धुंडिसुत मालू कवी विरचित “श्री नवनाथ भक्तिसार “ हा ओवीबद्ध ग्रंथ नाथपंथाचा प्रमाणग्रंथ मानला जातो . मालू कवीं नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व साधकाला विधिपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव देणारा असा आहे.नी हा ग्रंथ इ.स.१८१९-२० च्या दरम्यान लिहून पूर्ण केला. प्रस्तुत ग्रंथात ४० अध्याय असून ओवीसंख्या ७६०० आहे.
या ग्रंथात नवनारायणांनी श्रीकृष्ण परमात्म्याच्या आज्ञेने धारण केलेल्या नवनाथांच्या कथा आहेत. भगवान द्वारकाधीशांच्या आज्ञेवरुन कवी नारायणाने मच्छिंद्र हे नांव धारण केले, हरीने गोरक्ष, अंतरिक्षाने जालंधर,प्रबुद्धाने कानिफ, पिप्पलायनाने चरपट, आविहोंत्राने नागेश,द्रुमिलाने भरतनाथ, चमसाने रेवण व करभाजनाने गहिनी अशी नावे धारण केली
यात मच्छिंद्रनाथ हे प्रमुख नाथ. जात पंथ यांच्या पलीकडे जाऊन या नवनाथांनी आपल्या चमत्कारांनी जनसामान्यांना आकर्षित करून नाथपंथाचा प्रसार केला. त्यांच्या दिव्य चरित्रामुळे घोर तप,अनन्य गुरुभक्ती,अपूर्व भक्तीभाव, ब्रम्हचर्याचे नैश्ठीक पालन या सद्गुणांच्या जोरावर आपल्याला कोणतीही अशक्यप्राय गोष्ट प्राप्त करून घेता येवू शकते हि गोष्ट आपणास पटते .
ज्ञानेश्वरी च्या खालोखाल चिंतन,मनन व पारायण यांसाठी “नवनाथ भक्तिसार”हा ग्रंथ सुपरिचित आहे. “गोरक्ष किमयागार” या अप्राप्य ग्रंथाच्या आधाराने धुंडिसुत मालू यांनी हा अद्भुत ग्रंथ सिद्ध केला आहे.
या ग्रंथाचे पारायण वेगवेगळ्या पद्दतीने केले जाते. बरेच लोक या ग्रंथाचे पारायण श्रावण महिन्यात करतात. तर बरेच भाविक या ग्रंथाचे दैनिक पारायण करतात. या ठिकाणी आम्ही “नवनाथ भक्तिसार”
पोथीतील सर्व ४० आध्याय त्यांच्या सुलभ मराठी सारांशा सह देत आहोत
नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ दिव्य अश्या चित्रमय कथांनी सजलेला आहे. या ग्रंथ वाचनाने ऐहिक उत्कर्ष आणि पारलौकिक कल्याण असे दोन्हीही हेतू साध्य होतात.याचा प्रत्यक्ष अनुभव अनेक श्रेष्ठ भक्तांना आला आहे.