॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद

श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी

अध्याय १४

गोपीचंदाने जालंदरनाथास खड्ड्यात पुरले. १९७ ओव्या · कथासार वाचा

श्रीगणेशाय नमः जयजयाजी पंढरीनाथासमचरणीं भक्ततापशमिताकटीं कर नासाग्रीं दृष्टी ठेविताहोसी रंजिता मुनिमानसा
ऐसा स्वामी तूं करुणाकारतरी तूं बोलवीं भक्तिसारमागिले अध्यायीं कथानुसारपरम कृपें वदविला
त्या कृपेचा बोध सबळब्रह्म उदधि पावला मेळपात्रा मैनावती सबळसरिताओंघीं दाटली
ॐ नमो ब्रह्मार्णवीं दाटली परीऐक्यरुप झाली नारीमोहें पुत्राचें परिवारींगुंतलीसे जननी ते
मनासी म्हणे अहा कैसेंत्रिलोचनरायाचें जाहले जैसेंत्याचि नीतीं होईल तैसेंमम सुताचें काय करुं
जंव जंव पाहे त्यातें दृष्टींतंव तंव वियोग वाटे पोटींहदयी कवळूनि जठरवेष्टीहोत असे मोहानें
अहा पुत्राचें चांगुलपणदिसे जैसा प्रत्यक्ष मदनपरी काय करावें चांगुलपणभस्म होईल स्मशानीं
उत्कृष्टपणें करोनि कष्टधाम उभाविलें अति श्रेष्ठपरी वन्हिबळें लागल्य काष्ठतेवीं असे काळाग्नी
पहा पल्लवपत्रझाडअति विशाळ लावला पाडपरी गाभारी वेष्टितां भिरुडउशाशीं काळ बैसला
तन्न्यायें दिसूनि येतवायां जाईल ऐसा सुतकीं कद्रूलागीं चोखट अमृतफिकरपणे मिरविले
१०
कीं यत्नेंकरुनि कचें दुर्घटसंजीवनीचा केला पाठपरी देवयानीचा शाप उल्हाटयत्र व्यर्थ तो झाला
११
कीं सुंदर जाया कर्मे जारिणीपरी पतिभयाच धाक मनींतेवीं तो उशाशीं काळ बैसोनिसकळ जनां मिरवला
१२
कीं कुसुमशेज मृदुलाकारपरी उसां घालूनि निजे विखारते सुखनद्रेचा व्यापारसुखा लाहे केउता
१३
तन्न्यायें झालें येथराजवैभव अपरिमितपरी काळचक्राची सबळ बातभ्रमण करीत असे पैं
१४
ऐसी सदासर्वकाळचित्तीं वाहे माय तळमळपरी सुतासी बोध कराया बळअर्थ कांही चालेना
१५
तंव कोणी ऐके दिवशींशीतकाळ मावमासींउपरी सहपरिचारिकेंसीं उष्ण घेत बैसलीसे
१६
ते संधींत गोपीचंदचौकीविभागीं सकळ स्त्रीवृंदवेष्टूनि स्नान कराया सिद्धचंदनचौकीं बैसला
१७
चंदनचौकी परी ते कैशीहेमतगंटी रत्न जैशींजडावकोंदणी नक्षत्रांसींराजवृंदीं चमकतसे
१८
सकळ काढूनि अंगींचे भूषणवरी विराजे राजनंदनउष्ण उदकीं करीत दंतधावनचौकीवरी बैसला
१९
तों सौधउपरी मैनावतीझाली स्वसुतातें पाहतीदेखिला जैसा पूर्ण गभस्तीतेजामाजी डवरला
२०
राजसेवकाचें भोवतें वेष्टनपरिचारिका वाहती जीवनपरी त्या मंडळांत नृपनंदनचांगुलपर्णी मिरवतसे
२१
जैसा अपार पाहतां स्वनंदनमोहें आलें उदरवेष्टनतेणें लोटलें अपार जीवनचक्षूंतूनि झराटले
२३
परी ते बुंद अकस्मातमोहें घ्राणाचे उदभव व्यक्तगोपीचंद चातकातेंस्पर्शावया धावले हो
२४
म्हणाल बुंद चक्षूदकींनोहे उरते सत्कर्मवाकींउत्तम फळांवें लक्षूनि सेकीव्यक्त जलें ते अंगासी
२५
बुंद नव्हती ते चिंतामणीहरुष केला भवकाचणीकीं कृतांतभयातें संजीवनीभूपशरीरा आदळले
२६
कीं अर्के पीडित भारीनृपजन वेष्टला नगरीतैं ते उतरले घन मनहरीबुंदवेश धरुनियां
२७
कीं काळक्षुधेचा पेटला अनळतेणें शरीर झालें विकळते संधींत होऊनि कृपाळूकामधेनु उतरली
२८
कीं दरिद्राचें अतिवेष्टनतैसा येथें मिरविला कुबेर येऊनतन्न्याय सुबुंद घनरावहदयीं आदळले
२९
शरीरीं होतां बुंद लिप्तपरी उदभवस्थिती लागली त्यांतम्हणूनि ऊर्ध्व करुनि मूर्धातेंनभालागीं विलोकीं
३०
हदयीं होऊनि राव शंकितम्हणे बुंद कैंचा उदभवला येथतरी अंबर झालें असेल व्यक्तघनमंडळ आगळें
३१
म्हणूनि ऊर्ध्व करुनि दृष्टीपाहता झाला नभापोटींपरी ते निर्मळपणें वृष्टीझाली कोठूनि म्हणतसे
३२
ऐसा विचार करितां चित्तींदृष्टिगोचरी संभवितीतों रुदन करितां मैनावतीनिजदृष्टीं देखिली
३३
करीत होता दंतधावनतैसाचि उठला नृपनंदनउपरी त्वरा वेगीं चढूनमातेपाशीं पातला
३४
जातांचि पदी ठेवूनिया माथाउभा जोडूनि हस्तांम्हणे सांग जी कवण अर्थाउचंबळलीस जननीये
३५
मजसारखा तूतें सुतराज्याधीश महीं व्यक्तऐसा असूनि दुःखपर्वतकोठूनि उदेला तंव चित्तीं
३६
पाहें पाहें प्रताप आगळान वर्णवे बळ बळियांकित महीपाळामिरवती दर्पकंदर्प केवळाकरभारातें योजिती
३७
ऐसी असतां बळसंपत्तीबोललें कुणी दुःखसरितींतरी मम कोपाचा दाहक गभस्तीसांवरेल कोणातें
३८
जेणें पाहिलें असेल नयनींउगीच तीव्र दृष्टी करोनितरी तयाचे क्षणें चक्षु काढोनितव करीं माये ओपीन गे
३९
किंवा दाविलें असें बोटीतरी तींच बोटें काढीन शेवटींतरी कवण अर्थ उदेला पोटींरुदन कराया जननीये
४०
अष्टविंशति स्त्रीमंडळकीं त्यांनीं ओपिलें कडुवट फळतरी शिक्षा करुनि तयां सबळमोक्षपंथा मिरवीन
४१
किंवा माझिये दृष्टी सेवेशींउदया पावला अंतर शेषींम्हणूनि उदय शोकानिशीदर्शविली त्वां मातें
४२
तरी कोणता कवण अर्थमाते वदे प्रांजळवतकामनीं वेधक असेल चित्ततोचि वेध निवटीन मी
४३
म्हणसील कार्य आहे थोरकरुं न शके सुत पामरतरी हा देह वेंचूनि समग्रअर्थ तुझा पुरवीन मी
४४
जरीं ऐशिया दृष्टींअंतर पडेल काय पोटींतरी धिक्कार असो मज शेवटींपुत्रधर्म मिरवावया
४५
मग श्वान सूकर काय थोडींअवतार मिरविती द्वारीं पवाडीयाचि नीति तया प्रौढींनिर्माण झालों मी एक
४६
अहा पुत्रधर्म मग कैसामाता पिता दुखलेशापाहूनि चित्तीं परी हरुषाभूमार तो नर एक
४७
आपण मिरवे राणिवा प्रकरणींमातापिता दैन्यवाणींतयाचे भारें सकळ मेदिनीविव्हळ दुःखे होतसे
४८
कांतेलागी शृंगार व्यक्तमातेसी वसन नेसावया भ्रांततयाचे भारीं धरा समस्तविव्हळ दुःखी होतसे
४९
कांतेसी नेसावया वस्त्रें भरजरीमाता ग्रंथीं चीर सावरीतयाचे भारें सकळ धरित्रीविव्हळ दुःखें होतसे
५०
कांतेसी इच्छा समान देणेंमातेसीं खावया न मिळे अन्नतयाचे भारें पृथ्वी सधनविव्हळ दुःखे होतसे
५१
कांतेसी बसावया उंच शासनमातेसी कष्टवी दासीसमानतयाचे भारें धरारत्नविव्हळ दुःखी होतसे
५२
रंभेसमान कांता ठेवीभूतासमान माता मिरवीतयाचे भारें धरादेवी विव्हळ दुःखी होतसे
५३
जन्म घेतला जियेचे पोटींतीते म्हणे परम करंटीतयाचे भारें धरा हिंपुटींविव्हळ दुःखी होतसे
५४
कांता सर्व सुखाचे मेळींमाता दुःखें अश्रु ढाळीतयाचे भारें धरा विव्हळीआणि दुःखी होतसे
५५
कांतेलागीं मृदु भाषणमातेसी हदयी खोंची बाणतयाचे भारें धरारत्नविव्हळ दुःखी होतसे
५६
आपण मिरवे राणिवासरसापितया काळा मातंग जैसातयांचे भारें धरा क्लेशाविव्हळ दुःखी होतसे
५७
आपण कंठी कुड्या पडुडीपित्याशिरीं बत्या जोडीतयाचे मारें धरा मुख मुरडीविव्हळ दुःखी होतसे
५८
आपण भक्षी सदा सुरस अन्नपितर मागती भिक्षा कदन्नतयाचे भारेंधरारत्नविव्हळ दुःखी होतसे
५९
तरी ऐसिये पुत्र सृष्टींगळावेत गर्भीहून शेवटींतन्न्यास अर्थ पोटींमाझा न धरी जननीये
६०
जे तुज वेधक मनकामनातयासाठीं वेचीन प्राणापरी माये वो तव वासनापूर्ण करीन निश्वयेसी
६१
ऐसी बोलता स्वसुत वार्ताप्रेमान्धि उचंबळला चित्तामग हितार्थरत्न द्यावया हातावाग्लहरी उचंबळे
६२
म्हणे बारे ऐक वचनप्रेम उदयाचळीं तूं दिव्यरत्नउदय पावलासी चंडकिरणशत्रुतम निवटावया
६३
तया ठायीं अंधकारमज पीडा वा काय करणारपरिस लाधल्या वसतिस दरिद्रस्वप्नामाजी नांदेना कीं
६४
बा रे तव प्रताप दर्पपादरज झाले धूपऐसें असतां कोप कंदर्पमातें कोण विवरील
६५
बा रे तीव्र प्रतापी स्थावर केसरीतयाचे लेकुरा वारण मारीहा विपर्यास कवणेपरीमिरवूं आहे जगातें
६६
राया नरेंद्रा तुझी मी मातामातें कोण होय गांजितापरी चिंत्ता उदरी मोहव्यथाशोकतरु उदवभवला
६७
बा रे तव स्वरुप पूर्ण अर्कपाहतां मातें उदेला शोकम्हणशील जरी अर्थदायककवणापरी उदेला तो
६८
बा रे तव पिता तव समानस्वरुप उदेलें अर्कप्रमाणपरी काळ अस्ताचळीं जाऊनगुप्त झाला पुरुष तो
६९
अहा अपार तो स्वरुपाब्धीअंतीं वेष्टी वडवानळसंधींपडतां बा रे विशाळ बुद्धीभस्म झाला क्षणांतरी
७०
अस्थी जळाल्या काष्ठासमानलोभ दाहिलें जेउतें तृणमांसस्नेहाचें होऊनि शोषणस्वरुपातें लोपला तो
७१
तंव त्या भयाची हुडहुडी मोठीबा रे मज उदेली पोटींतुझें स्वरुप पाहतां दृष्टींभयातें उठी उठावे
७२
बा रे कृतांत महीं विखारधुमधुशीत वारंवारटपूनि बैसला जैसा मांजरमूषकातें उचलावया
७३
जैसा व्याघ्र जपे गाईकीं मीन वेंची बगळा प्रवाहींतैसें जगातें तन्न्यायींकृत्तांत आहारीं नटलासे
७४
तरी तो व्याघ्र ऐसा सबळजिंकूनि योजावा पिंजरीं मेळबा रे तैं भयाच वडवानळमग स्पर्शणार नाहीं देहातें
७५
बा रे विखार डंखी दुःखतोंचि वेंचिल्या सकळ सुखकंटकीं धरिल्यास सकळ वृश्विकवेदनेतें मिरवेना
७६
ऐसेपरी रचूनि युक्तीसकळ हरावा कृत्तांत गतीव्यर्थ शरीराची मातीकरुं नये जन्मल्यानें
७७
आपण आपुले पहावें हितसारासार नरदेहांतपाहें वश्य करुनि रघुनाथचिरंजीव झाला बिभीपण
७८
पाहें नारद वैष्णव कैसाविष्णु पाराधी नरवेषातो श्रीगुरु वरदेषाअमरपणीं मिरविला
७९
त्याचि नारदासी कृपाधनबोलला श्रीव्यास महीकारणतेणें पिकलें ब्रह्मपणशुक महाराज तिसरा
८०
त्याचा कौशिक अनुगृहीततेणें करोनि शरणागतकृष्णयाज्ञवल्की तारुनि निश्विततेणें तारिला रामानुज
८१
ऐसा प्रकाश सांप्रदाय मिरवूनते पुरुष झाले ब्रह्मसनातनतेवीं तूं बाळा माझा नंदनजगामाजी मिरवीं कां
८२
ऐसें बोधितां मैनावतीसंपली येथूनि तिची उक्तिपरी श्रोते कवि ते संप्रदाय पुसतीसांगा म्हणती चातुर्य
८३
ऐसा प्रश्न कवि पाहूनसांगे संप्रदाय पूर्णरामानुजापासूनयोगिया संत पैं झाला
८४
तयापासूनि मुकुंदराजमुकुंदराजाचा जैत्पाल भोजजैत्पालाचा धर्मानुजबोधल्यादिक पैं त्याचे
८५
यापरी द्वितीय संप्रदायीमाता सुतातें लोटी बोधप्रवाहींउमेनें आराधोनि शिवगोसावीचैतन्यसंप्रदायीं मिरवला
८६
त्यानें बोधिला कपिलमानीआणि दुसरा राघवचैतन्यस्वामीराघवाचा ब्रह्मचैतन्य नेमीतयाचा केशवचैतन्य
८७
केशवाचा बाबाचैतन्यश्रीतुकाराम त्याचा धन्य धन्यहा चैतन्यसंप्रदाय उत्तम मान्यसंतगणीं मिरवितो
८८
यापरी तिसरा संप्रदायमहाश्रेष्ठ म्हणती स्वरुपमयतरी प्रथम बोधिला कमलोद्भवहंसरुपें श्रीविष्णूनें
८९
ते विधीचे सकळ हितअत्रीनें घेतले सकळ पंथअत्रीपासूनि झाले दत्ततयापासूनि नाथ सकळ
९०
यापरी सांप्रदाय पाहेंचवथा नंद महीतें आहेसूर्यापासूनि याज्ञवल्की पाहेब्रह्मवेत्ता मिरविला
९१
तयापासूनि सहजानंदसहजानंदाचा कूर्म अवतार प्रसिद्धकूर्मानें उपदेशिला ब्रह्मानंदब्रह्मानंदाचा योगानंद कीं
९२
योगानंदाचा चिदानंदजगीं मिरवत आहे प्रसिद्धतरी तुवां गोपीचंदहित करुनि घेई कां
९३
तेणेंकरुनि अमरपणीजगीं मिरविसी महाप्राज्ञीयास्तव बा रे माझे नयनींअश्रू लोटले तुजलागी
९४
याउपरी बोले नृपनाथबोलसी माते सत्यार्थपरी प्रस्तुतकाळीं ऐसा नाथकोण मिळेल कोठूनि होईल जननीये
९६
ऐसी ऐकूनि तयाची मातमाता बोलती झाली त्यातेंबा रे तैसाचि आपुले गांवांतजालिंदरनाथ मिरवला
९७
स्वरुप सांप्रदाय परिपूर्णतूतें करील ब्रह्मसनातनतरी तूं कायावाचामनें करुनशरण जाई तयासी
९८
बा रे तुझें वैभव थोरराजकारणी कारभारपरी मायिक सकळ विस्तारलया जाईल बाळका
९९
तरी तनमनधनप्राणशरण रिघावें तयाकारणआपुलें हित अमरपणजगामाजी मिरवीं कां
१००
ऐसें ऐकोनि मातेचें वचनबोलता झाला त्रिलोचननंदनम्हणे माते तयासी शरणजालिया योग्यता फिरावें
१०१
सकळ टाकूनि सुखसंपत्तिराजवैभव दारासुतीआप्तवर्गादि सोयरेजातीटाकूनि योग कैसा करावा कीं
१०२
द्वादशवरुषें मातेंभोगूं दे सकळ वैभवातेंमग शरण रिघूनि त्यातेंयोगालागी कशीन कीं
१०३
कशीन तरी परी कैसामिरवीन ब्रह्मांडांत ठसाकीं उत्तानपादराजसुतापरीशिका जगामाजी मिरवीन
१०४
माता म्हणे बाळा परियेसींपळ घडी भरंवसा नाहीं देहासीतेथे संवत्सर म्हणतां द्वादशोदेखिले कोणी बाळका
१०५
चित्त वित्त आणि जीवित्व आपुलेंअचळ नोहे अशाश्वत ठेलेंक्षणैक काय होईल न कळेक्षणभंगुर वर्ततसे
१०६
बा रे उदकावरील बुडबुडाकोण पाहील अशाश्वत चाडावंध्यापुत्रें घेतला वाडामृगजळा केवीं तृषातें
१०७
तेवीं वारे सहजीस्थतींबोलतां न ये अशाश्वतीस्वप्नप्रवाहीं इंद्रपदासीभोगीत खरे न मानावें
१०८
तन्न्याय अभासपरसकळ मिरवतसे चराचरत्यांतूनि कोणीएक रणशूरशाश्वतपदा मिरवितसे
१०९
शुक दत्तात्रेय कपिलमुनीव्यास वसिष्ठाची मांडणीप्रल्हादादिक भागवतधर्मीऐसे कोणी निवडिले
११०
नाहींतरी होताती थोडींसकळ बांधिली प्रपंचबेडींपरी यमरायाच्या रक्षकवाडीएकसरां कोंडिलीं
१११
म्हणूनि बा रे सांगतें तुजशाश्वत नोहे काळ समस्तकोणे घडी घडेल केउतअक्कलकळा कळेना
११२
ऐसा बोध माता करितांलुमावंती तयाची कांतागुप्तवेषें श्रवण करितांहाय हाय म्हणतसे
११३
म्हणे माता नोहे पापिणीपुत्रासी योजिती पुत्रकाचणीऐसी राज्यविभवमांडणीजोग देऊं म्हणतसे
११४
तरी राज्यासी आली विवशीउपाय काय करावा यासीरामासारिखा पुत्र वनवासींकैकेयीनें धाडिला
११५
स्वभ्रताराचा घेतला प्राणचतुर्थपुत्रा लाविलें रानोरानतन्न्याय आम्हांकारणेंदेव क्षोभला वाटतसे
११६
दुष्ट स्वप्न दृष्टीं येतांतकीं मानिती विनाश चित्ताम्हणतां प्रवेशली दुःखव्यथातरी देव क्षोभतात
११७
दासदासी आपुले हातीआज्ञेमाजी सकळ वर्ततीते अवज्ञा करोनि उत्तर देतीतरी देव क्षोभला जाणावें
११८
सहज ठेविलें धनमांदुसपुढें काढूं जातां कार्यासतें न सांपडे ठेविल्यासतरी देवक्षोम जाणिजे
११९
सभेस्थानीं सत्यार्थगोष्टीकरितां अनृत वाटे चावटीलोक बैसती चेष्टेपाठीतरी देवक्षोभ जाणिजें
१२०
आपुलें धन लोकांवरी सांचेतें मागूं जातां स्वयें वाचेते म्हणती काय घेतले तुझ्या बापाचेंतरी देवक्षोभ जाणिजे
१२१
आपुली विद्या तीव्रशस्त्रशत्रुकाननीं विनाशपात्रती कार्यार्थ न मिरवे स्वतंत्रतरी देवक्षोभ जाणावा
१२२
नसतां वांकुडे पाऊल कांहींनागाविला जाय राजप्रवाहींनसत्या कळीं बैसल्या ठायींतरी देवक्षोभ जाणिजे
१२३
आपुला शत्रु प्रतापापुढेंमिरवी जैसा अति बापुढेंत्या शरण रिघतां आपुल्या चाडेंतरी देवक्षोभ जाणिजे
१२४
लोकां उपकार केला विशेषतेचि लोक मानिती आपुला त्रासपाहूं नका म्हणती मुखासतरी देवक्षोभ जाणिजे
१२५
नसता अधिमधीं उत्तरानसतीच विघ्ने येती घरातेंचि करणें परिहारादेवक्षोभ जाणिजे
१२६
गृहीचें मनुष्य मुष्टींत सकळअसूनि वाढे गृहांत कळआपुले न चाले कांहींच बळतरी देंवक्षोभ जाणिजे
१२७
तरी हेचि नीति उपदेशमाता करीत आहे पुत्रासतरी बरवें नोहे हा विनाशजगामाजी मिरवेल
१२८
तरी ह्या द्वंद्वसुखाची कहाणीपेटेल महावडवानळ वन्हीराजवैभव हें अब्धिपाणीभस्म करील निश्वयें
१२९
ऐसा विचार करुनि मानसींलुमावंती प्रवेशे स्वसदनासीयेरीकडे मैनावतीसीउत्तर देंत नरेंद्र
१३०
म्हणे माय वो तव कामनींऐसेंचि आहे वेधक मनींतंव त्या स्वामीची करणीनिजदृष्टी पाहीन वो
१३१
माझें मजलागीं हिततें द्यावया असेल सामर्थ्यशोध शोधितां भक्तिपंथसहज दृष्टीं पडेल वो
१३२
मग मी सोडूनि सकळांसतनधनमन ओपीन त्यासतूं येथून वाईट चित्ताससहसा न मानीं जननीये
१३३
ऐसें वदोनि समाधानींनृप गेला स्नानालागोनीयेरीकडे अंतःपुरसदनींकाय करी लुमावंती
१३४
परम आवडत्या स्त्रिया पांचसाततयांच्या आज्ञेंत नृपनाथपट्टराणिया प्रीतिवंतसदा सर्वदा वर्तती
१३५
तयांसी पाठवूनि परिचारिकाबोलाविल्या सद्विवेकात्यांत लुमावंती मुख्य नायिकापट्टराणी रायाची
१३६
वेगें मांडूनि कनकासनबैसविल्या प्रीतींकरुनतांबूलदि पुढें ठेवून वृत्तांत सांगे रायाचा
१३७
बाई वो बाई विपरीत करणीमैनावती राजजननीविक्षेप पेटला तियेचे मनींकाय सांगू तुम्हातें
१३८
कोण गावांत आला हेलाजालिंदर ऐसें म्हणती त्यालात्याचा अनुग्रह देऊनियां रायालाजोग देऊं म्हणतसे
१३९
ऐसें वैर भोगवी माता सुतनिश्वय करुनि केला घटपटीतरायासी बोधितां श्रवणीं मातसकळ झाली वो बाई
१४०
मग राजवैभव सकळ नासलेंस्तंभ भंगल्या सदन पडिलेंमुळींचि अर्कालागीं गिळिलेंमग अंधकार सर्वस्वीं
१४१
मग आपण अष्टविंशती सतीअसूनि काय करावी मातीपरचक्र येऊन सकळ संपत्तिविनाशातें पावे हो
१४२
परी येउते अर्थाअर्थीकैसी करावी ती युक्तीसांगावी आधीं योजूनि सबळ मतींकेलिया कारण मोडावे
१४३
अगे वन्ही म्हणूं नये लहानतो क्षणें जाळील सकळ सदनतरी त्यातें करुनि सिंचनविझवूनियां टाकावा
१४४
उशा घातला विखारमग सुखनिद्रा केवीं येणारविप भेदूनि गेल्या जठरजीवित्व काय वांचेल
१४५
तरी प्रथमचि सारासारकरुनि मोडावा सकळ प्रकारऐसी बुद्धि रचूनि सारसुखसंपत्ति भोगा कीं
१४६
ऐसी ऐकूनि तियेची उक्तीमग तर्कवितर्क करिती त्या युवतीनानाबुद्धि विलाप दावितीपरी निश्वय न घडे कोणाचा
१४७
यापरी विशाळबुद्धी युवतीविचार काढी लुमावंतीकी येअर्थी दिसे एक मजप्रतीसुढाळपणीं नेटका
१४८
आपुल्या गावांत जालिंदरजोगी आहे वैराग्यपरतरी तयाचा अपाय करुनि थोरनिर्दाळावा सर्वस्वीं
१४९
निर्दाळावा तरी कैसे रीतींतयाच्या भक्तीसी मैनावतीआहे तरी राजयाप्रतीनिवेदावें कुडे भावें
१५०
तरी तो तुमचा वसवसाग्रीवे मिरवितसे भयार्थ फांसाम्हणूनि युक्ति रचिली मानसागाढपणीं ऐकावी कीं
१५१
निवेदावें तरी कैसेंकाम न आवरे मैनावतीसम्हणूनि चित्तीं उदासजालिंदर भोगितसे
१५२
जालिंदराचा अनुग्रह देऊनजोगी करावा राजियाकारणमग करुनि पाठवावा तीर्थाटनअथवा तपाचे कारणीं
१५३
मग तो गेलिया दूर देशींगृहीं आणूनि जालिंदरासीबैसवोनि राज्यासनासीसकळ सुखा भोगावें
१५४
ऐसें सांगूनि सकळ रायातेंउदय करावा कोपानळातेंमग सहजविधि जालिंदरनाथभस्म होईल त्यामाजी
१५५
जैसे विषय अति गोडगोडचि म्हणूनि करावा पुडमग तें मिरवे शत्रुचाडद्वंद्वसुख वाटावया
१५६
ऐसा विचार करुनी गोमटाजात्या झाल्या त्या बरवंटायेरी सांगे राजपटागोपीचंद मिरवला
१५७
राजकारणीं अपार वार्तारागरंग कुशळतामानरंजनीं नृपनाथादिवस लोटूनि पैं गेला
१५८
मग निशाउदय तममांडणीतेही प्रहर गेली यामिनीमग पाकशाळेंत भोजन करुनीअंतःपूरीं संचरला
१५९
संचरला परी लुमावंतीतिच्याचि गेला सदनाप्रतीतिने पाहुनी राजाधिपतीकनकासनी बैसविला
१६०
उचलोनि परमभक्तीं मांदारबैसला आहे मंचकावरगौरवूनि षोडशोपचारप्रेमडोहीं बुडविला
१६१
मग तो राव होऊनि निर्मररतिसुखाचा करुनि आदरयावरी गजगामिनी जोडूनि करबोलती झाली रायातें
१६२
हे महाराज प्रतापतरणीएक वार्ता ऐकली कानींपरी वदतां भय कीं मनींसंचरत आहे महाराजा
१६३
जरी न बोलावें ठेवूनी गुप्ततरी महाअनर्थाचा पर्वत दिसतवदूं तंव तरी भयांतचित्त गुंडाळा घेतसे
१६४
ऐसा उभय पाहतां अर्थभ्रांतीमाजी पडलें चित्ततरी सुखशब्दाचा सरुनि वातवार्ता अवघड महाराजा
१६५
ऐसें ऐकूनि राव बोलतम्हणे सकळ सोडूनि भयातेंनिर्विकार कवण अर्थअसेल तैसें कळविजे
१६६
येरी म्हणे द्याल भाष्यतरी चित्त सोडील भयदरीसमग खरें खोटें बरें रत्नासतुम्हांलागीं अर्पिन तें
१६७
ऐसें वचन नृप ऐकतांमग करतलभाष्य झाला देंताम्हणे मम दर्पभयाची व्यथासोडूनि वार्ता बोल कीं
१६८
येरी म्हणे जी एक कुडेंमातेनें रचिलें तुम्हांपुढेंजालिंदर योगी विषयपांडेंवश्य केला आहे की
१६९
परी तुमचा भयाचा संदर्पअंगी विरला विषयकंदर्पतेणेंकरुनि बुद्धी कुरुपतिनें वरिली आहे जी
१७०
तुम्हांसी अनुग्रह देऊनि त्याचावेष द्यावा योगीयाचामग तीर्थाटनीं योग तुमचाबोळवावें तुम्हांते
१७१
तुम्ही गेलिया तपाकारणदूरदेशी विदेशाकारणमग जालिंदराप्रती आणूनराज्यासनीं ओपावा
१७२
ऐसें प्रकरणीं सहजस्थितीश्रुत मात झालें आम्हांप्रतीपरी आमुचे सौमाग्यनीतींभाग्यार्क दिव्य जाहले
१७३
आमचें कुंकुम होतें अचळम्हणोनि दृष्टीं आले ऐसे फळयापरी तुम्हा नृपाळवाईट बरें विलोका
१७४
ऐसी ऐकोनि तियेची वार्ताउज्बळला क्रोधनळाच्या माथांमग अनर्थानळाच्या शाखा दावितांभयंकररुपी जाहलासे
१७५
मग तो क्रोध न वदवे वाणीप्रत्यक्ष आला वडवानळ अग्नीनाथ जालिंदर समुद्रपाथीप्राशावया क्षोभला
१७६
मग तो उठोनि तैसेचि गतींबाहेर जाय तो नृपतीमंत्री बोलावूनि सेवकांहातींजालिंदरा पाहों चला
१७७
शीघ्र आणोनि कामाठ्यांसीगर्ती योजिली कूपासरसीनाथ जालिंदर ते उद्देशींतयामाजी लोटिला
१७८
अश्वलीद न गणतीतेथें सर्वत्र पडली होतीती लोटूनि गर्तेवरतीनाथजती बुजविला
१७९
ऐसें गुप्त करोनि प्रकरणराव सेवी आपुलें स्थानपरी सेवकां ठेविले सांगोनमात बोलूं नका ही
१८०
जरी होतां मुखलंपटमम श्रोत्रीं आलिया नीटत्याचें करीन सपाटयमलोकीं मिरवीन कीं
१८१
ऐसी ऐकूनि भयंकर वार्तादर्पासिंह तो योजूनि माथांरागेला परी सेवकाचित्ताधुसधुसी मिरवीतसे
१८२
इतुके प्रकरणीं मध्ययामिनीझाली म्हणूनि नेणती जनींअर्कोदयीं पाहिला स्वामीम्हणती उठोनि गेला असे
१८३
एक म्हणती त्याचें येथें कायस्वइच्छे बसावें वाटेल तेथहा ग्राम नव्हे आणिक रायग्रामवस्तीं विराजला
१८४
ऐशी बहुतांची बहुत वाणीप्रविष्ट झाली जगालागोनीकीं जालिंदर गेला येथूनीमहीं भ्रमण करावया
१८५
ऐसी वार्ता नगरलोकींउठली ऐकूनि परिचारिकीत्या जाऊनि साद्विवेकीमैनावतीसी सांगती
१८६
कीं महाराज आपुला गुरुवस्तुफळाचा कल्पतरुउठोनि गेला कोठें दुरुमहीं भ्रमण करावया
१८७
ऐसें ऐकोनि मैनावतीअसंतोषली परम चित्तींम्हणे मम सुताचे दैवाप्रतीलाभ नाहीं आतुडला
१८८
ऐसें म्हणोनि संकोचितनेत्रीं प्रेमाश्रु ढाळीतयेरीकडे जालिंदरनाथकैसे स्थितीं राहिला
१८९
तरी अवश्य भविष्य जाणणारआणि मैनावतीचा लोभ अपारआणि शत्रुमित्र पाहणारएकरुपीं समत्वें
१९०
नातरी परम प्रतापी वासरमणीक्षणें टाकील ब्रह्मांड जाळोनितो भद्र ज्याची विपर्यासकरणीतुष्ट कैसा राहिला
१९१
जो द्वंद्वातीत मूर्तिमंतदंभरहित स्वरुपीं मिरवतममता निःसंग विरहितकार्याकार्य जाणोनी
१९२
असो गर्तेमाजी यतिनाथवज्रासनातें घालोनि खालतेंआकाशास्त्र प्रेरुनि भोंवतेंस्वस्थचित्तीं बैसला
१९३
आकाशास्त्र असतां भोंवतेंलीद मिरवे सभोंवतेंयापरी आकाशास्त्र माथांवज्रास्त्र स्थापिलें
१९४
तेणेंकरोनि अधरस्थळीलीद मिरविली आहे शिरींयेरीकडे अंतःपुरींजनवार्ता समजली
१९५
नाथ जालिंदर गेला निघोनमग सकळ स्त्रियांचें झाले समाधानबरें झालें म्हणती निधानयेऊनि पहुडल्या सेजेसी
१९६
यापरी पुढें सुरसधुंडीसुत सांगेल श्रोतियांसतरी सर्व श्रोतीं टाकूनि आळसअवधान द्यावें पुढारां
१९७
मालू धुंडी नरहरी वंशींकथा वदेल नवरसीपरी वारंवार श्रोत्यांसीकृपा अवधान मागतसे
१९८
स्वस्ति श्रीभक्तिकथासारसंमत गोरक्षकाव्य किमयागारसदा परिसोत भाविक चतुरचतुर्दशाध्याय गोड हा
१९९

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ श्री नवनाथाय नमः ॥

या अध्यायाचे वाचन झाले?

तुमची नोंद या ब्राउझरमध्ये जतन होते.