि चित्तींतंव त्या स्मरतां येऊनि क्षितींगोरक्षातें भेटल्या
१५८
म्हणती महाराजा योगोत्तमाकामना उदेली कोण तुम्हांतैसाचि अर्थ सांगूनि आम्हांस्वार्थालागीं मिरविजे
१५९
येरी म्हणे हो शुभाननीमम प्राण आहे या स्थानींतरी तयाच्या क्षुधेलागुनीनित्य फळें ओपावीं
१६०
आणावी परी गुप्तार्थफळें ठेवावीं त्या नकळतशिळे उचलूनि जावें त्वरितनित्य फळें ओपावीं
१६१
ऐसें सांगूनि चामुंडेसीचालते झाले तीर्थवासीसहज चालीं चालतां महीसींगिरनारपर्वतीं पोंचले
१६२
येरीकडे चामुंडा सकळउत्तम आणूनि देती फळशिळा उचलूनि उतावेळकाननांत सांडिती
१६३
सांडिती परी कैसे रीतींगुप्त सेवा करुनि जातीपरी चौरंगी महाजतीशिळाभयें दाटला
१६४
मनांत म्हणे गुरुवचनकीं शिळा घेईल तुझा प्राणम्हणोनि दृष्टीं याकारणअखंडित रक्षावें
१६५
ऐसी भावना आणूनि चित्तींदृष्टी ठेवी शिळेप्रतीमुखीं नाम मंत्रउक्तीआराधींत सर्वदा
१६६
परी त्या शिळेच्या भयेंकरुनखाऊं विसरला फळाकारणकिंचित वायूचें होतां गमनतोचि आहार करीतसे
१६७
शिळेवरती सदा दृष्टीपरी ऊर्ध्वभागीं ओपिली दृष्टीअंग हालवेना महीपाठींअर्थ कांहीं चालेना
१६८
जरी करावें चलनवलननेणों दृष्टीसी चुकुरपणशिळा झालिया घेईल प्राणम्हणोनि न हाले ठायातें
१६९
फळें जरी चांचपूनि घ्यावें हातींनेणों तिकडे जाय अवचितींचित्त गेलिया इंद्रियें समस्तींतयामागें धांवती
१७०
मग चित्त बुद्धि अंतःकरणहें तों ऐक्य असती तिचे जणफळ स्पर्शितां भावनेकरुनभ्रष्ट होईल सर्वस्वें
१७१
मग मंत्ररुपें स्मरणशक्तीआबुद्ध करील माझी मतीम्हणोनि सांडिलें फळप्राप्तीयोगाहूनि लक्षीतसे
१७२
ऐसी उभयतां कांचणी करुनआटत चालिले रुधिर प्राणपरी तें रुधिर मांस लक्षूनआटत आहे तंव सत्य
१७३
रुधिर मांसालागूनि भक्षीतभक्षूनि उदरकमय करीतशेवटीं चित्तासी हरीतभक्षण करीतसे नित्यशः
१७४
चित्ता आटिलें सकळ रुधिरपैं शरीर उरलें अस्थिपंजरवरी उगवली त्वचा त्यावरगवसणीपरी विराजे
१७५
जोंबरी शरीरीं असे प्राणतोंबरी अस्थि त्वचा घ्राणप्राण भंगल्या भंग जाणसर्वत्रासी माहिती
१७६
नाडी त्वचा अस्थीचौरंगी उतरल्या देहाप्रतीसूक्ष्म शरीरीं आपण भूतींत्रासूनियां पळाले
१७७
मग तो देह काष्ठासमानबोलारहित चलनवलनहीनऐसें पाहूनि बाळ तान्हेंवारुळ वरी रचियेलें
१७८
मग तितुक्या दृष्टी हरल्याप्रतीमुखीं ध्वनि मंत्रशक्तीतितुकें उरे मग निश्वितींजिकडे तिकडे झालीसे
१७९
ऐसेपरी चौरंगीतेंझालें आहे निजदेहातेंयावरी पुढील स्वार्थेपुढील अध्यायीं ऐका तें
१८०
तरी हा ग्रंथ नवरत्नहारआणि वैडूर्य स्वतेजापरतुम्हां श्रोतियां शृंगारधुंडीसुत अर्पीतसे
१८१
नरहरिवंश मालूतेंमालू नरहरीचा शरणागततो हा भक्तिपूर्वक ग्रंथश्रोतियांतें संकल्पिला
१८२
स्वस्ति श्रीभक्तिकथासारसंमत गोरक्षकाव्य किमयागारसदा परिसोत श्रोते चतुरएकत्रिंशाध्याय गोड हा
१८३

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ॥ नवनाथभक्तिसार एकत्रिंशाध्याय समाप्त ॥

॥ श्री नवनाथाय नमः ॥

या अध्यायाचे वाचन झाले?

तुमची नोंद या ब्राउझरमध्ये जतन होते.