॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद

श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी

अध्याय २८

पिंगलेचे भर्तरीवरील प्रेम; त्याच्या कसोटीकरितां पाठविलेला निरोप; त्याचा दुष्परिणाम. १९२ ओव्या · कथासार वाचा

श्रीगणेशाय नमः जयजयाजी जगदुद्धाराअखिल निरंजना निर्विकाराभक्तमानसचकोरचंद्राप्रेमांबुधारा ओसरसी
तरी तूं असतां कृपाळु आईमाय माझे विठाबाईतरी आतां ग्रंथप्रवाहींयेऊनियां बैसे गे
मागिले अध्यायीं प्रेमेंकरुनवैभवीं मेळविला राव विक्रमभर्तरीसंगमीं पिंगलालग्नदत्तानुग्रह लाधला
उपरी मृगया करुनीअवंतिकास्थाना जाऊनिराजधामीं कनकासनींसभामंडपीं बैसला
क्षणैक बैसूनि त्वरितात्वरितपाकशाळे गेला नृपनाथपक्कान्न सेवूनि अंतापुरातपिंगलागृहीं संचरला
कनकमंचकीं सुमनशेजीराव बैसवी पिंगला अजींषोडशोपचारेंकरुनि पूजीश्रद्धापूर्वक पिंगला
परम प्रीतीं भावारुढरायें दर्शविलें चित्तीं कोडमग करी कवळूनि स्नेहपाडेंनिकट घेत पिंगला
तीतें वामांकी बैसवोनपरम प्रीतीनें घेत चुंबनवाचेनें म्हणे तुजसमानअन्य दारा नावडती
अगे पिंगले माझें मनभावी मम देहींचें ऐक्यरत्नजैसे मित्र आणि रश्मिचिन्हऐक्यदेहीं मिरवती
कीं राजमौळी तेजें आगळाद्वितीये शोभली त्याची कळातेवीं माते तूं पिंगलामम चित्तावरी धांवें
१०
अगे हे पिंगले माझा भावपिंगलाभर्तरीं ऐक्यनांवएकाचि देहीं मज वाढीवभासे भास शुभानने
११
जैशी शर्करा आणि गोडीनामें भिन्न परी ऐक्यप्रौढीतेवी तूं पिंगला माझे पाठींभासे भास शुभानने
१२
जैसा उदधी आणि लहरीपरी ऐक्यता सागरींतेवीं मातें तूं सुंदरीभास भाससी शुभानने
१३
ऐसें म्हणूनि परम प्रीतींपुन्हां चुंबन घेत नृपतीमग भोगूनि सकाम रीतींसंतुष्ट चित्तीं मिरवला
१४
मग विचार सुचला एक गहनआनंदें बैसती प्रीतीकरुनबैसल्या पिंगला बोलूनि वचनविडा त्रयोदशगुणी देतसे
१५
म्हणे हे महाराजा नृपवरामम देहींचे प्राणप्रियेश्वरामम मानसचकोरचंद्राप्रेमांबु मिरवतसे
१६
तरी तुम्हां आम्हां गांठीगांठी गांठिल्या त्या परमेष्ठींगांठिल्या परी चित्तदेठींऐक्यभास भासतसे
१७
जसें लवण उदकी मिश्रितभिन्न न दावी दृष्टींततन्न्यायें ऐक्यचित्तरावणराणी शोभत
१८
तरी ऐसा मिश्रित अर्थउदया पावला असे ऐक्यचित्तपरी नेणूनि निर्दय परम कृतांतजगामाजी मिरवतसे
१९
चित्तीं चित्तभय कायाहरण करीत असे रायातरी नेणों आपण विषयचिंते याबुद्धि जरी संचरली
२०
संचरतां परी एक त्यांतें मातें दिसत उचितार्थतुम्हांआधी मातें मृत्युसुगम चित्ता वाटतसे
२१
तरी हें ऐसें इच्छिल्याप्रमाणईश्वरसत्ते जरी आलें घडोनमग परम बरवें दैववानजगीं असें मी एक
२२
ऐसें बोलतां शुभाननीराव ऐकूनि बोले वाणीनेणों सखे ईश्वरकरणीपुढील काहीं वदवेना
२३
मज आधी तूं कामिनीमृत्यु पावों इच्छिसी मनींपरंतु नेणों निर्दयपणींमित्रात्मज मिरवतसे
२४
तो कदा न जाणे वेदविधीसदा वर्ततसे बिघडबुद्धींनेणों मज मृत्यु तुज आधीआल्या काय करशील
२५
ऐसें ऐकूनि वदे पिंगलानेणो कैसे असे जी भाळारेखिली विधीनें अकळ कळाकळत नाहीं महाराजा
२६
परी ऐशा घडल्या गोष्टीमी राहाणार नाहीं महीपाठींदेह दाहूनिया हव्यवाटीगमन करीन तुम्हांसह
२७
राव ऐकूनि बोले वचनपुरे आतां तुझे बोलणेप्राणांहूनि प्रिय कोणघात त्याचा करवेना
२८
तरी हे बोल उगलेचि फोलमाझिया तोषाचें करिसी मोलपरी समय येतां तव पाऊलमागेंचि धांव घेणार
२९
तरी अनुभव माझिये चित्तासहज आहे मजला पाहतांअगे राज्यासनीं विपुल वार्तासेवक श्रवण माझें करविती
३०
करविती परी कैशा रीतींसमरंगणींचा भाव दावितीशत्रुअनली प्राणाहुतीवेंचूं ऐसें म्हणताती
३१
तरी समय पडतां दृष्टींजीवित्व रक्षिती बारा वाटींमग कोण कोठील मोह पोटींजीवित्वाचा वरिती गे
३२
तरी हें तैसे तुझें बोलणेंदावीत मातें चांगुलपणपरी समय पडतां अर्थभिन्न दुसराचि आहे गे
३३
कीं बहुरुपियाचे खेळमेळींहोऊनि बैसती महाबळीपरी ते शूरपणाची नव्हाळीसमरभूमीं चालेना
३४
कीं श्वानपुच्छाची कैशी उग्रतापरी हार तेचि पडे बळी देखतांजैसी पालीची दृष्टी देखतांवृश्चिक नांगी उतरीतसे
३५
तन्न्यायें तव बोलणेंमातें दिसतें सहज स्थितीनेंऐसें बोलतां भर्तरीनंदनेंपिंगला वदे स्वामीसी
३६
म्हणे महाराजा प्राणेश्वराया बोलाच वाग्दोराकंठीं बांधिला आहे नराकाया वाचा मानसीं
३७
तरी आतां व्यर्थ बोलूननेणो घडेल अर्थ कोणईश्वरसत्तेचें प्रमाण ब्रह्मांदिका कळेना
३८
परी माझिये भावनेऐसेंयेत आहे स्वचित्तासविधवा शब्द शरीरासलिप्त होणार नाहीं कीं
३९
जरी म्हणाल कैशावरुनतरी काया वाचा चित्त मनतुम्हांलागीं केलें अर्पणसाक्ष असे ईश्वर तो
४०
तरी ईश्वर तो सत्याश्रितआहे म्हणती सकळ जगतींतरी वैधव्य शब्द जगमुखांतमातें लिप्त होणार नाहीं कीं
४१
असो बीज पेरिलें तैसे फळदुमकोमादि दावी सकळतेवीं माझो चाली सरळफळ उमटेल तैसेंचि
४२
ऐसें बोलूनि निवांतपणींस्तब्ध राहिली कामिनीपरी रायाचे अंतःकरणींशब्द सदृढ मिरवलें
४३
मिरवले परी ठेविले मनांतचमत्कार पाहूं कोणे दिवसांतअसो हे जल्प बहु दिनांतसारिते झाले प्रीतीनें
४४
सहज कोणे एके दिवशींराव जातसे पारधीसीमृगुया खेळतां विपिनासीआठव झाला कांतेचा
४५
कीं आम्ही उभयतां दोघे जणबैसलों होतों सुखसंपन्नतयामाजी मृत्यु बोलोननिश्चयविलें कांतेनें
४६
तुम्ही झालिया गतप्राणतुम्हांसवे करीन गमनतरी त्या बोलाचें साचपणआज पाहूं निश्चये
४७
ऐसी चित्तीं योजना करुनमृगया करीत फिरे काननतों अकस्मात देखिला नयनेंमृग एक नेटका
४८
राव देखतां तयापाठींलागूनि शीघ्र महीं आर्हामटीशीणचि त्या जीवीं बहु मेळथाटीमृग जीवंत धरियेला
४९
धरियेला परी हस्तेंकरुनतयाची ग्रीवा छेदूनमुकुटासह काढूनि भूषणेंरुधिरें अस्त्रें भिजविलीं
५०
भिजवोनियां सेवकाहातींदेता झाला शीघ्र नृपतीअन्य भूषणें उभवूनि कांतीसुखासनीं बैसला
५१
उत्तम छाया पाहूनतयाखालीं नृप जाऊनउत्तम चीर कनकवर्णमृदु गालिचा आंथरला
५२
तयावरी बैसूनि नृपतीमंडळी दुरावूनि बैसे एकांतीपरी रुधिरवस्त्रें जयाहातींतयालागीं पाचारी
५३
म्हणे ही रक्तवस्त्रें घेऊनसेवका पिंगलेचें गांठीं स्थानवस्त्रें तीतें गोचर करुनराव निमाला म्हणावें
५४
निमाला परी कैसें रीतीजरी पिंगला बोलले उक्तीतरी व्याघ्र संधांनी जीवित्वआहुतीघेऊनियां पळाला
५५
ऐसें वदोनि राव भृत्यातेंगुप्त पाठविला अवंतिकेतेंराजसदना जाऊनि भृत्येंपिंगलेतें विलोकिलें
५६
मौळीचीरासह सकळरुधिरव्याप्त वस्त्रें सबळपुढें ठेवूनि करकमळजोडूनियां बोलतसे
५७
म्हणे जी महाराज महीस्वामिनीमृगया करीत राव काननीअवचित व्याघ्र जाळींतुनीउठला राया न कळतां
५८
मागाहूनि साधूनि उड्डाणराव धरिला ग्रीवेकारणधरितांचि हरुनि प्राणरुधिर पिऊनि पळाला
५९
आतं त्याचें करुनि दहनचमू येईल सकळ परतोनऐसें पिंगला ऐकूनहदय पिटी आक्रोशें
६०
हदय पिटूनि महीवरतीभावें आपटी निष्ठुरगतीअहा म्हणूनि केश हातींधरोनियां लुंचीतसे
६१
शब्द करुनि अट्टाहासहंबरडा मारुनि उदासपुन्हां महीतें मस्तकासवारंवार आफळीतसे
६२
मृत्तिका घेऊनि टाकी मुखांतम्हणे हा जी प्राणनाथकैसे टाकूनि गेलांत मातेंपरत्रदेशभुवनासी
६३
अहा महाराजा प्राणेश्वराकूपीं कापिला कैसा दोराअहा तव प्रीतीचा मोहझराआज कैसा आटला जी
६४
अहो मम प्राणनाथामजविण तुम्हां क्षण गमत नव्हताप्रीती सोडूनि कैसे आतांपरत्र देशा गमलेती
६५
ऐसें म्हणोनि आरंबळततों अंतःपुरीं समजली मातस्त्रिया राजाच्या द्वादश शतआरंबळत पातल्या
६६
एक हदय पिटिती आपुलें हस्तींएक धांवती महीं पडतीएक ऐकतांचि झाली वरतीमहीलागीं मूर्च्छित
६७
एक हंबरडा फोडूनि ऊर्ध्वम्हणती आमुचा गेला निधआतां महीतें स्त्रीवृंददीनवंत झालों कीं
६८
ऐसें म्हणोनि आरंबळतीएकमेकींच्या गळां पडतीहदय पिटूनि आपटितीमहीलागीं मस्तक तें
६९
ऐसा सकळ अंतःपुरांतकोल्हाळ झाला अदभुतपरी पिंगला दारा प्रीतीं बहुतशोक करी आक्रोशें
७०
म्हणे महाराजा निढळवाणीमज कैसे गेलेत जी सांडोनीमोहाचा सकळ तरणीलोपोनियां महाराजा
७१
बाळाहूनि मोह अत्यंतमजविषयीं पाळीत होतेततो मोह दवडूनि निष्ठुरवरसांडूनि कैसे गेलांत
७२
अहो तुम्ही राया सिंहासनीबैसत असतां राजकारणींपरी मम स्मरण होतां मनींया धांवूनि सदनांत
७३
ऐसें म्हणोनि धरणीवर शरीरपिंगला टाकी वारंवारआजि सकळ सांडोनि राज्यभारकैसा गेलासी महाराजा
७४
पाहूनि माझें मुखमंडनपुन्हां सेविसी राज्यासनमोह आजि सकळ सांडोनकैसा गेलासी महाराजा
७५
अहा पिंगला अंडजखाणीकोठें गेलीसे मम पक्षिणीदाही दिशा ओस करोनीअचर रानीं चरावया
७६
मम पाडसाची हरिणीपरत्र तृण गोड पाहुनीतिकडेचि गुंतली लोभेंकरुनीमाझा लोभ सांडोनियां
७७
अहा मज आंधळ्याची काठीहिसकूनि नेली निर्दये पोरटीकीं क्षुधिताची अन्नवाटीजिंतूनि नेली भणंगें
७८
अहा राया मजवांचूनतूतें गमत नव्हतें एक क्षणआज निष्ठुर मन करुनकैसा गेलासी महाराजा
७९
अहा राया उत्तम पदार्थजो महीलागीं उत्पन्न होततो मम आधीं नृपनाथेंभक्षिला नाहीं कधीं कीं
८०
मातें बैसवोनि निजअंकासमुखीं ओपीत होता ग्रासऐसेपरी सांडोनि प्रीतीसपरत्र कैसे गेलांत
८१
ऐसेपरी नाना गुणआक्रंदतसे आठवूनमग ते सेवेकातें पाचारुनशय्यासाहित्य करवीतसे
८२
रायमौळीचा चीरमुगुटपरिधानी कबरी अलोटस्फुरण दाटोनि मग बळकटउत्तम चीरीं कवळिला
८३
स्वामीचें वस्त्र परिधान करुनघेती झाली सतीचें वाणस्मशानवाटिकेचें साधनसिद्ध केले तत्काळ
८४
मग सकळ समारंभासहितयेती झाली स्मशानवाटिकेंतअग्निकुंडीं विधानें करुन त्यांतसबळ अग्नि चेतविला
८५
अग्नि लावितां विधानशक्तींदाहूनि वर्तल अंगारनीतींधगधगोनि कुंडाप्रतीपावक शक्ति दावीतसे
८६
ऐसिया प्रकरणीं पेटविला वन्हीहोतां पातली सौदामिनीअग्निकुंडी शिळा स्थापोनीनिरोप मागे सर्वातें
८७
सकळां जय देऊन आशीर्वचनजय जय भर्ता ऐसें म्हणोनतुझा देह तुज अर्पणशीघ्रकाळीं होवो कां
८८
ऐसे म्हणोनि अग्निकुंडांतसांडिती झाली स्वशरीरातेंपरी त्या पावकीं होतां स्थितगुंडाळोनि गेली सर्वस्वीं
८९
मग ते याचक अपार जनधन्य म्हणती तियेकारणस्वहित केलें पिंगलेनेंस्वामीसवें गमूनियां
९०
अहा पिंगला ऐसें म्हणतीपवित्र जाया सत्यवतीउदार कर्ण स्वकुळाप्रतीपरकुळातें तारील
९१
भर्तरीपरी करितां परलोकविव्हळ चित्ती करिती शोकम्हणती आम्हां प्रजेचें दोंदिकईश्वरें कैसें नेलें हो
९२
ऐसें म्हणोनि आक्रंदतीभर्तरी म्हणोनि आठवितीअसो पावकीं दाहोनि सतीलोक निघाले माघारे
९३
आपुलाल्या सदनीं जाऊनबैसले असतीं मुख वाळवोनअहा भर्तरी ऐसें म्हणोनश्वासोच्छवास सोडिती
९४
आणि राजसदनीं स्त्रियांचा मेळशोक करीत अति तुंबळतों येरीकडे विपिनीं नृपाळमृगया करुनि येतसे
९५
तों अस्तासी गेला चंडमणीरात्र दाटली परम विपिनींम्हणोनि राजा उठोनीनगराप्रती चालिला
९६
पावकतेजीं देदीप्यमानहिलाल मागीं प्रदीप्त करुनजातां भृत्य पाठविला वस्त्रें देऊनआठव तयाचा पैं झाला
९७
राव बैसूनि सुखासनींयेतां मागीं मशाली पेटवोनीत्यांत चंद्रज्योती शशिसमानीदिशेलागीं उजळती
९८
आठव होतांचि म्हणे चित्तांतअबुद्धिपणें स्त्रियांची जातनेणों गृहीं कैसी मातघडोनि आली असेल कीं
९९
म्यांहीं केलें मूढपणशोध केला नाहीं आणिका पाठवोनसकल भ्रांतीत चित्त गोंवोनपाठीं लागलों मृगाच्या
१००
परी मातें दिसतें अहितमूर्खपणा घेतला स्वपदरांतऐसी चिंता करीतअवंतिके पातला
१०१
परी यांत श्रोते कल्पना घेतीपिंगला दाहिली पावशक्तितेव्हां विक्रम नृपतीशोध कैसा अंतरला
१०२
आणि जो भृत्य आला वस्त्रें घेऊनतेणें कैसें पाहिलें निर्वाणतरी तो पिंगलेतें वस्त्रें देऊनआला होता अरण्यांत
१०३
परी रायाची न पडूनि गाठीकटक शोधितां महीपाठींमग तो अस्तमान होतां शेवटीकटकालागीं मिळाला
१०४
आणि त्या समयीं विक्रम नृपवरेंसेविलें होतें मातुळघरमिथुळेस जाऊनि समाचारसत्यवर्म्याचा घेतसे
१०५
मग सुमतिप्रधान चमूसहितशुभविक्रमरायादि प्रज्ञावंतसकळ मंडळीही ज्ञानभरितरायासवें गेली ती
१०६
गृहीं तितुकें स्त्रीमंडळग्रामजनादि रक्षपाळसकळ अबुद्धि केवळज्यांते शक्ति नातुडली
१०७
ऐसा समय आला घडूनतों त्यांतही घडलें अपार विघ्नपिंगला अबुद्धिपणें रत्नदेहान्त पावली
१०८
असो पाहिली मार्गवाटराव भर्तरी चमूनेटयेऊनि अवंतिकेनिकटग्रामद्वारीं संचारला
१०९
तंव ते उठोनि द्वारपाळरायासमोर झाले सकळआश्चर्य मानूनि उतावेळरायाप्रती वदताती
११०
म्हणती परी कैसे रीतींनम्रोत्तरें मंजुळ करितीमुजरे करुनि निवेदितीपिंगलेचा वृत्तांत
१११
म्हणती महाराज दिनमणीभृत्य एक आला वनांतूनीतो दुश्विन्ह वदोनि वाणीग्राम बुडविला शोकांत
११२
परी त्या शोकाची ऊर्ध्वनळीसती पडली सुमति बळीनरस्वामिनी पिंगला दवडिलीपरत्र देशीं गेलीसें
११३
तरी तियेची करुनि बोळवणआतांचि गृहीं आले सकळ जनस्मशानवाटिका झाली भस्मएक प्रहर लोटला
११४
ऐसें राव ऐकतां वचनपरम घाबरलें अंतःकरणमग सुखासनांतूनि उडी टाकूनस्मशानवाटिके पातला
११५
पातला परी आक्रंदतअट्टहास्यें शब्द करीतअति लगबगें धांवतस्मशानवाटिकेजवळी पैं
११६
पातला परी चूम मागेंकरीत जातसे अति लागसकळ कुळवृद्ध योगरायालागीं कवळिती
११७
राव जाता स्मशानमहीसीपहात पिंगलेचे चित्तेसीरव विरागी होऊनि मानसींउडी टाकूं म्हणतसे
११८
परी ते चमूमेळीचे गृहस्थ थोररायासी कवळूनि धरिती समग्रस्मशानकुंडीचा वैश्वानरवेष्टूनियां बैसले
११९
परी राव ते उद्देशीप्राणघात इच्छी मानसींपरी वेष्टन पडतां शरीरासीउपाय कांहीं चालेना
१२०
मग बैसल्या ठायीं आरंबळतमहीं मस्तकातें आपटीतहदय पिटूनि शोक करीतमूर्च्छनेलागी पावतसे
१२१
मूर्च्छा गेलिया पुन्हां उठतअग्नीं आहुती द्यावया पहातपरी अपार जनांचे वेष्टन बहुतबळ कांहीं चालेना
१२२
ऊर्ध्व करुनि आपुला माथाघडी घडी पाहे पिंगलाचिताअहा म्हणोनि भाळ तत्त्वतांमहीलागीं आफळीतसे
१२३
आफळूनि आठवी पिंगलेचें गुणम्हणे कैसी वो गेलीस मज सांडूनमातें मृत्युमहीं ठेवूनपरत्र कैसी झालीस
१२४
हें पिंगले तुझे मनगमत नव्हतें मजवांचूनआतां कैसी निष्ठुर होऊनपरत्रदेशीं गेलीस तूं
१२५
हे पिंगले तुझा मी पतीनव्हतों शत्रु होतो या जगतींकैसें जल्पूनि कुडेमतीभस्म तूतें म्यां केलें
१२६
अहा मी पतित दुष्ट दुर्जनमूढमतीनें घेतला प्राणतरी मी तुझा शत्रु पूर्णपति न म्हणें पिंगलें
१२७
ऐसें म्हणोनि अंग धरणींटाकी हा हा शब्द करोनीहदय पिटी दणाणोनीमहीं मस्तक आफळीतसे
१२८
अहा पिंगला म्हणोनहांक मारी अट्टहास्येंकरुनअहा पिंगले एकदां तव वदनमज दृष्टी दावीं कां
१२९
अहा पिंगले परत्रभुवनींगेलीस मातें तूं सांडोनीहदय पिटी दणाणोनीमहीं मस्तक आफळीतसे
१३०
हें पिंगले आसनीं शयनींमज बैसवीत होतीस अंतःकरणीआतां माझा विसर धरोनिकैसी राहसी परत्र
१३१
अहा पिंगले तुजवांचूनसर्वत्र मातें दिशा शून्यअहा पिंगला माझा प्राणकुडी टाकून गेलासे
१३२
अहा पिंगले तुजवांचूनसर्वत्र मातें दिशा शून्यशून्यमंदिरीं निद्राशयनकैसें येईल सांग पा
१३३
अहा पिंगले माझी अधिकजाणत होतीस तृषाभूकआतां निष्ठुर मन केलें निककैसी सांडूनि गेलीस तूं
१३४
अहा पिंगले माझे शयनींहोतीस मृदु भाषणें करुनींपाहतां उर्वशी दिसे नयनीसंतोष माझा होतसे
१३५
ऐसें पाहूनि सुगंधद्रव्य मीरुंजी घाली षटपदकामीऐसें सुखसरितासंगमींसुख कोठें पाहूं आतां
१३६
यापरी पिंगले तव गुणदयचें भांडार मुक्त करुनकीं जगाचें करिसी पालनधर्मानुकूळें सर्वस्वीं
१३७
ऐसिया प्रज्ञेचें पहुडपणपिंगले कोठें मी जाऊनऐसें म्हणूनि धडाडूनधरणीं अंग सांडीतसे
१३८
यापरी सर्व जाणोनि लोकरायाचा पाहूनि शोकगहिंवर येतसे आणीकशोकशब्देंकरुनियां
१३९
कीं तरु मलयागरागंधी मिरवती समग्रातैसें रायाच्या शोकपाराशोकें व्याकुळित जाहले
१४०
असो हा ग्रामांत वृत्तांत सकळांकळला परी सुखवसा झालाजैसा प्राण जावोनि आलाशवशरीरा पुन्हां कीं
१४१
मग गांवीचें ग्रामजनस्मशानाजवळी आले धावोनपरी रायाचा शोक पाहूनतेही तैसेचि होती पैं
१४२
परी तो मायिक सहजस्थितींदुःखरहित शोकावरतीजैसे बहुरुपी खेळाप्रतीशूरत्व मिरविती अपार
१४३
कीं गुर्जरदेशीं चाल सधनरुदन घेती मोल देऊनतैसे घरचे सर्व जनयेती प्रेतसंस्कार करावया
१४४
तन्न्यायें शोक करीतराव पडला शोकार्णवांतन वर्णवे तो आकांतअल्प येथे वर्णिला
१४५
असो ऐसी रुदनस्थितीज्याची त्याला माया चित्तींपरी ते लोक अभाव नीतींसमजाविती रायातें
१४६
तुम्ही सर्वज्ञ सकळराशीबोध करिता अन्य जनासींहोऊनी गेलें होणारासीआश्चर्य याचे कायसें
१४७
म्हणती महाराजा भविष्योत्तरहोऊनि गेलें ते होणारतयाच शोक करणें चतुरयोग्य आम्हां दिसेना
१४८
अशाश्वताचा शोक करणेंतरी काय शाश्वत आपुलें जिणेंपिंगला गेली आपणही जाणेंकदाकाळीं सुटेना
१४९
पहा आपुले पूर्वज अपारमृत्यु पावले समग्रएकामागें एक सर्वत्रगेले न राहिले मेदिनी
१५०
कीं आजा गेला नातु उरलाऐसा कोणी पाहिलातरी अशाश्वताचा घट भरलारिता होय क्षणमात्रें
१५१
तरी हे सकळ अशाश्वतपणपूर्ण मानिती ज्ञानवानतरी तयाचा शोक करुनव्यर्थ जीवा कष्टवितां
१५२
अहा पाहती जपी तपीसिद्ध साधक नानारुपीकोण वांचले देहसंकल्पीमृत्युभुवनीं महाराजा
१५३
तरी जी जी जाईल घडीतीं सुखाचीच मानावी प्रौढीईश्वरनामीं ठेवूनि गोडीचित्त स्थिर असावें
१५४
ऐसें बोधितां सर्वही जगयुक्तिप्रयुक्तीं नानाबोधपरी रायाचे हदय चांगशोककाजळी उजळेना
१५५
मग ते ग्रामीचे सकळ जनथकित झाले बोध करुनएकामागें एक उठोनआपुल्या सदना सेविती
१५६
असो तीही लोटली रात्रीउदया आला गभस्तीपिंगलाचितेची पाहुनि शांतीपावक झाला अदृश्य
१५७
मग तो मानूनि दुसरा दिनपुन्हां पातले आप्तजनउत्तरक्रिया संपादोनअस्थिमिलन केले तैं
१५८
तें भर्तरीरावें पाहूनचित्तीं विचार करितां पूर्णघेऊं देईना अस्थिसंचयनस्पर्श कोणा न करवी
१५९
आपण बैसूनि चिता रक्षीतकोणा लावूं देईना हातमग ते आप्त जन समस्तपुन्हां गेले माघारे
१६०
परी तो राव तैसाचि चितेंतबैसता झाला दिवसरातअन्नपाणी त्यजूनि समस्तपिंगला पिंगला म्हणतसे
१६१
मग हें निर्वाणीचें वर्तमानमिथुळेसी दूत सांगती जाऊनराव विक्रम करितां श्रवणनिघता झाला तेथोनी
१६२
सत्यवर्मादि शुभविक्रमविक्रमादि सुमति प्रधानपरम शोकार्णव रचूनअवंतिके पातले
१६३
मग येतांचि स्मशानवाटींपिंगला आणूनि चित्तदृष्टिपरम शोकें जाहला कष्टीशोकसिंधूंत निमग्न
१६४
आठवी सर्व कन्येचे गुणम्हणें मम हातीचें गेलें निधानविक्रम म्हणे मम गृहीचे रत्नकाळतस्करें नेलें कीं
१६५
अहा माउली उभयकुळांततारक झाली भवसरितेंतपुन्हां दीपाची लावी वातअदृश्य कैसी झाली वो
१६६
अहा स्त्रीकटकीं अंतःपुरींमुख्य मिरवीत होती सज्ञानलहरीजैसा हस्ती चमूभीतरीचांगुलपण दावीतसे
१६७
रुपवंत गुणवंतसर्व लक्षणीं ज्ञानवंतसूचक सदा सर्वकाळ संगोपीतचित्त सकळांचे लक्षी कीं
१६८
ऐसे आठवोनि नाना गुणशोक करी अति दारुणमग विक्रम नृपति पुढें होऊनभर्तरीलागीं समजावी
१६९
नाना युक्ति नाना वचनभर्तरीचें बोधी मनपरी तो नायके पिसाटपणपिंगला पिंगला वदतसे
१७०
परी राव बोध करितां उत्तमलोटून गेला दिन दशममग विक्रमें उत्तरक्रिया करुनशुचिर्भूत जाहला
१७१
यापरी पुढें तेरावे दिवशींजातिभोजन दानमानेसीसर्व उरकोनि राज्यासनासीघेऊनि राव बैसला
१७२
भर्तरी न सोडी स्मशानवाटिकाधरुनि बैसला अचळ निकाजैसा वृंदे धरुनि हेकाविष्णु बैसला स्मशानीं
१७३
ऐसेपरी अचलपणमिरवता झाला मित्रनंदनपरि नित्य नित्य विक्रम येऊनबोध त्यातें करीतसे
१७४
ऐसा बोध करितां नित्यद्वादश वर्षे लोटलीं सत्यपर्णतृण भक्षूनि जीवितउदकआहारें राखिलें
१७५
अहा देवा अनाथनाथाकैसें केलें त्वां अनंतापिंगला माझी सगुण कांतातूतें कैसी आवडली
१७६
ऐसें म्हणोनि नामोच्चारशोक करीतसे वारंवाररात्रदिवस चित्तीं विसरपिंगलेचा पडेना
१७७
कृश शरीर झालें तेणेंकंठी उरलासे प्राणमुखीं आणूनि हरीचें नामशोकें पिंगला वदतसे
१७८
ऐसीं लोटलीं द्वादश वर्षेशुचिष्मंत झालें शरीर कृशतें पाहूनियां अति क्लेशमित्रावरुणी द्रवलासे
१७९
पुत्रमोहाचे अपार भरतेंलोट लोटले चित्तसरितेमग मित्रावरुणी तुष्टोनि मनांतअत्रिजानिकटीं पातला
१८०
तंव तो प्राज्ञिक अत्रिनंदनमित्रावरुणीस सन्मान देऊनम्हणे महाराजा कामना कोणधरुनि येथें आलासी
१८१
येरी म्हणे जी द्विजोत्तमाज्ञानलतिकेच्या फलद्रुमाजाणत असूनि पुससी आम्हांअज्ञानत्व घेऊनि
१८२
तरी तव शिष्य जो भर्तरीत्याची कैसी झाली परीतें हदयीं आणूनि हितातें वरीविलोकी कां महाराजा
१८३
मग तो महाराजा ज्ञानवानहदयीं पाहे विचारुनतों विपत्काळीं शोकेंकरुनभर्तरीनाथ मिरवला
१८४
अति क्लेश तयाचे पाहूनपरम द्रवला मोहेंकरुनमग मित्रावरुणीतें बोले वचनचिंता न करी महाराजा
१८५
तुम्हीं जावें स्वस्थानासीमी भर्तरीचे आहे उद्देशींस्वहित करीन चिंता मानसींपाळूं नका महाराजा
१८६
माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथतयाचा गोरक्ष प्रज्ञावंततो महीं भ्रमत करीत तीर्थयेथें येईल महाराजा
१८७
तो परम आहे प्रज्ञावानतयासी तेथे पाठवीनतो नाना प्रयुक्ती करुनशुद्ध पंथा आणील कीं
१८८
ऐसें बोलता मित्रावरुणीसीसंतोषें मिरवला तो चित्तासीमग पुसूनी अनसूयात्मजासीस्वस्थानासी पैं गेला
१८९
यावरी पुढील अध्यायीं कथा सुंदरअध्यात्मदीपिका मनोहरमालू सांगे धुंडीकुमरनरहरीकृपेंकरोनियां
१९०
दत्त सांगेल गोरक्षनाथागोरक्ष येऊनि विरहसरिताशोषण करील तत्त्वतांघटोदभवाचे कृपेनें
१९१
स्वस्ति श्रीभक्तिकथासारसंमत गोरक्षकाव्य किमयागारसदा परिसोत भाविक चतुरअष्टाविंशति अध्याय गोड हा
१९२

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

॥ श्री नवनाथाय नमः ॥

या अध्यायाचे वाचन झाले?

तुमची नोंद या ब्राउझरमध्ये जतन होते.