॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद

श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी

अध्याय १६

कानिफनाथ व गोरक्षनाथांची भेट, कानिफनाथाचे गोपीचंद राजाकडे आगमन. १९४ ओव्या · कथासार वाचा

श्रीगणेशाय नमः श्रीसरवत्यै नमः

जयजयाजी दिगंबराआद्यनामें विश्वंभरावर्णिता तुझिया गुणसंभारामति अपूर्व होतसे
वर्णिता तुझिया गुणसंपत्तीवेदभांडारे अपूर्व होतीसहस्त्रफणी वाहतां मार्थीशीण वाचे दावीतसे
पंचाननाऐसे धेंडेपरी दो अक्षरीं झाले धडेसरस्वतीचें शिणोनि तोंडकरी सांड विलापाची
आठभार उदभिज देहीकमळपत्रांते पुरे महीसप्ताब्धींची अपूर्व शायीतव गुणसाररसज्ञ
ऐसा सर्वगुणज्ञ पुरुषयेवोनि बैसला अबद्भमतीसभक्तिसार ग्रंथ सुधारसस्वयें निर्मिला आपणचि
तरी मागिले अध्यायीं सकळ कथनकानिफा आणि वायुनंदनयुद्धसमयीं ऐक्य होऊनसुखसागरा मिळाले
यावरी कानिफा स्त्रीदेशांतगेले श्रीगडमुंडगांवांततेथें भेटोनि मच्छिंद्रातेंआतिथ्यातें भोगिलें
भोगिलें परी कैसे रीतींतेंचि ऐका येथूनि श्रोतींमच्छिंद्राचे काम चित्तींएक अर्थी उदेला
कीं कानिफा जाईल स्वदेशांतश्रीगोरक्षका करील श्रुतमग तो धांवोनि येईल येथनेईल मातें येथुनी
तरी गोरक्ष मम शिष्य आहेऐसे यासी श्रुत करुं नयेअनेक योजूनि उपाययेथें राहता करावा
१०
ऐसी युक्ती रचूनि चित्तींकरावें म्हणे आतिथ्य बहू रीतींम्हणोनि बोलावूनि बहुत युक्तींसकळां मच्छिंद्र सांगतसे
११
याउपरी आणिक योजना करीतकीं विषयीं गोंवावा कानिफानाथमग हा कदा देशांतजाणार नाहीं सर्वस्वें
१२
चंद्राननी मृगांकवदनीपाठवीतसे शिबिरालागुनीपरी तो नातळे कामवासनींइंद्रियदमनी महाराज
१३
म्हणाल तरी त्या कैशा युवतीप्रत्यक्ष कामाच्या मूर्तीजयांचे नेत्रकटाक्षें होतीवेडेपिसे देवादि
१४
जयेचें पाहतां मुखमंडणतपी सांडिती तपाकारणेंयेवोनि मुंगी लुंगी होवोनमागें भ्रमती जपी तपी
१५
जयेचे अधर पोंवळ्यांपरी दिसतीदर्शन दाळिंबबीज गोमटीगौरवर्ण पिकाघाटीग्रीवा दर्शवी बाहेर
१६
कीं अनंत चंद्राचा प्रकाश जैसाकीं उडुगणपतीचा द्वितीय ठसाजयांच्या नखाकृतिलेखाचंद्रकोरी मिरवल्या
१७
असो ऐसे स्त्रियांचे वर्णकीं भानुचि पावला उदयमानऐसिया स्त्रिया पाठवोनि स्थानचेतविती कामासी
१८
परी तो नातळे महाराजहा वृत्तांत मछिंद्रा कळला सहजमग म्हणे शिष्यकटकाचा समाजकामासनीं गोवावा
१९
ऐसाहो यत्न करुनि पाहतांकामिनींचा श्रम झाला वृथाशिष्यकटकही येईना हाताउपाय कांहीं चालेना
२०
असो ऐसे छळणांतएक मास राहिले तेथपरी कोपें देव होतां उदितसहजस्थितीं लोटले
२१
असो लोटल्या एक मासमग पाचारुनि मच्छिंद्रासम्हणती आज्ञा द्यावी आम्हांसस्वदेशासी जावया
२२
मग अवश्य म्हणोनि मच्छिंद्रनाथनानासंपत्ती द्रव्य ओपीतगज वाजी उष्ट्र अमितद्रव्य बहुत दिधले
२३
शिबिरें कनाथा पडप थोरतंबू राहुट्या पृथगाकारशिबिका मुक्तझालरा छत्रवस्त्राभरणी भरियेले
२४
ऐसी ओपूनी अपार संपत्तीबोळवीतसे मच्छिंद्रजतीएक कोस बोळवोनि नमितीपरस्परांसी आदरें
२५
ऐसें बोळवोनि कटकभारस्वस्थाना आला नाथ मच्छिंद्रयेरीकडे तीर्थवरकरीत आला स्वदेशा
२६
सहज आले मुक्कामेंमुक्कामलंघुनि स्त्रीदेश सुगमपुढें गौडबंगाल स्थान उत्तमनानाक्षेत्रें हिंडती
२७
परी जया गावीं जाय नाथत्या गावीं लोक करिती आतिथ्यसर्व पाहूनि भक्तिवंतउपचारें मिरवती
२८
इच्छेसम सकळ अर्थपूर्ण होऊनि शिष्यसांप्रदायीं होतम्हणोनि वर्णिती कीर्तमुखोमुखीं उल्हासें
२९
मग या गावीचें त्या गांवीं लोकयेऊनि नेती सकळ कटकदावूनि भाक्तिभाव अलोलिकबोळविती पुढारा
३०
ऐसें श्रवण करीत करीतकीर्तीमागें कीर्ती होतती सत्कीर्ती हेळापट्टणांतप्रविष्ट झाली जगमुखें
३१
बहुत जनांचे वाचे स्तुतीअहाहा स्वामी ऐसें म्हणतीमग राजांगणी ही कीर्तीहेलावली सेवकमुखें
३२
कीर्ति ऐकूनि नृपनाथपुढें प्रेरिता झाला दूतत्याकरवी उत्तम वृत्तांतमुनिकटकाचा आणविला
३३
ते सांगती मुनीचा राजयोगगांवोगांवींहूनि शिबरें सुरंग चांगधांवताती घेऊनि मागोमागस्वामीलागीं राहावया
३४
पुढें नाथध्वज येऊनशिबिरें चालती त्यामागूनशिष्यकटकासी मागूनि गमनकानिफाचे होतसे
३५
ऐसें मार्गी करितां गमनतो येरीकडे जगन्नाथाहूनगोरक्ष बंगालदेशात येऊनगांवोगांव भ्रमतसे
३६
तो सहजमार्गी करितां गमनमहीप्रवाही तरुव्यक्त विपिनतया विपिनीं गजकर्ण नंदनसहजस्थितीं भेटला
३७
तेणें पाहिलें गोरक्षकासीगोरक्षें पाहिलें कानिफासीदृष्टादृष्टी होतां आदेशींएकमेकां बोलिले
३८
करुनि स्थिर शिबिकासनखालीं उतरला कर्णनंदनमग भरजरी गालिंचा महीं पसरुनगोरक्षासी बैसविलें
३९
आपण बैसें उपसवे नेटींबोले कानिफा वाग्वटीनाथपंथ हा वरदपुटीकोण गुरु लाहिला
४०
हें ऐकून गोरक्षनाथमच्छिंद्रजन्मापासुनि कथा सांगतवरदपाणी उदयामित्रप्रसन्न झाला तयासी
४१
तरी त्याचा दासानुदासमी म्हणवितों महापुरुषपरी श्रीगुरु कानिफादेहासगुरु कोण मिरवला तें सांगा
४२
ऐसे गोरक्षबोल ऐकूनकानिफा सांगे जालिंदरकथनजन्मापासूनि वर्तमानदत्तकृपा आगळी
४३
ऐसे उभयतांचें भाषणझालिया मिरवले समाधानम्हणती योग्य आलें घडूनतुम्ही आम्हां भेटलां
४४
याउपरी कानिफाचित्तींकामना उदेली एका अर्थीकी मच्छिंद्र गुरु गोरक्षाप्रतीदत्तवरदें मिरवला
४५
तरी दत्तकृपेचें अनुसंधानकैसें लाधलें विद्यारत्नकीं कवणरुपीं सहजदर्शनजगामाजी मिरवती
४६
तरी याचा शोध करावादावूनी आपुल्या गौरवाऐसें योजूनि सहज भावादृष्टी करी भोंवतालीं
४७
तों दृष्टीसमोर आम्रवनपक्क फळी देखिलें सघनतेंही पाडाचें पक्कपणशाखा व्यक्तझोंबल्या आहेत ह्या वृक्षीं
४९
परी ऐसी फळें सुगम दिसतीतरी भक्षण करावें वाटे चित्तींयावरी गोरक्ष बोले युक्तींनको नको म्हणतसे
५०
याउपरी बोले कानिफा वनचतोडूनि आणवितों शिष्य धाडूनगोरक्ष म्हणे इतुका यत्नकासयासी करावा
५१
आतां शिष्य आहेत जवळीतोडूनि आणावें त्या करकमळींशिष्य नसतां कोणे काळींमग आपण काय करावें
५२
तरी आतां स्वतः ऐसे करावेंगुरुप्रसादें प्रताप मिरवावेफळें तोडूनि विद्येसी गौरवावेंतुष्ट आत्मा करावा
५३
ऐसें कानिफा ऐकूनि वचनजरी तुमचें इच्छितें ऐसें मनतरी आतांचि आणितों तोडूनपक्कपणीं गुरुकूपें
५४
मग कवळूनी भस्मचिमुटीविभक्तास्त्र जपे होटीत्यावरीं आकर्षण मंत्रपोटींप्रेरिता झाला युक्तीनें
५५
विभक्तास्त्र आकर्षणीप्रेरितां फेकीं भस्म काननींतंव तीं पक्कफळें वृक्षावरुनीपुढें आलीं सर्वत्र
५६
मग ते शिष्यकटकासहितफळें भक्षिती मधुर व्यक्तभक्षिल्या पूर्ण तृप्तक्षाळिले हात जीवनानें
५७
ऐसे झालिया पूर्णप्रकरणींगोरक्ष विचारी ऐसें मनींम्हणे प्रताप दाविला मजलागुनीकानिफानें आपुला
५८
तरी आपण आतां यासीदावूं विद्या चमत्कारासीऐसा विचार करुनि मानसींकानिफातें बोलतसे
५९
म्हणे तुम्ही केला पाहुणचारतरी उत्तरालागीं उत्तरआणिक फळें भक्षूनि साचारचवी रसने मिरवावी
६०
ऐसें ऐकोनि तयाचें वचदम्हणे बोललां ते फार उत्तमतुमच्या शब्दासी करुनि मानस्वीकारावें तैसेंचि
६१
मग आकर्षणशक्तीं विभकास्त्रजल्पोनि नाथ गोरक्ष पवित्रतों लवंगवनींचीं फळें विचित्रयेऊनि पडलीं पुढारां
६२
मग तीं फळें खात जेठीरसनेसी पडो पाहे मिठीअहा अहा म्हणे शेवटींअमृतसरीं दाटले
६३
मग ती फळें केलिया भक्षणशुद्धजीवनें हस्त प्रक्षाळूनबैसले आसनीं सुखें येऊनत्यावरी बोले गोरक्ष तो
६४
म्हणे खालीं फळें उत्तम राहिलींपरी जैसीं तैसी करावीं वहिलींपुन्हां योजूनि वृक्षडाहळींपुढें मार्गा गमावें
६५
याउपरी कानिफानाथऐसा कोण ब्रह्मयाचा सुतपुन्हां निर्मोनि मूर्तिमंतजैसे तैसे करील
६६
गोरक्ष म्हणे गुरुपुत्रजो निस्सीमपणीं आहे पवित्रत्यासी हें करणें अघटित विचित्रकदाकाळीं नसेचि
६७
तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्नमग ऐसियाची कथा कोणजो महीच मस्तकीं करिता धारणतो पर्वताचे ओझें शिणे कीं
६८
जो अर्कतेजा निवविणारतो पावक ठिणगीनें पळे सत्वरहदयीं सांठवितो सप्तसागरतो थिल्लरोदके अटकेना
६९
जो बोलकाजाचे गंभीर चातुरींबृहस्पतीतें मागें सारीतो अजारक्षकाते भिवोनि अंतरींमौन वरील कां वाचे
७०
जो आपुलें प्रतापेंकरुनीक्षीराब्धी करील गृहवासनीतो तक्राकरिता सदैव सदनींभीक मागेल केउता
७१
कीं चक्षूचे कृपाकटाक्षेपाषाण करी परीस जैस्सेतो हेमाकरितां काय प्रत्यक्षआराधील धनाढ्या
७२
जयाचे वचनवाग्वटीमिरविती सकळ देवांच्या थाटीतो आपल्या मोक्षासाठींआराधीना भूतासी
७३
तस्मात् ब्रह्मयाची काय कथाजो अनंतब्रह्मांडें होय निर्मितासर्व कर्तव्याचा कर्तागुरुकृपेसी मिरवितसे
७४
नातरी मुळींच प्रौढींगुरु मिरवला ज्याच्या कवाडींतयाची दैना कोण फेडीकाबाड ओझें वाहे तो
७५
ऐसें ऐकतां कानिफानाथपरम क्षोभला खचितार्थजैसा पावक आज्यसिंचितार्थकवळूं पाहे ब्रह्मांडा
७६
म्हणे हो हो जाणतों तूतेंआणि तुझिया गुरुसहितबहुसाधनीं प्रतापवंतनरकामाजी पचतसे
७७
वाचे म्हणविती योगीजनकर्म आचरती नरकपतनसकळ स्त्रीराष्ट्र वेष्टूनभोग पापांचा
७८
जितेंद्रियत्व दावावें जनींअसोनि भोग चिंती मनीतया भोगवश करोनिमेनिकानाथ होवोनि ठेला
७९
तरी ठाऊक गुरु तुझाकिती बोलसी प्राज्ञी ओजाआतां ब्रह्मयातें करुनि हीन तेजाढिसाळ गोष्टी करितोसी
८०
प्रथम गुरु तुझा काबाडीतुझी दैना कोण फेडीआतां सोडोनि सकळ प्रौढीमार्गालागी क्रमी कां
८१
ऐसें वचन खडतर बोलणेंगोरक्षकातें होतां श्रवणमग म्हणे बोलसी आपणचावटीपणी हे भ्रष्टा
८२
तुझा गुरु जालिंदरनाथप्रतापहीन दीन बहुतदशवर्षे आजपर्यंतनरकीं नित्य पचतसे
८३
परी त्या सामर्थ्य नाहीं झालेंकीं आपण येथूनि जावें वहिलेंनृपसर्पदपें वेष्टिलेंशक्तिहीन झालासे
८४
हेळापट्टणीं गौडबंगाल देशींवस्ताद मिळाला आहे त्यासीधन्य गोपीचंद प्रतापराशीलीदगर्तीत पचवीतसे
८५
तैसा नोहे गुरु माझाहालवील सकळ ब्रह्मांड चोजाशंकराचें अस्त्र ओजाकरकमळीं मिरवतसे
८६
अष्टभैरव महादारुणअजिंक्य देवांदानवांकारणत्यांसी बळें करुनि कंदनशरणागत आणिलें
८७
पाहे केवढा मारुतसुतजेणें विजयी केला रघुनाथतया मस्तकीं देऊनि पर्वतउभा केला स्तंभापरी
८८
वीरभद्र प्रतापतरणीदेवदानवां अजिंक्य करणीतयाचा प्राण कंठीं आणुनीशरणागत तो केला
८९
द्वादशकळी तीव्र आदित्यतयाचा उलथोनि पाडिला रथसकळ देव शरणागतहोऊनि लोटले पायासी
९०
तरी प्रतापी गुरु ऐसाभक्त सोडवीत नरकक्लेशातयाच्य वरदकृपें ऐसाआतांचि पाहें हे भ्रष्टा
९१
मग घेऊनि भस्मचिमुटीमंत्रप्रयोग बोले होटींसंजीवनी ते पीयूषथाटीसकळ फळातें मिरवली
९२
ऐसीं सकळ प्रयोगीं फळें संपूर्णजैसीं तैसीं ठेलीं होऊनतें कानिफानाथ पाहूनमनीं शंकित पैं झाला
९३
योजूनि सवें मुख वोठींविस्मय करीत आपुले पोटींम्हणे धन्य हा प्रतापजेठीजगामाजी मिरविला
९४
सकळ टाकूनि विरुद्ध भाषणधांवोनि दिधलें आलिंगानम्हणे धन्य तूं एक निपुणगुरुपुत्रता मिरविशी
९५
परी ऐशा बोलतां विरुद्ध बोलामातें सर्वज्ञ लाभ झालाशोधित फिरलों जालिंदरालाठाव लाधला तुजपासीं
९६
यापरी गोरक्ष बोले वचनहें बोलिलासी अति अप्रमाणमाझा लाभ तुजकारणतुझा लाभ मज झाला
९७
ते बोल नव्हे वाईटदाविते झाले मार्ग चोखटगुप्तगुरुचें उघडूनि कपाटमार्गदिवटा पैं केला
९८
तरी आतां उत्तम झालेंदृष्टीं पाहूं गुरुपाउलेंऐसें वदूनि प्रीतीं नमिलेंएकमेकां तें वेळा
९९
याउपरी गौरनंदनस्पर्शास्त्र मुखी जल्पूनवृक्षांदेठीं फळे नेऊनजेथील तेथें जडियेलीं
१००
मग पुन्हां करोनि नमनानामनप्रांजळ वर्णित वर्तंमानएकमेकांतें विचारुनआदेश म्हणवूनि जाताती
१०१
गोरक्ष चालिला स्त्रीदेशांतकानिफा गौडबंगाली जातहेळापट्टण लक्षूनियां पंथकूच मुक्काम साधीतसे
१०२
परी तीव्र होऊनि अति चित्तींम्हणे जातांचि भस्म करीन नृपतीअहा जालिंदर गुरुमूर्तीदुखविली नष्टानें
१०३
ऐसें म्हणोनि वारंवारपरम क्रोधाचा वैश्वानरशिखा डुलवी स्वअंगावरअहाळूनि पाडावया
१०४
तन्न्यायें तीव्रमतीचित्तकुंडी पावकस्थितीप्रदीप करोनि नृपआहुतीइच्छूनियां जातसे
१०५
तच्छिष्यकटकथाटीगमन करितां वाटोवाटींतंव हेळापट्टण काननपुटींजाऊनियां पोहोंचला
१०६
तो वृत्तांत रायासी कळलाकानिफा आले गावालामग परिवारासहित गोपीचंद वहिलासवें सामोरा जातमे
१०७
चित्तीं म्हणे मम वैभवायोग्य दिसे महानुभावातरी गुरु हाचि करावाकायावाचाभावानें
१०८
सातशें शिष्यकटक भारीपूर्णयोगी ब्रह्मचारीगज वाजी स्यंदनी स्वारीजगामाजी मिरवतसे
१०९
सिद्ध करुनि चमूभारशिबिकासनें तुरंग अपारअन्य मंडळी वीर झुंजाररायासवें मिरवले
११०
रायमस्तकीं एकशतचंद्राकृती देदीप्यवंतऐसीं छत्रें वर्णिता बहुतवाढेल ग्रंथ आगळा
१११
एक सहस्त्र सातशें मितीबरोबरीचे सरदार असतीतयांचीं छत्रें पंच असतीचंद्राकीं मिरवत
११२
हेमतगटी झालरा शिल्पयुक्तींछत्रकळसाची अपार दीप्तीरत्नखचित अर्का म्हणतीतेज सांडी तूं आपुलें
११३
ऐशा संपत्तिसंभारेसीठेंगणें भाविती अमरपदासीमार्गी चालतां मांत्रिकासीपाचारी तो नृपनाथ
११४
म्हणती प्रारब्धयोगेंकरुनयेथें पातलें सिद्धरत्नतरी याचा अनुग्रह घेऊनईश्वरभक्तीं परिधानूं
११५
हा श्रीगुरु आहें योग्य मातेंमाझी संपत्ती भूषणभरतेंजगामाजी दिसे सरितेंयोगायोग्य उभयतीं
११६
नातरी गुरु मम मातेनेंयोजिला होता कंगालहीनरत्नपति काच आणूनभूषणातें मिरवीतसे
११७
कीं कल्पतरुच्या बागायतींकंटकतरु बाभूळवस्तीकीं अर्कचंद्राचे मध्यपंक्तीकाजव्यानें मिरवावें
११८
मी भूप माझे पंक्तीभूपती असावा सर्वज्ञमूर्तीघृतशर्करा दुग्धसरितींलवण कैसें वाढावें
११९
अमंगळ गल्ली कुश्वल स्थानबहुत ज्ञानी पिशाचसमानतो गुरु मातेंनेंजालिंदर योजिला
१२०
अहो ती योग्य नसे संगतकाय केलें स्त्रीजातींतपरी आतां उदेलें उचिताउचितगुरु कानिफा आम्हांसी
१२१
ऐसें वदूनि मंत्रिकासीराव जातसे कटकप्रदेशीघेऊनि सवें संभारासीषोडशोपचार आदरें
१२२
ऐसेपरी कटकथाटींराव जाय सुगम वाटींत्या मार्गी योगींद्र जेठीजाऊनियां मिळाला
१२३
परी येतां देखतांचि गोपीचंदहदयीं धडाडला अपार क्रोधपरी विवेक अर्गळा अपारतेणें अक्रोध मनामाजी संचरला
१२४
आतांचि शापुनि करीन भस्मपरी कार्य सुगमउरकोनि घ्यावा मनोधर्मआघीं पाहूनि गुरुचरणपद्मशासनातें मग ओपूं
१२६
ऐसा विचार करुनि चित्तींस्तब्ध राहिला योगींद्र जतीक्रोधानळा समूळ शांतीबोधलक्ष्मी स्थापीतसे
१२७
जैसे शस्त्रास्त्री निपुणजेवीं रक्षिती प्रतापवानपरी कार्यसंबंधीं देदीप्यमानदर्शविती लोकांतें
१२८
तरी प्रथम श्रीगुरुमूर्तीप्रत्यक्ष करावी याचे हातींमग क्रोधानळासी दुस्तर आहुतीगोपीचंद योजावा
१२९
ऐसिये विचारीं शब्दबोधेंकानिफा राहिला स्तब्धयेरीकडे गोपीचंदचरणावरी लोटला
१३०
उभा राहिला समोर दृष्टींनम्रोत्तर बोले होटींजोडोनियां करसंपुटींविनवणी विनवीतसे
१३१
हे महाराजा दैवयोगामज आळशावरी गंगावोळलासी कृपाओघाअनाथा सनाथ करावया
१३२
तुम्ही कृपाळू संतसज्जनदयाभांडार शांतिरत्नज्ञानविज्ञान आस्तिककर्मगृहस्थांसीं कल्पावें
१३३
ब्रह्मी पावला तत्त्वतांषड्रगुणासी विषयां दमितांसकळ भोगूनि अकर्तामिरवतसां जगामाजी
१३४
आणि जगाच्या विषयतिमिरींज्ञानदिवटी तेजारीमिरवूनि सुख सनाथपरीदाविते झाला महाराजा
१३५
ऐसे साधक याचकमणीतुम्ही कल्पतरु कल्पनापूर्णीऐसिये स्थिती जान्हवी जीवनीबोळविलीत मजवरुती
१३६
परी श्रीरायाचें वागुत्तरऐकूनि कानिफा मनोहरतेणें चित्तशक्तितरुवरआनंदशांती मिरवली
१३७
देहीं क्रोधाचा वैश्वानरपेटवा घेत होता अपारतरी रावउत्तराचें सिंचननीरहोतांचि शांति वरियेली
१३८
मग रायासी धरुनि करींबैसविला स्वशेजारींमग बोलत वागुत्तरींकुशळ असा कीं महाराजा
१३९
म्हणे राया अनुचित केलेंपरी तव भाग्य सबळ पाहिलेंतेणेंकरुनि शांतीतें वरिलेंमम मानसें महाराजा
१४०
नातरी अनर्थासी गांठीपडत होती प्राणासी मिठीपरी तव भाग्यउत्तराचे देठींशांतिफळें मिरवलीं
१४१
तरी आतां असो कैसेंवेगीं चाल पट्टणासतेथें सकळ इतिहासनिवेदीन तुज राया
१४२
मग बैसूनि शिबिकासनींकाटकासह ग्रामासी येवोनिराये राजसदना आणोनीकनकासनीं वाहिला
१४३
वाहिला तरी प्रीतीकरुनीषोडशोपचारें पूजिला मुनीहेमरत्नीं आणि वस्त्रभूषणींनम्रवाणी बोलतसे
१४४
हे महाराजा योगसंपत्तीकामना वेधली माझे चित्तींअनुग्रहीं चोज घेऊनि निगुतीसनाथपणी मिरवावें
१४५
ऐसी वेधककामना चित्तींप्रथम भागीं मिरवत होतीत्यांत उदेली कोपयुक्तीवैश्वानरशिखा ते
१४६
तेणें आनंदोनि उदयाचा तरुवोळलासे योगधीरुमग पुढें वासनाफळकारुप्रेरावयातें पावला
१४७
नृप म्हणे अर्थ उघडूनचित्तीं मिरवा समाधाननातरी भययुक्त भिरड पूर्णचित्ततरुतें स्पर्शीतसे४८तरी प्रांजळ करुनि मातेंकृपें ओपूनि अनुग्रहातेंआपुला साह्य म्हणोनि सरतेंतिहीं लोकीं मिरवावें
१४९
कानिफा म्हणे नृपा ऐकमम अनुग्रहाचें उत्तम दोंदिकघेऊं पाहसी भावपूर्वकपरी तुवां भाव नासिला
१५०
जैसें दुग्ध पवित्र गोडपरी लवण स्पर्शितां परम द्वाडतेवीं तूतें घडूनि विघडआलें आहे महाराजा
१५१
अरे माझा अनुग्रह घ्यावया पाहसीपरी ज्याचा अनुग्रह मजसीतो तूं स्वामी महागर्तेसीअश्वविष्ठेंत स्थापिलाज
१५२
परी तुझें आयुष्य लागपूर्वपुण्याचा होता योगम्हणोनि क्रोधानळ मगशांतिदरीं दडाला हो
१५३
नातरी महाराज जालिंदरप्रळयकाळीचा वैश्वानरतुझे वैभवाचें अपार नीरभस्म करिता क्षणार्धे
१५४
जयाच्या प्रतापाची सरीकोण करी बोल वागुत्तरींजेणें स्वर्गदेवतांची थोरीझाडोझाडीं लाविली
१५५
मग साद्यंत वराची कथातया नृपातें सांगतांतेणेंही सकळ ऐकूनि वार्ताभय उदेलें चित्तांत
१५६
अंगीं रोमांच आले दाटूनशरीरीं कापरें दाटले पूर्णमग धरोनि त्याचे चरणनम्रपणें विनवीतसे
१५७
म्हणे महाराजा योगवित्तघडूनि आलें तें अनुचिततरी आतां क्षमा उचितप्रसाद करा दासावरी
१५८
या ब्रह्मांडपंडपावमजएवढा कोणी नाहीं पतितअहा ही करणी अघटितघडूनि आली मजलागीं
१५९
परी सदैव मायेपरीशांति वरावी हदयांतरींबहु अन्याय होतां किशोरीअहितातें टेकेना
१६०
तुम्ही संत दयावंतघेतां जगाचे बहु आघातअमृतोपम मानूनि चित्तकृपा उचित दर्शवितां
१६१
जैसा झाडा घातला घावएकीं लावणी केली अपूर्वपरि उभयतां एकचि छावमिरवूं शके जैशी कां
१६२
कीं सरितापात्रीं नीरओघींधुती पूजिती मळसंगीपरी एकचि तों उभयप्रसंगीमिरवली कीं सरिता ते
१६३
कीं तस्कारा होतां घरांत रिघावात्यासही प्रकाश देई जैसा दवातन्न्याय संतभावामिरवूं जात महाराजा
१६४
तरी आतां असो कैसेंक्षमावोढण करी आम्हांसदुष्कृतसरिताप्रवाही विशेषओढूनि काढीं महाराजा
१६५
ऐसें ऐकूनि तयाचें वचननाभी म्हणे गजकर्णनंदनमग रायालागीं सवें घेऊनस्वशिबिरातें पातला
१६६
परी हा वृत्तांत ऐकूनिपरिचारिका धांवल्या तेथूनीत्यांनी जाऊनि सकळ युवतींलागोनीमैनावतीते सांगितलें
१६७
हे माय वो भक्तिसंपादनींजालिंदरगुरु तुम्हांलागुनीपरी तयाची रायें विपत्तीं करुनीमहीगर्ते मिरविला
१६८
तेंही अश्वाविष्ठेतटाकिला आहे दशवरुपांतही राजदरबाअ ऐकूनि माततुम्हां आम्हीं निवेदिलें
१६९
म्हणाल कैसी कळली माततरी जालिंदराचा आला सुतअपार वैभव कानिफानाथविद्यार्णव दुसरा
१७०
तरी तयाचें वैभव पाहूनशेवटीं नटला आपुला नंदनपरी जालिंदराचें वर्तमानश्रुत केलें तेणेंचि
१७१
आता राव तयाचे शिबिरींगेला आहे सहपरिवारींतेथें घडेल जैसेपरीतैसे वृत्त सांगूं पुढें
१७२
ऐसें सांगतां युवतीहदयीं क्षोभली मैनावतीपरी पुत्रमोहाची संपत्तीचित्तझुलारी हेलावे
१७३
येरीकडे नृपनाथमुनिशिबिरा जाऊनि त्वरितउत्तम अगारीं अनन्य पदार्थइच्छेसमान भरियेले
१७४
सदा सन्मुख कर जोडूनअंगें धांवे कार्यासमानजेथील तेथें अर्थ पुरवूनसंगोपन करीतसे
१७५
जैसे दुर्वासा अतिथी सकळसेवे आराधी कौरवपाळतन्न्याय हा भूपाळनाथालागी संबोखी
१७६
असो ऐसे सेवेप्रकरणीअस्तास गेला वासरमणीमग रायातें आज्ञा देऊनीबोळविला सदनातें
१७७
राव पातला सदनाप्रतीपरी येतांचि वंदिली मैनावतीमग झाला वृत्तांत तियेप्रतीनिवेदिला रायानें
१७८
वृत्तांत निवेदूनि तिजसीतुवां जाऊनि शिबिरासीयुक्तिप्रयुक्ती बोधूनि त्यासीमहाविघ्ना निवटावें
१७९
मग अवश्य बोलूनि मैनावतीशिबिरा आसनीं जाऊं पाहतीशीघ्र येऊनि शिबिराप्रतीकानिफानाथ मिरवला
१८०
वंदूनि निकट बैसली तेथम्हणे महाराजा गुरुनाथकोण तुम्ही वरिला अर्थनाथपंथी मिरवावया
१८१
तरी या नाथपंथिकामीही मिरवतें महीलोकातरी मम मौळी वरदपादुकाश्रीजालिंदराची मिरवितें
१८२
ऐसी ऐकोनि तियेची वाणीबोलता झाला कानिफा मुनीऐसी असूनि बरवी करणीजालिंदरातें मिरविली
१८३
तूं अनुग्रही असतां निश्वितगुरु ठेवावा अश्वविष्ठेंतमैनावती म्हणे श्रुतआजि झालें महाराजा
१८४
मग आपुली कथा मुळापासुनीतया नाथासी निवेदूनीहें स्वसुताहातीं झाली करणीमज न कळतां महाराजा
१८५
तरी आतां झालें कर्मसज्ञाना सांवरी दुर्गमपरी रायाचें दुष्टकर्मटाळूनि सुपंथ मिरवीं कां
१८६
ऐसें सांगूनि तयाप्रतीमोहों उपजला अति चित्तींमग म्हणे श्रीगुरुमूर्तीदृश्य करा लोकांत
१८७
म्हणशील सुताचे हातेंकरुनकां न करिसी दृश्यमानपरी नेणों जालिंदराचा कोपाग्नधांव घेईल पुढारां
१८८
तरी बोधावा युक्तिप्रयुक्तींरक्षूनियां आपुल्या भाच्याप्रतीदृश्य करुनि गुरुमूर्तीसत्कीर्ती भाच्या वरीं कां
१८९
मग या ब्रह्मांडमंडपांतकीर्तिध्वज अति लखलखीतहेळाऊनि परम लोकांतकीर्तिध्वज फडकेल
१९०
ऐसें बोलूनियां तयाप्रतीमग उठती झाली मैनावतीत्यानेंही नमूनि परमप्रीतीबोळविलें भगिनीतें
१९१
पूर्ण आश्वासन देऊनम्हणे रायाचें कल्याण इच्छी पूर्णश्रीगुरुचरण पाहूनि जाणसकळ संशय सोडीं कां
१९२
ऐशी आश्वासूनि माताश्रीनाथ झाला बोळविताअसो मैनावती तत्त्वतांनमूनि आली सदनासी
१९३
स्वसुतातें पाचारुनसकळ सांगितलें वर्तमानमग सकळ भयाचें दृढासनभंगित झालें तत्क्षणीं
१९४
जालिंदराचे अनुग्रहासहितआश्वासीत कानिफानाथऐसा सकळ सांगूनि वृत्तांतभयमुक्त तो केला
१९५
असो आतां येथूनपुढिलें अध्यायीं धुंडीनंदननरहरिवरदें श्रोत्यांकारण्झमालू निवेदिल गुरुकृपें
१९६
स्वस्ति श्रीभक्तिकथासारसंमत गोरक्षकाव्य किमयागारसदा परिसोत भाविक चतुरषोडशाध्याय गोड हा
१९७

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ श्री नवनाथाय नमः ॥

या अध्यायाचे वाचन झाले?

तुमची नोंद या ब्राउझरमध्ये जतन होते.