॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद

श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी

अध्याय २७

विक्रम राजाचा सुमेधावतीबरोबर विवाह, भर्तरीचा पिंगलेबरोबर विवाह व दत्तात्रेयाची भेट. १९२ ओव्या · कथासार वाचा

श्रीगणेशाय नमः जयजयाजी जगदुद्धाराविश्वव्यापका विश्वंभराजगसृजित्या करुणाकरादिगंबरा आदिपुरुषा
पूर्णब्रह्म सनातनापंढरीअधीशा रुक्मिणीरमणापुढें ग्रंथरचनामहिमानाबोलवीं कां महाराजा
मागिले अध्यायीं निरुपणभर्तरी आणि दुजा विक्रमप्रेमसागरीं भक्ति प्रेमउभय सरिता लोटल्या
मग ते उभयतां एक दुर्गीग्रास रक्षिती एक प्रसंगींतों एके दिवशीं शुभमार्गीदैव उदया पातलें
मोक्षपुर्यां असती सप्तमतयांतील तें अवंतिका ग्रामतेथील नृपति नरेंद्रोत्तमशुभविक्रम विराजे
तया जठरीं ती सूक्ष्म वेलीसकळ देहीं संचार पावलीपावली परिभवें परतलीसंभव तो न ये सांगावया
ऐसी कन्या असें उदरींतीही धाकुटी बरवंटावरीकीं लवणाब्धीची लहरीमदनबाळी शोभतए
नाम जियेचें सुमेधावतीतीक्ष्णबुद्धि असे युवतीपरी चंद्रकला नक्षत्रज्योतीसांग स्वरुपीं मिरवतसे
तंव कोणे एके दिवशींबैसली होती रायापाशींरायें परम लालनेसीअंकावरी घेतली
परम सौंदर्य मुखमंडनरायें कवळुनि घेतलें चुंबनउपरी कल्पने वेधले मनवराविषयीं
१०
मग सुमति मंत्री पाचारुनीबोलता झाला शुभविक्रम वाणीम्हणे सुमेधावती मम नंदिनीउपवर ती दिसतसे
११
तरी इतुके स्वामित्वपणपुरुष योजावा दिव्यरत्नयावरी मंत्री बोले वचनराजउक्ती ऐकूनियां
१२
म्हणे महाराजा सुरतयोगजराव्यापक सर्वागऐसिया काळीं विषयरंगसरसावला तुम्हांतें
१३
उदरीं नाहीं वंश संततीजरा व्यापिली शरीराप्रतीतरी कामना एक वेधली चित्तींसुमेधावतीकडूनियं
१४
तरी स्वआत्मजा लावण्यराशीदावितों पहा जया वरासीत्यांते स्थापूनि राज्यासनासीकरावें सुरत वैभवातें
१५
मग तो वर जामातसुतउभयपणीं या जगांतमिरवूनि जरेतें सकळ हितसंगोपील तुम्हांसी
१६
तरी ऐसिये मम वचनसिद्धार्थ करा आपुलें मनतरी सुत घ्यावा कन्या देऊनपुढिलिया सुखातें
१७
ऐसें मंत्री बोलतां वचनमान तुकावी शुभविक्रमम्हणे अवश्य ऐसोंचि करणेंयोजिलिया अर्थातें
१८
तरी प्राज्ञिक एक यांतगोष्ट सुचली आहे मातेंआधीं योजूनि अधिकारातेंवरी जामात मानवावा
१९
तरी प्राज्ञिक करावें ऐसेंसमारंभीं गजशुंडेसमाळ ओपूनि राज्यासनासस्वामित्वपणीं मिरवावें
२०
मग तो सहज ईश्वरीसत्तेंलोकांत मिरवेल महीपतीकन्या अर्पूनि उपरांतींसर्वसुखा ओपावें
२१
ऐसें बोलतां शुभविक्रम नृपतीतेंचि मानलें मंत्रिकाप्रतींमग शुभमाळा मंडपक्षितींमहोत्सव मांडिला
२२
पाहूनि दिन सुदिन मासउभारिलें मंडपासगुढ्या तोरणें पताकांसराजसदन शोभलें
२३
वस्त्राभरणीं कनककोंदणींभूमीं मिरवला कुंजर रत्नीदिव्यमाळा शुंडी ओपूनीनगरामाझारी संचरला
२४
मागें मंत्री मानव विप्रांसहितचक्षुदीक्षा करी नृपनाथतों दिव्यकुंजर घेऊनि माळतेंनगरामाजी संचरला
२५
आधीं सभामंडपीचे जनदिग्गजें सर्व विलोकूनउपरी नगरामाजी गमनकरिता झाला कुंजर तो
२६
मग सकळ ग्रामीचे ग्रामजनपाहती ठाई ठाई उभे राहूनतों ग्राम शोधीत दुर्गी येऊनविक्रमाते विलोकी
२७
गज येऊनि दुर्गानिकटउभा राहे न चाले वाटतो दुर्गी विक्रमासह हे अष्टसेवाधारी असती कीं
२८
गज खुंटतां पाहे नृपतीखालीं पाचारी अष्टांप्रतीएकामागें एक उतरतीदुर्गपाययासत विशाळ
२९
तों सर्वामागूनि उतरतां विक्रमगज आनंदोनि धावे सप्रेमकुसुममाळा ग्रीवेलागूनशुंडादंडे ओपिली
३०
माळा ग्रीवे ओपितां गजवाद्ये वाजती जाहले चोजगजस्कंधीं वाहूनि राजश्रृंगारमंडपी आणिला
३१
मग ओपूनियां कनकासननिकट रायें मंत्री बैसवूनपरी सहज चर्चा जातीलागूनकुल्लाळशब्द निघाला
३२
तेणें करुनि राव चित्तींकांहींसा झाला साशंकितमग मंत्रिका नेऊनि एकांतीकुल्लाळशब्द दर्शवी
३३
म्हणें योजिल्या अर्थाप्रतीभिन्न अर्पाया सुमेधावतीआम्हां क्षत्रियां कुल्लाळजातीवर्ण भिन्न दिसतो हा
३४
ऐसें बोलता शुभविक्रमरावमंत्रांही व्यापिला संशयभावेंपरी तो सर्वज्ञ शोधार्णवराव घेऊनि वहिवटला
३५
सवें येऊनि मंडपाबाहेरत्या अष्ट सोबत्यां बोलावूनि बाहेरनिकट बैसवूनि जातीविचारपुसतां झाला तयांसी
३६
ते म्हणती नेणों कोण जातीकुल्लाळ म्हणती विक्रमाग्रतींपरी याचा शोध कुल्लाळजातींकवणालागीं पुसवा
३७
मग तो मंत्री परस्परेंकमठा पाचारुनि वागुत्तरेंएकांतीं नेऊनि परम आदरेंजातिवृत्तांत पुसतसे
३८
मग तों कमठ मुळापासूनसांगता झाला विक्रमकथनमाता क्षत्रियकुळीं सत्यवर्ममिथुळापतीची दर्शवी
३९
याउपरी पिता सुरोचनदर्शवी स्वर्गीचे गंधर्वरत्नऐसें ऐकतां वर्तमानमंत्री तोषमान होतसे
४०
मग कमठासी नेऊनि रायासमोरतेथेंही वदविलें वागुत्तररावही ऐकूनि तें उत्तरपरम चित्तीं तोषला
४१
तोषूनी मंत्रिका पुन्हा बोलतमंत्री म्हणे कमठ घेऊनि आंतमीच जातों महाराज्यांततरी पाचरण पाठवा सत्यवर्म्यातें
४२
अवश्य म्हणे शुभविक्रमनृपतीबोळविता झाला मंत्रिकाप्रतीमग कमठ आणि मंत्री सुमतीमिथुळेलागीं पातले
४३
राये सत्यवर्मे ऐकूनसदनीं नेलें गौरवूनमग कमठ मंत्री सत्यवर्मएकांतासी बैसले
४४
ते एकांती कमठ विचारसांगता झाला सविस्तरकीं सत्यवतीचें उदेलें जठरविक्रमफळ मिरवलें
४५
तरी आतां दैवेंकरुनपौत्रा लाभलें राजचिन्हतरी संशयद्रुम आपण चालूनमुळापासूनि खुडावा
४६
ऐसी सांगूनि सकळ कथायोगक्षेमाची सांगितली वार्तास्वर्गवास गंधर्वजामाताझाल्यासह कथियेलें
४७
रायें ऐकूनि सकळ विस्तारचित्तसरिते आनंदपूरदाटोनि पृतनेसह संभारशुभविक्रमसंगमीं मिळाला
४८
भेटून सत्यवतीतेंसकळ पुसूनि वृत्तांतातेंमग शुभविक्रमरायाचे चित्तींअंतीं पांग फिटला
४९
याउपरी सुघोषमेळीविक्रम अभिषेकिला राज्यनव्हाळींमग राज्यपदीं तयें काळींबैसविला महाराजा
५०
छत्रचामरें माथां मिरवतीतें राज्यासनीविक्रम नृपतिगहिंवरोनि तोषविला प्रजापतीयाचकां धन वांटिलें
५१
ऐसा समारंभ झालियापाठींमग सुमेधा अर्पिली गोरटीतोही आनंद महीपाठींमंगलाचा भिरवला
५२
यापरी सत्यवर्मपरम संस्काराचा आनंद घेऊनआपुलें राज्य विक्रमा देऊनउचित आनंद संपादीत
५३
सत्यवतीउदरींचे रत्नराज्य ओपिले तया आंदणउभयराज्यीं सार्वभौमविक्रमनृपति मिरवला
५४
असो ऐसी वहिवाट करुन निघता झाला सत्यवर्मयेरीकडे राव विक्रमभर्तरीतें ओपी युवराज्या
५५
मग उभय बंधु समाधानींराज्य करिती अवंतिकास्थानींतों सुमंत मंत्रिका एके दिनींअर्थ एक सूचला
५६
कीं आपुली कन्या पिंगलादेऊं राया भर्तरीलामग विक्रमा पुसूनि सोहळाशुद्ध तिथि लग्नाची
५७
परी ते तेथें विक्षेप आला अवचिताकुटाळ मिळाला रजक तत्त्वतांमंत्रिका आराटूनि सांगे वार्ताशोध करा जातीचा
५८
ऐसें बोलतां रजक त्यातेंपुन्हां बोलविलें कमठकुल्लाळातेंत्यातें पुसतां सविस्तर तेंकुल्लाळ म्हणे श्रुत नाहीं
५९
मग सत्यवतीतें विचारीतभर्तरी तुमचा कैसा सुततीही म्हणे उदरव्यक्तभर्तरी नव्हे माझा कीं
६०
ऐसी ऐकूनि तयाची उक्तीविक्रमा विचारी मंत्री सुमतीतोही म्हणे नेणों जातीबंधु मानिला भावार्थे
६१
ऐसें बोलतां राव विक्रमसंशयीं पडला मंत्री सुगममग भर्तरीस पुसता झाला वर्मप्रांजळ सांगे भर्तरी
६२
मित्रावरुणीरेतापासूनवनांतरीं वाढलों हरिणीपासूनभाटसंगतीं व्यवसायादि करुनसकळ कथन निरुपिलें
६३
परी मंत्रिका न पडे विश्वासचित्तीं म्हणे स्वकार्यासऐसें भाषण करीतसे विशेषसत्य केवीं मानावें
६४
तरी आतां असो कैसेंहा म्हणवितो मित्रपिता आम्हांसतरी याचे हस्तें मित्रावरुणीसकार्यालागीं पाचारावें
६५
ऐसें मंत्री चित्तीं योजूनीम्हणे तुमचा पिता मित्रावरुणीतरी स्वमंगलातें बोलावूनीआम्हां दृष्टीं दाखवा
६६
भर्तरी असे तुमची मातातरी ती झाली विगलितापरी लग्नविधातें आपुला पितासोहळा घेऊनि पाचारा
६७
ऐसें बोलतां मंत्री त्यातेंम्हणे अघटित काय यातेंमग उभा राहूनि अंगणातेंऊर्ध्वदृष्टीं करीतसे
६८
म्हणे मित्रावरुनी मम ताताहा देह असेल तव रेतातरी मज बाळाची धरुनि आस्थामंगलासी येई कां
६९
ऐसे बोलूनि दीर्घवाणींघ्यान करीतसे आपुलें मनींहें जाणवलें अंतःकरणींमित्रावरुणीच्या तेधवां
७०
मग वातचक्रीं आगमनअवंतीनगरीं स्वतां येऊनबोलता झाला मंत्रिकालागूनशुभविक्रम रायाच्या
७१
म्हणे मंत्रिका सर्व सुमूर्तीसकळ संशयाची सांडी भ्रांतीमम सुता विवाहाप्रतीकन्यादान ओपी कां
७२
म्हणसील जरी मंगळा निकवराचा सिद्ध असावा जनकतरी पुष्पवृष्टि मंगळघोषसुरवरां हातीं करवीन
७३
याउपरी राया विक्रमाच्या तातातेंसुरोचन गंधर्वा पाठवीन येथेंसकळ संशय सांडूनि त्वरितेंसुखें द्यावी पिंगला
७४
म्यां जरी यावें मृत्युभूमींतरी दाहतील बहुत प्राणीतस्मात् सकळ संशय सोडोनीपिंगला अर्पी मम सुता
७५
ऐसें तन्मुखींचें ऐकूनि वचनपरितोषलें मंत्रिकाचें मनसकळ संशयातें सांडूनलग्नसोहळा मांडिला
७६
मग नेमिल्या तिथीस सीमांतपूजनते संधींत उतरला गंधर्व सुरोचनस्वकांता सत्यवतीसी भेटूनविक्रमांते पाचारी
७७
विक्रम येऊनि त्वरितात्वरिततातचरणीं माथा ठेवोतमग बोलावूनि सुमंत्रिकातेंसुरोचनातें भेटवी
७८
असो सुरोचन गंधर्वपतीदिव्यतेजे पाहूनि क्षितींअतिनम्र होऊनि चित्तींनिकट बैसे गंधर्वी
७९
निकट बैसतां सुरोचनम्हणे सुमति तूं दैववानप्रत्यक्ष धृमीनारायणसोयरा केला जामात
८०
अरे भर्तरीपुत्र अवतारदक्षमित्रावरुणीचा अवतार प्रत्यक्षतुवां जामात केला प्रत्यक्षसकळ दैवां मिरवला
८१
ऐसें बोलतां सुरोचनपुन्हां वंदिता झाला चरणम्हणे मम भाग्य खरें उत्तमसोयरे झाले देव कीं
८२
तरी मी एक अर्थाअर्थीदैववान असें त्रिजगतींतरी चलावें मंडपाप्रतीकरुं सीमांतपूजना
८३
अवश्य म्हणोनि सुरोचनमानववेषीं मंडपीं येऊनसमारंभें करिती सीमांत पूजनकरुनि विधि उरकिला
८४
वधूवरांतें आशीर्वाद देतांकुसुमें वर्षती स्वर्गदेवताअष्टके झालिया करतलहस्ताटाळी पिटिती आनंदें
८५
मग नाना वाद्यांचा गजरतेणें कोंदलें सकळ अंबरस्वर्गी गर्जती जयजयकारसुरवर विमानी बैसूनियां
८६
असो पांच दिवस उत्तम सोहळानाना रत्नरंगमाळासकळ तोषवूनि वर्हायळपाळाबोळविलें सुमतीनें
८७
याचकांसी अपार धनरायें बोळविलें देऊनएक मास गंधर्व सुरोचनतया ठायीं राहिला
८८
वरपिता मिरवला सुरोचनवरमाय सत्यवतीरत्नअसो सकळां पुत्रसोहळामानसुमतीनें ओपिला
८९
यापरी एक मासाची अरुतीसुरोचन तोषविला सहसत्यवतीमग विचारुनि शुभविक्रमरायाप्रतीस्वस्थानासी पैं गेला
९०
येरीकडे अवंतिकेंतदिवसेंदिवस लोटले बहुतपिंगला नामें स्वरुपवंतऋतकाळ पावली
९१
मग उभयतां एकपणेंसदा विचरती संतोषमनेंयाउपरी भर्तरीनें लग्नें केली अमूप
९२
द्वादश शत कामिनी करोनिसदा विचरे भोगासनींपरी मुख्य दारा पिंगला नामींपट्टराणी मिरवत
९३
जैसा नवलक्ष नक्षत्रांततेजें मिरवे नक्षत्रनाथतेवीं द्वादश शतांतपिंगला नामें मिरवतसे
९४
असो युवराज्याच्या मंडणींभर्तरी राणा मिरवे भूषणींपरी तयासमीप हिरकणीपिंगला मिरवे वैडूर्या
९५
कीं अर्का शोभवी रश्मिकिरणकीं घृतीं शर्करा दावी गोडपणतेवीं भर्तरी पिंगलारत्नस्वस्वरुपीं मिरवतसे
९६
ऐसें उभयतांचें एकचित्तकीं लोह मिळालें चुंबकांतकीं कर्दम उदकातेंकदाकाळीं सांडीना
९७
सभामंडपीं राय असतांपरी पिंगलेस वदे सदा चित्तारायासही न गमे तीतें पाहतांघडोघडी पाहतसे
९८
पाहूनियां पिंगलेचें वदनमग राया सुचे कारभार पूर्णजैसें अमालिया पूर्णअमल सर्वदा पाहिजे
९९
तन्न्यायें उभयतांशींऐक्यप्रीति वर्ते प्रपंचासीऐसें लोटतां बहुत दिवसींवय अर्धे पातलें
१००
तों एके दिवशीं पारधीलागूनीराव जातसे घोर विपिनींतों वरुनि पाहे मित्रावरुणीपुत्रचंद्र दृष्टीनें
१०१
पाहतां विचारी मनांतकीं मम वीर्याचे उदेले सुतएक अगस्ती दुसरा भर्तरीनाथमृत्युभूमी कारणें
१०२
परी त्यांत अगस्तीनें हित केलेंचपळपणानें स्वयंभ वरिलेपरी भर्तरीचें मन गुंतलेराज्यवैभवाकारणें
१०३
तरी अहिताचा विषयप्यालाराया भर्तरीस गाड वाटलाहितालागीं सर्वस्वीं चुकलाअचलपद तोचि राया
१०४
तरी हा विषयपदापासूनकैसा सुटेल स्वबुद्धीनेंयाचें हित याजकारणेंप्राप्त कैसें होईल कीं
१०५
नवनाथांतील अवतारधृमीनारायण महाथोरपरी वेष्टिला विषयतिमिरसुटेल कैसा कळेना
१०६
ऐसा मोह उपजोनि पोटींउतरता झाला महीतळवटींअनुसूयात्मजाची घेऊनि भेटीवर्तमान निवेदिलें
१०७
म्हणे महाराजा योगद्रुमाकाम वेधला आहे आम्हांतरी त्या कामाची सत्यभावनाऐकूनि घेईं महाराजा
१०८
तुम्ही विजयप्रतापध्वजमिरवलां महीं तेजःपुंजतरी मिरवला मम आत्मजमच्छिंद्रासम भर्तरी
१०९
तूं रायपंथ मिरवूनसच्छिष्य मिरवले जगांत रत्नते चित्तीं मम नंदनप्रविष्ट करीं याचि जागीं
११०
यावरी बोले अनुसूयासुतचिंता न करीं भर्तरीनाथमाझे प्रसादे जाण सत्यजगामाजी मिरवेल
१११
मिरवेल परी कैसे रीतींचिरंजीव शोभे महीवरतीयावत् मही तावत् जतीभर्तरीनाथ मिरवेल
११२
हें पूर्वीच भविष्योत्तरआहे समर्था मम गोचरदिधलें उत्तर केलें वागुत्तरमम वचनीं सर्वथा
११३
तरी आतां संशयासीं न रहावेंआतां स्वस्थचित्त असावेंमी यत्न करुनि भर्तरीरावनाथपंथीं मिरवीन
११४
ऐसें बोलूनि अत्रिनंदनबोळविला मित्रावरुणआपण तेचि घडी कृपा करुनभर्तरीपासीं जातसें
११५
तों येरीकडे भर्तरी नृपतीपारधीस्तव काननाप्रतीमृगयेकरितां हिंडे निगुतीनाना वनें उपवनादि
११६
सवें सेना अपरिमितविपिनीं विस्तारली कृतांतवतचवदा लक्ष वाताकृतवाजी फिरती विपिनीं ते
११७
हेमतगटीं शृंगारासहितपाखरा झालरी शोभती मुक्तअलंकारें कोंदणयुक्तरत्नें मिरवी नवविध
११८
तरी ते शृंगार म्हणा वाचेकीं मोहर उजाळें नक्षत्रांचेंतेवीं रत्नें चमकपणाचेभाव दाखविती नक्षत्रांचे पै
११९
अहो ते हय न म्हणूं वाचेरत्न उदेले उदधिउदराचेंतेणे इंदिरा हर्षोनि नाचेबंधू म्हणोनि शृंगारी
१२०
त्याचि नीतिं एक लक्षदिनसमान गज प्रत्यक्षविशाळ शुंडादंड सुलक्षचंद्रतेज मिरवले
१२१
मिरवले परी कैसे भावेंइंदूस मानलें बंधुभावेंम्हणोनि सर्व पूर्ण स्वभावेंचमत्कार दावीतसे
१२२
त्याही दंती शुद्धकोंदणींचुडे मिरवती हाटकखाणीत्यांत हिरे नक्षत्रें आणोनीइंदुराज मिरवितसे
१२३
आणि स्वतां तोचि मुक्तासंपत्तीवरदबाळ ओपित्याप्रतीझालरी अग्रगण्य निगुतींएकसारा अर्चियेल्या
१२४
चांदवे अंबारी कोंदणयुक्तनवरत्नादि सगुण मुक्तकळसतेजीं लावूनि आदित्यम्हणती विसावा घेई कां
१२५
आणि रायासमान पंचशतराजविनवणी प्रज्ञावंतसरदारनामीं भूषणभरितमूर्ती जेवीं गभस्तीच्या
१२६
तयां माथां कनकचीरसहज तेज छत्र चंद्राकारतयांच्या कळसदीप्तीवरभानुतेज लाजतसे
१२७
रायामाथीं अर्धशतकनक अंबरीं हाटक व्यक्तपाच माणिकी मणियुक्तहेमें गुंफिल्या झालरी
१२८
ऐसिया छत्रकळसउद्देशींवैडूर्यरत्नें जडिल्या राशीपद्मरागें आदित्य मानसींविरह करुं म्हणतसे
१२९
विरह तरी केउता तरणीव्यर्थ फिरतसे अंबरभ्रमणीतरी वैडूर्यरत्नांच्या पंक्तींलागुनीयेऊनि सुख भोगी कां
१३०
वनें विरहे उदास चित्तींअस्ताचळीं जातां गभस्तीचतुर्थ प्रहरीं शिणली वृत्तीरत्नपंक्ती इच्छितसे
१३१
असो आतां विरहअर्कम्हणे संपत्ती मिरवला मम बाळकतेणें तो अर्क पावूनि सुखअस्ताचळा मावळतसे
१३२
असो ऐशा भाषणस्थितींअचाट विपिनीं भर्तरी नृपतीमृगया करितां वाताकृतीकाननांत हिंडूनिया
१३३
परी समयास आला मास चैत्रपुत्रचंद्रा पहावया मित्रस्थिरावे तेणें रश्मि उलटयंत्रकाननांत लखलखी
१३४
तैं रश्मीचें तीव्रपणचमू हळहळी तृषेंकरुनमग राव भर्तरी मृगया सांडूनउदक शोधूं धावतसे
१३५
परी पंचत्रयचतुर्थीतकाननविरहित योजनशतउदक न दिसे ऐसें भावीतकानन रुक्ष मिरवतसे
१३६
फार व्यापिले तृषेंकरुनकोणी सोडूं पाहती प्राणकोणी हिंडोनि रानोरानलवन जीवन पहाती
१३७
कोणी त्रासूनि पाला भक्षितीकोणी लघुशंका सेवितीकोणी तरुच्या सावलीं क्षितीधरुनियां पडियेले
१३८
ऐसी पृतना आहाळपणीव्यापिली आहे तृषेंकरुनीरावही तैसाच क्लेशें काननीपाणी पाणी म्हणतसे
१३९
प्राण झाला कासावीसहदयीं न सांठवे श्वासोच्छवासमुखीं कोरड पडली विशेषजिव्हा लोटूं लागलीसे
१४०
ऐसें क्लेशाचे प्रकरणींश्रीदत्तात्रेय काननींगुप्तवेषें असोनीरायामागें हिंडतसे
१४१
तो विपिनीं मध्यें गोंगावतकाय करी अत्रिसुतमायेचें सरोवर रचूनि तेथछंदे व्यक्त दाखवी
१४२
निर्मळपणीं गंगाजळदाटोनि पात्र उचंबळेकुमुदिनी विकासित घालूनि पाळेनांदताती सभोंवती
१४३
आणि तया सरसीकांठीबहु फलित तरुदाटीअनेक पक्षी मराळकोटीपंक्तिसरी दाटल्या
१४४
शीतळ छाया शीतळ जीवनसरोवर मिरवले गहिंवरपणेतये तटीं पर्णकुटी करुनअत्रिआत्मज मिरवला
१४५
तों येरीकडे नृपनाथक्लेशें हिंडतां काननांततों सरोवर ठायीं देखोनि अकस्प्रातएकटाचि पातला
१४६
परमदेखूनि गहिंवरें जीवनधांव घेतसे नृपचिद्ररत्नसरसीकांठीं जाऊनजीवन स्पर्शू टेंकला
१४७
आतां स्पर्शावें ओंजळांततों तिकडूनि उठला अत्रिसुतप्रत्योदक करें कवळूनि हातरायावरी धांवला
१४८
अरे अरे वाचे म्हणूनम्हणे न स्वीकारीं माझे जीवनतूं कोणाचा आहेस कोणआधीं माते सांगें की
१४९
येरी पावोनि देहातेंभयें दाटलां नृपनाथकांहीं न बोले क्षितींतटकमकां पहातसे
१५०
अवधूत म्हणतसे कां रे मौनधरुनि कांहीं न बोलसी वचनमाता पिता गुरु कोणतव देही मिरवले
१५१
मातापिता गुरुसहितसांगूनि करीं उदकपानातेंनातरी सेवितां पावसी मृत्युजीवन येथेंचि हें राया
१५२
ऐसें ऐकूनि भर्तरीनाथपदावरी लोटला त्वरितनमूनि जन्मकथेसहित अत्रिसुता सांगितलें
१५३
भर्तरीमाता पात्रसांठवणींपिता मिरवला मित्रावरुणीऐसें प्रकरण दत्तालागुनीमूळापासोनि सांगितलें
१५४
येरी म्हणे गुरु कोणभर्तरी म्हणे नाहीं अजूनऐसें ऐकूनि अत्रिनंदनबोलता झाला तयासी
१५५
म्हणे राया व्यवस्थितमिरवलासी या देहातेंअद्यापि गुरु नाहीं तूतेंभ्रष्टबुद्धि मिरविसी
१५६
तरी तूंख पूर्वीचा परम पापिष्ठम्हणूनि गुरु न मिळाला वरिष्ठतरी आतां क्रियानष्टस्पर्श न करी जळातें
१५७
तुवां स्पर्श केलिया पाणीसकळ तोय जाईल आटोनीनिगुरुत्वाचा विटाळ मानूनीतोय त्रासा पावेल
१५७
तुवां स्पर्श केलिया पाणीसकळ तोय जाईल आटोनीनिगुरुत्वाचा विटाळ मानूनीतोय त्रासा पावेल
१५८
मग तोय आटल्या निगुतींमम कोपाची पावकशेखीआसडोनि तव देहाप्रतीभस्म करील क्षणार्धे
१५९
ऐसें बोलतां अत्रिनंदनभर्तरी करीतसे नमनम्हणे महाराजा तृषें प्राणजात आहे माझा कीं
१६०
तरी आता अनुग्रह देऊनआपण वांचवा माझा प्राणदत्त म्हणे तव अनुग्रहास मम मनद्यावया योग्य दिसेना
१६१
अरे मम अनुग्रहासाठीशिव विरिंची घालिती मिठीतरी अनुग्रहातें पूर्ण कोटीतुझे पदरीं दिसेना
१६२
ऐसे भागले थोर नायकतरी नातुडे अनुग्रह दोंदिकतों तेथे तूं मशकअनुग्रह वांछिसी
१६३
भर्तरी म्हणे हें तो निश्वितपरी तृषेनें होतों प्राणरहिततुम्ही कृपाळु परम संतदया क्षमा पाळितां
१६४
जगाचें न साहे कीचकपणत्वरेंचि हरतां दैन्याकारणतरी माझा वांचवूनि प्राणधर्मसाधन मिरवावें
१६५
ऐसें ऐकतां तपोराशींम्हणे अनुग्रह देईन तुजसीपरी पूर्ण तप द्वादशवर्षीआचरावें या स्थळा
१६६
त्या तपःपुण्यांशेंकरुनयोग्य होसील अनुग्रहाकारणराव म्हणे सध्याचे प्राणतृषेंकरोनि जातो कीं
१६७
मग द्वादश वर्षे वांचल्यावरतीकैसी घडेल कृपामूर्तीदत्तात्रेय म्हणे तपापुढतीसंकल्पातें करावें
१६८
काया वाचा चित्त मनसंकल्प झालिया पुण्यवर्धनवर्धन झालिया पाजीन जीवनसकळ बाधा वो चुके
१६९
येरी म्हणे महाराजासंकल्प करीन सांगितल्या चोजापरी आतां मातें उदक पाजाप्राण रक्षा माझा कीं
१७०
नाथ गुरु संकल्प करिसीकीं तपा आचरण द्वादश वरुषीपरी तैसें वैभवासीपुन्हां लिप्त न व्हावें
१७१
वमनासमान पाळूनि सर्वविरक्तपणाची बरवी ठेवयोगामाजी नित्य बैसावेंआयुष्यमर्यादापर्यत
१७२
ऐसें ऐकतां राव कुंठितविचारदरीं व्यापिलें चित्तम्हणे कैसी करावी रीतप्राण कासावीत होतसे
१७३
तरी तो पूर्ण प्रज्ञावंतम्हणे महाराजा हे नाथमी प्रपंचरहणीरुपमुक्त झालों नाहीं अद्यापि
१७४
परी पितृश्राद्ध पितृऋणमातेसी केलिया गयावर्जनकांते पुत्र झालिल्यावीणकांताऋण फिटेना
१७५
पुत्रविवाह स्नुषामेळींऋणमुक्त होय शुद्धमौळीऐसिया ऋणाची स्थावरकाजळीफिटली नाहीं महाराजा
१७६
तरी द्वादश वरुषेंपर्यतप्रपंच आचरुं द्यावा मातेंउपरी योजूनि पूर्ण योगातेंकेलिया संकल्प समान कीं
१७७
ऐसे बोलता तई भूपाळअवश्य म्हणे अनसूयाबाळमग कमंडलू भरुनि जळतयापासीं पैं आला
१७८
उदक ओपूनि करयुग्मीसंकल्प करवीं मनोधर्मींकीं द्वादशवरुषें संकल्पनामींपुण्ययोग आचरेन
१७९
यापरी तन मन धनकाया वाचा जीवित्व पूर्ण गुरुसंकल्पीं सोडूनि जीवनअनुग्रह देतसे
१८०
मौळीं ठेवूनि वरदहस्तकर्णी बीजमंत्र अर्पीतआपुला करोनि शरणागतनाम आपुले सांगतसे
१८१
म्हणे वत्सा ओळख मातेंमी दत्तात्रेय अत्रिसुतपरी तव दैव भाग्यवंतमम कर मौळीं विराजला
१८२
परी अनुग्रह होतांचि प्राप्तमायिक सरोवरासहित झाला गुप्तइतुकें केलें जया अर्थीव्यर्थ होऊं पहातसे
१८३
ऐसी चिंता मानसीं बहुतकरिता झाला भर्तरीनाथम्हणे महाराजा गुरुनाथप्राण जाऊं पाहे आतां
१८४
ऐसे ऐकतां भर्तरीवचनभोगावती पाचारी अत्रिनंदनतरी ती सरिता अपार जीवनघेऊनियां धांवली
१८५
सुरभीचें करुनि चिंतनमही दर्शविली देदीप्यमाननेमक सहज उपजवोनि अन्नपर्वतासमान मिरवलें
१८६
मग चमूसहित नृपनाथभोगावतीचे स्नान करीतउत्तम अन्न स्वीकारुनि समस्तदर्शन करोनि चालिले
१८७
पृतनेसहित तुष्टचित्तींमृगया करुनि येत नृपतीयेरीकडे भोगावतीतिचे स्थाना पाठविली
१८८
कामधेनू स्वर्गस्थानींपाठवोनि अदृश्य झाला मुनीयेरीकडे मृगया करोनीभर्तरी गेला गांवांत
१८९
तरी आतां पुढें श्रोतींकथा स्वीकारावी सुधारससंपत्तीधुंडीसुत मालू वदेल उक्तीनरहरिप्रसादेंकरुनियां
१९०
स्वस्ति श्रीभक्तिकथासारसंमत गोरक्षकाव्य किमयागारसदा परिसोत भाविक चतुरसप्तविंशति अध्याय गोड हा
१९१

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ सप्तविंशति अध्याय समाप्त ॥

॥ श्री नवनाथाय नमः ॥

या अध्यायाचे वाचन झाले?

तुमची नोंद या ब्राउझरमध्ये जतन होते.