॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद

श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी

अध्याय २१

गोरक्षनाथास मोहविण्याचे मैनाकिनीचे सर्व प्रयत्नि निष्फळ. १९४ ओव्या · कथासार वाचा

श्रीगणेशाय नमः जयजयाजी जगन्नायकाजगज्जनका जगत्पाळकाविश्व व्यापूनि अवशेषकाविश्वंभर म्हणविसी
जरी सकळ विद्यांचे भरणेंकरिसी कायावाचामनेंतरी मीच काय विश्वार्तीनेंउरलों असें महाराजा
जरी मी असें विश्वांततरी पाळण होईल सहजस्थितींतऐसें असोनि संकट तुम्हातेंकवण्या अर्थी घालावें
परी मम वासनेची मळीरसनांतरी हेलावलीतयाचीं सुकृत फळें जीं आलींतीं तुज पक्क ओपीत महाराजा
तरी तेंही तुज योग्य भूषणस्थितमज न वाटे पंढरीनाथपरी सूक्ष्म शिकवीत भक्तां मातमोक्षगांवांत प्रणविसी
तरी आतां असो कैसेंस्वीकारिलें बोबड्या बोलासमागिले अध्यायीं सुधारसगोरक्ष मच्छिंद्र भेटले
भेटले परी एकविचारींगुरुशिष्य असती त्या धवळारीनानाविलासभोगउपचारीभोगताती सुखसोहळे
शैल्यराजनितंबिनीमुख्य नायिका कीलोतळा स्वामिनीमोह दर्शवी गोरक्षालागुनीस्वामिनीमोह दर्शवी गोरक्षालागुनीस्वसुताहूनि आगळा
आसन वसन भूषणांसहितस्वइच्छें तया उपचारीतपैल करुनि मीननाथसंगोपीत गोरक्षबाळा
जैसा चातकालागी घनस्वलीलें करी उदकपानकीं तान्हयाला कासें लावूनपय पाजिती गौतमी
१०
पाजी परी कैशा स्थितिउभवोनि महामोहपर्वतींवत्सासी लावोनि कांससंपत्तीशरीर चाटी तयाचें
११
त्याची नीतीं कीलोतळासंगोपीत गोरक्षबाळाभोजन घालीत अपार लळातान्हयातें पाजीतसे
१२
भलतैसें ललितपणेंश्रीगोरक्षा घाली भोजननिकट मक्षिका उडवोननिजकरें जेववीतसे
१३
नाना दावोनि चवणेअधिकाधिक करवी भोजनऐसिये परी माउलपणनित्य नित्य वाढवी
१४
ऐसा असोनि उपचारबरें न मानी गोरक्ष अंतरेंचित्तीं म्हणे पडतो विसरयोगधर्माविचाराचा
१५
ऐसें चिंतीत मनेंमग भोग तो रोगाचि जाणेंजेवीं षड्रस रोगियाकारणेंविषापरी वाटती
१६
मग नित्य बैठकीं बैसूनएकांतस्थितीं समाधानधृति वृत्ति ऐसी वाहूनकरी भाषण मच्छिंद्रा
१७
हे महाराजा योगपतीआपण बसता या देशाप्रतीपरीं हें अश्लाघ नाथपंथींमातें योग्य दिसेना
१८
कीं पितळधातूचें तगटीं हिराकदा शोभेना वैरागराकीं राव घेऊनि नरोटीपात्राभोजन करी श्लाघ्यत्वें
१९
श्रीमूर्ति चांगुळपणेंमहास्मशानीं करी स्थापनतैसा येथें तुमचा वास जाणदिसत आहे महाराजा
२०
पहा जी योगधर्मीतुम्ही बैसलां निःस्पृह होवोनितेणेंकरुनि ब्रह्मांडधामींकीर्तिध्वज उभारिला
२१
मृत्यू पाताळ एकवीस स्वर्गव्यापिलें आहे जितुकें जगतितुकें वांच्छिती आपुला योगचरणरज सेवावया
२२
ऐसी प्रज्ञा प्रौढपणींअसोनि पडावें गर्ते अवनींचिंताहारक चिंतामणीअजाग्रीवी शोभेना
२३
तरी पाहें कृपाळु महाराजउभारिला जो कीर्तिध्वजतो ध्रुव मिरवेल तेजःपुंजऐसें करी महाराजा
२४
ऐसें झालिया आणिक कारणतुम्ही पूर्वीचे अहां कोणआला कवण कार्याकारणकार्याकार्य विचारा
२५
कीं पूर्वी पहा ब्रह्मस्थितीश्रीकविनारायणाची होतीलोकोपकारा अवतार क्षितींजगामाजी मिरवला
२६
आपण आचरलां तपाचरणशुभमार्गा लावावें जनधर्यपंथिका प्रज्ञावानजगामाजी मिरवावया
२७
ऐसें असतां प्रौढपणते न आचारावे धर्ममग जगासी बोल काय म्हणवोनअर्थाअर्थी ठेवावे
२८
जात्या वरमाया आळशीणमम काय पहावी वर्हाडीणराव तस्कर मग प्रजाजनेंकोणे घरी रिघावें
२९
कीं अर्कचि ग्रासिला महातिमिरींमग रश्मी वांचती कोणेपरीउडुगणपती तेजविकारीजात्या होती तेवीं तारागणें
३०
तेवीं तुम्ही दुष्कृत आचरतांलोकही आचरती तुम्हांदेखतांअवतारदीक्षेलागीं माथांदोष होईल जाणिजे
३१
तरी आधींच असावें सावधानअर्थाअर्थी संग वर्जूनअंग लिप्त मलाकारणेंतिळतुल्यही नसावें
३२
नसतां ओशाळ कोणापाठींकळिकाळातें मारूं काठीनिर्भयपणें महीपाठींसर्वां वंद्य होऊं कीं
३३
तरी महाराजा ऐकें वचनसकळ वैभव त्यजूननिःसंग व्हावें संगेंकरुनदुःखसरिता तरवी
३४
प्रथमचि दुःखकारणविषयहस्तें बीज रजोगुणरजा अंकुर येत तरतरोनक्रोधपात्रीं हेलावे
३५
मग क्रोधयंत्रीं तृतीयसंधीमदकुसुमें क्रियानिधीमदकुसुमांचे संधींमत्सरगंध हेलावे
३६
गंधकुसुमें ऐक्यताहोतांचि दैवे विषयफळतामग विषयफळीं अपार महिमतामोहर शोभें वेष्टीतसे
३७
मग वेष्टिलिया मोहर अंतींदैवें फळें पक्कपणा येतीमग तीं भक्षितां दुःखव्यावृत्तींयमपुरी भोगावी
३८
मग तें शिवहळाहळाहूनि अधिककीं महा उरगमुखींचे विखमग प्राणहारक नव्हे सुखदुःखाचे परी सोशीतसे
३९
मग दुःखाचिये उपाधीशोधीत फिराव्या ज्ञानऔषधीतरी प्रथम पाऊल कृपानिधीभिवोनियां ठेवावें
४०
तरी आतां योगद्रुमाचित्तीं निवटोनि विषयश्रमासावधपणें योगक्षेमाचिंता मनीं विसरावी
४१
ऐसी विज्ञापना युक्तिप्रयुक्तींकरुनि तोषविला मच्छिंद्रयतीतंव निवटूनि विषयभ्रांतीविरक्तता उदेली
४२
मग म्हणे वो गोरक्षनाथातूं जें बोललासी तें यथार्थानिकें न पाहती अशा वृत्ताभ्रष्टदैवा दिसेना
४३
तरी आतां असो कैसेंजाऊं पाहूं आपुला देशऐसें म्हणोनि करतळभाषगोरक्षकातें दीधली
४४
कीं गंगाजळनिर्मळपणपरी महीचे व्यक्तकरोनगढूळपणें पात्र भरुनसमुद्रातें हेलावे
४५
भाक देऊनि समाधानचित्तीं मिरवी गोरक्षनंदनमग गुरुशिष्य तेथूनि उठोनपाकशाळे पातले
४६
पाकशाळे करुनि भोजनकरिते झाले उभयतां शयनकीलोतळामेळें मच्छिंद्रनंदनशयनीं सुगम पैं झाले
४७
झाले परी मच्छिंद्रनाथकीलोतळेतें सांगे वृत्तांतम्हणे मातें गोरक्षनाथघेऊनि जातो शुभानने
४८
जातो परी तव मोहिनीघोटपळीत माझे प्राणांलागुनीत्यातें उपाय न दिसे कामिनीकाय आतां करावें
४९
येरी म्हणे तुम्ही न जातांकैसा नेईल कवणे अर्थीमच्छिंद्र म्हणे मज सर्वथावचनामाजी गोंविले
५०
विरक्तपणाच्या सांगोनि गोष्टीवैराग्य उपजविलें माझे पोटींतया भापे संतुष्टदृष्टीवचनामाजी गुंतलों
५१
तरी आतां काय उपायसरला सर्वस्वी करुं कायतुझा देखोनि विनयजीव होय कासाविस
५२
तरी आतां ऐक वचनींउपाय आहे नितंबिनीतुवांचि त्यातें घ्यावें मोहोनीबहुधा अर्थीकरोनियां
५३
येरी म्हणे जी प्राणनाथम्यां उभविला उपायपर्वतपरी तो न रोधी वज्रवंतविरक्तीतें मिरवी तो
५४
ऐसें असतां त्या प्रवाहींउपाय मोहाचा चालत नाहींमच्छिंद्र म्हणे करुनि पाहींयत्न आणिक पुढारां
५५
ऐसें भाषण करितां उभयतांनिशा लोटली सर्वही असतांउपाय मोहाचा चिंतन करितांगोरक्ष येऊनि बोलतसे
५६
म्हणे माय वो ऐक वचनमज करुं वाटतें तीर्थाटनतरी मच्छिंद्रनाथा सवें घेऊनतीर्था आम्ही जातसों
५७
येरी म्हणे वत्सा ऐकतूं ज्येष्ठ सुत माझा एकतूं वरिष्ठ अलोलिकमम मनीं ठसलासी
५८
कीं स्त्रिया राज्यसंपत्तीत्यांत तूं शोभसी नृपतीआणि धाकटा बंधु धरुनि हातींशत्रु जिंकशील वाटतसे
५९
तरी तूं सकळ राज्याचा धीरआम्ही उगलेंचि सुख घेणारअन्नवस्त्राचा अंगीकारकरुनि असों तव सदनीं
६०
बा रे नाथाचा वृद्धापकाळदिवसेंदिवस वाढतसे सबळतैसें माझें शरीर विकळदिवसेंदिवस होईल कीं
६१
मग आम्हां वृद्धांचें दीनपणहरील बा कोण तुझ्याविणआणि धाकट्या बंधूचें संगोपनकोण करील तुजवांचुनी
६२
बाळा तुजवांचूनि मनाचें कोडकोण पुरवील तूं गेल्या पुढेंमायेवांचूनि न ये रडेसंगोपिता तूं अससी
६३
बा देवा रे आमुचा सकळ तिलकतूं अससी राजनायकतूं गेलिया आम्हीं भीकघरोघरीं मागावी
६४
तरी ऐसें विपत्तिकोडेमज न दाखवी दृष्टीपुढेंतरी मज योजूनि विहीरआडेंलोटूनि मग जाई पां
६५
ऐशा बोलतां रसाळ युक्तीपरी न मोहे गोरक्ष चित्तींजैसें मेघसिंचन झालिया पर्वतींअचळ भंगावीण तो
६६
ऐसें कीलोतळेचें ऐकूनि वचनम्हणे माय तूं करिसी सत्य भाषणपरी काय गे तूतें बोलूनवैभव माझें दाखवावें
६७
तिहीं लोकीं गे चार खुंटआमुचे असे गे राज्यपटतूतें बोलाया अधिक वरिष्ठकाय स्त्रियांचें राज्य हें
६८
तरी माय वो आतां कैसेंआम्ही जातों तीर्थावळीसतुम्ही स्वस्थ असूनि ग्रामाससंपत्ती भोगा आपुली
६९
आम्हांसी काय संपत्ति कारणआमुची संपत्ति योगधारणसुकृतक्रियाआचरणसुखसंपन्न भोगावें
७०
ऐसें निकट बोलूनि तीतेंम्हणे आज्ञा द्यावी जी आमुतेंयेरी म्हणे जी ऐक मातेंमम हेतू जाऊं नये
७१
चित्तीं विचारी कीलोतळापरम दक्षतेनें या बाळाउपरी दाराविषय घालोनि गळांयत्नेंकरुनि अडकावूं
७२
हें योजूनि म्हणे जाणें तीर्थासीतरी ऐक बा अटक घालूं तुजसीइतुका संवत्सर मजपासींवस्ती करुनि असावें
७३
येरी म्हणे एक मातेंषण्मास लोटले मज येथेंआतां न राहे माते कल्पांतेंतीर्थावळी जाणें कीं
७४
याउपरी बोले कीलोतळाषण्मास तरी संगती द्यावी मलाथोडकियासाठीं उतावेळाहोऊं नको मम वत्सा
७५
मग मी समाधानेंकरुनश्रीनाथ तुजसवें देऊनतीर्थावळीतें बोळवीनसमारंभ पाडसा
७६
< ऐसे बोलतां बोल रसाळविवेकी ज्ञानतपोबाळषण्मास वस्ती करुं सदनींपरी अमुक दिन निश्वय करोनीठेवीं आम्हां जावया
७८
तो दिवस आलियापाठींआम्ही न वसूं महीतळवटींमग यत्न केलिया तुम्हीं कोटीफाल माते होतील
७९
तरी आतां कोणता दिनदावी माते निश्चयेंकरुनयेरी म्हणे प्रतिपदकारणबोळवीन तुम्हांसी
८०
मुहूर्त संवत्सरप्रतिपदेसमग न पुसतां कोणासतया दिनीं गमन तुम्हांसभोजन झालिया करवीन
८१
ऐसा निश्चय मैनाकिनीबोलूनि स्थिर केला भुवनीपुढें कांहींएक दिवसांलागुनीगोरक्षातें पाचारी
८२
निकट बैसवूनि आपुलेजवळीअति स्नेहानें मुख कवळीम्हणे बा रे कामना मम हदयकमळींवेधली असे एक
८३
कामना म्हणशील तरी कोणस्नुषा असावी मजकारणतरी उत्तम दारा तुज निपुणकरुं ऐसें वाटतें
८४
मग मी बाळा स्नुषेसहितकाळ क्रमीत बैसेन येथतों तुम्हीं करुनि यावें तीर्थआपुलें राज्य सेवाया
८५
षण्मास बाळा येथें अससीअंगीकारीं मुख्य संबंधासीअंगीकारिलिया तव मानसींमोह माझा उपजेल
८६
म्हणशील तरी विधिपूर्वकलग्न तुझें करीन निकपरी मम चित्ताचे काम दोंदिकफेडशी इतुकें पाडसा
८७
गोरक्ष ऐसे बोल ऐकूनीम्हणतसे ऐका मम जननीम्यां काता दोन गुरुकृपेनीवरिल्या आहेत जननीये
८८
वरिल्या आहेत तरी चांगनित्य भोगितों करुनि योगम्हणशील कवण नामीं सांगतरी कर्णमुद्रिका म्हणती त्यां
८९
तया कांतालागीं सोडूनअन्य कांता न वरी व्यभिचारीणहें योग्य नव्हे मजकारणगुरुभक्ती जननीये
९०
ऐसें बोलतां गोरक्षनाथकीलोतळा बैसली स्वस्थचित्तम्हणे नाथ हा विरक्तकदा नातळे विशयांतें
९१
यापरी लोटलिया त्या दिवशींआणिका एके दिनीं परदेशींएक शैली उत्तमराशीसेवेलागीं पाठविली
९२
भोजन झालिया रात्रीं निर्भरशैली संचरली तें मंदिरअत्युत्तम सारीपाट करेंकवळोनियां पातली
९३
सदनीं संचरतां बोले वचनम्हणे हे गोरक्षनंदनमी सारीपाट करीं कवळूनखेळावया आणिला कीं
९४
तरी खेळ खेळूं एकटभावेंऐसें उदेलें माझिया जीवेंयेरु म्हणे अवश्य यावेंपूर्ण कामना करावया
९५
ऐसें म्हणतां नितंबिनीसारीपाट पसरुनि निकट येऊनीपरी द्यूत खेळतां शुभाननीनेत्रबाण खोंचीतसे
९६
खोंचीत परी विषयपरबोल बोलत अनिवारबोल नव्हे तें महावज्रतपपर्वत मंगावया
९७
ऐसे बोलत आणिक कर्णीदाखवितसे नितंबिनीमौळीचा चीरपदर काढूनीभूमीवरी सोडीतसे
९८
श्रृंगारव्यक्त नेत्रकटाक्षतुकवोनि खेळ खेळे गोरक्षखेळ खेळतां मग प्रत्यक्षजाणूनि चीर सरसावी
९९
उघडी एकचि जानू करुनदावी आपुलें नग्नपणपरी तो विरक्त गौरनंदनविषयातें आतळेना
१००
मग नाना संवाद नाना स्तुतीदावितां ती श्रमली युवतीपरी हा विरक्त कोणे अर्थीआतळेना तियेते
१०१
मग ती आपुले चित्तीं श्रमोनराहती झाली दीनवदनकीलोतळेतें वर्तमानसर्व सांगूनि गेलीसे
१०२
यावरी कीलोतळा संपत्तीसीगोरक्षा दावी भलते मिसींरत्नमुक्तमाणिकराशीश्रृंगारादि अचाट
१०३
परी दावूनि सहजस्थितम्हणे वत्सा हें तुझेंचि वित्तचंद्रसूर्यअवधीपर्यंतभोगिसील पाडसा
१०४
ऐसें कीलोतळापरी हा न मळे आशामळाजेवीं मुक्ता लिंपिलिया काजळाश्वेतवर्ण सांडीना
१०५
ऐशा युक्तिप्रयुक्ती करितांनिकट वृत्ति आली तत्त्वतांमग कीलोतळेच्या मोहे चित्तानित्य हुंबाडा येतसे
१०६
मीननाथ जवळ घेऊननेत्रीं लोटलें अपार जीवनती आणि शैल्या सेवकी पाहूनदुःखी होती तैशाचि
१०७
मग त्या म्हणती वो माय स्वामिनीआम्ही युवतीकीलोतळेसी समजावितीऐसें बोलतां दिनव्यावृत्तीप्रतिपदा आली असे
१०९
मग त्या दिवशी आनंदमहिमागुढ्या उभारिल्या ग्रामोग्रामापरी श्रृंगाररुप प्रवाहोत्तमामच्छिंद्रयोगी बुडाले
११०
ैचा आनंद कैंची पाकनिष्पत्तीकैंची गुढी शोकव्यावृत्तीसकळ ग्रामीं शैल्या युवतीमच्छिंद्रयोगें हळहळल्या
१११
एक म्हणती हा नाथराज्यप्रकरणी प्रतापवंतउदार धैर्यपर्वतदयाळ आगळा मायेहुनी
११२
एक म्हणती चागुलपणायापुढें उणीव वाटे मदनाकनकारनीं सभास्थानाअर्कासमान वाटतसे
११३
एक म्हणती ऐसा पुरुषदैवें लाधला होता आम्हांसगोरक्ष विवसी आली त्यासघेऊनि मेला जातसे
११४
ऐशापरी बहुधा युक्तींगोरक्षातें शिव्या देतीअहो मच्छिंद्रअर्काप्रतीराहुग्रह हा भेटला
११५
एक म्हणती नोहे गोरक्षकआम्हां भेटला यम देखमोहपाश घालूनि प्रत्यक्षमच्छिंद्र प्राण नेतसे
११६
हा कोणीकडोनि आला मेलाकां आमुच्या देशासी आलामच्छिंद्र मांदुस घेऊन चाललाबलात्कारें तस्कर हा
११७
एक म्हणती अदैव पूर्णऐसें लाधलें होतें स्थानत्या सुखासी लाथ मारुनजात आहे करंटा
११८
काय करील अभाग्यपणघरोघरीं भीक मागूनत्या तुकड्यांचें झाले स्मरणषड्रसान्न आवडेना
११९
उत्तम चीर अन्न भूषणसांडूनि करील चिंध्या लेपनमहाल माड्या नावडे सदनसेवील कानन अदैवी
१२०
ऐसे बहुधा बहुयुक्तीबोलताती त्या युवतीबोलूनी वियोगें आरंबळतीमच्छिंद्र मच्छिंद्र म्हणोनि
१२१
ऐसेपरी सकळ ग्रामांतसंचरलीसे विकळ मातयेरीकडे गोरक्षनाथकुबडी फावडी संयोगी
१२२
अंगी लेवूनी कंथाभूषणमाळा गळां दाट घालूनसिंगी सारंगी करीं कवळूननाथापाशीं पातला
१२३
चरणीं अर्पूनियां भाळम्हणे स्वामी आली वेळउठा वेगीं उतावेळगमन करावया मार्गात
१२४
तें पाहूनि कीलोतळासबळ उदक आणीत डोळाम्हणे स्थिर होई कां बाळाभोजन सारिल्या जाईजे
१२५
मग पाक करुनि अति निगुतीगुरुशिष्य बैसवूनि एक पंक्तीवाढितां बोलती झाली युवतीविचक्षण कीलोतळा
१२६
म्हणे महाराज मच्छिंद्रनाथतुम्ही जातां स्वदेशांतपरी मीननाथ तुमचा सुतठेवितां कीं संगे नेतां
१२७
नाथ म्हणे वो शुभाननीजैसे भावेल तुझिये मनींतैसीच नीति आचरुनीमीननाथ रक्षूं गे
१२८
मग बोलती झाली कीलोतळातुम्ही संगे न्यावें बाळायेथें रक्षण केऊतें बाळाभुभुःकारी होईल कीं
१२९
तुम्ही होतां निकट येथेंम्हणवूनि भुभुःकार न बाधी त्यातेंतुम्ही गेलिया कोण येथेंरक्षण करील बाळाचें
१३०
आणिक एक घेत लक्षमातें शापिलें वसू उपरिईशेतुमचा पिता जो प्रत्यक्षवीर्यसंघ आराधिला
१३१
तयाचा विचक्षण सबळ शापमीं सोडिलें सिंहलद्वीपत्या शापाचें पूर्ण मापभरुनि आले महाराजा
१३२
तरी उःशापाचा समय आला आतांफळासी येईल तुम्ही जातांउपरिचर वसू तुमचा पितायेऊनि नेईल मजलागीं
१३३
मग बाळाचें संगोपनकोण करील मायेविणयातें जरी न्यावें स्वर्गाकारणमनुष्यदेह नयेचि
१३४
तरी सांगाया हेंचि कारणमीननाथ सवें नेणेंमग अवश्य म्हणे मच्छिंद्रनंदनभोजन करुन उठले
१३५
कीलोतळाही भोजन करुनीमेननाथाकडे पाहूनी बोल न निघे तिचे वदनींपरी हदयीं डोंब पाजळला
१३६
मच्छिंद्रमोहाच्या स्नेहेंकरुनि आपारअनिवार मोहाचे वैश्वानरपेट घेता शिखेपरदुःख आकाशीं प्रगटलें
१३७
मोह उचंबळोनि अत्यंत चिंतानेत्रीं लोटली अश्रुसरितातें पाहूनियां शैल्या समस्तागोरक्षातें वेष्टिती
१३८
म्हणती गोरक्षा ऐक वचनकरुं नको रे कठिण मनमच्छिंद्र आमुचा घेऊनि प्राणजाऊं नको महाराजा
१३९
पहा पहा सुखसंपत्तीराज्यवैभव केवीं गतीऐशा टाकूनि स्वसुखाप्रतीकानन सेवूं नको रे
१४०
महाल मुलुख तुज हस्तीअश्व फिरणें चातकगतीहें सुख टाकूनि राज्यसंपत्तीकानन सेवूं नको रे
१४१
महाल मुलुख तुज स्वाधीनप्रजालोकादि करिताती नमनऐसा टाकूनि बळमानकानन सेवूं नको रे
१४२
हिरे रत्नें माणिक मोतींपरम तेजसी नक्षत्रज्योतीस्वीकारुनि भूषणाप्रतीसुखसंपत्ती भोगावी
१४३
आम्ही झालों तुमच्या दासीनित्य आचरुं सेवेसीरतिसुखासी नटूं तैसेंहें सुखसंपन्न भोगी कां
१४४
कला कुशला विद्या सांगसभेस्थानीं रागरंगऐसे टाकूनि प्रेमभोगकानन सेवूं नको रे
१४५
जरी जरतारी दीपती चीरपरिधानीं कीं इच्छापरऐशिया सुखा करी निर्धारकानन सेवूं नको रे
१४६
जडितरत्न हेमशृंगारभूषणीक मनोहरऐसें टाकूनि सुख मनोहरकानना जाऊं नको रे
१४७
चुवा चंदन अर्गजा गंधअंगीं चर्चू आम्ही प्रसिद्धऐसें टाकूनि सुखवृंदकानना जाऊं नको रे
१४८
कनकासनीं विराजमानदिससी जैसा सहस्त्रनयनऐशा सुखाचा त्याग करुनकानना जाऊं नको रे
१४९
द्रव्यराशी अमूप भांडारभरले असती अपरंपारकिल्ले कोट टाकूनि सुंदरकानन सेवू नको रे
१५०
ऐशा सुखाची उत्तम जातीटाकूनि जासी दुःखव्यावृत्तीमहीं भ्रमण काननक्षितींदुःख अपार आहे रे
१५१
शालदुशाल भूषणमाळाटाकूनि घेसी दुःख कशालासांडूनि षड्रस अन्न विपुलाकंदमूळ खाशील
१५२
उंच आसन मृदु कैसेंमंचकीं शय्या कुसुमकेशतें टाकूनि महीसलोळसील काननीं
१५३
तरी गोरक्षा मनुष्यदेहीवृत्ति आणी विवेकप्रवाहीराज्यासनाचें सुख घेईसकळ मही भोगीं कां
१५४
अरे या देशीं शत्रुभयअन्य राजाचें नाहीं भयऐसें स्थान आनंदमयतरी सकळ मही भोगीं कां
१५५
ऐसें बहुतांपरी उपदेशींदाविती तया सुखासीपरी विरक्त स्वचित्तेंसींआशेलागीं आतळेना
१५६
मग धिक्कारुनि सकळ युवतीम्हणे आम्हां कासया व्हावी संपत्तीप्राण टाकोनि शवाहातींतुम्हीच मिरवा जगीं हो
१५७
अगे आम्हांसी वोढण शयनावसनींवरती आकाश खालीं मेदिनीशयन करितों योगधारणींअलक्षीं लक्ष लावूनियां
१५८
ऐसी बहुतां नीतीं तयेसी वाणीम्हणे दूर लंडी गोड बंगालिणीऐसें म्हणोनि तये अवनींपाऊल ठेवितां पैं झाला
१५९
मग किलोतळेतें करुनि नमनस्कंधीं वाहिला मच्छिंद्रनंदनश्रीमच्छिंद्र सवें घेऊनग्रामाबाहेर पैं आला
१६०
परी कीलोतळेनें गोरक्षकासी चोरुनकनकवीट आणिली भांडारांतूनमच्छिंद्रनाथाकरीं अर्पोनभस्म झोळीत टाकिली
१६१
परी मच्छिंद्राच्या मोहें करुनघोंटाळीत पंचप्राणनेत्रीं अपार अश्रुजीवनमोहें नयन वर्षत
१६२
मग गांवाबाहेर मैनाकिनीमाथा ठेवी नाथाचे चरणींगोरक्ष हदयीं कवळोनीनिरवीतसें तयातें
१६३
म्हणे वत्सा माझे नाथाघेउनि जासील अन्य देशांतपरी क्षुधा तृषा जाणोनि यातेंसुख देईं पाडसा
१६४
बा रे अशक्त मच्छिंद्रनाथदिधलासे तुझिया हातांतयोजन अर्धयोजन महीतेंसुख देई पाडसा
१६५
बा रे मच्छिंद्र शांतीचा अचळूपरी फारचि असे अति भुकाळूतरी मच्छिंद्राचा क्षुधानळूबाळासमान जाण रे
१६६
जैसें मीननाथाचें लहानपणत्याचि रीतीं मच्छिंद्रातें मानहे उभयतां आहेत क्षीणतुझे ओटींत वाहिले
१६७
यापरी तूतें सांग कितीतू जेथें अससी बा सर्वज्ञमूर्तीसच्छिष्य असें तूतें म्हणतीकारण भक्ती पाहोनी
१६८
ऐसें वदोनि कीलोतळामिठी घाली गोरक्षगळांम्हणे बारे तूतें वेळोवेळांनिरवितें जीवीं धरी बा
१६९
ऐसें म्हणोनि हंबरडा फोडीतपरम अट्टहास्यें शब्द करीतम्हणे आतां कैसा नाथनिजडोळां देखेन मी
१७०
ऐसी मोहाची उभवी वार्तातें गोरक्षक पाहोनि म्हणे चित्तावेगें निघावें नातरी ममतामच्छिंद्रातें दाटेल
१७१
मग श्रीगुरुचा धरोनि हातलगबगें चालिला गोरक्षनाथपाउलापाउलीं दुरावततों तों आरंबळे कीलोतळा
१७२
पालथा घालोनि पर्वतअदृश्य झाले तिन्ही नाथमग कीलोतळा मस्तक महीप्रतआपटीतसे तेघवां
१७३
गायीसमान हंबरडा मारीतहस्तें वक्षःस्थळ पिटीतम्हणे आतां मच्छिंद्रनाथदृष्टीं कैसा पडेल
१७४
ऐसा मच्छिंद्र गुणीसदा शांत म्हातारपणींदयाब्धि कृपानिधि पूर्णकोठें पाहूं मच्छिंद्रा
१७५
म्हणे बाई गे शचीनाथतैसा आपणांमाजी मिरवतऐसा स्वामी दयावंतकोठें पाहूं निजदृष्टीं
१७६
अहा मज कृपणाचें धनगोरक्षतस्करें नेलें चोरुनआतां नाथें कठीण मनकैसें केलें मजविषयीं
१७७
आहा मज वत्साचें अब्धिजीवनगोरक्षघन गेला गिळोनकीं मज अंधाची काठी हिरोनगोरक्षक निर्दयें नेली गे
१७८
आतां आवोनि मंदिरांतकाय कोठें पाहों नाथदाही दिशा ओस मातेंवाटताती साजणी
१७९
सभेस्थानीं कनकासनींजेवीं बैसला दिसे तरणीआतां तें आसन वसन पाहोनीपाठी लागेल गे माये
१८०
अगे राजवैभव सकळ भारमातें वाटतें ओस नगरआतां माझा नाथ मच्छिंद्रकैं पाहीन निजदृष्टीं
१८१
ऐसा हा मच्छिंद्रपुरुषकोठें हिंडतां न देखों देशअति स्नेहाळू माया विशेषमायेहूनि पाळीतसे
१८२
बाई गे बाई निजतां शयनींकाय सांगू तयाची करणीतीन वेळां मज उठवोनीतान्हेलीस म्हणते
१८३
मग आपुले करीं उदकझारीलावी माझिये मुखपात्रींउदक पाजोनि कृपागात्रींजठर माझें चापीतसे
१८४
रिक्त जठर लागतां त्यातेंम्हणे अससी क्षुधाक्रांतमग पाचारोनि परिचारिकेतेंबळेंचि भोजन घालीतसे
१८५
ऐशिया मोहाची दयाकोटीवागवीत होता आपुले पोटींअति निर्दय होवोनि शेवटीकैसा सोडोनि पैं गेला
१८६
ऐसें बोलोनि वागुत्तरमस्तक आपटिलें महीवरमुखीं मृत्तिका वारंवारघालोनि हंबरडा फोडीतसे
१८७
ऐशिया दुःखाची सबळ कहाणीउपरिचरवसूच्या पडली कानींमग तो विमानीं बैसोनीतियेपाशीं पातला
१८८
विमान ठेवोनि तये अवनींनिकट पातला कृपेंकरुनीनिकट येता धरिला पाणीम्हणे पापिणी हें काय
१८९
तूं स्वर्गवासिनि शुभाननीयेथें आलीस शापेंकरुनींतें शापमोचन गे येथोनिझालें आहे सुख मानी कां
१९०
मग करें कुरवाळोनि कीलोतळाधरिता झाला हदयकमळाअश्रु डोळां पुसोनि ते वेळांसदनामाजी आणीतसे
१९१
सदना आणूनि ते युवतीबोधिता झाला नाना युक्तींतो बोध असे भक्तिसार ग्रंथींपुढले अध्यायीं ऐकावा
१९२
भक्तिसार उत्तम ग्रंथऐकतां होय पुण्यवंततरी श्रोते देऊनि चित्तग्रंथ आदरें ऐकावा
१९३
नरहरिवंशी धुंडीसुतअनन्य तुम्हां शरणागतमालू ऐसें नाम देहातेंसंतकृपेनें व्यापिलें
१९४
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ग्रंथस्वयें बोलिला पंढरीनाथसदा संतसज्जन परिसोतईश्वरीकृपेंकरोनियां
१९५
स्वस्ति श्रीभक्तिकथासारसंमत गोरक्षकाव्य किमयागारसदा परिसोत भाविक चतुरएकविंशतितमाध्याय गोड हा
१९६

श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु नवनाथभक्तिसार एकविंशतितमाध्याय समाप्त ॥

॥ श्री नवनाथाय नमः ॥

या अध्यायाचे वाचन झाले?

तुमची नोंद या ब्राउझरमध्ये जतन होते.