॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद

श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी

अध्याय १५

कानिफनाथ व मारुती यांचे युद्ध, कानिफनाथाचे स्त्रीराज्यात आगमन.. १९७ ओव्या · कथासार वाचा

श्रीगणेशाय नमः जयजयाजी जगत्पालकामुनिमानसचकोरमृगांकाकृपांबुदातया पूर्णशशांकाग्रंथादरीं येई कां
मागील अध्यायीं कथनतुवां वदविलें कृपा करुनगर्तकूपीं अग्निनंदनगोपीचंदें घातला
घातला परी कैसा लागकीं कोठें नाहीं मूसमागजैसा शंकर गेल्यामागफसवूनि त्यासी वरियेलें
असो पुढें आतां श्रोतीश्रवण करावी रसाळ उक्तीसिंहावलोकनीं घेऊनि गतीमागील कथा विलोका
बद्रिकाश्रमीं पूर्ण तपासीगोरक्ष कानिफा जान्हवीतीरासीतप आचरितां द्वादशवर्षीउद्यापन उरकिलें
परी याचें त्यासी नाहीं ठाऊककायाभुवनीं उभय अर्कसंगोपीत कामांतकपरी माहीत नाहीं अन्योन्यां
पुढील भविष्योत्तर जाणूनगुप्त ठेविलें ओळखूनयापरी तप झालिया पूर्णउभयतांही बोळविलें
कानिफा निघाला उत्तरदेशींमहातपी तो गोरक्षशेखीउत्तरपूर्णमध्य कोणासीसंचार करीत चालिला
प्रयाग गया काशी करुनश्रीगुरुतें शोधी गजकर्णनंदनयापरी पूर्ण दक्षिण कोणगोरक्ष शोधी मच्छिंद्रा
शोधीत परी तो कैसाकीं जलाविण विभक्त मासाकीं बाळ मातेचे वसवसासदोदित हदयांत
१०
नावडे त्यातें अन्नपाणीनावडे निद्रा सुखासनींसदा भंवते भाविक मनींउद्वेगचक्रीं पडियेला
११
श्रीगुरु आठवूनि चित्तांतभ्रमण करीतसे पिशाचवतसाडी श्वास आणूनि हेतनाथ हे नाथ म्हणोनि
१२
वारंवार हंबरडे फोडीतम्हणे कधीं भेटती गुरुनाथप्राण डोळां उरला किंचितपाय आतां दाखवीं
१३
ऐसी प्रेमें होतसे वृष्टीआपुल्या पुसे वागवटीम्हणे पहिला असेल मच्छिंद्र जेठीकोणी तरी सांगा हो
१४
ऐसें बहुधा बहुतां पुसूननाना क्षेत्री करी गमनतो भ्रमत गौडदेशाकारणहेळापट्टणीं पातला
१५
तपें मांस भक्षिलें समग्रअति सूक्ष्म जर्जर शरीरत्यावरी श्रीगुरुवियोगचिंताशरहाडीं टोले मारीतसे
१६
जेथें बैसे तेथें वसेनीरबिंदू वाहती नेत्रासकार्याकारण कोण्या क्षेत्रासभिक्षा मागूं जातसे
१७
तों हेळापट्टण नगरामाझारीयेऊनि बैसला क्षणभरीतों द्वारपाळ ग्रामद्वारींबैसले होते कांहींसे
१८
त्यांनी पाहूनि गोरक्षनाथआदेश म्हणूनि त्यातें नमीतपरी गोरक्ष तयां द्वारपाळां पुसतमच्छिंद्रनाथ आहे कीं
१९
तवं ते म्हणती आमुचे गांवींमच्छिंद्र नामें कोणी गोसावीमहाराजा आलाचि नाहींकाय सांगावी सुखव्यक्ती
२०
परी नाथा एक तापसीआला होता या गांवासीनाम जालिंदर या जगासीमिरवत होता महाराजा
२१
काय सांगावी तयाची नीतीलोकांसी वाटे जैसा गभस्तीतो तृणभारा वाहतां माथींअधर आम्ही पाहातसों
२२
गोरक्ष म्हणे काय कारणमस्तकीं वाहतसे तृणयेरी म्हणे तो काननांतूनगोधनाकरितां आणीतसे
२३
गोरक्ष म्हणे गोधन कोणाचेंयेरी म्हणती तें गांवीचेंपरी निःस्पृहवृत्ति गोधनाचेंपालन करी महाराजा
२४
गोरक्ष म्हणे किती दिवसराहिला होता या वस्तीसराहूनि लोप कवण ठायासझाला पुढें तो सांगा
२५
येरी म्हणती योगद्रुमाएक संवत्सर राहिला या ग्रामापुढें गेला कोठें तें आम्हांमाहीत नाहीं महाराजा
२६
याउपरी गोरक्षनाथदिवस किती लोटले ते पाहातयेरी म्हणे दश आजपर्यंतलोटले संवत्सर महाराजा
२७
ऐसी ऐकूनि तयांची वाणीगोरक्ष विचारी आपुले मनींतरी कां माझा स्वामी नाम पालटूनीजगामाजी विचरला
२८
मी सांडूनि पूर्ण तपासलागावया करीत येईन धांवतम्हणूनि पालटिलें स्वनामासगांवामाजीं मिरवला
२९
ऐसी कल्पना आणूनि मनींअश्रुधारा वाहती नयनींम्हणे महाराजा गेलासी सोडुनीमज पाडसा कैसा रे
३०
टाकूनि निर्वाण काननांतकोठें गेला माझा नाथमी अर्भक अज्ञान बाळकबहुत मोकलिलें कैसें मज
३१
हे नाथ तूं सकळमयसर्वस्वी बापमायतुजविण मातें कोण आश्रयतिन्हीं लोकीं दिसेना
३२
अहा मज पाडसाची येरणीचरुं गेली कोणे रानींमाझें स्मरण सकळ सांडूनीकैसी गुंतली तिकडेचि
३३
अहा मग वत्साची प्रेममाउलीकोण रानीं चरुं गेलीपरी माझे स्मरण विसरलीकैसी गुंतली तिकडेचि
३४
अहा माझी मोहाची मायकरुं गेली अंतरायमज ते विसरुनि सदयहदयकैसी गुंतली तिकडेचि
३५
ऐसें बोलूनि विलाप करीतऊर्ध्व हंबरडा मारुनि धांवतपोट कवळुनि श्वास सोडीतअहा नाथ म्हणूनी
३६
मग ते कानवाळू द्वारपाळम्हणती नाथा न करीं तळमळतुम्हां मायलेंकरांचा मेळईश्वर करील पुढारां
३७
ऐसी वदती ते वाणीगांवांत धाडिला भिक्षेलागूनीमग तो गोरक्ष सदनोसदनींअलक्ष गाजवीत जातसे
३८
परी जालिंदर होता ज्या ठायींतेथें सहज आला भिक्षेस पाहींतैं एकटएक सदन सांईपाहुनि अलख म्हणतसे
३९
तो सवाल ऐकूनि जालिंदरनाथआदेश म्हणत महीआंतते आदेश गोरक्षाप्रतश्रवण झाले तांतडी
४०
मग ते आदेश वंदूनि पुढतीम्हणे कोठे आहांत महाराज जतीयेरु म्हणे महीगतीविराजलोसे महाराजा
४१
गोरक्ष म्हणे कवण नामींमिरवत आहांत नाथा स्वामीयेरी म्हणे मनोधर्मीनाथ जालिंदर म्हणतात
४२
परी महाराजा योगद्रुमाकवण नाम मिरवतसे तुम्हांआणि वहदहस्तप्रसादउगमागुरु कोण तुमचा हो
४३
गोरक्ष म्हणे मच्छिन्द्रजतीवरदप्रसाद गुरुमूर्तीआणि गोरक्ष नाम देहाप्रतीजगामाजी मिरवलें
४४
परी महाराजा ऐकें उक्तीतुम्हीं सेविली महीगर्तिजगीं प्रवेवेष्टवूनि पाप मतीभंगीत झाली लोकांची
४५
ऐसी ऐकूनि तयाची वार्ताजालिंदर सांगे झाली कथाती ऐकतांचि गोरक्षनाथाकोपानळ पेटला
४६
म्हणे महाराजा आज्ञा करावीक्षणेंचि घालीन पालथी महीतंव त्या नृपाची प्रौढी कांहींभस्म करीन क्षणांत
४७
जैसा अग्नि पेटला सदनांततेणें तृणतंतूचें कोण गणिततन्न्यायें येथील नृपनाथभस्म करीन महाराजा
४८
अहा ऐसी गुरुमूर्तीदेवां दानवां वरद अतीऐशा स्वामीसी घालूनि गर्तीराज्य कैसा करितो जी
४९
तरी आतांचि आज्ञा प्रमाणलागूं नेदीं एक क्षणमग जालिंदर बोले वचनऐसें नोहे महाराजा
५०
या कार्याचें पुढें कार्यनातरी हदयीं विचारुनि पाहेंनाथपंथ येणें दुणावेहेंचि भविष्य असे पहा
५१
तरी आतां क्षमा करुनपुढें महाराजा करी गमनपरी हें ऐसें वर्तमानबोलूं नको जगासी
५२
तुम्ही हिंडतां सहज महीसीमम सुत कानिफा भेटतां तुम्हांसीश्रुत करावें कृत्य त्यासीवृत्तांत यथींचा सकळिक
५३
मग तो युक्तिप्रयुक्ती करुनसंपादूनि रायासी कल्याणमातें काढील गर्तेतूनवाढवील तो नाथपंथ
५४
ऐसें सांगूनि गोरक्षनाथआदेश म्हणू बोळवीतआणि गोरक्ष ऐकूनि शांतहोऊन आदेश म्हणतसे
५५
मग आदेशशब्दोंचे गमनकरुनि निघाला गोरक्षनंदनआहारापुरतें मेळवूनि अन्नउपहारा संपादी
५६
मग शिंगी शेली करुनि ग्रहणकरिता झाला मार्गी गमनतों जगन्नाथ प्राचीनस्थानतेथें जाऊनि पोहोंचला
५७
येरींकडे कानिफानाथगांवोगांवी भ्रमण करीतपरी ज्या गांवी जाय तेथेंजगालागीं बोधीतसे
५८
कानिफामुखाचिये बोधस्थितीऐकूनि परम जन मानवतीसलिलप्रेम दाटूनि चित्तींअनुग्रह घेती तयाचा
५९
मग त्या गांवांत एकेक दोनसच्छिष्य निघती विरक्तमानप्रपंचराहणी लाथ मारुननाथासवें चालती
६०
ऐसे एक दोन पाच सातदहाविसांचा मेळा जमतहोतां होतां सप्तशतदाटले शिष्य समागमें
६१
पूर्वदेशीं करितां गमनतो स्त्रीराज्य दोषसघनतयाच्या सीमेपर्यंत जाऊनउलट पाहती माघारां
६२
स्त्रीराज्यांत पुरुष कोणीनाहीं हे विख्यात जनश्रुतकर्णीम्हणोनि शिष्यमंडळ दणाणोनिपरतोनि पाहती माघारीं
६३
ठायीं ठायीं करिती विचारम्हणती स्त्रीराज्यदेव तीव्रतेथें प्रवेश करितां नरवाचत नाहीं सहसाही
६४
ऐसा देश कठिण असूनस्वामी करिती तयांत गमनतरी अग्निकुंडीं सकळां नेऊनपूर्ण आहुती इच्छीतसे
६५
जरी सेविल्या हलाहलातेंमग कोण पुरुष जगेल तेथेजेवी तीव्र अग्नीत शिरतां तेथेंआहाळेना कैसें म्हणावें
६६
सदनीं प्रेरिला वैश्वानरसदन झाले स्त्रदिरांगारतयामाजी निघतां नरवांचेल कैसा सहसा तो
६७
कीं पतंग घेता दीपाची भेटीत्याचि रीती येथें गोष्टीदिसूनि येती परी शेवटींमृत्यु आम्हा दिसतसे
६८
ऐसें होतां निश्चयवचनकोणी म्हणती करा पलायनजीवित्व वाचल्या साधनघडून येईल महाराजा
६९
एक म्हणती ऐसें करावेंसदृढ धरावे गुरुचे पायमग जीवित्वाचें भय कायजातसे तरी जाऊं द्या
७०
काय वाचा तनुमनधनप्रथम त्यासी केलें अर्पणमग या जीवित्वाची आस्था धरुनव्रतालागीं कां भंगावें
७१
एक म्हणती लागलें वेडकैंचे व्रत पडिपाडजीवित्व हरल्या व्रतकोडकोणी दृष्टीं पाहिलें
७२
तरी हा अर्थ सांडूनि धनया स्वामीलागीं चुकवूनगृहस्थांनो पलायनकरुनि जावित्व वांचवा
७३
या स्वामीसी लागलें वेडसादर मृत्युझांपडजया ठायीं पडेल धाडचालूनि जातो त्या ठायीं
७४
ऐसें तुम्हांसीं सत्य भासेलतरी हे मानूनि घ्यावे बोलजीवित्वाची आस्था असेलतरी बोल्र फोल न मानावे
७५
ऐसें ठायी ठायीं ताटींबैसूनि करिती बोलचावटीपरी हा अर्थ सकळ पोटींकानिफातें समजला
७६
मनांत म्हणे भ्याले सकळहीनबुद्धि अति दुर्बळपरी आपुला प्रताप सांगतां तुंबळसत्य वाटणार नाहीं यासी
७७
मग करीं कवळूनि भस्मचिमुटीस्पर्शास्त्रप्रयोग पोटींजल्पूनि प्रेरी महीपोटींतिन्ही दिशा लक्षुनी
७८
पुढील मात्र मार्ग ठेवूनि मोकळादिशा बंधन केल्या सकळाकेल्या परी ऐशा बळादेवदानवां आतुळेना
७९
केले अर्थ द्व्यर्थपरशिष्य पळूनिं नाहीं जाणारआणि मारुतीचाही भुभुःकारपोहोचूं नये त्या ठाया
८०
ऐसें स्पर्शास्त्र पृष्ठींरचूनि शांत बैसला जेठीमग शिष्यां पाचारुनि शेवटींपुसता झाला तथासी
८१
लहान मोठे मेळवूनसमुद्रायासी बैसवूनम्हणे आम्हांलागीं जाणेंस्त्रीराज्यांत आहे कीं
८२
परी तो देश कठिणवांचत नाहीं पुरुषरत्नहनुमंतभुभुःकारेंकरुनप्राणहानी होतसे
८३
पुढें देश बहुत कठिणपरी आम्हांलागीं आहे जाणेतया देशींचे तीर्थ करुनयेऊं ऐसे वाटतसे
८४
आमुचा विश्वास गुरुपायींजरी असेल भवप्रवाहींतरी देशाची लंघूनि महीपुनः येऊं माघारे
८५
नातरी सुखें जावो प्राणपरी मनाची धांव घेई पूर्णतरी तुमचा विचार कवणतो मजप्रती दर्शवावा
८६
जें निःसीम गुरुच्या असती भक्तींतिहीं धरावी माझी संगतीनातरी जीवलोम असेल चित्तींतिहीं जावें माघारें
८७
ऐसें सांगूनि बोलावीतम्हणे देखिली बुद्धि करा येथमग निःसीम भक्तांचे किंचिततया ठायी राहिले
८८
सातशतांत सात जाणठायीं उरले स्थान धरुनवरकड कंबरवस्ती करुनकल्पिल्या मार्गी चालिले
८९
मनांत मानिती सुखवसाम्हणती तस्करबुद्धीचा ठसापळूनि जाता काजळीलेशामूर्खत्व येते आपणांसी
९०
तरी फार बरवें झालेंस्वामीनें अंतर ओळखिलेंउजळणी बोळविलेकीर्तिमाहात्म्य रक्षुनी
९१
ऐसा चित्तीं सुखवसा मानूनआले पंथी करिती गमनएक कोस गेले धांवूनसीमेपर्यंत ग्रामाच्या
९२
परी स्पर्शास्त्र सीमा लक्षूनबैसलें होतें मही वेष्टूनतेणें येतांच धरिले कवळूनमहिसीं दृढ केले ते
९३
पद झालें महीं व्यक्तमागें पुढें ठेवाया नसे शक्तजैसें सावज गुंतल्या चिखलांतबळ कांहीं चालेना
९४
असो झाले महीं व्यक्तम्हणूनि हस्ते काढूं जाततों हस्त झाले महीं लिप्तमग सकळ ओणवे झाले
९५
येरीकडे कानिफानाथत्या सातातें बोलावूनि घेतजवळ बैसवूनि सकळ वृत्तांतनिवेदिला तयांचा
९६
तुम्ही करावें आतां ऐसेंशीघ्र जाऊनि त्या महीसपाषाण करीं उचलोनि विशेषतयांच्या पृष्ठी स्थापावे
९७
मग विभक्तास्त्रविभूतिचर्चूनि तयांच्या भाळाप्रतिमागूनि पाठविलें सातीसमाचारा तयांच्या
९८
ते तंव श्रीगुरुचे आज्ञेकरुनपहात चालिले सीमास्थानतरी ते सर्वही ओणवे होऊनठायीं ठायीं खुंटले
९९
सातांसी पाहूनि अवघ्या मूर्तीपरम चित्तीं लज्जित होतीअधोवदन करुन्मि पाहतीपरी न देती उत्तर
१००
हे जाऊनि बोलती त्यांतेंकैसें सोडूनि गुरुतेंजीवित्वलोभ धरुनियां मनातेंमार्ग केला पुढारां
१०१
परी ईश्वराची अगाध करणीसकळ पडलां महीं खिळूनीऐसिया रीतीं कोण तरुनीगेला आहे सांगा पां
१०२
मग हस्ते सकळ पाषाणपृष्ठीं ठेविती बळेंकरुनस्पर्श होतांचि जाती चिकटूनआंग हालवितां पडेना
१०३
मग परम आक्रंदतीचुकलों चुकलों ऐसें म्हणतीआतां क्षमा करुनि चित्तींसोडवावें आम्हांतें
१०४
येरु म्हणती खुशाल असाजीवित्वाचा धरुनि भरंवसास्वामी पाहूनि आलिया देशासोडवूनि नेऊं तुम्हांसी
१०५
गुरु करितां हा कशालासंकट पडतां काढितां पळापरी ज्याची क्रिया त्याची त्यालाफलद्रूप होतसे
१०६
आतां स्वस्थ असा चित्तींअम्ही जातों स्त्रीदेशाप्रतीदैवें वांचूनि आलिया अंतींसोडवूनि नेऊं तुम्हांतें
१०७
ऐसें सकळां करुनि भाषणसकळां पृष्ठीं देऊनि पाषाणपरतते झाले गुरुआज्ञेकरुनपरी ते पाहूनि आरंबळती
१०८
म्हणती गुरुमायेहूनि मायहोऊनियां सदस्यहदयआम्हांसही सवें न्यावेंस्त्रीराज्यामाझारी
१०९
आमुची सकळ गेली भ्रांतीआणि गुरुची समजली प्रतापशक्तीआतां सकळ नसूनि दुर्मतीविश्वासाते टेंकलों
११०
ऐसी करितां विनवणीती ऐकिला सातजणींमग म्हणती श्रीगुरुतें सांगुनीसुटका करुं तुमची
१११
ऐसें बोलूनि सकळांकारणपुनः आले परतूनम्हणती महाराजा दैन्यवाणशिष्यकटक मिरवले
११२
त्यांची नासिली सकळ भ्रांतीपृष्ठी पाषाण घेऊनि आरंकळतीतरी आतां कृपा ओसंडोनि चित्तींमुक्त करा सर्वांतें
११३
आतां येथूनि गेलिया प्राणसोडणार नाहीं आपुले चरणसर्वही स्थिर मती धरुनचरणाचरी लोटतील
११४
नाना युक्तींकरुनकरितील श्रीगुरुचें समाधानहें सच्छिंष्यांचें ऐकूनि वचननाथ चित्तीं तोषला
११५
मग विभक्तास्त्रमंत्र होंटीजल्पूनि योजिली भस्मचिमुटीओपूनि शिष्या करसंपूटीम्हणे चर्चूनि यावे तयातें
११६
मग एक शिष्य जाऊनि तेथेंभाळीं चर्चूनि भस्मचिमुटातेंचर्चिता झाले सकळ मुक्तसातां उणें सातशें
११७
ऐसे मुक्त झाले सकळ जनींयेऊनिं लागले गुरुचे चरणींनाथ तयालागीं पाहुनीअहा अहा म्हणतसे
११८
असो ऐसें बोलूनि बचनतेथूनि टाळितां मग मुक्कामस्त्रीदेशाचे सीमेवरी जाऊनवस्तीलागीं विराजती
११९
तेथें दिन लोटल्या झाली रात्रीतो चमत्कार वर्तला ते क्षितींभुभुःकार द्यावया मारुतीसेतुहूनि चालिला
१२०
तों मार्गी येतां अस्त्र सबळवेष्टित झालें पदकमळपरी तो वज्रशरीरी तुंबळअस्त्रालागीं मानीना
१२१
येरु चित्तामाजी विचार करीतहें स्पर्शास्त्र आहे निश्विततरी येथें कोणी प्रतापवंतआला आहे निश्वयें
१२२
ऐसा विचार करुनि चित्तींयेता झाला सीमेप्रतीतों कटक पाहूनि नाथपंथीमनांत विचार करीतसे
१२३
कीं म्या यत्न करुनि बहुततेथें पाठविला मच्छिंद्रनाथपरी कटक गेलिया तेथबोधितील तयासी
१२४
मग बोधें होऊनियां स्वारस्वदेशीं येईल मच्छिंद्रमग मैनाकिनीमुखचंद्रदुःखसागरीं उतरेल
१२५
तरी येथेंचि यातें निर्बळ करुनमागें लावावें परतूनमग अति भीमरुप धरुनभुभुःकार करीतसे
१२६
गाजवी पुच्छाचा फडत्कारभयंकररुपी अति तीव्रतें पाहुनिया कटकभार समग्रस्वामीआड दडताती
१२७
म्हणती महाराजा प्रळयकाळप्रथम उदेला महाबळआता मधील कटक सकळउपाय कांहीं योजावा
१२८
येरु म्हणे नाहीं भयउगेचि पहा धरुनि धैर्ययानें तुमचें करावें कायअचळपणीं असा रे
१२९
मग करी घेऊनि भस्मचिमुटीवज्रास्त्र परम बोले होटींतो प्रयोगसिद्ध होतां दाटींभस्मचिमुटी फेंकिली
१३०
मग तें वज्रास्त्र परम कठीणमाथां मिरविलें भूषणगगनयेरीकडे वायुनंदननिजदृष्टीं पाहतसे
१३१
मग मोठमोठे उचलून पर्वतफेंकिता झाला गगनपंथते गिरी आदळतां वज्रास्त्रचूर्ण होती क्षणार्धे
१३२
तें पाहूनि अंजनीसुतप्रेरिता झाला मुष्टीघाततेणें वज्र झाले भंगितनिचेष्टित महीं पडलें
१३३
ऐसे होतां प्रकरणदृष्टी पाहे कर्णनंदनमग काळिकास्त्र जल्पूनभस्मचिमुटी सोडीतसे
१३४
यावरी सर्वोचि अग्न्यस्त्रसोडिता झाला प्रयोगमंत्रत्यावरी सर्वोचि वासवास्त्रवरी वाय्वस्त्र प्रेरिलें
१३५
मग तो वाय्ववस्त्रप्रयोग्त होतांद्विमूर्धनी दाटला सवितामग महापर्वत असती स्थूलताभस्म होती तयानें
१३६
तों अंजनीसुतासकटतो अति तीव्र करीत नेटयाउपरी काय उद्भटविक्राळरुपी प्रगटला
१३७
कीं कृत्तांत जैसा मुख पसरुनग्रासू पाहे सकळ जनत्यातें साह्य परिपूर्णवासवशक्ती मिरवली
१३८
जैसा यमामागे दमप्रगट होय हरुं प्राणऐसें उभयास्त्र तरुणकडकडां करीतसे
१३९
जैसे खग मेघडंबरींचमका मारिती चपळेपरीउदेली भक्ती तदनुपरीप्रणयतरणी मिरवल्या
१४०
त्यात अग्न्यस्त्राचा ताप थोरत्यावरी साह्यातें वातास्त्रमग मारुतिदेह होऊनि जर्जररक्षणार्थ कांही दिसेना
१४१
वासव आणि काळिकास्त्रमागे पुढें होऊनि पवित्रप्रहर भेदाया पाहती स्वतंत्रपरी वायुपुत्र चपळ तो
१४२
देई अस्त्रातें दोन हातओढिता झाला चपळवंततरी तेंही अस्त्र चपळ बहुतहस्तयुक्त होऊं न देत
१४३
यावरी अग्न्यस्त्राकारणपुच्छीं योजी वायुनंदनयापरी वातास्त्राकारणस्तुति विनवोनि आराधिले
१४४
म्हणे महाराजा प्रळयवंतप्रविष्ट करा अग्न्यस्त्रांततरी तुझा आहे सुतलोकांमाजी मिरवतसे
१४५
परी गृहींचा पाहूनि अनयेकोणता पाहुनि तुष्टला तातऐसेया प्रकरणीं हदयांतनिवारिजे महाराज
१४६
ऐसें उत्तर ऐकोनि सावधानमग बोलवी वायुनंदनतें वातास्त्र झालें क्षीणमहाप्रतापें आच्छादी
१४७
तें पाहुनी कानिफनाथमोहनास्त्र प्रेरुनियां त्वरिततें गुप्तास्त्र हदयांतजाऊनि आंत संचरलें
१४८
संचरलें तरी वज्रशरीरलाग न धरी मोहनास्त्रपरी कांहींसा भ्रांत वायुकुमरनिजदेहीं दाटला
१४९
तरी तैसाचि भ्रांतीमाझारीअग्न्यस्त्र पुच्छे धरीमहाबळें समुद्रतीरीमिरकावुनि दिधलें
१५०
परी अग्न्यस्त्रें महासबळकाढूं लागलें समुद्र जळजळाचरा ओढवला प्रळयकाळतेणे समुद्र गजबजिला
१५१
मग तो येवोनि मूर्तिमंतनिजदृष्टीनें जंव पाहाततों कानिफा आणि वायुसुतयुद्धालागीं मिरवले
१५२
परी तयासी ओढवला प्रळयकाळअग्न्यस्त्रातें करी शीतळमग जलद आणोनी सकळअग्न्यस्त्रीं स्थापिलें
१५३
तेणें अग्न्यस्त्र झालें शांतयेरीकडें वायुसुतमोहनप्रकरणीं प्रविष्टचित्तपरी पुच्छी पर्वत उचलिला
१५४
पर्वत उचलावयाचे संधींफाकली होती तिकडे बुद्धीआणि स्थावरमोह अस्त्रें शुद्धिभ्रम पडला होताचि
१५५
त्या संधींत दोहींकडूनपाठींपाटी अस्त्रें दोनएकदांचि मेदिली प्रहार करुनसबळबळें करुनियां
१५६
जैसी मेणाची मूर्धनीझुंजतां एक होय मेळणींतैसी पृष्ठीं हदय लक्षुनीभेदतीं झालीं तीं अस्त्रें
१५७
कालिका आणि वासवशक्तीभेदितांचि मूर्च्छित झाली व्यक्तीतेणें उलंढूनि महीवरतीवातसुत पडियेला
१५८
तें पाहूनि अनिळराजहदयीं उजळलें मोहबीजमग प्रत्यक्ष होवोनि तेजःपुंजतयापासीं पातला
१५९
परी तो अंजनीचा बाळवज्रशरीरी ब्रह्मांडबळपुच्छ सांवरोनि उतावेळयुद्धा मिसळूं पहातसे
१६०
मग श्रीवातें धरुनि हातम्हणे ऐक मद्वचन सत्यहे सबळपाणी आहेत नाथरळी यांतें करुं नको
१६१
पूर्वी पाहें मच्छिंद्रनाथतव शिरीं दिधला होता पर्वतवाताआकर्षणविद्या बहुतजाज्वल्यें मिरवे यापासीं
१६२
तरी आतां संख्य करुनकार्य काय तें घे साधूनगूळ दिल्या पावे मरणविष त्यातें नकोचि
१६३
यापरी बोले अपांपतीम्हणे हेंचि मानवतें माझे चित्तींसंख्यासारखी दुसरी युक्तीयोग्यायोग्य दिसेना
१६४
मग उदधीं आणि द्वितीय वातेंसवें घेऊनि मारुतीतेंकानिफातें घेऊनि त्वरितेंपरम प्रीतीनें भेटले
१६५
कानिफा तीन्ही देवांसीनमन करीतसे अतिप्रीतीसींनमूनि पुढें वायुसुतासीयुद्ध कां सोडिलें म्हणतसे
१६६
हे ऐकूनि बोले अनिळकीं युद्ध कासया करितां तुंबळकवण अर्थी तयाचें फळआम्हांलागीं दाखवा
१६७
नाथ म्हणे तया मारुतीसीयुद्ध करीत होतों कासयासीमारुती म्हणे कामनेसीतरी ऐका माझिया
१६८
म्यां बहुत यत्नेंकरुनगौरवोनि मच्छिंद्रनंदनपरम आदरें स्त्रीराज्याकारणपाठविला आहे कीं
१६९
तरी हे तयाचे असती जातीतेथें गेलिया तयाप्रतीभेटल्या तयाची समूळ वृत्तीबोधस्थिती आणितील
१७०
मग तो सांडूनि तेथींचे स्थानस्वदेशांत करील गमनऐसी चित्तीं कल्पना आणूनयुद्धालागीं मिसळलों
१७१
तरी आतां असो कैसेंहा गेलिया स्त्रीराज्यासकांहीं योग मच्छिंद्रासबोलूं नये दुरुक्ती
१७२
ऐसे प्रकरणीं भाष्य देऊनआवश्य करावें यांनीं गमनमग माझें कांहीं एक छलनहोणार नाही नाथासी
१७३
ऐसें बोलतां वायुसुतअपांपति म्हणे बरवें यांतअहा म्हणूनि वदे मरुतसुतयांत काय वेंचतसे
१७४
मग हांसोनि बोलिलें कानिफानाथेंअहा शंका आलिया तुम्हांतेंतरी प्रयोजन काय आमुतेंमच्छिंद्रातें बोलाया
१७५
तरी सहसा आम्ही मच्छिंद्रासीबोलणार नाहीं दुर्बलेंसीआणि संबोधूनि त्यासीतेथील तेथें स्थापूं कीं
१७६
ऐसें वदूनि करतळभाषदेऊनि तुष्ट केलें त्यासमग आपण आपुल्या स्वस्थानासत्रिवर्गही चालिले
१७७
स्वस्थानासीतों उदय झाल्या लोटली निशींमग शिष्यकटकेंसीतेथूनियां निघाले
१७८
स्त्रीराज्यांत प्रवेशूननाना तीर्थक्षेत्रस्थानपहात पहात गजनंदनशृंगमुरडीं पातला
१७९
तों तें गांवीचे नृपासनींतिलोत्तमा मनाकिनीमच्छिंद्रासह बैसोनि समास्थानींसेवेलागी विनटली
१८०
तों कानिफानाथ फेरीआला करीत राजद्वारीसवें शिष्य कटक भारीतों द्वाररक्षक शोधालागीं धांवले
१८१
शोधिता शिष्य नयनींतों कानिफा कळला कानींमग जाउनियां राजांगणींवृत्तांत सुचविला
१८२
म्हणती महाराजा ग्रामद्वारींकानिफा सहनाथपरिवारींसातशें शिष्य समुद्रलहरीतव भेटी आलासे
१८३
हें ऐकूनि मच्छिंद्रनाथम्हणे पाहिला तया कोण पंथयेरी म्हणती म्हणवती नाथकानफाटी कर्णी
१८४
ऐसें ऐकूनि मच्छिंद्रनाथपरम दचकलें तयाचें चित्तम्हणे आला कीं गोरक्षनाथपालटोनि नामातें
१८५
तरी आतां कैचे येथेंराहूं देईना या सुखातेंअहा तिलोत्तमा सौंर्दयें मातेंलाधली होती प्रीतीनें
१८६
परी तयामाजी विक्षेप झालाकीं सैंधवे दुग्धघट नासलातन्न्यायें न्याय झालाप्रारब्धवशें आमुचा
१८७
आतां असो कैसे तरीयासी न्यावें ग्रामाभीतरींम्हणोनि सिद्ध करोनि स्वारीअश्वशिबिकेसह निघाला
१८८
त्वरें येऊनि ग्रामद्वारींपरस्पर भेटी झाल्यावरीकानिफा पाहोनि हदयाभीतरीसमाधान मिरवलें
१८९
मग आदेशा होऊनि नमनरुजामे भरजरी कनकवर्णमहीं पसरुनि योगद्रुमतयावरी बैसविला
१९०
मग कोण कोणाची समूळ कथातदनु पुसतां गुरुचे पंथात्यांनींहि सांगितली समूळ वार्ताजालिंदर जन्मापासूनी
१९१
मग मच्छिंद्र म्हणे जालिंदरनाथदेता अनुग्रह उत्तम याततरी तूं कानिफा नाम सुतगुरुबंधू तो माझा
१९२
मग शब्दोशब्दीं अधिकोत्तरवाढत चालली प्रेमलहरमग वाहूनि गजस्कंधावरग्रामामाजी आणिलें
१९३
मग नानायुक्ती रचोनि चित्तींस्वयें करीं मच्छिंद्रजतीएक भास अति प्रीतींकानिफा राहविला त्या स्थानीं९४राहिला परी तो नाथ कैसातरी समूळ कथासुधारसापुढिले अध्यायीं श्रवणीं वसाश्रवण होईल सकळिकां
१९५
तरी हा भक्तिकथासारतुम्हां वैष्णवांचें निजमाहेरप्रपंच सांडूनि रहावें स्थिरया धवलगिरीं येऊनि
१९६
धुंडीसुत नरहरिवंशींकवि मालू नाम जयासीतो बैसला ग्रंथमाहेरासीसुखसंपन्न भोगावया
१९७
स्वस्ति श्रीभक्तिकथासारसंमत गोरक्षकाव्य किमयागारसदा परिसोत भाविक चतुरपंचदशाध्याय गोड हा
१९८

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

॥ श्री नवनाथाय नमः ॥

या अध्यायाचे वाचन झाले?

तुमची नोंद या ब्राउझरमध्ये जतन होते.