॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद

श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी

अध्याय १७

जालंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट. १९५ ओव्या · कथासार वाचा

श्रीगणेशाय नमः जयजयाजी वैकुंठाधीशाअलक्ष अगोचरा आदिपुरुषापूर्णब्रह्म निष्कल निर्दोषासनातना आदिमूर्ते
ऐसा स्वामी पंढरीअधीशबैसूनि मालूचे कवित्वपृष्ठीसभक्तिसारसुधारसनिर्माण केला ग्रंथासी
तरी मागिले अध्यायीं कथनआनिफा पातला हेळापट्टणगोपीचंदाची भेटी घेऊनमैनावतीसी भेटला
तरी सिंहावलोकनीं तत्त्वतांमैनावती भेटूनि नाथासकळ वृत्तांत सांगूनि सुतासमाधानीं मिरविलें
असो गोपीचंद दुसरे दिनींनाथाग्रहें शिबिरीं जाऊनिमौळी ठेवूनि नाथाचे चरणींउभा राहिला सन्मुख
कानिफा पाहूनि राव दृष्टींबोलता झाला स्ववाग्वटीश्रीजालिंदर महीपोटीकोठे घातला तो सांग पां
येरु म्हणे महाराजाठाव दावितो चला ओजातेव्हां म्हणे शिष्य माझाघेऊनि जावें सांगाती
ऐसी कानिफा बोलतां मातअवश्य म्हणे नृपनाथमग सच्छिष्य घेऊनि सांगाततया ठायीं पातला
ठाव दाखवूनि सच्छिष्यासीपुन्हां आले शिबिरासीशिष्य म्हणती त्या ठायासीपाहूनि आलों महाराजा
मग रायासी म्हणे कानिफानाथजालिंदर काढाया कोणती रीतयेरु म्हणे तुम्ही समर्थसकळ जाणते सर्वस्वीं
१०
बाळें आग्रहें करुं जातीपरी तयांचा निर्णय कैशा रीतींकरावा हें तों नेणती निश्वतींसर्व संगोपी माता ती
११
तेवीं माता पिता गुरुत्राता मारिता सर्वपारुतरी कैसे रीती हा विचारुआव्हानिजे महाराजा
१२
ऐसें बोलतां नृपनाथमग बोलतां झाला गजकर्णसुततुझे रक्षावया जीवितविचार माझा ऐकिजे
१३
कनक रौप्य ताम्रवर्णपितळ लोहधातु पूर्णपांच पुतळे करुनि आणतुजसमान हे राया
१४
ऐसी आज्ञा करितांचि नाथप्रेरिले रायें ग्रामांत दूतहेमकार लोहकारासहितताम्रकारका आणिलें
१५
जे परम कुशल अति निगुतीलक्षूनि सोडिले हेराप्रतीधातु ओपूनि तयांचे हातींपुतळ्यांतें योजिलें
१६
मग ते आपुले धीकोटीपुतळे रचिती मेणावरतीनाथालागीं दावूनि दृष्टीरसयंत्रीं ओतिले
१७
पाहोनि दिन अति सुदिनमग नृपासह पुतळे घेवोनपाहता झाला गुरुस्थानविशाळबुद्धी कानिफा
१८
गरतीकांठीं आपण बैसोनपुतळा ठेवोनि हेमवर्णराजाहातीं कुदळ देवोनघाव घालीं म्हणतसे
१९
घाव घालितां परी लगबगांपुसतां स्वामी नांव सांगासांगितल्यावरी अति वेगागरतीबाहेर निघे कीं
२०
ऐसें सांगोनि प्रथम रायातेंमग कुदळी दिधली हातातेंउपरी चिरंजीवप्रयोगातेंभाळीं चर्चिली विभूती
२१
पुतळा ठेवोनि मध्यगरतींमागें उभा राहिला नृपतीलवकर घाव घाली क्षितींआंतूनि पुसे महाराज
२२
कोणी येवोनि घालिती घाववेगीं वदे कां तयाचें नांवनृप म्हणे मी राणीवगोपीचंद असें कीं
२३
रायें सांगतांचि नामनिघाला होता गरतींतूनश्रीजालिंदराचें शापवचनकणकप्रतिमे झगटले
२४
तीव्रशाप वैश्वानरव्यापिलें कनकपुतळ्याचें शरीरक्षण न लागतां महीवरभस्म होवोनि पडियेलें
२५
भस्म होतां कनकप्रतिमादुसरा ठेविला उगमातयाही मागें नरेंद्रोत्तमापुन्हां गरतीं स्थापिलें
२६
रौप्यवर्णी पुतळ्यामागेंराव उभा केला वेगेंपुन्हा विचारिलें सिद्धियोगेंकोण आहेस म्हणवोनि
२७
पुन्हां सांगे नृप नांवगरतीबाहेर वेगीं धांवजालिंदरशापगौरवजळ जळ खाक होवो कीं
२८
ऐसें वदतां शापोत्तरपुतळा पेटला वैश्वानरेंतोही होवोनि भस्मपरमहीलागीं मिरवला
२९
मग तिसरा लोहपुतळा पूर्णतोही झाला शापें भस्मचवथा पांचवा गति दुर्गमत्याचिपरी पावला
३०
यावरी त्या नृपनाथाश्रीकानिफा झाला सांगतामातें वदोनि नाम सर्वथानाथाप्रती सांगावें
३१
अवश्य म्हणोनि गौडपाळलवकरी भेदी अति सबळतो नाद ऐकूनि तपी केवळविचार करीत मानसीं
३२
माझा क्रोध वडवानळजाळूनि टाकील ब्रह्मांड समग्रतेथें वांचला त्रिलोचनकुमरहें आश्चर्य वाटतें
३३
कृतांताचे दाढेआंतसांपडलिया सुटोनि जातन शिवे वैश्वानर मृत्यहें आश्चर्य वाटतसे
३४
महातक्षकानें दंश करुनवांचवूं शके कोणी प्राणकेंवीं वांचला नृपनंदनहें आश्चर्य वाटतें
३५
परम संकट पाहोनीप्राण उदित घेत हिरकणीतो वांचूनि मिरवे जनींहें आश्चर्य वाटतसे
३६
उरग खगेंद्रा हातीं लागतांपरी न मरे भक्षण करितांतेवीं झालें नृपनाथाहेंचि आश्चर्य वाटतें
३७
कीं मूषक सांपडल्या मुखांतत्यातें कदा न ये मृत्यतेवीं वांचला हा नृपनाथहेंचि आश्चर्य वाटतें
३८
सहज उभा पर्वतानिकटीकडा तुटोनि पडला माथींत्यांत वांचला ऐसें म्हणतीहेंचि आश्चर्य वाटतसे
३९
ऐसा विचार मनांतकरिता झाला जालिंदरनाथचित्तीं म्हणे त्या भगवंतसाह्य झाला रक्षणीं
४०
तरी आतां असो ऐसेंवांचल्या अमर करुं त्यासऐसें विचारुनि चित्तासमनीं गांठी दृढ धरिली
४१
येरीकडे कानिफनाथहुंकार नृपासी देततंव उभा स्वकरीं व्यक्तलवकरी मही भेदीतसे
४२
लवकरी घाव कानीं उठतांश्रीजालिंदर होय पुसताकोण आहेस अद्यापपर्यंतघाव घालिसी महीतें
४३
ऐकतां श्रीगुरुवचनरायाआधीं गजकर्णनंदनसांगूनि आपुलें नामाभिधानगोपीचंदाचें सांगतसे
४४
म्हणे महाराजा तपोजेठीमी बाळक कानिफा महीपाठीपहावया चरण दृष्टींबहुत भुकेले चक्षू ते
४५
म्हणवोनि गोपीचंद नृपनाथतुम्हां काढावया उदितऐसी ऐकोनि सच्छिष्यमातम्हणे अद्यापि नृप वांचला
४६
तरी आतां चिरंजीवअसो अर्कअवघी ठेवअमरकांती सदैव भावजगामाजी मिरवो कां
४७
ऐसें वदोनि जालिंदरनाथनिजचक्षूनें पहावया सुतबोलता झाला अति तळमळतम्हणे महीतें विदारीं
४८
ऐसी आज्ञा होतांचि तेथेंमग काढिते झाले वरील लिदीतेंतंव ते मृत्तिका दशवर्षातमहीव्यक्त झालीसे
४९
मग कामाठी लावूनि नृपतीउकरिता झाला मही तीवरील प्रहार वज्रापतीजावोनियां भेदलासे
५०
मग तो नाद ऐकूनि नाथम्हणे आतां बसा स्वस्थमग जल्पोनि शक्रास्त्रवज्रास्त्रातें काढिलें
५१
मग नाथ आणि गजकर्णनंदनपाहते झाले उभयवदनमग चित्तीं मोहाचें अपार जीवनचक्षुद्वारें लोटलें
५२
मग गरतीबाहेर येवोनि नाथप्रेमें आलिंगला सुतम्हणे बा प्रसंगें होतासी येथम्हणवोनि नृपनाथ वांचला
५३
परी गरतीबाहेर येतांचि नाथचरणीं लोटला नृपनाथमग त्यातें कवळोनि धरीतमौळीं हात ठेवीतसे
५४
म्हणे बाळा प्रळयाग्नीत्यांत निघालासी वांचुनीआतां जोंवरी शशितरणींतोंवरी मिरवें महीतें
५५
यावरी त्रिलोचनकामिनीमैनावती लोटली चरणींनेत्रीं अश्रुपात आणोनीस्वामीलागी बोलतसे
५६
म्हणे महाराजा एकादश वर्षातमातें लोटली महातभरातमाझा अर्क गुरुनाथअस्ताचळीं पातलासे
५७
मित्रकुमुदिनी दीनवाणीहुरहुर पाहे जैसी तरणीकीं मम बाळकाची जननीगेली कोठें कळेना
५८
कीं मम वत्साची गाउलीकोणे रानीं दूर गेलीसमूळ वत्साची आशा सांडिलीतिकडेचि गुंतली कैसोनि
५९
कां मम चकोराचा उड्डगणपतीकैसा पावला अस्तगतीकीं मज चातकाचे अर्थीओस घन पडियेला
६०
सदा वाटे हुरहुर जीवाकीं लोभ्याचा चुकला द्रव्यठेवाकीं अंधाची शक्ती काठी टेकावाकोणें हरोनि नेलीसे
६१
ऐसे एकादश संवत्सरमास गेले महाविकारऐसें बोलोनि नेत्रीं पूरअश्रुघन वर्षतसे
६२
मग तियेसी हदयीं धरोनि नाथस्वकरें नेत्राश्रु पुसीततीन्ही बाळकें धरोनि यथार्थमाय हेलवे त्यामाजी
६३
गोपीचंदाचें मुख कुरवाळूनबोलता झाला अग्निनंदनबा रे तुझें काय मनइच्छीतसे मज सांगा
६४
राजवैभवा भोगावेंकीं आत्मीं समयोग्यते मिरवावेंकोणतें तुझें मनीं भावेतैसा योग घडेल बा
६५
अश्वाश्वत शाश्वत दोन पदराज्य वैराग्य मार्गभेदतरी तुज आवडे तोचि वृंदस्वीकारीं कां बाळका
६६
म्यां तूतें केलें अमरपणींपरी तैसें नाहीं राजमांडणीअनेक आलें अभ्र दाटोनीमृगजळासमान तें
६७
बा रे संपत्ती अमरां कैसीतेही आटेल काळवेळेसींदिसतें तितुकें वैभवासीनाशिवंत आहे बा रे
६८
बा रे पूर्वी राज्य सांडूनकित्येक बैसले योग्यांत येवोनपरी तो योग सोडूनराज्यवैभवा नातळला
६९
पाहें गाधिसुताचे वैभवमहीलागीं केवढें नांवपरी तो सोडूनि सकळ वैभवयोगक्रिया आचरला
७०
उत्तानपाद महीवरतीकाय न्यून असे संपत्तीपरी सुताची कामशक्तीवेगें जनीं दाटलीसे
७१
तस्मात् अशाश्वत ओळखूनबा ते झाले सनातनतरी आतां केउतें मनइच्छितें तें मज सांगें
७२
गोपीचंद विचार करी मनांतराज्यवैभवीं सामर्थ्य गळितअहा योगी जालिंदरनाथचिरंजीव मिरवतसे
७३
आज एकादश वर्षेपर्यंतगरतगलित पचला योगीनाथजेणें यम शरणागतपायांतळीं लोळतसे
७४
जेणें कृत्तांत निर्बळ केलातो राज्य मेळवूनि खळ ठेलाहेमकर्णे अशक्त झालापरीस लोहाकारणें
७५
सुरभी त्रैलोक्यकामनापूर्ण करील क्षुधार्तवचनाती स्वपोटा रानोंरानाशोधील काय तृणातें
७६
ब्रह्मांडावरी जयाची सत्तातो कोणे अर्थी दरिद्रताभोगील मनेंऐसा पश्चात्ताप दारुणचित्तामाजी डवरला
७८
मग म्हणे गुरुमहाराजइंधनीं अग्नि होतां सज्जतेवीं विधानचि तैसे विराजेपावका स्पर्श झालिया
७९
तरी आतां सरतें पुरतेंआपुल्यासमान करा मातेंआळीभृंगन्यायमतेंकरुनि मिरवें महीसी
८०
ऐकोनि दृढोत्तर वचनश्रीगुरु स्वकरातें उचलोनपृष्ठी थापटी वाचे वचनगाजी गाजी म्हणतसे
८१
मग वरदहस्त स्पर्शोनि मौळीसकळ देहातें कृपें न्याहाळीकर्णी ओपूनि मंत्रावळीस्वनाथ मार्गी मिरवला
८२
ऐसें होता अंग लिप्तमग दिसून आलें अशाश्वतकाया माया दृश्य पदार्थविनय चित्तीं मिरवले
८३
मग वटतरुचें दुग्ध काढूनजटा वळी राजनंदनत्रिसट कौपीन परिधानूनकर्णी मुद्रा परिधानी
८४
शैली कंथा परिधानूनीशिंगीनाद गाजवी भुवनींकुबडी फावडी कवळूनि पाणीनाथपणीं मिरविला
८५
भस्मझोळी कवळूनि कक्षेंतआणि द्वितीय झोळी भिक्षार्थहातीं कवळूनि नाथनाथजगामाजी मिरवला
८६
परी हा वृत्तांत सकळ गांवांतअंतःपुरादिकीं झाला श्रुतश्रुत होतांचि अपरिमितशोकसिंधू उचंबळला
८७
एकचि झाला हाहाकाररुदन करितां लोटला पूरस्त्रिया धरणीसी टाकिती शरीरमुखीं मृत्तिका घालिती
८८
मैनावतीसी शिव्या देतम्हणती हिनेचि केला सर्वस्वीं घातअहा अहा नृपनाथमहीं कोठें पहावा
८९
आठवूनि रायाचें विशाळ गुणभूमीवरी लोळती रुदन करुनमूर्छागत होऊनि प्राणसोडूं पाहती रुदनांत
९०
अहा हें राज्यवैभवकैसी आली विवशी मावअहा सुखाचा सकळ अर्णववडवानळें प्राशिला
९१
अहा रायाचें बोलणें कैसेंकधीं दुखविलें नाहीं मानसआमुचे वाटेल जें इच्छेसराव पुरवी आवडीनें
९२
एक म्हणे सांगू कायरायें वेष्टिलें चित्त मोहेंम्लानवदन पाहोनि रायहदयी कवळी मोहाने
९३
म्हणे बाई मुखातें कुरवाळूनपरम प्रीतीनें घेत चुंबनअति स्नेहानें अर्थ पुरवूनमनोरथ पुरवी माझें गे
९४
ऐसें म्हणूनि आरंबळतएकसरां शब्द करीतएक म्हणे वो बाई मातकाय परी सांगूं रायाची
९५
अगे वत्सालागीं जैशी गायक्षणिक विसंबूं कदा न पावेतेवीं क्षणक्षणां येऊनि रायवदन पाहे माझें गें
९६
एक म्हणे अर्थ पोटींकिती सांगू राजदृष्टीवांकुडा केश कबरीथाटीपडतां सावरी हस्तानें
९७
अगे कुंकुमरेषा वांकडी होतती सांवरी नृपनाथमायेहूनि अधिक आतिथ्यमाझें करीत होता गे
९८
ऐसें म्हणूनि धरणी अंगधडाडूनि टाकिती सुभाग्यम्हणती विधात्या बरवा भांगनिजभाळीं रेखिला की
९९
मस्तक धरणीवरी आपटितीधडाधडां हस्तें हदय पिटितीमहीं गडबडूनि पुन्हां उठतीपुन्हां सांडिती शरीरातें
१००
म्हणती राया तुजविणआतां कोण करील संगोपनआतां आमुचे सकळ प्राणपरत्र देशांत जातील हो
१०१
ऐसे म्हणूनि आरंबळतीअट्टाहासे हदय पिटितीमृत्तिका घेऊनि मुखीं घालितीकेश तोडिती तटातटां
१०२
म्हणती अहा राया तीन वेळशय्येहूनि उठूनि पाजिसी जळऐसा कनवाळू असूनि निर्मळसोडूनि कैसा जासी रे
१०३
अहा राया शयनीं निजताउदर चापसी आपुल्या हातारिक्त लागतां उठोनि तत्त्वतांभोजन घालीत होतासी
१०४
ऐसा कनवाळू तूं मनींआतां कैसा जासी सोडूनिऐसें म्हणोनि शरीर धरणींधडाडूनि टाकिलें
१०५
म्हणे रायाचें स्वरुपपहातांचि पुरतसे कंदर्पतरी त्या स्वरुपाचा झाला लोपकोठें पाहूं महाराजा
१०६
एक म्हणे नोहे भर्ताप्रत्यक्ष होती आमुची माताकैसी सांडूनि जात आतांनिढळवाणी पाडसा
१०७
एक म्हणे माझी हरिणीकैसी पाडसा जात सोडूनीएक म्हणे माझी कूर्मिणीकृपादृष्टी आवगतली
१०८
एक म्हणे मज मीनाचें जळकैसे आटलें अब्धीचें जळदुःखार्काची झळाळसाहवेना वो माये
१०९
एक म्हणे माउली माझीस्नेहाचा पान्हा पाजीवियोगकाननीं चुकर आजीकैसी झाली दैवानें
११०
एक म्हणे आमुची पक्षिणीअंडजासमान पाळिलें धरणीआतां चंचुस्नेहें करोनीकोण ओपील ग्रासातें
१११
एक म्हणे मज चातकाकारणभरतां नोहे गे अंबुदस्थानपरम स्नेहाचें पाजितां जीवनआजि ओस कैसा झाला गे
११२
ऐसें म्हणोनि आरंबळतीएकमेकींचे गळां पडतीरडती पडती पुन्हां उठतीआरंबळती आक्रोशें
११३
ऐसा आकांत अंतःपुरांतयेरीकडे जालिंदरनाथराया गोपीचंदा सांगततपालागीं जाई कां
११४
परी राया ऐक मातसुरत्नपणाचा पाहों हेततुझ्या स्त्रिया अठरा शतभिक्षा मागे तयांपासी
११५
आलक्ष आदेश निरंजनऐसा सवाल मुखें वदोनअंतःपुरांत संचार करोनभिक्षा मागें बाळका तूं
११६
शिंगीनाद वाजवूनि हातींभिक्षा दे माईवदोनि उक्तीऐशापरी भेटोनि युवतीतपालागीं जाई कां
११७
मग अवश्य म्हणोनि नृपनाथसंचार करी अंतःपुरांतअलक्ष निरंजन मुखे वदतमाई भिक्षा दे म्हणतसे
११८
तें पाहूनि त्या युवतीमहाशोकाब्धींत उडी घालितीएकचि कोल्हाळ झाला क्षितींनाद ब्रह्मांडीं आदळतसे
११९
एक हातें तोडिती केशांतेंएक मृत्तिका घालिती मुखांतएक म्हणे दाही दिशा ओस दिसतदाही विभाग झाल्यानें
१२०
एक धुळींत लोळतीएक उठूनि पुन्हां पडतीएक हदय पिटोनि हस्तींआदळिती मस्तकें
१२१
एक पाहोनि रायाचें स्वरुपम्हणती अहाहा कैसा भूपसवितारुपी झाला दीप खद्योतपणी दिसतसे
१२२
अहाहा राव वैभवार्णवकैसा दिसतो दीनभावकीं मेरुमांदार सोडूनि सर्वमशक दृष्टीं ठसावला
१२३
अहा राय हस्तेंकरुनअपार याचकां वांटी धनआतां कक्षेंत झोळी घालूनमागे कण घरोघरीं
१२४
ऐसें म्हणोनि आरंबळतीधरणीवरी अंग टाकितीपुन्हां उठोनि अवलोकितीम्हणती अहा काय झालें
१२५
असो नृप तो अंतःपुरांगणींआदेश निरंजन वदे वाणीमुख्य नायिका लोमावती राणीरायापासीं पातली
१२६
मुखचंद्र गळे बोलूनीनयनी अश्रु अपार जीवनींरायालागीं पाळा घालूनीवेष्टुनियां बोलती त्या
१२७
तिचे मागें चंपिका कारंतीउठोनि येतात मागें समस्तींराजस्त्रिया अट्टहास करितीधांव घेती मागें लगबगां
१२८
म्हणती राया असो कैसेघडूनि आले ईश्वरसत्तेसेंपरी येथेंचि राहूनी पूर्ण योगाससंपादिजे महाराजा
१२९
आम्हां दरिद्रियांचें स्वरुपमांदुसलोपवूं नका सहसा महीसआम्ही तुम्हांविण दिसतों ओसप्राणाविण शरीर जैसे
१३०
हे राया आम्ही स्त्रिया कोटीपरम अंध महींपाठींतरी आमुची सबळ काठीटेंका हरूं नका जी
१३१
तरी येथोंचि योग आचरावाआम्ही न छळूं विषयभावापरी तव स्वरुपाचचि ठेवापाहूनि तो शांत करुं कीं
१३२
जैसें जीर्ण कडतरपरी म्हणाया वैभवी थोर छत्रतेवीं तव आश्रयीं सर्व पवित्रवैभवमंडण आम्हांसी
१३३
तरी मानेल तेथें पर्णकुटिकाबांधूनि देऊं जडितहाटकाआम्ही बारा सोळा शत बायकासेवा करुं आदरानें
१३४
सुवर्णे शिंगीं देऊं मढवूनआणि रत्नबिकी शैल्य परिधानूनकनकचिरी कंथा घालूनसुखसंपन्न भोगावें
१३५
मुक्तरत्नें हिरे माणिकसंगीत करुनि हाटकीं देखत्यातें भूषणमुद्रा अलौलिकसुखसंपन्न भोगावें
१३६
लोड तिवासे मंचक सुगमगादी तोषक अति गुल्मतरी भस्म सन्निधीकरुनसुखसंपन्न भोगावें
१३७
भिक्षातुकडे सूक्ष्म कठिणत्यजूनि सेवीं षड्रसान्नघृत दुग्ध दधि सेवीं पक्कान्नहें सुखसंपन्न भोगावें
१३८
एकट सेवीं त्यजीं काननदासदासी सेवकजनसेवा करितां षोडशोपचारानहें सुखसंपन्न भोगावें
१३९
चुवा चंदन अर्गजासुवासमार्जन करुं तव देहासतरी धिक्कारुनि तृणासनाससुखसंपन्न भोगावें
१४०
हत्ती घोडे शिबिका सदनटाकूनि कराल तीर्थाटणपरी चालाल तें दुःख त्यजूनसुखसंपन्न भोगावें
१४१
महाल चौकट संगीत रंगीतते सांडूनि विपिनीं पडाल दुःखिततरी तें त्यजूनि रहा येथहे सुखसंपन्न भोगावें
१४२
छत्र चामरें प्रजा अंकितत्यजूनि फिराल अरण्यांतएकटपणीं त्यजूनि रहा येथहें सुखसंपन्न भोगावें
१४३
मृगाक्षा खंजीर पदमनयनीपद चुरती कोमल पाणीतरी तृणांकुरशयन त्यजूनीहें सुखसंपन्न भोगावें
१४४
चंद्राननी गजगामिनीबोलती संवाद रसाळ वाणीतरी यांचा त्याग करोनीहें सुखसंपन्न भोगावें
१४५
ऐशा स्त्रिया संवादतीपरी कोप चढला तयाच्या चित्तींदूर हो लंडी म्हणोनि उक्तीधिक्कारीत तयांतें
१४६
परी त्या मोहें वेष्टूनि बोलतराया एकटें पडावें अरण्यांततुम्हांसवें बातचीतकोण करील महाराजा
१४७
येरी म्हणे अरण्यपोटींसिंगी सारंगी करील गोष्टीस्त्रिया म्हणती आसनदृष्टीवपन कैंचें हो तेथें
१४८
राव म्हणे मही आसनअंबरासारखें असे ओढवणस्त्रिया म्हणती शयनीं कोणनिजेल तुमच्या सांगातीं
१४९
येरी म्हणे कुबडी फावडीशयन करितील दोन्ही थडीस्त्रिया म्हणती शैत्य हुडहुडीकोण निवारी सांगावें
१५०
येरी म्हणे अचळ धुनीपेटवा घेईल पंचाग्नीते सबळ शीतनिवारणींहोतील योग साधावया
१५१
स्त्रिया म्हणती अलौलिकतेथें कोठें परिचारक लोकराज्यासनीं पदार्थ कवतुकदेत होते आणूनियां
१५२
येरी म्हणे व्याघ्रांबरआसन विराजूं वज्रापरमग धांव घेती नारीनरकौतुकपदार्थ मिरवावया
१५३
स्त्रिया म्हणती मोहव्यक्तकोणतीं असतीं मायावंतमाय बाप भगिनी सुतअरण्यांत कैंची हीं
१५४
येरी म्हणे विश्वरुपघरघर आई घरघर बापइष्टमित्र भगिनी गोतरुपशिष्य साधक मिरवती
१५५
स्त्रिया म्हणतीं षड्रसादि अन्नविपिनीं मिळतील कोठूनयेरी म्हणे जीं फळें सुगमषड्रसादि असती तीं
१५६
स्त्रिया म्हणती वेंचाया साधनविपिनीं मिळेल जी कोठूनयेरी म्हणे ब्रह्मरुपानेंघेऊं देऊं वेव्हारासी
१५७
स्त्रिया म्हणती फाटल्या कौपीनपुनः मिळेल ती कोठूनयेरु म्हणे इंद्रियदमनविषयीं कांसोटी घालूं कीं
१५८
स्त्रिया म्हणती फाटल्या कंथाते कोठूनि मिळेल जी समर्थायेरु म्हणे योग आचरतांदिव्य कंथा होईल
१५९
स्त्रिया म्हणती सिंगी सारंगाफुटूनि गेलिया प्रसंगीमग गोष्टी करावयाची तरंगीकोण आहे तुम्हांपाशी
१६०
येरी म्हणे सगुण निर्गुणशिंगी सारंगी असती दोनआगमानिगमाचे तंतू ओंवूनसुखसंवाद करीन मी
१६१
स्त्रिया म्हणती कुबडी फावडीजीर्ण झालिया लागती देशोधडीमग सुखशयनीं निद्रापहुडीकोण सांगेन करील जी
१६२
येरी म्हणे खेचरी भूचरी उभयआदेय विदेह प्रकाश स्वरुपमयवाम दक्षिण घेऊनि तन्मयडोळां लावीन निरंजनीं
१६३
स्त्रिया म्हणती शैल्य तुटूनगेल्या पुन्हां आणाल कोठूनयेरी म्हणे मोक्षयुक्तिसमानशैल्यभूषण मिरवीन गे
१६४
स्त्रिया म्हणती कर्णमुद्रिकाहरपोनि गेल्या नरपाळकामग काय करशील वनीं देखानाथपंथी मिरवावया
१६५
येरु म्हणे वो खेचरी भूचरीलुप्तमुद्रा कर्णद्वारींअलक्ष चाचरी अगोचरीलेवविल्या गुरुनाथें
१६६
ऐसें बोलतां उत्तरोत्तरम्हणे माई भिक्षा देई सत्वरतंव त्या धांवती धरावया करकंठीं मिठी घालावया
१६७
ऐसें चांचल्यगुणयुक्तदृष्टीं पाहूनियां नृपनाथकुबडी फावडी उगारीतदूर होई लंडी म्हणतसे
१६८
तें गुप्त पाहोनि मैनावतीसिद्धार्थ अन्न घेऊनि हातींशीघ्र येऊनि पुत्राप्रतीम्हणे भिक्षा घे नाथा
१६९
मग भिक्षा घेऊनि झोळींमातेपदीं अर्पी मौळीमग तेथूनि निघूनि तये वेळींनाथापाशीं पातला
१७०
मग जो झाला स्त्रियांत वेव्हारतो सकळ सांगितला वागुत्तरमैनावती येऊनि तत्परतीही वदे वृत्तांतासी
१७१
असो उभयतांचा वृत्तांत ऐकूनमान तुकावी अग्निनंदनमग तीन रात्री रायासी ठेवूनबहुतां अर्थी उपदेशिला
१७२
मग लोमावतीचा उदरव्यक्तगोपीचंदाचा होता सुतमुक्तचंद नाम त्याचेंराज्यासनीं वाहिला
१७३
स्वयें जालिंदरें कौतुकराज्यपटीं केला अभिषेकमंत्री प्रजा सेवक लोकतयाहातीं ओपिलें
१७४
राया गोपीचंदा सांगे वचनबा रे पाहें बद्रिकाश्रमबद्रिकेदारालागीं नमूनतपालागीं तूं बैसें कां
१७५
लोहकंटकीं चरणांगुष्ठदेऊनि तपाचें दावीं कष्टद्वादश वरुषें नेम स्पष्टएकाग्रीं रक्षावा
१७६
ऐसें सांगूनि तयातेंमग प्रजा लोकादि समस्तेंनिघाले रायासी बोळवायातेंकानिफासुद्धां जालिंदर
१७७
परी प्रजेचे लोक शोक करितीराया गोपीचंदाचे गुण आठवितीनेत्रीं ढाळूनि अश्रुपातींरुदन करिती अट्टहास्यें
१७८
म्हणती अहा सांगों कायीनृप नव्हे होती आमुची आईवक्षाखाली सकळ महीसंबोधीतसे महाराजा
१७९
ऐसे वर्णूनि तयाचे गुणआक्रंदती प्रजाजनपरी आतां पुरे करा विघ्नशोकमांदार खोंचला
१८०
तृणपाषाणादि तरुपक्षी पशु जाती अपारुराया नृपाकरितां समग्रशोकाकुलित मिरवले
१८१
मग एक कोस बोळवूनसमस्त आणिले अग्निनंदनेंजेथील तेथे संबोखूनआश्वासीत सकळांसी
१८२
परी राया जातां ठायीं ठायींधांवूनि पाहतां उंच महीम्हणती सोडूनि गेलीस आईकधी भेटसी माघारां
१८३
घडी घडी दृष्टी ऊर्ध्व करुनपहाती रायाचें वदनकोणी मागें जाती धांवूनवदन पाहूनि येताती
१८४
ऐसा राजा जातां दोन कोशमग सकळ मिरवले एक निराशमग मागें उलटूनि संभारासग्रामामाजी संचरले
१८५
राजसदनीं येऊनि समस्तसकळ बैसले दीनवंतजैसें शरीर प्राणरहितएकसरां मिरवले
१८६
मग श्रीजालिंदर राजसदनींमुक्तचंदा विराजूनि राज्यासनींमंत्रियातें पाचारुनीवस्त्रेंभूषणें आणविलीं
१८७
मग जैसें महत्त्व पाहूनतयालागीं भूषणें देऊनप्रेमें गौरवूनि प्रजाजनबोळविले स्वस्थाना
१८८
याउपरी अंतःपुरीं जाऊनसर्व स्त्रियांचें केलें समाधानमैनावतीचे करीं ओपूनसमाधानीं मिरविलें
१८९
मुक्तचंद ओपूनि तियेचे करींम्हणे हा गोपीचंदचि मानींहा शिलार्थ तयाचे परीमनोरथ पुरवील तुमचे
१९०
ऐसे करोनि समधानराज्यासनीं पुन्हां येऊनिमुक्तचंदाचे हस्तेंकरुनयाचकां धन वांटिले
१९१
जालिंदर कानिफा कटकासहितषण्मास राहिले पट्टणांतअर्थाअर्थी सकळ अर्थनिजदृष्टीं पाहती
१९२
श्रीजालिंदराचा प्रताप सघनकोण करुं पाहती विघ्नयेरीकडे गोपीचंदरत्नभगिनीग्रामा चालिला
१९३
तेथें कथा होईल अपूर्वते पुढील अध्यायीं ऐका सर्वअवधानपात्रीं घन भावकथा स्वीकार श्रोते हो
१९४
नरहरीवंशीं धुंडीसुतमालू संतांचा शरणागततयाचे रसनेस धरुनि हेतअवधान पात्रीं मिरवावें
१९५
स्वस्ति श्रीभक्तिकथासारसंमत गोरक्षकाव्य किमयागारसदा परिसोत चतुरसप्तदशाध्याय गोड हा
१९६

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ नवनाथभक्तिसार सप्तदशाध्याय समाप्त ॥

॥ श्री नवनाथाय नमः ॥

या अध्यायाचे वाचन झाले?

तुमची नोंद या ब्राउझरमध्ये जतन होते.