॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद

श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी

अध्याय २९

पगोरक्षनाथाच्या भेटीनें भर्तरीचा मोहनाश; भर्तृहरीस वैराग्यदीक्षा. १८५ ओव्या · कथासार वाचा

श्रीगणेशाय नमः रुक्मिणीवरा कमलाकांताचाणूरमर्दना वसुदेवसुताकंसारी तूं जगत्रातावासुदेवा जगदीशा
शेषशायी हलधरभ्राताभावप्रिया सुदर्शनदर्शिताद्रौपदीलज्जारक्षणकर्तापाठिराखा मिरवसी
जैसा पांडवांचा पाठिराखातैसा मिरवसी मम दोंदिकाभक्तिसारग्रंथ कौतुकावाग्वरदा म्हणविसी
मागिले अध्यायीं विरहस्थितीलाधली गाढत्वें भर्तरीप्रतीपिंगलेकरितां स्मशानक्षितीपूर्ण तप आचरला
तया क्लेशाचे उद्देशींमित्रावरुणी दत्तापाशींश्रुत करुनि स्वस्थानासीयेऊनियां पोहोंचला
इतुकी कथा सिंहावलोकनींचित्तीं धरावी श्रोतेजनींयापरी पुढें ग्रंथमांडणींसिद्ध अवधानी असावें
असो गर्भाद्रींत मच्छिंद्रनाथठेवूनि गोरक्ष करावया तीर्थमहीलागीं भ्रमतगिरनारप्रती पातला
तेथें भेटोनि दत्तात्रेयासीभावें नमिलें प्रेमराशींश्रीदत्तें धरोनि हदयासीआनंदानें उचंबळला
श्रीकरपद्में मुखमंडनगोरक्षाचें कुरवाळूनि वदननिकट बैसविला हस्त धरोनअलाई बलाई घेतसे
मोहितवाणीं पुसतसे त्यातेंम्हणे कोठें रे मच्छिंद्रनाथतूं सोडूनि निरपेक्ष त्यातेंमहीलागीं भ्रमतोसी
१०
येरुं सांगे पुन्हां नमोनगर्भाद्रिपर्वती मच्छिंद्रनंदनराहिलासे स्वसुखेंकरुनजपजाप्यातें योजूनियां
११
मुहूर्तपणे स्वसुखासींलाविलें असें तीर्थस्नानासीमग मी नानातीर्थउद्देशींकरीत आलों परियेसा
१२
ऐसा वदोनि वृत्तांतयाउपरी बोले अत्रिसुतवत्सा कार्य लागलें मातेंत्या कार्यातें संपादीं
१३
तरी म्हणसी कार्य कवणभर्तरी मम अनुग्रही नंदनतो स्वकांतेकरितां स्मशानद्वादश संवत्सर सेवीतसे
१४
अन्नोदकाचा त्याग करुनसेवोनि आहे तृणपर्णकांता कांता चिंतन करुनद्वादश वर्षे बैसला
१५
तरी तुवां जावोनि तेथेंसावध करीं युक्तिप्रयुक्तिसकळ दावीं अशाश्वतआपुले पंथीं मिरवावें
१६
त्यासी मीं अनुग्रह जेव्हां दिधलातेव्हांचि गुंतविला संकल्पालाकीं सोडूनि वैभवपंथालानाथपंथीं मिरवेन मी
१७
तरी तया बोलासी जाणदिवस लोटूनि गेले पूर्णमग जन्मापासूनि सकळ कथनभर्तरीच्या सांगीतलें
१८
समुचयगोष्ट ऐकूनि कथनमान तुकावी गोरक्षनंदनम्हणे महाराजा तव कृपेनेकार्य सत्य करीन हें
१९
तव आज्ञा यापरी मातें असतांमग भर्तरी लोहातें आणीन कनकताही अशक्य नसे मातें वार्ताअर्थ घडला सहजचि
२०
हें महाराजा तूं कृपाघनवर्षलासी मम देहकारणतैं भर्तरीतरुनें ज्ञानकणअनायासें कणसेंचि
२१
तव कृपा जवळी असतांमग भर्तरीक्षुधेची कामवार्ताही अशक्य नसे मातें करितांतृप्त सिद्धीतें भिनवाया
२२
कीं तव कामकल्पतरुमम चित्तागणीं पावला विस्तारुतेथें भर्तरीहीनत्वविचारुदरिद्रातें उरेना
२३
तरी आतां बोलतों प्रमाणकार्य आपुलें करुनि देईनऐसें म्हणोनि वंदोनि चरणशीघ्रगती निघाला
२४
व्यानअस्त्र जपोनि होटींभाळी चर्चिली भस्मचिमुटीमग व्यानमंत्रे महीपाठीगमन करुं निघाला
२५
लवतां डोळ्याचें पातेंक्षणें आला अवंतिकेप्रतपन्नास योजनें निमिषांत क्षितींतलंघोनिया पातला
२६
तों गोरक्ष येतां स्मशाननिकटदुरोनि पाहे भर्तरी नेटतों सर्वांग दिसे अटि कृशवटअस्थिगत प्राण देखिला
२७
मुखीं तितुकीच सहजध्वनीम्हणे राम हे बरवी केली करनीआम्हां उभयतांची तुटी करोनीपिंगला नेली जवळिके
२८
ऐसी सहजध्वनि ऐकोनपाहूनि तयाचें कृशपणपरम चित्तीं हळहळोनचकचकाव मानीतसे
२९
चित्तीं म्हणे अहा कठिणराव आचरे परम निर्वाणअस्थिमय राहिला प्राणत्वचा व्यक्त होऊनियां
३०
तरी ऐसा विरह जयासीबाणलाहे पूर्ण मानसींतो वरपंगी वाग्वरासीकदाकाळीं मानीना
३१
तरी यातें आम्ही जें बोलूंतें तें सकळ होय फोलूजैसा क्षुधेला वेळूपळवा तेथें मिरवेना
३२
जैसा खापरासी परीस भेटेव्यर्थ होय यत्नपाठतेवीं बोधितां बोध अचाटव्यर्थपणीं मिरवेल
३३
कीं हिंगतरु अपार विपिनींत्यांत मैलागरु स्थापिला वनींतया सुगंध लिप्तदुर्गध वनींकदाकाळी तुटेना
३४
कीं शर्करेचे आळीपाळींशक्रावणाच्या वेष्टिल्या वेलीपरी त्या कटुत्वपणा सकळांमधुरपणा मिरवेना
३५
कीं चतुराननाचे हस्तकमळींजन्मभर स्थापिलें दरिद्र भाळींतैं व्यवसायेंकरुनि नव्हाळीकदाकाळीं चालेना
३६
तरी आतां विचार येतांयोजावा कांही बोधरहिताज्यातें जैसी कामना स्थिततैसी स्थिती वर्तावी
३७
कीं श्वपुच्छा चक्रवेढानीट होण्या यत्न पाडातेवीं राव झाला वेडाशब्दबोध चालेना
३८
जैसा जो तैसाचि होतां स्थितमग संतोष मिरवे चित्तसंतोष मिरवल्या कार्य प्राप्तघडोनि येतें सकळिकां
३९
पहा राम शत्रु दानवांपरी विभीपण मिरवला भिन्नभावातेणेंकरुनि स्ववैभवाभंगूं दिलें नाहींच कीं
४०
कीं बळियारायाचें जिणेंत्यासी मिरवला तो वामनमातृशत्रू फरशधर होऊनतातासमान वहिवटला
४१
तन्न्यायें करुनि येथेंरायासी ओपावें सर्व हितसंतोष मिरवोनि अत्रिसुताकीर्तिध्वज लावावा
४२
मग जाऊनि अवंतिकेंतकुल्लाळगृहीं संचार करीतएक गाडगें आणूनि त्यातेंबाटली नाम ठेविलें
४३
उपरी रंग चित्रविचित्रदेऊनि रोगणीं केलें पवित्रमग तें चमकपणीं पात्रतेजालागीं दर्शवी
४४
परो अंतरीं पात्र कच्चेपणींवरी रंग दावी लखलखोनीजेवीं वाढीव ब्रह्मज्ञानीपरी अंतरी हिगो
४५
बोलतां ज्ञानी विशेषकीं प्रत्यक्ष मिळाला स्वरुपासऐसें भासलें तरी ओंफसतरी अंतरी हिंगो
४६
नव तें मडकें कच्चेपणींवरी सुढाळ दिसे रंग सन्मुख तत्त्वतांठेंचेचे निमित्त करुनि नाथभूमीलागी पडतसे
४८
अंग धरणीं देत टाकूनसोंग दावी मूर्च्छापणेंत्या संधींत बाटली कवळूनबाटलीलागीं न्याहाळी
४९
असो बाटली गेली फुटोनमग सोंग मूर्च्छेचें सांवरोनभंवतें पाहे विलोकूनबाटली झाली शतचूर्ण
५०
तंव ती देखिली शतचूर्णमग उठतां झाला अहा म्हणोनम्हणे माझी माय बहीणवाटले कैसी फुटलीस तूं
५१
सकळ मेळवूनि तिचे खापरशोक करीतसे वारंवारऊर्ध्वशब्दें गहिंवरलोकांमाजी दाखवी
५२
म्हणे अहा माझी बाटलीदैवें कैसी फुटोनि गेलीआतां ती माझी परम माउलीकोणे रानी धुंडाळूं
५३
अहा माय गेलीस सोडोनआतां तुजसाठीं वेंचीन प्राणअहा विधात्या कैसें घडोनआणिलें तुवां या ठायी
५४
अहा माजे माय बहिणीकैसी गेलीस सोडोनीदाही दिशा मजलागोनीओस करोनि गेलीस
५५
माये गे माय गा ठायींतूं वांचली असतीस आपुले देहींमी पावलों असतों मृत्युप्रवाहींत्यांत कल्याण मानितो
५६
ऐसे शब्द रायें ऐकोनहास्य करी गदगदोनचित्तीं म्हणे पावलिला मरणमडक्याम काय मग करितां
५७
ऐसी अदेशा आणोनि चित्तींहास्य वारंवार करी नृपतीयेरीकडे गोरक्ष क्षितींआरंबळे अट्टाहास्यें
५८
धरणीं टाकोनि शरीरहदय पिटीं उभय करींअहा बाटली वागुत्तरीऐसें म्हणोनि आरंबळे
५९
म्हणे तूं गेलीस माय बहिणींपरी माझें आटलें सुदैवपाणीअहा माझा वासरमणीअस्ताचळा गेलासे
६०
अहा बाटली माझें घनकोणें दुर्जनें नेलें हिरावोनअहा बाटले तुझें वदनएकदां दावीं मजलागीं
६१
अहा बाटली परम धूर्जटीकोणी हिरावली मम अंधाची काठीऐसें म्हणोनि वाग्वटीमाय वदन दावीं गे
६२
ऐसें म्हणोनि दीर्घरुदनकरीत आहे अट्टाहास्येंकरोनपरी राव भर्तरी तें पाहुनचित्तामाजी चाकाटे
६३
अहा पिंगला हा पिंगलाऐसा घोप करीत बैसलापरी तें पाहूनि विसरलामनीं आश्चर्य बहु मानी
६४
म्हणे वोंचिता दमडी अडकातयासाठीं धरुनि आवांकानाशवंत जाणे सर्व निकाशोक केवीं करतसे
६५
ऐसें जल्पूनि चित्तींनिवांत बैसला तये क्षितींपरी हुडहुडी तरुफलाप्रतीशांतपणें राहीना
६६
सुशब्दवाक्या अमृतपरसिंचिता झाला वागुत्तरम्हणे योगिया कां चिंतातुरशोक करिसी हें सांग
६७
अरे वेंचितां सापिका कवडीमडकें येईल पुन्हां आवडींतयासाठीं शोकपरवडीकरिसी काय हे मूर्खा
६८
ऐसें उत्तरद्रुमाचें फळअर्थी ओपितां नृपाळयावरी गोरक्षबाळबोलता झाला तयातें
६९
म्हणे महाराजा नृपाळातूं शोक करिसी कवण मेळातरी दुःखाब्धिशोकजाळाप्रचीति पाहें आपुली
७०
तरी अहा पांथस्थ तूं प्रकामकंठीं लागला जगाचा उगमतरी त्या उभवोनि अनर्थघामसुख कैसें नांदेल
७१
तरी आपणावरुनि नृपतीघ्यावी जगाची अर्थप्रचीतीमाझी बाटली फुटल्या क्षितींदुःख जाणें मी एक
७२
राव ऐकूनि वागुत्तरापुन्हां म्हणतसे ऐकिजे नरामम दुःखाचा दृष्टांत खराप्रचीतिरुपीं धरिला त्वां
७३
परी माझी पिंगला राणीमान पावली जेवीं सौदामिनीहारपली जैसी सौदामिनीपरतोनि कैसी प्राप्त होय
७४
शतानुशत मडकीं मिळतप्राप्त करुनि देईन क्षणांतपिंगलेसमान स्त्रीरत्नकैंचे दुसरे मिळेल
७५
यावरी गोरक्ष बोले वचनतुझ्या पिंगला लक्षवधि जाणप्राप्त करीन एक क्षणपरी ऐसी बाटली मिळेना
७६
ऐसें ऐकूनि नराधिपम्हणे पिंगलेचें स्वरुपगुणवती गंभीर दीपलक्षावधि दाविसी
७७
तरी लक्षावधि पिंगला मातेंआतांचि दाखवीं सदगुरुभरितेतूतें बाटल्या शतानुशतेंसिद्ध करितों या ठाया
७८
तरी तुझा चमत्कारुदावीं मातें कल्पतरुजैसा भूषण कृपापरुगुरुसुत तो गहिंवरला
७९
तरी बा समान करणीमातें मिरवेल अंतःकरणींनातरी ढिसाळ बाटल्यावाणीपरी अर्थ हिंगूच दिसतसे
८०
जैसें मृगजळाचें पाणीपरी अब्धिसमान वाटे खाणीपरी तृषाकोडाचा वासरमणीअतस्ताचळीं पावेना
८१
कीं शुद्ध ओडंबरी घनस्वगींहूनि करी गर्जनपरी तोय लेशमानमहीलागीं आतळेना
८२
कीं काजवा जो तो दिढवा दावीतरी कां तिमिरास तो आटवीतेवीं बोल फोलप्रवाहींमिरवू नको योगेंद्रा
८३
ऐसें ऐकतां वचनम्हणे राया नरेंद्रोत्तमापिंगलाउदय लक्षावधीनकेलिया मज देसील काय
८४
येरु म्हणे पिंगला नयनादाविलिया पुरवीन इच्छिली कामनाराज्यवैभव सुखसेवनासंकल्पीन तुजलागीं
८५
ऐसें बोलतां नरेंद्रपाळसाक्ष कोण म्हणे गोरक्षबाळयेरु म्हणे पंचमंडळसाक्षभूत असती बा
८६
आणि अनलादि स्वर्गसविताजळपाताळ जळमही मान्यताहे साक्ष असती बा देस्वतापशु पक्षी मृगादिक
८७
जरी मज न घडे बोलासमानतरी पूर्वज सर्व पावती हीनस्वर्गवासी पावती पतननरकवास भोगिती
८८
आणि शतजन्म रौरवकारमहीं भोगीन वारंवारजरी मी न ओपीं राज्यसंभारतुजलागीं महाराजा
८९
ऐसें बोलूनि शपथपूर्वकपुन्हां बोले शपथदायकम्हणे महाराजा हे तपपाळकबोलासमान दावीं कीं
९०
जरी या बोलासमान राहणीतूं न दाखविसी मातें नयनींतरी नरक पावसील सहस्त्र जन्मींविहित वाचे अनृतत्वें
९१
ऐसी राजेंद्र बोले वाणीसत्यार्थ म्हणतसे योगतरणीमग कामिनीअस्त्र पिंगलानामींप्रयोगातें उच्चारी
९२
मग सहज करुनि ऊर्ध्व दृष्टीफेंकिता झाला भस्मचिमुटीतंव ते कामिनी अस्त्रपोटींस्त्रिया कोटी उतरल्या
९३
मुख्य पिंगला जी भस्म झालीतीच अनंत मूर्ति धरुनि उतरलीपाठीं पोटीं व्यापिलीसन्मुख उभी राहिली रायाच्या
९४
राव पाहूनि पिंगलास्वरुपमोह कामाचा उजळला दीपसकळांसी बैसवोनि आपणासमीपसंसारखुणा पुसतसे
९५
परी त्या पिंगला सगुणसरितासर्व सांगती अचूक वार्तासांगूनि उपरी बोधअर्थारायाप्रती बोलती
९६
म्हणती महाराजा प्राणेश्वरामम विरहाचें शल्य बैसलें अंतरापरी अशाश्वताचा माथां भाराफुकटपणीं वाहिला
९७
म्यां चित्तीं करुनि तुमची प्रीतीदाहूनि घेतले देहाप्रतीपुन्हां उदय गोरक्षजतीअनंत दृश्य पैं केलें
९८
केलें तरी तुम्हांभावनीमिरवणें मज पुन्हां अवनींपरी शेवटी मृत्युपणाची काचणीतुम्हां आम्हां असेचि
९९
तरी राया महीभोजाआतां संग सोडूनि माझामोक्षमहींतळीं ध्वजालावोनियां उभारी
१००
यापरी माझा काम चित्तींवरुनि आचरला संसारनीतिपरी मुक्तिमोक्षाची मांदुस हातींचढणार नाहीं महाराजा
१०१
मी पिंगला तुमची कांताआचार आचारलें पतिव्रतातेणें डौरवोनि श्रीवरें माथादिधलें हिता मजलागीं
१०२
आतां तुमचे सर्व हिततुम्ही विलोका प्रज्ञावंतमी तुमची दासी तुम्हां संमतचालूं शकें महाराजा
१०३
ऐसे वदोनी निवांतपणींपिंगला बैसली राव वेष्टोनिपरी तो चमत्कार पाहोनिविस्मय त्यासी वाटला
१०४
मग धांवूनि गोरक्षचरणींलोटूं पाहे दंडवत अवनींपरी सर्वज्ञ गोरक्ष धरुनि पाणीरायाप्रती बोलतसे
१०५
हे महाराज महीपाळमाझा गुरु जो मच्छिंद्रबाळमच्छिंद्रनामें प्रतापशीळशिष्य आहे दत्ताचा
१०६
तरी यापूर्वी तुझिया देहींदत्तानुग्रह लाधला पाहींतरी तूं मच्छिंद्रसहोदर महींगुरु माझा अससी कीं
१०७
तरी तूं वंद्य आहेसी मातेंम्हणोनि नमना अनुचिततरी माझा साष्टांग प्रणिपाततव चरणी असो कीं
१०८
तरी राया सदगुरुभ्रातासांग कीं कामना केवीं उदभवली चित्ताराज्यवैभव संसारदुहितापिंगला भोगूं इच्छीतसे
१०९
किंवा सोडूनि सकळ संपत्तीकामनाविरह वैराग्य चित्तींआचरुं ऐसी बोधमतीतरी स्थिती सांग कीं
११०
जैसी कामना असे चित्तातैसीच लाभेल तेजभरिताऐसें बोलतां गोरक्षनाथाराव बोले उत्तर
१११
म्हणे महाराजा द्वादश वरुनांबैसली पिंगलाउद्देशापरी पिंगला स्वरुपासप्राप्त झाली नाहीं कीं
११२
तरी येऊनि त्वरितात्वरितपिंगला दाविल्या शतानुशततरी ऐसें सबळ सामर्थ्यराज्यपदीं दिसेना
११३
मी पूर्वीच भ्रांतीं वेष्टिलोंश्रीगुरुचे हातापासूनि निसटलोंनिसटलों परी कष्टलोंसंसारतापामाझारीं
११४
तरी आतां कृपाघनदत्तदर्शनाचें अपार जीवनमज चातका करीं पानकृपाघना महाराजा
११५
आतां मातें संसारराहणीराज्यवैभव सुखावणींतुच्छ लागे योगधर्मीप्रतापानें हीन तैं
११६
धन्य तूं एक प्रत्ययासपिंगला दाविली चमत्कारासजेवीं आवडी कुरुपाळासकौरवदर्शना दाविलें
११७
तैसें पूर्ण कथेंतदर्शन करविलें मातें येथतरी मी न राहें भवभ्रांतींतवेष्टोनियां महाराजा
११८
आतां आचरेन पूर्ण योगासाधीन सकल कलांसी प्रयोगामाझा स्वामी अनसूयाकुशिगारत्न मातें दावीं कां
११९
गोरक्ष म्हणे विरहे नृपाळामनीं वरिली आहे पिंगलातरी लक्षावधी प्राप्त या वेळातूतें झाल्या महाराजा
१२०
तरी तितुक्या भोगूनि आतांसंतुष्ट करीं आपुल्या चित्तायेरु म्हणे एकीकरितांदुःख इतुकें भोगिलें
१२१
मम लक्षावधी भोगूनतयांचे दुःख अवर्णनकोणी भोगावें चंद्रार्कमानअवधीतें सांडोनियां
१२२
एक वृश्चिक दंशिल्या अंगावेदना होती भोगात्यांत लक्षानुलक्ष सुयोगादंशिल्या काय सांगावें
१२३
तरी आतां असो कैसेंपुन्हा अदृश्य करीं पिंगलेसआणि तूं राज्यवैभवाससांभाळ करीं महाराजा
१२४
तरी माझिया स्वामीचे चरणआतां दावीं मजकारणइतुका उपकार करुनकीर्तिध्वजा मिरवीं कां
१२५
मग अवश्य म्हणे गोरक्षसुतपुन्हां अदृश्य पिंगला समस्तमग धरोनि भर्तरीनाथाचा हस्तनगरामाजी आणिला
१२६
आणिला तेव्हां हर्ष समस्तांलोटिती झाली आनंदसरिताविक्रमरायानें माथागोरक्षचरणीं ठेविला
१२७
रायें बैसवोनी कनकासनींषोडशोपचारे पूजिला मुनीमग जोडोनियां पाणीगोरक्षकातें पुसतसे
१२८
म्हने महाराजा मम भ्रातापिंगलाविरहें पेटल्या चित्ताकैसा आणिला देहावरतातरी कथा सांगावी
१२९
मग रायातें सकळ कथनतुष्ट केला मनोधर्मउपरी वैराग्यसंकेत पावूनपुढील कार्य सांगितलें
१३०
परी विक्रम तो सर्व मर्मज्ञतुष्टतांचि मिरवी मनोधर्मयावरी बोलता झाला वचनगोरक्षकांतें तेधवां
१३१
हे महाराजा कृपामूर्तीआपण बरीच योजिली युक्तीपरी आपण येथ षण्मास वस्तीभ्रात्यासमवेत करावी
१३२
म्हणाल तरी काय कारणतरी द्वादश वर्षे सोडिले अन्नतेणें कृश शरीर होऊनप्राण डोळां उरलासे
१३३
म्हणोनि आपणा विनंतिपत्रपुढें वाढितों पवित्रतरी तें स्वाद्वन्न सेवोनि चित्रमम मानसा पोसावें
१३४
यावरी बोले गोरक्ष जतीजाणत आहे माझे चित्तींपरी नेणों यावरी पुढें मतीकैसी होईल रायाची
१३५
त्याकरितां तप्तातप्तदेईन रायाचें हातीं हितआतां राहणें योग्य मातेंदिसत नाहीं महाराजा
१३६
ऐसें विक्रमा गोरक्ष बोलोनप्रविष्ट झालें सकळांकारणद्वादशशत राण्या आदिकरोनवृत्तांत त्यांतें समजला
१३७
मग तें असुख मानूनि चित्तींशोकें युवती विव्हळ होतीगोरक्षातें शिव्या देतीमेला मेला म्हणोनियां
१३८
नाना वल्गना बोलती ऐसीम्हणती होता दृष्टीसरसींमेल्यानें येऊनि घातलें फांशींदूरदेशा न्यावया
१३९
तरी याचे जळो वदननेतों आमुचें सौभाग्यरत्नऐसें म्हणोनि म्लान वदनरुदनाते दाविती
१४०
असो यापरी विक्रपाकरितांत्रिरात्र झाला राहतामग भर्तरी गोरक्ष उभयतांनिघते झाले तेथोनी
१४१
राव विक्रमा आनंद चित्तींउभयतांचे घेऊनि संगतींबोळवीतसे अति प्रीतींगोरक्षातें वंदूनिया
१४२
परी स्त्रियांचे कटकांतथोर ओढवला आकांतशरीर टाकूनि भूमोवरतेंआरंबळती अट्टाहास्यें
१४३
आठवोनि रायाचे निपुण गुणस्त्रिया करिती अट्टहास्यें रुदनम्हणती आमुचा गेला प्राणरावशरीरी मिरवला
१४४
येरीकडे गोरक्षनाथभर्तरी आणि विक्रमासहितअपार मंडळ प्रज्ञावंतगांवाबाहेर पातले
१४५
तों गोरक्ष पुसे भर्तरीतेंकीं राज्यवैभव अत्यदभुतयांत मानस जरी गुंडाळतअसेल तरी मज सांग
१४६
ऐसी ऐकोनि गोरक्षवार्ताभर्तरी बोले प्रांजळ अर्थाहे महाराजा वैभव नलगे चित्तायोग आचरुं वाटतसे
१४७
राज्यवैभव कनककामिनीवाटले नीच वमनाहुनीलक्ष लावोनी श्रीगुरुचरणींप्रचीत घेऊनि वहिवाटला
१४८
मग आपुली शैली शिंगी कंथाझाला देता राया यशवंताभिक्षाझोळी घेऊनि हाताकुबडी फावडी ओपीतसे
१४९
ऐसिया सरंजामेंकरुनरायासी बोलता झाला वचनवैभव मानसीं वमनासमानतरी प्रचीत दावी कां
१५०
तरी संचरोनि अंतःपुरांतकामिनी तुझ्या द्वादश शतत्या परक्या मानूनि चित्तांतभिक्षा मागूनि येईं मम दृष्टी
१५१
ऐसें ऐकोनि भर्तरीनाथअवश्य म्हणे काय आहे यांतमग तैसाचि उठूनि कृतांतवतअंतःपुरांत संचरला
१५२
आदेश लक्ष निरंजनशब्द गाजवी सवालपणशिंगी सारंगी वाजवोनस्त्रियांचे सदनीं फिरतसे
१५३
तों तें आधींच स्त्रीकटकबैसलें होतें करीत शोकत्याउपरी पाहुनि रायाचें मुखआक्रंदती अट्टहास्यें
१५४
एक धरणीवरी लोळतीएक कबरीकेश तोडितीएक मृत्तिका मुखीं घालितीमस्तक आपटिती धरणीये
१५५
महीं आपटूनि कपाळरुधिरें व्यक्त करिती बंबाळएक उभयहस्तें वक्षःस्थळधबधबां पिटिती पैं
१५६
एक रडती एक पडतीएक शोकें मूर्च्छित होतीपरिचारिका धांवोनि हस्तींसावध करिती तयांतें
१५७
एक म्हणे या रायासमानउपरी न देखों शतजन्मअहा रायाचें मायिक धनमायेहूनि आगळिक
१५८
एक म्हणती अहा रावकैसा मिटला आमुचा भावअहा विधात्या आमुचें दैवकैसे रेखिलें निजभाळा
१५९
जैं वत्सालागीं गायएक घडी न टाकूनि जायत्याचि नीतीं तो पतिरायहोय माय आमुचा
१६०
अगे स्नेहेकरुन एकशयनींपरमस्नेहाच चांगुलपणींकिंचित कोमाइलेपहात वदनींअर्थ पुसे तयाचा
१६१
पुसे परी इष्टार्थासमानराव पूर्ण करी स्नेहेंकरुनजैसी माय करी कन्येकारणतैसा लळा फळीतसे
१६२
ऐसी माया जयाचे चित्तींतो आतां होऊनि निष्ठुमतीकैसा जातसे अदृश्य क्षितींआम्हां शव करुनियां
१६३
तरी आता अर्थहीनराया जातात आमुचे प्राणआम्हां निढळवाणी करुनअधोर रानीं सोडिसी
१६४
ऐसें म्हणोनि आरंबळतीउलथोनि महीवरती पडतीपुन्हा उठोनि रायासी पाहतीदैन्यवाणी शरीरें
१६५
मग म्हणती अहा जी रावमिरवत होतासी कैसा भावकीं महीलागीं कामदेवअवतार दुसरा दिसतसे
१६६
अहो राजाचे वैभववर्णनठेंगणा वाटतसे सहस्त्रनयनतो कुशशरीर दैन्यवाणाभिक्षा मागें घरोघरीं
१६७
ऐसें बोलूनि पहात त्यातेंपुन्हा सांडिती शरीरातेंमग सकळ उठोनि रायातेंवेष्टन घातलें स्त्रियांनीं
१६८
म्हणती राया आम्हां सांडूनदुर देशीं नको करुं गमनयेथेंचि पाहूनि चंद्रवदनतुष्ट होतों आम्हीं कीं
१६९
तरी आतां निःस्पृह निराशदाही दिशा पडल्या राया उदासतरी मुक्त करुनि आमुच्या प्राणांसपाऊल मग पुढें ठेवावें
१७०
ऐसें बोलतां राया मनींसंचरला त्र्कोधद्विमूर्धनीमग कुबडी उगारोनीनिघता झाला माघारा
१७१
परी तो गोरक्ष गुप्तहेरपा त होता चमत्कारराव निघतां त्यजूनि स्त्रिया सत्वरमान तुकावी गोरक्ष
१७२
असो भर्तरी सहजस्थितींनिघतां मागे त्या युवतीआरंबळोनि पाठी येतीनको जाऊं म्हणोनियां
१७३
आज द्वादश वर्षेपर्यंतबैसला होतासी स्मशानांतआतां जोग आचरण करुनि वनांततैसाचि येथें राहें कां
१७४
परी तो राव सकळ सांडोनगांवाबाहेर आला परतोनयेरीकडे विक्रम उज्जयिनींस्त्रिया गेल्या स्वस्थाना
१७५
यापरी गोरक्ष भर्तरीनाथपुसोनि निघाले विक्रमातेंमग पदीं पदीं दुरवा होतअर्धकोस पैं गेले
१७६
येरीकडे विक्रम नृपतीपरतोनि आला स्थानाप्रतीपरी अट्टहास्य पाहूनि अंतःपुराप्रतीसंचार करिता पैं झाला
१७७
मग माय बहिणी कन्यासमानसकळां तोषवी बोध करुनयेरीकडे उभयजनमार्गाप्रती गमताती
१७८
परी कृशशरीरी भर्तरीनाथअशक्त पद ठेवी कंठेना पंथमग व्यानअस्त्र भस्मचिमुटींतस्थापिता झाला गोरक्ष
१७९
मग तें भस्म चर्चिता भाळींझडूनि गेली अशक्त काजळीमग क्षण पातीं लागतां डोळींगिरनारपर्वतीं पोंचला
१८०
तों जातां देखें अत्रिनंदनपायीं लोटले उभयजनमग मायें उभयतां कवळूनवदन इंदु कुरवाळी
१८१
म्हणे वत्सा गोरक्षनाथाभर्तरीकरितां शिणविले तूतेंऐसें म्हणोनि कुर्वाळीतवारंवार मुखातें
१८२
त्याच प्रकरणीं मोहस्थितीराया भर्तरीतें संपादितीम्हणे वत्सा श्रम बहुतींआणिलें येथें मम वत्से
१८३
असो स्थिति वृत्ति धृति सकळाएकमेकांतें घोंटाळानिवेदनीं चित्तीं संचियेलातोषाप्रती तरी वरितील
१८४
असो आतां तुष्ट लक्षणपुढील अध्यायीं सांगेल धुंडीनंदनमालू नरहरिकृपेंकरुनसंतगणीं मिरवला
१८५
स्वस्ति श्रीभक्तिकथासारसंमत गोरक्षकाव्य किमयागारसदा परिसोत भाविक चतुरनवविंशति अध्याय गोड हा
१८६

शुभं भवतु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ नवनाथभक्तिसार नवविंशतितमोध्याय समाप्त ॥

॥ श्री नवनाथाय नमः ॥

या अध्यायाचे वाचन झाले?

तुमची नोंद या ब्राउझरमध्ये जतन होते.